Value investing and Behavioral Finance
Value investing and behavioral finance: Insights into Indian Stock Market Realities
Value investing and behavioral finance
Investment wisdom, Value investing, Trading tricks, Lectures, Seminars, Join our channel, Chart sites, Investment gurus ह्यांनी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया ओतप्रोत भरलेला आहे. प्रत्येक जागी जबरदस्त यशाची हमी, जगावेगळी रणनीती, हमखास परतावा इत्यादींची तोंडभरून केलेल्या जाहिराती दिसून येतात. पण कोणत्या मार्गाने किती रिटर्न मिळाला हे खरे सांगणारे कमीच असावेत किंवा कुणी सांगितलेला रिटर्न हा किती खरा किती खोटा हे तपासण्याची काही सोय नाही. त्यामुळे अशा गोष्टी नुसत्या ऐकण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसते. शेवटी कोणत्या इन्व्हेस्टमेंट पद्धतीचा आपल्याला कसा आणि किती फायदा झाला आणि कोणत्या पद्धतीने आपले किती नुकसान झाले हे ज्याचे त्यालाच चांगल्या प्रकारे ठाऊक असते.
सगळ्या क्लुप्त्या माहित असूनही एखाद्याला गुंतवणुकीत नुकसान कसे होऊ शकते? ह्याचे एक उत्तर ‘ झटपट फायद्याच्या इच्छेवर नियंत्रण नसणे’ हे असू शकते. Delayed gratification ही संकल्पना मला आवडते. जेव्हा कुणी Delayed gratification च्या विरुद्ध काम करतो तेव्हा त्याची greed जास्त असते आणि financial market मध्ये अशा वेळेस तो अडचणीत सापडतो.
Delayed gratification ला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो. Delayed gratification म्हणजे दीर्घकाळाने मिळणाऱ्या मोठ्या आणि जास्त टिकाऊ बक्षिसासाठी (more favorable reward at a later time) त्वरित मिळणाऱ्या छोट्या बक्षिसाच्या (immediate reward) आमिषाला बळी न पडणे म्हणजे होय. हे Delayed gratification म्हणजे आजच्या छोट्या आनंदाला पुढे ढकलणे सुरुवातीला कठीणच काम असते. पैशांच्या आणि गुंतवणुकीच्या क्षेत्राशिवाय ही संकल्पना अजूनही अनेक क्षेत्रात काम करते. ह्या गोष्टीला समजण्याअगोदर मी कित्येक चांगले शेअर्स छोट्या फायद्यात विकले होते.
Value investing and Behavioral Finance
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अशी मराठीत एक म्हण आहे. त्यालाच अनुसरून Value investing, Long term investment, Capital protection वगैरे वगैरे शब्द बोलणारे, बाजार लाल अंकात डुबकी मारताना ह्याउलट आचरण करताना दिसतात. म्हणजेच शब्द आणि कृती ह्यात फरक आढळतो. गर्दीपासून दूर होण्याची भीती आपल्याला crowd behavior चे अनुसरण करायला भाग पाडते.
आता ह्या सगळ्या विषयाला उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाकडे वळूया. Value Investing and Behavioral Finance: Insight into Indian Stock Market Realities हे लेखक पराग पारीख ह्यांनी लिहिलेले पुस्तक वाचकाला गुंतवणूक विषयात बऱ्याच खोलात घेऊन जाते. पराग पारीख ह्यांची लेखनशैली मला आवडून गेली. एक वाचक म्हणून मी जसे विस्तृत लिखाण अपेक्षित करतो तसे भेटल्यावर जसे समाधान होते ते मला हे पुस्तक वाचतांना जाणवले.
खऱ्या वाचकाला जसजसा वाचनाचा आनंद मिळत जातो तसतसा तो पुस्तकाचे पुढील पान उलगडत जातो. एक वाचक म्हणून मी जसे विस्तृत लिखाणाची अपेक्षा करतो त्याला आठवण ठेवून “पैसा मंत्र” ह्या Marathi Money Blog वरील बरेच लेख विस्तृत स्वरूपात लिहिले आहेत आणि ह्यातील बरेच लेख सर्च इंजिन द्वारे शीर्ष स्तरावर आहेत ह्याला वाचकांची पसंतीच म्हणावी लागेल.
