The Compound Effect Book

The compound effect book

The Compound Effect Book Summary

The Compound Effect -Jumpstart your income, your life, your success. Author – Darren Hardy.

The Compound Effect Book in brief
  • कंपाऊंड इफेक्ट म्हणजे लहान, कमी महत्वाच्या वाटणाऱ्या कृतींमधून मोठे निकाल किंवा बक्षीस मिळवण्याची रणनीती. The compound effect is the strategy of reaping huge rewards from small, seemingly insignificant actions.
  • जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट/सवय मोजत नाही तोपर्यंत तुम्ही ती सुधारू शकत नाही. You cannot improve something until you measure it.
  • तुमच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची 100 टक्के जबाबदारी नेहमी स्वतः घ्या.Always take 100 % responsibility for everything that happens to you.
The compounding effect

The Compound Effect Book

गुंतवणूक (Investing) विषयात Compounding ह्या शब्दाचे महत्व काय आहे? हे वाचकांना वेगळ्याने सांगायची गरज नाही. छोटी वाटणारी गोष्ट दीर्घ काळात लक्षणीय बदल घडवते.

ह्या Compound Return सारखेच एक पुस्तक नुकतेच मी वाचले. डॅरेन हार्डी ह्यांनी लिहिलेले The Compound Effect हे ते पुस्तक.

नावाप्रमाणेच The Compound Effect ह्या पुस्तकात छोट्या छोट्या कृती, सातत्याने अंमलात आणल्याने, व्यवसाय आणि जीवनात, किती जबरदस्त परिणाम मिळू शकतात ? हे लेखकाने सांगितले आहे. मजेची गोष्ट ही आहे कि ह्या छोट्या कृती जर विकासाशी पूरक असतील तर जास्त विकास घेऊन येतात आणि आळस व कमी उत्पादनक्षम सवयींशी निगडित असतील तर जास्त नुकसान घेऊन येतात.

कदाचित हे सगळे होत असतांना बऱ्याच लोकांना आपल्याला असे निकाल (चांगले किंवा सुमार दर्जाचे) का मिळत आहेत ह्याचे अचूक कारण देखील कळत नसावे.

नेमके हेच कारण समजण्यासाठी The Compound Effect Book हे पुस्तक महत्वाचे ठरते.

The Compound Effect Book

पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक संदेश लिहिला आहे, No matter what you learn, what strategy or tactic you employ, success comes as the result of the Compound Effect.

159 पानांच्या ह्या पुस्तकात एकूण सहा प्रकरण आहेत.

  • Chapter 1: The COMPOUND EFFECT in Action
  • Chapter 2: Choices
  • Chapter 3: Habits
  • Chapter 4: Momentum
  • Chapter 5: Influences
  • Chapter 6: Acceleration

पुस्तक सुरु करण्याअगोदर लेखक परिचय मध्ये (Introduction) लिहितो कि मागील 40 वर्षांपासून मी व्यवसाय, सफल व्यावसायिक, यश, यशासाठी आवश्यक असणाऱ्या मानवी सवयी इत्यादींचा अभ्यास करत आहे. मी हजारो रुपये मोजून आणि रोज दिवसातील कित्येक तास घालवून ह्या सगळ्या गोष्टींवर काम केले आहे.

परिणामाअंती मला हेच समजले कि तुम्ही काहीही करत असाल, कितीही नाना प्रकारच्या युक्त्या करत असाल; तुम्हाला यश मिळते ते फक्त तुमच्या विचारांच्या आणि कृतीच्या Compounding Effect मुळेच.

लेखक पुढे लिहितो कि तुम्हाला यशासाठी नवीन माहितीची गरज नाही; तुम्हाला गरज आहे ती कृती करण्याच्या नवीन योजनेची.

The Compound Effect Book

The compounding effect

प्रकरण 1: The COMPOUND EFFECT in Action

बरेच लोक Compound effect च्या साध्या सोप्या नियमाला कमी समजतात.

जसे कि आठ दिवस पळण्याचा व्यायाम केल्यानंतर काही निकाल न दिसल्यास ते हा क्रम बंद करतात.

हे लोक विसरतात कि त्यांच्या लहान आणि नियमित क्रिया लांब वेळपर्यंत करत राहल्यास त्यांच्यात लक्षणीय बदल होईल.

Small, smart choices + Consistency + Time = RADICAL DIFFERENCE

ह्या प्रकरणातील तीन मित्रांची गोष्ट मला आवडून गेली. तीनही मित्र सोबतच लहानाचे मोठे झाले आहेत. सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुद्धा सारखीच.

तिघांनाही जवळसपास सारख्याच कमाईची नोकरी लागते आणि एकंदर तिघेही सारख्या स्थितीत असतात.

पहिला मित्र Larry आरामात जगतो. तो सगळे तेच करतो जे रोज करतो. कधी काही बदलत नाही अशी तक्रार करतो.

दुसरा मित्र Scott लहान-लहान चांगल्या सवयी लावून घेतो. तो रोज पुस्तकाची दहा पाने वाचतो. प्रेरणादायी वक्त्यांना ऐकतो किंवा माहितीपूर्ण वाचन करतो. व्यायामासाठी काही मिनिटे वेगळे काढतो. वगैरे वगैरे…

तिसरा मित्र Brad काही साधारण सवयी लावून घेतो. त्याने नुकताच एक मोठा दूरदर्शन संच विकत घेतला आहे, जेणेकरून तो आपले आवडते कार्यक्रम जास्तीत जास्त बघू शकेल.

आणि हो त्याने आपल्या घरीच एक छोटा बार सुरु केला कि ज्यामुळे तो आठवड्याच्या शेवटी कामाच्या व्यापातून थोडा दूर राहून काही आनंद घेऊ शकेल.

जास्त काही नाही फक्त तो आपल्या जगण्यात थोडे निवांत राहू इच्छितो.

