Table of Contents
Investment diary म्हणजे आपण नोंद केलेल्या गुंतवणुकीची एक वही. Track all your investments in one place by writing investment diary regularly.
Investment Diary म्हणजे काय ?
डायरी म्हटले कि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दुकानात सजलेल्या अनेक वेगेवेगळ्या प्रकारच्या आकर्षक diary डोळ्यासमोर येतात आणि ह्या वर्षात तरी आपण काही तरी विशेष लिहू ह्या आशेने बरेच जण (मी सुद्धा) ती विकत घेतात. पण ‘नव्याचे नऊ दिवस’ ह्या म्हणीप्रमाणे डायरीची काही पाने भरली की मग अनेकांची ती डायरी कपाटात किंवा पुस्तकांच्या ढिगाखाली लपत जाते आणि मग परत एक नवे वर्ष येण्याची चाहूल लागते.
Investment Diary म्हणजे ज्यात आपण गुंतवणुकीच्या नोंदी ठेवतो ती वही. असे म्हटले जाते कि कि जे लक्ष्य लिखित स्वरूपात असते तेच मिळवता येते. जे लिहिले जात नाही त्या नुसत्या फिरत राहणाऱ्या काल्पनिक गोष्टी. इथे लक्ष्य ह्यासाठी म्हटले आहे कि जेव्हा आपण Investment diary बनवतो त्यात लक्ष्य आणि ते गाठण्यासाठी केलेल्या कृती ह्या दोन्ही गोष्टी सोबत सोबत लिहिल्या जातात.
My Investment Diary
मला चांगले आठवते, मी २००७ साली अशाच एका डायरीमध्ये -investment diary- गुंतवणुकीचे पहिले लक्ष्य लिहिले होते. ते होते ‘शेअर बाजारात १ लाख रुपये गुंतवणे’. तेव्हा मी नागपूरला माझा पहिला जॉब करत होतो आणि मी ५००० रुपये देऊन NFO द्वारे पहिला वाहिला म्युच्युअल फंड विकत घेतला होता. पण ते लक्ष्य काही पूर्ण झाले नाही आणि यथावकाश मी घेतलेला फंड सुद्धा विकला.
मग नवीन नोकरीमुळे दोन तीन शहरात जाणे झाले आणि काही SIP वगळता खर्च वगैरे होत राहिल्याने core investment विषय बाजूला राहला. ह्या सगळ्या धामधुमीत फक्त सुटले किंवा दुरावले नाही ते म्हणजे माझे वाचन. उलट माझा पुस्तकांवरचा खर्च वाढत गेला आणि जसजसे माझे पुस्तकांचे कपाट भरत गेले तशा तशा माझ्या नोंदवह्यासुद्धा वाढत गेल्या. त्या Investment diary म्हणजेच नोंदवह्या आजही मी मध्ये मध्ये वाचतो.
Investment Diary कशी लिहावी?
आता Investment Diary कशी लिहावी हा काही फार कठीण विषय नाही, तरीही मला उपयोगी वाटलेल्या लिखाण पद्धती ह्या लेखात लिहिल्या आहेत.
गुंतवणुकीचा हिशेब ठेवण्याच्या ह्या प्रवासात सुरुवातीला मला नेहमीच कठीण वाटणारी गोष्ट म्हणजे जी माहिती आपण लिहिली आहे ती नेमकी कोठे लिहिली आहे हे शोधणे किंवा आठवणे. कारण माहितीच्या ढिगामध्ये एखादी छोटी नोंद लगेच शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखे होय. ह्या गोष्टीत माझा बराच वेळ बरेचदा व्यर्थ गेला आहे.
सुरुवातीला एका वर्षात माझ्या २-3 डायरी संपत असत. दरमहा SIP ने केलेल्या गुंतवणुकी, त्याचे पूर्ण विवरण, घेतलेल्या विकलेल्या शेअरचे विवरण, झाला असेल तर फायदा नाहीतर बऱ्याच शेअरमध्ये झालेले काही नुकसान; अशी सांगोपांग माहिती त्यात लिहिल्या जायची. त्यातल्या त्यात वर्तमानपत्रातील आणि गुंतवणूक मासिकातील मार्गदर्शन आपल्या शब्दांत लिहिणे आणि नवीन गुंतवणूक कुठे करायला हवी त्याची माहिती सुद्धा त्याच डायरीत लिहिली जात असे आणि कालांतराने ती डायरी मग कपाटात इतर पुस्तकांच्या बोझ्याखाली पडून राहायची.
सुरुवातीला असे होणे काही नवीन गोष्ट नसावी, परंतु एके दिवशी मी ह्या अव्यवस्थितपणातून एक धडा घेतला. नवीन डायरी च्या सुरुवातीला index लिहिणे आणि संबंधित माहिती त्याच भागात लिहिणे पक्के केले. हेतू एकच- जुन्या नोंदी शोधतांना उगाच जास्तीचा वेळ जायला नको.