Value investing and Behavioral Finance
एकूण 12 धड्यात लिहिलेल्या ह्या पुस्तकातील सामग्री बघूया.
1. Success and Failure
ह्या प्रकरणात सुरुवातीलाच लोक अयशस्वी का होतात? ह्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. अगोदरच्या काळापेक्षा अधिक माहिती ती सुद्धा सोप्या पद्धतीने उपलब्ध असतांना देखील लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी का होतात ? अर्थशास्त्र्यांच्या मते Economic failure साठी inability to delay gratification हे एक प्राथमिक कारण असावे.
Instant gratification आपल्याला अडचणीत आणू शकते. Instant gratification म्हणजे आता पैसे दिले तर आताच सेवा/वस्तू/परतावा पाहिजे. ह्यात लोक वेळेला शून्य महत्व ठेवतात. आज शेअर घेतला कि आज किंवा उद्याच वाढला पाहिजे ही अपेक्षा जेव्हा शेअरची किंमत घसरते तेव्हा निराशाच देणार.
ह्याउलट Delayed gratification म्हणजे त्वरित काहीतरी मिळवण्याच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे होय. Delayed gratification मी कित्येकदा वापरतो आणि ह्यामुळे बरेचदा आपल्या पैशांची बचत देखील होते. Impulse buying मुळे आपल्याला तात्काळ योग्य निर्णय घेणे कठीण होते पण ह्याला थोडा वेळ दिला कि मग आपण जास्त चांगल्या प्रकारे निर्णय घेतो असे काही कारण ह्यामागे असावे.
खरे तर, मानवी स्वभावाच्या नैसर्गिक गुणांमुळे मनुष्य हा मुळातच काही मिळवण्यासाठी त्वरित व सोप्या पद्धतीला महत्व देतो आणि सामान्यतः गोष्टी लवकर मिळाव्यात म्हणून तो प्रयत्नशील असतो. त्यामुळे ही गोष्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतांना तशी सामान्यच म्हटली पाहिजे. पण सगळेच जण अशा गोष्टी करतील तर मग ती गर्दीची मानसिकता -Herd mentality-होते.
गोष्टी सोप्या मार्गाने व लवकर मिळवणे ह्याचे दैनंदिन जीवनात खालील काही उदाहरणे पाहता येतील. Crash course साठी मोठी रक्कम भरून लगेच चांगला निकाल मिळण्याची अपेक्षा ठेवणे, नोकरी लागल्या-लागल्याच मोठी गाडी घेणे, जितके वेतन फक्त तेवढेच काम करण्याची मानसिकता, सोपे पण यशस्वी जीवनासाठी अनुपयोगी असणारे काम करणे; ह्याउलट कठीण पण यशस्वी जीवनासाठी उपयोगी काम न करणे वगैरे वगैरे.
2. Understanding behavioral trends
Equity market ला Volatile आणि Risky म्हटले जाते. ह्याउलट Fixed instruments ला Safe आणि Stable म्हटले जाते. पण जर Inflation factor विचारात घेतला तर Fixed हे जास्त Risky ठरू शकते. ह्यासाठी लेखकाने 1991 ते 2007 च्या दरम्यानचा Sensex चा परतावा दिला आहे.
Equity market मध्ये दोन प्रकारचे परतावे मिळू शकतात. एक तर कंपनीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे तिच्या कमाईत व पर्यायाने संपत्तीत झालेली वाढ; जी की Dividend वगैरे स्वरूपात दिसते आणि दुसरे Speculative म्हणजे लोकांच्या मतानुसार शेअरच्या किंमतीत झालेला बदल.
आपल्या शेअरची खरेदी किंमत ही त्या शेअरवरील परतावा किती हे ठरवते. जेवढी खरेदी किंमत कमी तेवढा भविष्यातील परतावा जास्त (सगळ्या गोष्टी वेळेनुसार व्यवस्थित चालल्या तर). पण Market, Greed आणि Fear च्या मध्ये झुलत असल्याने आपली शिस्त तेवढी महत्वाची ठरते.