The Compound Effect Book

पाच महिन्यानंतरही तिघांच्याही स्थितीत काही बदल दिसत नाही. दहा महिन्यांच्या काळानंतर सुद्धा लक्षणीय असा काही बदल दिसत नाही.

Larry त्याच गोष्टीत मग्न असतो. Scott ने आतापर्यंत काही पुस्तके वाचली असतात आणि काही चांगल्या सवयींवर त्याचा अभ्यास सुरु असतो. Brad देखील त्याच्या सवयींप्रमाणे जगत आनंद घेत असतो.

पण 25व्या महिन्यानंतर बदल दिसायला लागतो. 27 व्या महिन्यानंतर मोठा बदल जाणवतो आणि 31 व्या महिन्यानंतर जबरदस्त बदल नजरेस पडतो.

Brad लठ्ठ दिसतो तर Scott सडपातळ होतो. त्याचे वजन देखील प्रमाणात येते. Larry हा अगोदर जसा होता तसाच असतो; फक्त आता तो अधिक कंटाळतो.

Brad ने थोड्या थोड्या Calories वाढवत Scott पेक्षा बरेच जास्त वजन वाढवले असते.

Scott ने हजारो तास पुस्तके व नवीन ज्ञान मिळवण्यात गुंतवलेले असतात ते आता त्याला अधिक बढती मिळवून द्यायला मदत करू लागतात.

Larry मध्ये फार काही बदल घडत नाहीत.

ह्या कथेचा संदेश सरळ आहे. Compound Effect चा उपयोग कुणी आपल्या फायद्यासाठी करून घेतला तर जास्त फायदा होतो. कुणी त्याचा वापर नुकसानीच्या दिशेने केल्यास जास्त नुकसान होण्यास सुरु होते.

एका निश्चित काळानंतर Compound Effect चा योग्य वापर करणाऱ्या व्यक्तीला Overnight success मिळू लागते. ही वस्तुतः Overnight success नसते तर लहान लहान कार्यांना नियमित करत गेल्याने मिळणारे हे बक्षीस असते.

The compounding effect
प्रकरण 2: Choices

आपल्या निवडी आपल्याला प्रगती करण्यास मदत करतात किंवा कोणत्यातरी प्रकारचे नुकसान करण्यात देखील कारणीभूत ठरतात.

आपल्या निवडी आपले चांगले मित्र असतात आणि खराब शत्रू देखील असतात.

You make your choices and then your choices make you.

Luck is when opportunity meets preparation.

The complete formula for getting lucky: Preparation + Attitude + Opportunity + Action = Luck

ह्या प्रकरणात वरील सगळ्या गोष्टीवर लिखाण केले गेले आहे.

The Compound Effect Book

प्रकरण 3: Habits

हे प्रकरण सवयी कशा काम करतात ह्यावर आहे. ह्याच विषयावर मी आणखी काही पुस्तके वाचली आहेत.

Atomic habit by James Clear आणि Power of Habit by Charles Duhigg ही पुस्तके ह्याच विषयावर बरीच प्रभावशाली आहेत.

पैसा मंत्र ह्या Marathi Money Blog वर अशाच एका पुस्तकाची समीक्षा अगोदर लिहिल्या गेली आहे. वाचा: Mini habits book in marathi 

ह्याच विषयाशी थोड्या दुरून Who moved my cheese? हे पुस्तक सुद्धा संबंधित आहे.

प्रकरण 4,5 आणि 6: Momentum, Influences and Acceleration

“A journey of a thousand miles begins with one step” हे वाक्य आपण वाचले असेलच. Momentum चे सुद्धा असेच आहे.

It starts slow before it picks up steam.

The hardest part of momentum is the beginning. 

Influence: तुमचे मार्गदर्शक कोण? Garbage in, garbage out हे वाक्य लक्षात ठेवा.

Acceleration: Common things deliver common results. Do better than expected.

The compounding effect

The Compound Effect Book

थोडक्यात THE COMPOUND EFFECT हे पुस्तक जरी छोटे असले तरी दर्जेदार माहितीने परिपूर्ण आहे. THE COMPOUND EFFECT फक्त हे एक पुस्तक जरी कुणाच्या विकासात मार्गदर्शक सिद्ध झाले तरी त्यात नवल नसावे.

हे पुस्तक इंग्रजी हिंदी व मराठी भाषेत उपलब्ध आहे.

the almanack of naval ravikant summary

The Almanack of Naval Ravikant Summary

The Almanack of Naval Ravikant Summary

The Almanack of Naval Ravikant Summary

काही दिवसांपूर्वी मी The Almanack of Naval Ravikant: A Guide to Wealth and Happiness हे पुस्तक वाचून संपवले आणि ते मला एवढे आवडले कि त्याची एक प्रत परत बोलावून मी एका स्टार्टअपशी संबंधित अधिकाऱ्याला ते भेट म्हणून दिले.

Eric Jorgenson द्वारा लिखित हे पुस्तक नवल रविकांत ह्या भारतातून अमेरिकेत गेलेल्या उद्योजकावर लिहिलेले आहे. सुरुवातीला Naval शीर्षक पाहून मला वाटले कि हे पुस्तक कुण्या नौदलाच्या अधिकाऱ्यावर आधारित असेल. पण ते नेव्हीशी संबंधित नसून नवल ह्या नावाने होते हे मला वाचनानंतर कळले. ह्या पुस्तकाची Tagline ‘A guide to wealth and happiness’ ही आहे त्यामुळे मला ह्याबद्दल जास्त कुतूहल निर्माण झाले होते. पैसे आणि wealth ह्यात फरक आहे आणि happiness हा अजूनच एक वेगळा विषय आहे की ज्याबद्दल पैशांच्या पुस्तकात फारसे लिहिले नसते ( माझ्या अल्प वाचनातील काही पुस्तके वगळता).

वाचनाअंती ह्या पुस्तकाचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवले. ह्या पुस्तकाचे मला भावलेले एक अजून वेगळेपण म्हणजे हे पूर्ण पुस्तक वाचनासाठी इंटरनेट वर अगदी मोफत उपलब्ध आहे.

