Income tax कसा वाचवावा? How to save income tax?

मार्च महिना आला कि Income Tax हा शब्द इकडे तिकडे ऐकू यायला सुरुवात होते. सरकारी नोकरदारांच्या कार्यालयात वेगवेगळ्या कर बचतीचे फायदे सांगणाऱ्या आणि विविध कर बचत योजनांची विक्री करणाऱ्यांची वर्दळ वाढते आणि कसेही करून मार्च संपण्याच्या अगोदर कुठेतरी पैसे गुंतवून काहीतरी Income Tax वाचला असे म्हणून काही करदात्यांचा जीव भांड्यात पडतो.

how to save income tax

परंतु आपण नेमक्या कोणत्या कर बचत योजनेची निवड केली? किंवा ही योजना पुढे किती फायदेशीर आहे? ह्यावर काही कोणी जास्त चर्चा करताना दिसत नाही. बरेचदा एखाद्या कर बचत योजनेची विक्री करणारा व्यक्ती एकदा मार्च संपला की परत भेटणे ही दुरापास्त होते असा देखील बऱ्याच ग्राहकांचा अनुभव असतो.

अशी स्थिती टाळण्यासाठी कर बचतीच्या विभिन्न योजनांची किमान माहिती ठेवणे प्रत्येक करदात्याला गरजेचे ठरते.

कुणी नोकरदार असो किंवा व्यावसायिक; योग्य रीतीने Tax Planning केले कि बऱ्यापैकी पैसे वाचवू शकतो. भारतीय आयकर कायदा आपल्याला काही विशिष्ट कलमांखाली केलेल्या खर्चातून कर बचत करण्यासाठी परवानगी देतो.

ह्या कलमांपैकी सगळ्यांना एक बऱ्यापैकी ओळखीचे कलम म्हणजे Section 80 C. ह्या अंतर्गत जीवन विमा प्रीमियम, PPF, मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा ट्युशन खर्च, सुकन्या समृद्धी योजना, गृहकर्जाच्या मुद्दलीची परतफेड, ५ वर्षीय मुदत ठेव, समूह विमा योजना ,ELSS म्युच्युअल फंड इत्यादी आपल्याला ओळखीचे आहेत.

वर्तमान कर योजना आणि नवीन प्रस्तावित कर योजना

जुन्या Income tax नियमाखाली ह्या Section 80 C कलमाखाली जास्तीत जास्त दीड लाख रुपये आपण दाखवू शकतो. जुन्या नियमाखाली ह्यासाठी म्हटले कि ह्याच वर्षी म्हणजेच २०२० च्या अर्थसंकल्पात नवीन टॅक्स योजना पण जाहीर केली आहे. सध्यातरी (FY 2020-21) कुणी व्यक्ती दोनपैकी एका योजनेची स्वेच्छेने निवड करू शकतो.

नवीन योजनेमध्ये अशा कुठल्याही कलमाखाली आयकर वाचवण्याचे मार्ग नाहीत. त्याउलट सरसकट उत्पन्नावर काही विशिष्ट प्रमाणात कर लागेल. ह्यावर्षी कुणी ह्या दोन्ही योजनेद्वारे आपला आयकर किती लागेल ह्याची पडताळणी करून ज्या योजनेखाली कमी कर लागत असेल त्या योजनेची निवड करू शकतो. अशा निवडीची किमान ह्यावर्षी तरी मुभा आहे.

आपल्या उत्पन्नानुसार दोन्ही योजनेपैकी कशात किती कर लागेल ह्यासाठी आपण सरकारच्या income tax website वर तपासू शकता.

आरोग्य विमा प्रीमियम आणि कर बचत

ह्यानंतर Section 80D ह्या कलमाखाली कुणी आपल्यासाठी व आपल्या परिवारातील व्यक्तीसाठी घेतलेल्या Health Insurance च्या प्रीमियमला दर्शवू शकतो. ह्या प्रीमियमची रक्कम उत्पन्नातून आपण वजा करू शकतो. असा Health Insurance घेताना Individual किंवा Family Floater अशा पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करता येईल.

मात्र Health Insurance च्या योजनांची एवढी गर्दी आहे कि नेमका कोणता Health Insurance घ्यावा हे ठरवताना चांगलाच गोंधळ उडतो, असा किमान माझा तरी अनुभव आहे. त्यासाठी १-२ गोष्टी लक्षात घेतल्या तर फायदाच होईल जसे कि basic plan घ्यावा म्हणजे ज्यात बऱ्यापैकी मुख्य कामाच्या सगळ्या गोष्टी cover होतील.

  • २-३ हजाराच्या काही गोष्टी जशा daily cash benefit, Ambulance चा खर्च, इतर काही Fancy Expenditure स्वतःच्या खिशातून गेले तरी चालेल, म्हणजे प्रीमियमचा काही खर्च देखील कमी होईल आणि मुख्य उद्देश देखील साध्य होईल.
  • Room Rent पुरेसा असावा किंवा यावर capping नको, कारण काही policy मध्ये sum assured च्या 1% किंवा 2% एवढी रक्कम साठी निर्धारित असते त्यापेक्षा जास्त room rent दर असल्यास claim घेतांना त्याला काही गुणोत्तरात फरक पडू शकतो.
  • Health Insurance घेताना संबंधित व्यक्तीला ह्याबद्दल अगोदरच विचारणा करू शकतो. हा थोडा क्लिष्ट विषय आहे पण अगोदरच माहित असला कि वेळेवर गोंधळ उडत नाही.
how to save income tax

आयकर मध्ये सूट मिळवण्यासाठी खालील कलमांखाली गुंतवणूक /खर्च करून आयकर वाचवता येतो.