Some Tips for Writing Investment Diary
Investment diary लिहितांना किंवा tracking all investment at one place करतांना मला उपयोगी वाटलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे:
- सुरुवातीच्या काही पानांवर वेगवेगळे user id, passwords इत्यादी लिहिल्याने, विसरल्यास वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात.
- म्युच्युअल फंडाचे तीन-सहा महिन्याच्या printed statements चिपकवता येतील. NAVमध्ये जास्त बदल होत असतील तर असा फरक दर महिन्याला लक्षात ठेवून अतिरिक्त Buying करता येणे शक्य होते. SIP च्या तारखेला आलेले SMS पाहून अशी नोंद लगेच सुद्धा करता येते पण ह्यात सातत्य हवे.
- खूप साऱ्या शेअरमध्ये कमी कमी संख्येत वारंवार खरेदी विक्री केल्यापेक्षा ५०-१०० अशी संख्या ठरवून किंवा एका शेअरमध्ये ५ किंवा १० हजार अशी रक्कम ठरवून घेतली तर मग नोंदवहीत लिहायला व त्यावर लक्ष ठेवायला सोपे होते.
- मोठ्या डायरीशिवाय एक छोटी खिशातील डायरी जवळ बाळगल्यास त्यात बारीक सारीक नोंदी करता येतात ह्याच नोंदी मग मोठया डायरीत उतरवू शकतो.
- अतिरिक्त मिळालेल्या पैशांचा हिशेब ठवण्यासाठी एक वेगळा भाग अनुक्रमणिकेत समाविष्ट करावा. बोनस, पगारवाढ किंवा अजून काही मानधन वगैरे सारखी रक्कम दोन तीन विशिष्ट शेअरमध्ये, फंड मध्ये किंवा gold bond मध्ये गुंतवता येईल. असे केल्याने लांबच्या काळात असे मिळालेले पैसे कोठे गुंतले आहेत आणि त्याची वर्तमान स्थिती काय आहे हे लगेच समजून येते.
- Goal setting साठी एक भाग वेगळा असावा. ह्यात दर तीन महिन्याने लक्ष द्यावे. असे केल्याने आपल्याला भूतकाळातील आणि भविष्यकाळातील गुंतवणुकीमध्ये ताळमेळ बसवता येतो.
- मी सुरुवातीला बऱ्याच online website वर अशा नोंदी ठेवायचो पण कालांतराने त्यापेक्षा हाताने लिहिलेल्या नोंदी मला जास्त सोयीस्कर वाटल्या.
- Moneycontrol सारख्या website वर एकदा SIP ची तारीख, पहिली NAV अशी काही माहिती भरली कि मग भविष्यातील प्रत्येक सिप ची NAV व प्राप्त युनिट्स आपोआप update होत राहते. त्यात एकूण पोर्टफोलिओ आणि त्यात काय बदल झाला ते सुद्धा लगेच समजते. भूतकाळातील प्रत्येक महिन्याच्या गुंतवलेल्या रक्कमेत (SIP) फायदा आहे कि तोटा हे सुद्धा कोणत्याही दिवशी पाहता येते. त्यानुसार कोणत्या NAV च्या आसपास जास्तीची खरेदी करावी ह्याचा एक अंदाज येऊ शकतो. एखाद्या long term च्या म्युच्युअल फंड SIP साठी अशी tracking method उपयोगी असू शकते.
- एकंदर सगळ्या श्रेणीतील गुंतवणुकी एका जागी पाहण्यासाठी आपण स्वतः तयार केलेली Excel ची एक spreadsheet वापरू शकतो. ह्याला Investment at a glance असे नाव देता येईल. ह्या file ला दर तीन महिन्याने update करता येईल.
- एका वर्षात किती लाभांश मिळाला ह्यासाठी एक वेगळा विभाग डायरीत असावा. शेअरचे व म्युच्युअल फंडचे नाव , शेअरची संख्या किंवा MF युनिट्स किती होते? किती Dividend per share किंवा Per unit मिळाला हे लिहिता येईल. दर वर्षीच्या डायरीतून हा आकडा मिळाला कि मग किती वर्षात किती लाभांश मिळाला? त्याचे Dividend yield किती वगैरे गोष्टी समजू शकतात. वार्षिक रिटर्न मध्ये हा लाभांश जोडावा म्हणजे एकूण खरा रिटर्न किती हे समजून येईल.
Investment diary लिहितांना आपल्याला काय मुद्दे जास्त महत्वाचे वाटतात? टिप्पणी करून जरूर कळवा.
हे सुद्धा वाचा: Financial planning in marathi