The Almanack of Naval Ravikant Summary

आपल्या यशाला कारणीभूत असलेल्या गोष्टी बरेच जण लोकांना सांगत नाहीत. ह्या पुस्तकात मात्र नवल रविकांत स्पष्टच सांगतात की ‘यशस्वी होण्यासाठी मला ज्या गोष्टी कामी आल्या त्या मी नेहमीच लोकांशी सामायिक करत होतो मात्र मी यशस्वी होण्याअगोदर बरेच लोक त्या गोष्टींकडे कानाडोळा करायचे’. ह्या पुस्तकात नवल रविकांतचे अनेक छोटे पण परिणामकारक वाक्य लिहिलेले आहेत. प्रचंड पैसे येऊनही त्याचा अजिबात गर्व नसून लोकांच्या विकासासाठी सहाय्यक गोष्टीबद्दल प्रस्तुत पुस्तकात सविस्तर चर्चा केलेली आहे.

Timeline of Naval Ravikant

Naval Ravikant ह्यांचा जन्म दिल्ली येथे १९७४ मध्ये झाला आणि वयाच्या नवव्या वर्षी १९८५ मध्ये कुटुंबासहित ते दिल्लीहून Quuens, Newyork ला गेले. २५ ते ३४ वर्षाच्या वयात त्यांनी काही startup, company स्थापन केल्या. ३४ व्या वर्षानंतर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये Investment केली आणि २०१८ मध्ये ४३ व्या वर्षी ‘Angel Investor of the Year” हा अवॉर्ड मिळाला.

नवल ह्यांच्या भाषेत Single parent कुटूंबामुळे त्यांच्या आईने त्यांना आणि त्यांच्या भावाला वाढवले. आई शाळेत काम करत असे आणि दोन्ही भाऊ दरवाजा बंद असलेल्या घरात हळहळू मोठे झाले. नवल रविकांत म्हणतात “ते कठीण असे दिवस होते पण प्रत्येकालाच कठीण परिस्थितीतून जावे लागते आणि हीच कठीण परिस्थिती मला अनेक मार्गानी पुढे सहाय्यक ठरली”. ह्यातील कठीण परिस्थितीला सकारात्मक दृष्टीने घेत नवल ह्यांनी तेव्हाच आपल्या यशाचा पाया घातला होता असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

The Almanack of Naval Ravikant Summary

शाळा सुटल्यावर नवल सरळ पुस्तकालयात जात आणि ते बंद होईपर्यंत तिथेच बसून असत. हे त्यांचे दैनंदिन वेळापत्रक असे. ते सांगतात, ‘New York मध्ये नवीन असल्याने माझे कुणी मित्र नव्हते. फक्त पुस्तके माझे खरे मित्र होते. पुस्तके खरंच चांगले मित्र असतात. कारण मागील काही शतकातील सर्वोत्तम असे लोक आपले शहाणपण पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला सांगत असतात.’ हा उतारा वाचल्यावर एवढा यशस्वी व्यावसायिक आणि गुंतवणूकदार पुस्तकांप्रती किती कृतज्ञ आहे हे जाणून लेखकाप्रती माझा आदर अजूनच वाढला. पुस्तकांच्या अशा महत्वाबद्दल पैसा मंत्र – मराठी Money Blog वर लिहायला मला नेहमीच आवडते.

लेखकाचा व्यवसाय (Startups, Business) आणि गुंतवणूक (Investment) विषयातील इतका दांडगा अनुभव असूनदेखील लेखक हे स्पष्ट सांगतो कि ‘मी शिकलेले काही तत्व आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. मी तुम्हाला काही शिकवू शकत नाही. मी फक्त तुम्हाला प्रेरित करू शकतो.’ हे देखील तेवढेच खरे आहे. पाण्यात पडल्याशिवाय पोहोता येत नाही अशी म्हण इथे सार्थ ठरते. Think and Grow Rich ह्या लेखात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपली स्वतःची किती तयारी आहे ह्यावर पुढील यश हे कसे अवलंबून असते ह्याबद्दल लिहिले आहेच. वाचक त्याबद्दल Think and Grow Rich हा लेख वाचू शकतात.

पुस्तक दोन भागात विभागलेले आहे.

Wealth आणि Happiness


Wealth ह्या भागात संपत्ती कशी निर्माण होते ह्याबद्दल लेखक लिहितो की ‘कठीण परिश्रम करणे महत्वाचे असते, पण फक्त कठीण परिश्रमच करणे तुम्हाला श्रीमंत बनवत नाही. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे?, कुण्या व्यक्तींसोबत केले पाहिजे? आणि कधी केले पाहिजे? हे माहित असायला हवे.’
नवल रविकांत पुढे लिहितात की ‘जर तुम्हाला अजूनही हे माहित नसेल कि काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम ते निश्चित करा. जर तुम्ही स्वतः नेमके काय करायला पाहिजे ह्याबद्दल निश्चित नसाल तर कठीण परिश्रम करण्याला काही महत्व उरत नाही.’

The Almanack of Naval Ravikant Summary

सारांश

The Almanack of Naval Ravikant Summary

नवल रवीकांतच्या छोट्या छोट्या वाक्यांनी मला खूपच प्रभावित केले. उदाहरणादाखल मूळ इंग्लिश भाषेतील काही वाक्य पाहूया.

  • Seek wealth, not money or status. Wealth is having assets that earn while you sleep.
  • You are not going to get rich renting out your time. You must own equity-a piece of a business- to gain your financial freedom.
  • You will get rich by giving society what it wants.
  • Pick business partners with high intelligence, energy and above all, integrity.
  • Learn to sell. Learn to build. If you can do both, you will be unstoppable.
  • When specific knowledge is taught, it is through apprenticeships, not schools.
  • There are no get rich quick schemes. Those are just someone else getting rich off you.