Section 80 C

  • Section 80CCA: ह्यामध्ये National Savings Scheme or payment to a deferred annuity plan ह्याचा समावेश होतो.
  • Section 80CCB: ह्यामध्ये Deduction in respect of investment made under Equity Linked Savings Scheme ह्याचा अंतर्भाव होतो. ह्या कलमाखाली कुणी Tax saving म्युच्युअल फंडची निवड करू शकतो. परत एकदा चांगल्या परताव्याची नोंद असलेल्या ELSS फंडची निवड करणे चांगले राहील. ह्याला तीन वर्षाचा Lock in period असतो आणि मिळणाऱ्या परताव्यावर income tax देय असेल. Dividend देणाऱ्या ELSS म्युच्युअल फंडचा देखील कुणी विचार करू शकतो, जेणेकरून नियमित अंतराने Dividend मिळत राहील आणि गुंतवलेल्या रकमेतील काही हिस्सा Lock in period च्या अगोदरच परत येईल. ही गोष्ट मला आवडून गेली.
  • Section 80CCC- Deduction  in respect of contribution to certain pension funds. ह्या Investment Product ची रचना निवृत्तीनंतर (Retirement) मिळणाऱ्या पेन्शन संबंधित आहे.
  • Section 80CCD- Deduction in respect of contribution to pension scheme of Central Government.
  • Section 80CCE-ह्या द्वारे Secion 80 C, Section 80 CCC आणि Section 80 CCD सगळ्या कलमांखालील एकूण दाखवलेली कपात दीड लाखाहून जास्त नसावी असे नमूद केलेले आहे.
  • Section 80 CCG-Deduction in respect of investment made under an equity savings scheme. ह्यानुसार नव्याने इक्विटी मध्ये गुंतवणूक करणारे व्यक्ती पात्र होतात.

Section 80 D

  • Section 80 DD- Deduction in respect of maintenance including medical treatment of a dependant who is a person with disability. ह्यानुसार आपल्यावर अवलंबित असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या (Disability) वैद्यकीय उपचारांबद्दल केलेल्या खर्चाला एकूण उत्पन्नातून वजा करता येते. ह्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे उपचारपत्र जरुरी असते.
  • Section 80 DDB- Deduction in respect of medical treatment, etc ह्यानुसार स्वतःवर किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या गंभीर आजारावरील वैद्यकीय उपचाराचा खर्च उत्पन्नातून वजा करता येतो. ह्यासाठी सुद्धा डॉक्टरचे Prescription जरुरी असते.

Section 80E

  • Section 80 E-Deduction in respect of interest on loan taken for higher education. स्वतःच्या किंवा परिवारातील जवळच्या सदस्यांसाठी उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या Educational Loan वर ह्या द्वारे कर बचतीचा फायदा घेता येतो.
  • Section 80EE-Deduction in respect of interest on loan taken for residential house property ह्याद्वारे घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर सूट मिळते. ह्यासाठी सीमा ५० हजार रुपये एवढी आहे.
  • Section 80EEB: Deduction in respect of purchase of electric vehicle इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास ह्या कलम अंतर्गत आयकर सूट प्राप्त करता येते ह्याची कमल मर्यादा १ लाख ५० हजार रुपये एवढी आहे.

Section 80G

  • Section 80 G: Deduction in respect of donations to certain funds, charitable institutions, etc धार्मिक संस्थाने तसेच काही संस्थांना दिलेली देणगी ह्याचा ह्या कलमात समावेश होतो.
  • Section 80GG: Deductions in respect of rents paid आपल्या एकूण उत्पन्नाच्या १० टक्क्यापेक्षा जास्त रक्कम जी RENTAL PAID स्वरूपात दिली असेल ती रक्कम ह्या कलमाअंतर्गत आयकर सूट घेण्यास उपयोगात येऊ शकेल.

Section 80 TTA: Deduction in respect of interest on deposits in savings account बचत खाते मधील मिळालेल्या व्याजासाठी ही सूट डे असते ह्याची कमाल मर्यादा रुपये दहा हजार एवढी आहे.

Income Tax टॅक्स वाचवण्यात ही काही कलमे उपयोगी आहेत. ह्याव्यतिरिक्त बाकी अनेक Section साठी इथे क्लिक करा.

आर्थिक वर्षाच्या शेवटाला घाई न करता Income tax च्या अशा अनेक Sections चा अभ्यास करत Tax Planning केली तर अशी Planning आपल्याला फायदाच करून जाईल अशी खात्री आहे.

हे सुद्धा वाचा: योजना आगामी आर्थिक वर्षाच्या

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!