3. Behavioral obstacles to value investing
ह्या प्रकरणात परत एकदा Behavioral finance हे Investing च्या क्षेत्रात कसे काम करते ह्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. Behavioral finance साठी Stocks to Riches हा लेख वाचता येईल. हरणारे शेअर्स जवळ ठेवतांना जिंकणारे शेअर्स विकणे हे Behavioral finance चा परिणाम आहे. Asset Allocation आणि Risk Aversion बद्दल लिहिताना लेखक म्हणतो, Asset Allocation म्हणजे गुंतवणूक कशी करावी? ह्याच्या सुद्धा अगोदर उचललेले पाऊल होय.
Asset Allocation म्हणजे काय हे वाचण्यासाठी Asset Allocation हा लेख वाचावा. ह्या प्रकरणात Value investing व Growth investing बद्दल सुद्धा बऱ्याच विस्ताराने लिहिलेले आहे. Value investing म्हणजे काय हे वाचण्यासाठी Value investing हा लेख वाचता येईल.
4. Contrarian Investing: The psychology of going against the crowd
Contrarian Investing हा एक माझा आवडता विषय आहे. Contrarian Investing अंमलात आणायला नक्कीच कठीण आहे, हे मी तरी अनुभवले आहे. हे जरी एकदम सोपे नसले तरी ह्यावर काम करताना आपण बऱ्याच गोष्टी शकतो.
एका शेअरमध्ये बऱ्याच दिवस मी चिकटून होतो पण तो अचानक घसरत असताना मी माझी धारणा सोडून त्यातून बाहेर पडलो आणि काही दिवसांनी तो पूर्व स्थितीला येऊन मग त्यात वरच्या दिशेने प्रगती झाली. त्याचा अभ्यास करून मग पुढे अशा स्थिती मला काही अंशी टाळता आल्या.
सगळेच चुकले तर मग आपली चूक आपल्याला चूक वाटत नाही तसेच एखाद्या जवळ असलेल्या एखाद्या शेअरची किंमत घसरली आणि बऱ्याच लोकांजवळ हा शेअर असला व त्यांचाही परतावा Negative असला कि मग कुणाला जास्त दुःख होत नसावे.
पण इतरांच्या नुकसानीमुळे आपल्या नुकसानाला काही योग्य म्हणता येणार नाही. त्यामुळे यशस्वी Contrarian investing कसे करावे? ह्याबद्दल हा धडा महत्वाचा वाटतो.
ह्या प्रकरणात Contrarian Investing म्हणजे काय? आणि ते अंमलात आणायला कसे कठीण आहे ह्यावर सविस्तर लिहिले आहे. Conventional vs Contrarian portfolio बद्दल विस्तृत स्वरूपात लिहिले आहे. जोडीला दोन portfolio चे 1995-96 ते 2005-06 मधील Average PE चे तुलनात्मक विश्लेषण दिलेले आहे आणि Contrarian portfolio चा परतावा कसा जास्त भरला हे स्पष्ट केले आहे.
5. Growth trap:
एखादी चांगली वाटणारी कंपनी ही चांगली गुंतवणूक आहे आणि ती पुढे वाढेलच असा ठाम विश्वास ठेऊन शेअर्स खरेदी करणे म्हणजे Growth trap होय. Benjamin Graham ने सुद्धा त्याच्या The intelligent investor ह्या प्रसिद्ध पुस्तकात सांगितले आहे कि एखाद्या कंपनीची Growth ही Investor च्या संपत्तीत देखील वाढ करेल हे जरुरी नाही. कंपनी वाढते पण त्याचे प्रतिबिंब गुंतवणूकदाराच्या फायद्यात दिसत नाही हा Growth trap बऱ्याच ठिकाणी आढळतो.
6. Commodity investing:
Commodity stocks लोक का विकत घेतात? आणि त्यासाठी काय Research करावा? Commodity cycles बद्दल लिहिले आहे. ह्या विषयात Behavioral finance चे महत्व मांडलेले आहे.
7. Public Sector Units मध्ये PSU company बदल इत्यंभूत माहिती दिली असून खाजगी कंपन्यांच्या growth story ने दिपून जाऊन तुलनेने PSU ला कुणी दुय्यम ठरवत असेल तर त्यांच्यासाठी हे प्रकरण वाचनीय ठरते. अनेक PSU कंपन्यांची growth story आणि त्यांनी दिलेले लाभांश प्रमाण बघितले तर असे PSU stocks आपल्या पोर्टफोलिओ मध्ये अवश्य असावेत असे वाटते.