ह्यातील दोन वाक्ये तर मला खूपच आवडून गेली ती म्हणजे.

  • Earn with your mind and not your time.
  • If they wrote it to make money, don’t read it.

Happiness ह्या दुसऱ्या भागात सुरुवातीलाच लिहिले आहे The three big ones in life are wealth, health, and happiness. We pursue them in that order, but their importance is reverse. हे वाचून तर वाह! वाह! असे शब्द तोंडातून न निघतील तर नवलच.

ह्या भागातील लिखाण एखाद्याच्या सद्यस्थितीतील विचारांना नक्कीच आव्हान देईल. जसे कि

  • Happiness is being satisfied with what you have.
  • The greatest superpower is the ability to change yourself.
  • Desire is a contract you make with yourself to be unhappy until you get what you want.

Happiness is the absence of desire. Happiness is our choice. आनंदी राहणे ही आपली निवड आहे जो आनंदी राहण्याची निवड करत नाही तो कोठे ना कोठे कमी काढून दुःखी होईलच. ह्या भागात आरोग्याबद्दल सुद्धा लिहिलेले आहे.

नवल रविकांत ह्यांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे If they wrote it to make money, don’t read it ह्या आपल्या शब्दाला जागत The Almanack of Naval Ravikant: A Guide to Wealth and Happiness हे दर्जेदार पुस्तक हौशी वाचकांसाठी इंटरनेटवर अगदी मोफत उपलब्ध करून दिलेले आहे.

हे पुस्तक मराठी भाषेत सुद्धा अनुवादित आहे,

पण मी मूळ भाषेत म्हणजेच English मध्ये वाचलेले आहे. मला छापील पुस्तके वाचण्याची जास्त आवड असल्यामुळे मी हे पुस्तक Print स्वरूपात Amazon वरून खरेदी केलेले आहे.

Think and Grow Rich

think and grow rich

Think and Grow Rich is the famous book written by Napoleon Hill.

Think and Grow Rich म्हणजेच सोचिये और अमीर बनिये हे पुस्तक पहिल्यांदा मी 2004-2005 मध्ये वाचले असावे. Manjul Publication चे निळ्या चमकत्या कव्हरचे हे पुस्तक आजही माझेजवळ आहे. हे पुस्तक हिंदी भाषिक पुस्तकांमध्ये माझे दुसरे तिसरे पुस्तक असावे.

व्यक्तिमत्व विकासाच्या पुस्तकांचे वाचन करतांना सुरुवातीलाच मला ह्या उत्कृष्ट पुस्तकाचे वाचन आणि मनन करण्याचे भाग्य मिळाले. भाग्य ह्यासाठी कारण हे प्रसिद्ध पुस्तक जगभरात आजही Personality Development च्या क्षेत्रात उत्कृष्ट मानले जाते. 1937 मध्ये झालेल्या पहिल्या प्रकाशनानंतर तब्बल ८५ वर्षानंतर देखील यश व संपत्तीबद्दल लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीला एक व्यवस्थित आकार देण्यात हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर प्रभावशाली आहे.

ह्या पुस्तकाबद्दल मला कुणी जर अभिप्राय विचारला तर मी फक्त ‘Must Read’ हे दोनच शब्द म्हणेल. माझ्या विचारांना सुरुवातीला कलाटणी देणारे तीनच पुस्तके मला आज आठवतात. ते म्हणजे Rich Dad Poor Dad, The Magic of Thinking Big आणि Think and Grow Rich.

Think and Grow Rich ह्या पुस्तकाला मी तेव्हा दोन तीनदा वाचले असावे. तेव्हा असे जाणवायचे कि पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी आणि आपण बघत असलेले जग हे अगदी विरुद्ध आहेत आणि पुस्तकातील सगळेच काही जसेच्या तसे काम करत नसावे. पण जसजसा वेळ गेला आणि इतर अनेक पुस्तकांनी मी समृद्ध होत गेलो तसतसे ह्या पुस्तकाचे महत्व मला जाणवत गेले आणि म्हणूनच मी ह्या पुस्तकासाठी ‘Must Read’ हे शब्द वापरतो.

कोळ्याचे जाळे कसे अनेक धाग्यांनी अनेक दिशांनी विणलेले असते आणि म्हणूनच सगळ्या धाग्यांच्या संतुलनामुळे ते आपल्या कामासाठी अधिक परिणामकारक ठरते. तसेच एका एका विषयाचे एकापेक्षा जास्त पुस्तके वाचत गेल्यास प्रत्येक पुस्तकाचा अधिक अधिक फायदा होऊन त्या वाचनाचा आपल्या विचारांवर अत्याधिक आणि टिकाऊ प्रभाव होत असावा.

ह्या पुस्तकाचे जर नाव आपण वाचले तर Think and Grow Rich विचार करा आणि श्रीमंत व्हा हे आहे. ‘पैसे गुंतवा आणि श्रीमंत व्हा’ असे नाही किंवा ‘काम करा आणि श्रीमंत व्हा’ असे सुद्धा नाही. यशस्वी होण्यासाठी माझेजवळ ‘हे नाही किंवा ते नाही’ अशा वाक्यांना आपल्या बोलण्यात स्थान देणाऱ्या सगळ्यांनाच हे पुस्तक एक मंत्र शिकवते. तो म्हणजे सफलता किंवा श्रीमंती ही विचारांवर अवलंबून असते. हेन्री फोर्ड साहेबांचे एक वाक्य आहे. Thinking is the hardest work there is, which is probably the reason why so few engage in it. म्हणूनच यशस्वी लोक आपल्या विचारांना एवढे महत्व देत असावेत.

think and grow rich

Think and grow rich

प्रस्तावनेत प्रकाशकाने लिहिले आहे कि ‘हे पुस्तक व्यक्तिगत सफलतेवर लिहिलेल्या त्या अनेक प्रभावी पुस्तकांपैकी एक आहे कि जे आपल्याला आर्थिक स्वतंत्रता कशी मिळवावी हे सांगते आणि सोबतच अशी समृद्धी देखील कि जी पैशांच्या मोजपट्टी (scale) वर मोजू शकत नाही.’ लेखकाने ह्या पुस्तकाबद्दल स्वतःचे शब्द लिहितांना म्हटले आहे कि ‘सगळी उपलब्धी आणि सगळ्या कमावलेल्या संपत्तीची सुरुवात एका विचारापासून होते.’

लेखकाच्या दाव्यानुसार ह्या पुस्तकाची प्रेरणा लेखकाला Andrew Carnegie ह्यांनी त्यांच्या व्यक्तिगत उपलब्धीच्या सूत्रांनी दिली होती. कार्नेगी हे एक अतिश्रीमंत अमेरिकन उद्योगपती होते. आपल्या सूत्रांवर काम करून कार्नेगी ह्यांनी स्वतःला तर अरबपती बनवलेच; सोबत त्या अनेक लोकांना देखील ज्यांना Carnegie ह्यांनी त्यांचे रहस्य शिकवले. लेखकाच्या दाव्यानुसार अजून 500 श्रीमंत लोकांनी आपल्या श्रीमंतीचे रहस्य लेखकाला सांगितले आणि लेखकाने आपले जीवन हे रहस्य लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून ह्या पुस्तकाच्या निर्मितीत समर्पित केले.

Think and Grow Rich हे पुस्तक Andrew Carnegie (1835-1919) ह्यांच्या मृत्यूनंतर 1937 साली लिहिले गेले आहे आणि जरी Andrew Carnegie व Napoleon Hill ह्यांची भेट झाली होती कि नाही ह्याची खात्रीलायक काही बातमी internet वर नसली तरी त्यामुळे ह्या पुस्तकाची ताकद कमी होत नाही.

ह्या पुस्तकात अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आणि सफल व्यक्तींबद्दल लिहिले आहे. माझ्या जवळ असलेल्या पुस्तकातील मी रेखांकित केलेल्या वाक्यांपैकी काही काही वाक्य खाली दिले आहेत.

Think and grow rich

प्रकरण एक: विचार ही वस्तु है
  • जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी खरंच तयार होतो तेव्हा ती गोष्ट मिळतेच.
  • संपत्ती येण्याची सुरुवात ही मानसिक स्तरावर लक्ष्याची निश्चिती केल्यानंतर होते.
  • यश हे त्यांनाच मिळते की जे त्याबद्दल जागृत असतात.
प्रकरण दोन: इच्छा

कोणत्याही उपलब्धी साठी महत्वपूर्ण म्हणजे इच्छा. नुसती इच्छा नको, प्रबळ इच्छा हवी. ह्या प्रकरणात प्रबळ इच्छेला संपत्तीत बदलण्यासाठी सहा उपाय दिले आहेत. हे उपाय खरंच खूप परिणामकारक आहेत. निश्चित इच्छा किंवा रक्कम कशी ठरवावी आणि त्यासाठी निश्चित वेळेची सीमा सुद्धा का हवी? ह्याबद्दल विस्तृत लिहिले आहे.

प्रकरण तीन:आस्था

ह्या धड्यात अवचेतन मनाची शक्ती आणि आत्मविश्वासाचे सूत्र ह्यावर सविस्तर लिहिले गेले आहे. ह्यातील एका लांब कवितेचे शेवटचे वाक्य मला आवडून गेले.

“जीवन के युद्ध में हमेशा वही नहीं जीतता जो सबसे ताकतवर या तेज होता है, बल्कि जल्दी या देर से जीतता वही है जो सोचता है की वह जीत सकता है!”

प्रकरण चार: आत्मसुझाव
  • Autosuggestion कसे द्यावे आणि त्याचा अवचेतन मेंदूवर कसा परिणाम होतो?
  • एकाग्रतेच्या शक्तीचा कसा उपयोग करावा?
  • अवचेतन मेंदूला प्रेरित करण्याचे उपाय
प्रकरण पाच: विशेषज्ञीय ज्ञान

खूप लोक म्हणतात के ‘ज्ञान शक्ती आहे.’ पण हे पूर्णतः खरे नाही. ज्ञान हे केवळ संभावित शक्ती आहे. ज्ञान शक्ती तेव्हाच बनते जेव्हा त्याचा कोणत्यातरी निश्चित योजनेत किंवा निश्चित लक्ष्य प्राप्तीसाठी उपयोग केला जातो. विशेष ज्ञान ह्याबद्दल मी नुकतेच एका पुस्तकात (The Almanack Of Naval Ravikant: A Guide to Wealth and Happiness) सविस्तर वाचले आहे. त्या पुस्तकाची चर्चा कधीतरी होईलच. Think and Grow Rich पुस्तकातील ह्या प्रकरणाचा मला दुसऱ्या पुस्तकातील विशेष ज्ञानावर सविस्तर लिहिलेल्या माहितीला सोपी करून समजण्यासाठी उपयोगच झाला.

प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्या क्षेत्राशी संबंधित विशेष ज्ञान मिळवत राहतात. विशेष ज्ञान मिळवत राहण्याची ही क्रिया कधी संपत नाही. दुसरीकडे हजारो लोक हे समजतात की एकदा शाळा महाविद्यालय झाले कि शिकण्याची प्रक्रिया बंद होते.