8. Sector investing ह्या प्रकरणात sector investment ह्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. जो सेक्टर favorable आहे त्यातील कंपन्यात गुंतवणूक करणे व फायदा करून घेणे ही एक सर्रास आढळणारी रणनीती आहे. पण परत एकदा सगळेच जण जर एकाच रणनीतीवर काम करतील तर तर मग किती वाढ अपेक्षित असेल हा प्रश्न नक्कीच येतो.
9.Initial public offerings मध्ये मागील २ दशकापासून IPO चा performance काय? Investor ह्यातून काय धडा घेऊ शकतात? लोभ कसा अडसर ठरतो? हे स्पष्ट केले आहे. IPO Value investor साठी नाही कारण Value ही Bear market मध्ये मिळते व IPO हे Bull market मार्केट चे Product आहे.
10. Index investing:
ह्यात Index investing बद्दल भरपूर माहिती दिलेली आहे. Index investing काय आहे आणि गुंतवणूकदारांनी index investing का करावी हे काही उदाहरणांच्या मदतीने स्पष्ट केले आहे. Index investing बद्दल अधिक वाचण्यासाठी Index fund in marathi हा लेख वाचक वाचू शकतात.
11. Bubble trap:
Bubble म्हणजे बुडबुडा आणि बुडबुडा म्हटला कि तो कधीतरी फुटणारच. Stock market मध्ये Bubble का बनतो? आणि त्यात Behavioral finance ची कशी भूमिका असते? ह्यावर ह्या प्रकरणात भाष्य केलेले आहे. Bubble formation कसे ओळखावे? आणि गुंतवणूकदाराने ह्यातून काय धडा घ्यावा? हे सुद्धा लिहिले आहे.
अधिक आशावाद, गुंतवणूकदारांचा लोभ आणि अति आत्मविश्वास बुडबुड्याला कारणीभूत ठरतात. कुण्या शेअर्सच्या अति प्रेमात पडू नये हा ह्या प्रकरणातील मुद्दा मला आवडून गेला. Stocks to Riches ह्या पुस्तकात सुद्धा बुडबुडा कसा निर्माण होतो, वाढतो व फुटतो हे लिहिले आहे. गर्दीची मानसिकता बाजाराला Bull व Bear market बनवते. Stocks to Riches ची समीक्षा वाचण्यासाठी Investment book in marathi हा लेख वाचता येईल.
12. Investor behavior based finance: एखाद्या शेअरची किंमत ही त्या कंपनीची खरी Value नसते. शेअरची किंमत तर एक गुंतवणूकदारांच्या समजावर आधारित एक किंमत असते. गुंतवणूकदार जर त्या कंपनीवर आशावादी असतील तर ही किंमत वाढते आणि ह्याउलट जर अधिक आशावादी नसतील तर त्याची किंमत कमी होते.
गुंतवणूकदारांची भूमिका एखाद्या कंपनीसाठी महत्वाची असते. एखाद्या कंपनीचे प्रदर्शन जसे shareholders साठी महत्वाचे असते तसे shareholders सुद्धा कंपनीसाठी तेवढेच महत्वाचे असतात. त्यामुळे त्यांच्या वर लिहिलेले हे प्रकरण वाचकांना अधिक माहिती देऊन जाते.
सारांश: Value investing and Behavioral Finance
थोडक्यात Value investing and behavioral finance: Insights into Indian Stock Market Realities ह्या पुस्तकाचे वाचन मला बाकी कामांच्या गराड्यात बरेच दिवस पुरले. काही पुस्तके एकदा वाचून त्यातील मजकूर पूर्णतः लक्षात राहत नाही, कारण अशी पुस्तके दर्जेदार आणि विस्तृत लिखाणाने परिपूर्ण असतात.अशा पुस्तकांचे मध्ये मध्ये किंवा एखाद्या गुंतवणूक रणनीतीवर काम करतांना गरज पडल्यास वाचन करता येते.
Value investing and behavioral finance by Parag Parikh हे पुस्तक ह्याच पठडीतील आहे. McGraw Hill ने प्रकाशित केलेले Value investing and behavioral finance हे पुस्तक English भाषेत लिहिलेले आहे आणि आतील दर्जेदार मजकुराप्रमाणेच पुस्तकाची Hardcover बांधणी आणि Page quality सुद्धा उत्कृष्ट आहे.