प्रकरण सहा: कल्पना
  • मनुष्य जिस चीज की कल्पना कर सकता है, उसकी रचना भी कर सकता है। पैसामंत्र Marathi Money Blog वर कोणत्यातरी लेखात लिहिलेल्या ‘आपल्या योजनेला लिहून त्यावर काम करण्याचे महत्व’ मी ह्याच प्रकरणातून शिकलो होतो.
  • सुरुवातीला तुम्ही आपल्या विचारांना जपता, त्यांचे संरक्षण करता, त्यांना वाढवता, मार्गदर्शन देता. मग हे विचार स्वतः शक्तिशाली बनतात आणि आपल्या रस्त्यातील सर्व अडथळ्यांना हटवतात.
इतर प्रकरणे:

प्रकरण सात ते पंधरा मध्ये सुव्यवस्थित योजना बनवून इच्छेला कार्यात कसे रूपांतरित करावे?, निर्णय कसा करावा? चालढकल करण्याच्या सवयींवर मात करण्याचे उपाय, लक्ष्य मिळवण्यासाठी आवश्यक निरंतर प्रयत्न कसे महत्वाचे आहेत, Master Mind म्हणजे इतर उपयोगी लोकांच्या समूहाची शक्ती; इत्यादींवर अनेक गोष्टींच्या साहाय्याने विस्ताराने लिहिले आहे.

सारांश:

इतर अनेक पुस्तकांच्या समीक्षेसारखेच ह्या पुस्तकाला देखील माझे Five star असले तर नवल नाही. जगात एकाहून एक सरस पुस्तके लिहिल्या गेली आहेत आणि मी वाचलेल्या काही थोडक्या पुस्तकांच्या यादीत Think and Grow Rich आपले महत्व तेवढेच टिकवून आहे असे माझे मत आहे.

हे पुस्तक यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांसाठीच एक प्रारंभिक स्तराचे पुस्तक आहे. समजेल अशी सोपी भाषा, वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टींतून सहजच मिळणारी मोलाची शिकवण ह्या सगळ्यांचा विचार करून कोणत्याही क्षेत्रात श्रीमंत (म्हणजेच आत्मविश्वास, निर्णयक्षमता, लक्ष्य निर्धारण आणि त्याला गाठणे, संपत्तीअर्जन इत्यादी इत्यादी) होण्यासाठी हे पुस्तक आवश्यक म्हणावे लागेल.

मी Think and Grow Rich सोचिये और अमीर बनिये हे पुस्तक Manjul Publication चे हिंदी भाषेत वाचलेले आहे. मी काही दिवस भोपाळ ला राहलेलो असल्याने आणि Manjul Publication तिथेच असल्याने अशा पुस्तकांची उपलब्धता तेथे नेहमीच असायची.

शिवाय Manjul Publication ची हिंदी भाषा (सहसा अनुवादक डॉ सुधीर दीक्षित व रजनी दीक्षित) मला खूपच आवडते. ह्या लेखकांनी अनुवादित केलेली पुस्तके मी डोळे बंद करून विकत घेतो असे म्हटले तरी चालेल. सध्या हे मराठीत सुद्धा भाषांतरित दिसत आहे.

हे सुद्धा वाचा: आवडत्या पुस्तकातील पैशांच्या गोष्टी

Value investing and Behavioral Finance

value investing and behavioral finance

Value investing and behavioral finance: Insights into Indian Stock Market Realities

Value investing and behavioral finance

Investment wisdom, Value investing, Trading tricks, Lectures, Seminars, Join our channel, Chart sites, Investment gurus ह्यांनी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया ओतप्रोत भरलेला आहे. प्रत्येक जागी जबरदस्त यशाची हमी, जगावेगळी रणनीती, हमखास परतावा इत्यादींची तोंडभरून केलेल्या जाहिराती दिसून येतात. पण कोणत्या मार्गाने किती रिटर्न मिळाला हे खरे सांगणारे कमीच असावेत किंवा कुणी सांगितलेला रिटर्न हा किती खरा किती खोटा हे तपासण्याची काही सोय नाही. त्यामुळे अशा गोष्टी नुसत्या ऐकण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसते. शेवटी कोणत्या इन्व्हेस्टमेंट पद्धतीचा आपल्याला कसा आणि किती फायदा झाला आणि कोणत्या पद्धतीने आपले किती नुकसान झाले हे ज्याचे त्यालाच चांगल्या प्रकारे ठाऊक असते.

सगळ्या क्लुप्त्या  माहित असूनही एखाद्याला गुंतवणुकीत नुकसान कसे होऊ शकते? ह्याचे एक उत्तर ‘ झटपट फायद्याच्या इच्छेवर नियंत्रण नसणे’ हे असू शकते. Delayed gratification ही संकल्पना मला आवडते. जेव्हा कुणी Delayed gratification च्या विरुद्ध काम करतो तेव्हा त्याची greed जास्त असते आणि financial market मध्ये अशा वेळेस तो अडचणीत सापडतो.

Delayed gratification ला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो. Delayed gratification म्हणजे दीर्घकाळाने मिळणाऱ्या मोठ्या आणि जास्त टिकाऊ बक्षिसासाठी (more favorable reward at a later time) त्वरित मिळणाऱ्या छोट्या बक्षिसाच्या (immediate reward) आमिषाला बळी न पडणे म्हणजे होय. हे Delayed gratification म्हणजे आजच्या छोट्या आनंदाला पुढे ढकलणे सुरुवातीला कठीणच काम असते. पैशांच्या आणि गुंतवणुकीच्या क्षेत्राशिवाय ही संकल्पना अजूनही अनेक क्षेत्रात काम करते. ह्या गोष्टीला समजण्याअगोदर मी कित्येक चांगले शेअर्स छोट्या फायद्यात विकले होते.

Value investing and Behavioral Finance

‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अशी मराठीत एक म्हण आहे. त्यालाच अनुसरून Value investing, Long term investment, Capital protection वगैरे वगैरे शब्द बोलणारे, बाजार लाल अंकात डुबकी मारताना ह्याउलट आचरण करताना दिसतात. म्हणजेच  शब्द आणि कृती ह्यात फरक आढळतो. गर्दीपासून दूर होण्याची भीती आपल्याला crowd behavior चे अनुसरण करायला भाग पाडते.

आता ह्या सगळ्या विषयाला उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाकडे वळूया. Value Investing and Behavioral Finance: Insight into Indian Stock Market Realities हे लेखक पराग पारीख ह्यांनी लिहिलेले पुस्तक वाचकाला गुंतवणूक विषयात बऱ्याच खोलात घेऊन जाते. पराग पारीख ह्यांची लेखनशैली मला आवडून गेली. एक वाचक म्हणून मी जसे विस्तृत लिखाण अपेक्षित करतो तसे भेटल्यावर जसे समाधान होते ते मला हे पुस्तक वाचतांना जाणवले.

खऱ्या वाचकाला जसजसा वाचनाचा आनंद मिळत जातो तसतसा तो पुस्तकाचे पुढील पान उलगडत जातो. एक वाचक म्हणून मी जसे विस्तृत लिखाणाची अपेक्षा करतो त्याला आठवण ठेवून “पैसा मंत्र” ह्या Marathi Money Blog वरील बरेच लेख विस्तृत स्वरूपात लिहिले आहेत आणि ह्यातील बरेच लेख सर्च इंजिन द्वारे  शीर्ष स्तरावर आहेत ह्याला वाचकांची पसंतीच  म्हणावी लागेल.

value investing and behavioral finance

Value investing and Behavioral Finance

एकूण 12 धड्यात लिहिलेल्या  ह्या पुस्तकातील सामग्री बघूया.

1. Success and Failure

ह्या प्रकरणात सुरुवातीलाच लोक अयशस्वी का होतात? ह्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. अगोदरच्या काळापेक्षा अधिक माहिती ती सुद्धा सोप्या पद्धतीने उपलब्ध असतांना देखील लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी का होतात ? अर्थशास्त्र्यांच्या मते Economic failure साठी inability to delay gratification हे एक प्राथमिक कारण असावे.

Instant gratification आपल्याला अडचणीत आणू शकते. Instant gratification म्हणजे आता पैसे दिले तर आताच सेवा/वस्तू/परतावा पाहिजे. ह्यात लोक वेळेला शून्य महत्व ठेवतात. आज शेअर घेतला कि आज किंवा उद्याच वाढला पाहिजे ही अपेक्षा जेव्हा शेअरची किंमत घसरते तेव्हा निराशाच देणार.

ह्याउलट Delayed gratification म्हणजे त्वरित काहीतरी मिळवण्याच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे होय. Delayed gratification मी कित्येकदा वापरतो आणि ह्यामुळे बरेचदा आपल्या पैशांची बचत देखील होते. Impulse buying मुळे आपल्याला तात्काळ योग्य निर्णय घेणे कठीण होते पण ह्याला थोडा वेळ दिला कि मग आपण जास्त चांगल्या प्रकारे निर्णय घेतो असे काही कारण ह्यामागे असावे.

खरे तर, मानवी स्वभावाच्या नैसर्गिक गुणांमुळे मनुष्य हा मुळातच काही मिळवण्यासाठी त्वरित व सोप्या पद्धतीला महत्व देतो आणि सामान्यतः गोष्टी लवकर मिळाव्यात म्हणून तो प्रयत्नशील असतो. त्यामुळे ही गोष्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतांना तशी सामान्यच म्हटली पाहिजे. पण सगळेच जण अशा गोष्टी करतील तर मग ती गर्दीची मानसिकता -Herd mentality-होते.

गोष्टी सोप्या मार्गाने व लवकर मिळवणे ह्याचे दैनंदिन जीवनात खालील काही उदाहरणे पाहता येतील. Crash course साठी मोठी रक्कम भरून लगेच चांगला निकाल मिळण्याची अपेक्षा ठेवणे, नोकरी लागल्या-लागल्याच मोठी गाडी घेणे, जितके वेतन फक्त तेवढेच काम करण्याची मानसिकता, सोपे पण यशस्वी जीवनासाठी अनुपयोगी असणारे काम करणे; ह्याउलट कठीण पण यशस्वी जीवनासाठी उपयोगी काम न करणे वगैरे वगैरे.

2. Understanding behavioral trends

Equity market ला Volatile आणि Risky म्हटले जाते. ह्याउलट Fixed instruments ला Safe आणि Stable म्हटले जाते. पण जर Inflation factor विचारात घेतला तर Fixed हे जास्त Risky ठरू शकते. ह्यासाठी लेखकाने 1991 ते 2007 च्या दरम्यानचा Sensex चा परतावा दिला आहे.

Equity market मध्ये दोन प्रकारचे परतावे मिळू शकतात. एक तर कंपनीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे तिच्या कमाईत व पर्यायाने संपत्तीत झालेली वाढ; जी की Dividend वगैरे स्वरूपात दिसते आणि दुसरे Speculative म्हणजे लोकांच्या मतानुसार शेअरच्या किंमतीत झालेला बदल.

आपल्या शेअरची खरेदी किंमत ही त्या शेअरवरील परतावा किती हे ठरवते. जेवढी खरेदी किंमत कमी तेवढा भविष्यातील परतावा जास्त (सगळ्या गोष्टी वेळेनुसार व्यवस्थित चालल्या तर). पण Market, Greed आणि Fear च्या मध्ये झुलत असल्याने आपली शिस्त तेवढी महत्वाची ठरते.

3. Behavioral obstacles to value investing

ह्या प्रकरणात परत एकदा Behavioral finance हे Investing च्या क्षेत्रात कसे काम करते ह्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. Behavioral finance साठी Stocks to Riches हा लेख वाचता येईल. हरणारे शेअर्स जवळ ठेवतांना जिंकणारे शेअर्स विकणे हे Behavioral finance चा परिणाम आहे. Asset Allocation आणि Risk Aversion बद्दल लिहिताना लेखक म्हणतो, Asset Allocation म्हणजे गुंतवणूक कशी करावी? ह्याच्या सुद्धा अगोदर उचललेले पाऊल होय.

Asset Allocation म्हणजे काय हे वाचण्यासाठी Asset Allocation हा लेख वाचावा. ह्या प्रकरणात Value investing व Growth investing बद्दल सुद्धा बऱ्याच विस्ताराने लिहिलेले आहे. Value investing म्हणजे काय हे वाचण्यासाठी Value investing हा लेख वाचता येईल.

4. Contrarian Investing: The psychology of going against the crowd

Contrarian Investing हा एक माझा आवडता विषय आहे. Contrarian Investing अंमलात आणायला नक्कीच कठीण आहे, हे मी तरी अनुभवले आहे. हे जरी एकदम सोपे नसले तरी ह्यावर काम करताना आपण बऱ्याच गोष्टी शकतो.

एका शेअरमध्ये बऱ्याच दिवस मी चिकटून होतो पण तो अचानक घसरत असताना मी माझी धारणा सोडून त्यातून बाहेर पडलो आणि काही दिवसांनी तो पूर्व स्थितीला येऊन मग त्यात वरच्या दिशेने प्रगती झाली. त्याचा अभ्यास करून मग पुढे अशा स्थिती मला काही अंशी टाळता आल्या.

सगळेच चुकले तर मग आपली चूक आपल्याला चूक वाटत नाही तसेच एखाद्या जवळ असलेल्या एखाद्या शेअरची किंमत घसरली आणि बऱ्याच लोकांजवळ हा शेअर असला व त्यांचाही परतावा Negative असला कि मग कुणाला जास्त दुःख होत नसावे.

पण इतरांच्या नुकसानीमुळे आपल्या नुकसानाला काही योग्य म्हणता येणार नाही. त्यामुळे यशस्वी Contrarian investing कसे करावे? ह्याबद्दल हा धडा महत्वाचा वाटतो.

ह्या प्रकरणात Contrarian Investing म्हणजे काय? आणि ते अंमलात आणायला कसे कठीण आहे ह्यावर सविस्तर लिहिले आहे. Conventional vs Contrarian portfolio बद्दल विस्तृत स्वरूपात लिहिले आहे. जोडीला दोन portfolio चे 1995-96 ते 2005-06 मधील Average PE चे तुलनात्मक विश्लेषण दिलेले आहे आणि Contrarian portfolio चा परतावा कसा जास्त भरला हे स्पष्ट केले आहे.

5. Growth trap: 

एखादी चांगली वाटणारी कंपनी ही चांगली गुंतवणूक आहे आणि ती पुढे वाढेलच असा ठाम विश्वास ठेऊन शेअर्स खरेदी करणे म्हणजे Growth trap होय. Benjamin Graham ने सुद्धा त्याच्या The intelligent investor ह्या प्रसिद्ध पुस्तकात सांगितले आहे कि एखाद्या कंपनीची Growth ही Investor च्या संपत्तीत देखील वाढ करेल हे जरुरी नाही.  कंपनी वाढते पण त्याचे प्रतिबिंब गुंतवणूकदाराच्या फायद्यात दिसत नाही हा Growth trap बऱ्याच ठिकाणी आढळतो.

6. Commodity investing:

Commodity stocks लोक का विकत घेतात? आणि त्यासाठी काय Research करावा? Commodity cycles बद्दल लिहिले आहे. ह्या विषयात Behavioral finance चे महत्व मांडलेले आहे.

7. Public Sector Units मध्ये PSU company बदल इत्यंभूत माहिती दिली असून खाजगी कंपन्यांच्या growth story ने दिपून जाऊन तुलनेने PSU ला कुणी दुय्यम ठरवत असेल तर त्यांच्यासाठी हे प्रकरण वाचनीय ठरते. अनेक PSU कंपन्यांची growth story आणि त्यांनी दिलेले लाभांश प्रमाण बघितले तर असे PSU stocks आपल्या पोर्टफोलिओ मध्ये अवश्य असावेत असे वाटते.

8. Sector investing ह्या प्रकरणात sector investment ह्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. जो सेक्टर favorable आहे त्यातील कंपन्यात गुंतवणूक करणे व फायदा करून घेणे ही एक सर्रास आढळणारी रणनीती आहे. पण परत एकदा सगळेच जण जर एकाच रणनीतीवर काम करतील तर तर मग किती वाढ अपेक्षित असेल हा प्रश्न नक्कीच येतो.

9.Initial public offerings मध्ये मागील २ दशकापासून IPO चा performance काय? Investor ह्यातून काय धडा घेऊ शकतात?  लोभ कसा अडसर ठरतो? हे स्पष्ट केले आहे. IPO Value investor साठी नाही कारण Value ही Bear market मध्ये मिळते व IPO हे Bull market मार्केट चे Product आहे. 

10. Index investing:

ह्यात Index investing बद्दल भरपूर माहिती दिलेली आहे. Index investing काय आहे आणि गुंतवणूकदारांनी index investing का करावी हे काही उदाहरणांच्या मदतीने स्पष्ट केले आहे. Index investing बद्दल अधिक वाचण्यासाठी Index fund in marathi हा लेख वाचक वाचू शकतात.

11. Bubble trap:

Bubble म्हणजे बुडबुडा आणि बुडबुडा म्हटला कि तो कधीतरी फुटणारच. Stock market मध्ये Bubble का बनतो? आणि त्यात Behavioral finance ची कशी भूमिका असते? ह्यावर ह्या प्रकरणात भाष्य केलेले आहे. Bubble formation कसे ओळखावे? आणि गुंतवणूकदाराने ह्यातून काय धडा घ्यावा? हे सुद्धा लिहिले आहे.

अधिक आशावाद, गुंतवणूकदारांचा लोभ आणि अति आत्मविश्वास बुडबुड्याला कारणीभूत ठरतात. कुण्या शेअर्सच्या अति प्रेमात पडू नये हा ह्या प्रकरणातील मुद्दा मला आवडून गेला. Stocks to Riches ह्या पुस्तकात सुद्धा बुडबुडा  कसा निर्माण होतो, वाढतो व फुटतो हे लिहिले आहे. गर्दीची मानसिकता बाजाराला Bull व Bear market बनवते. Stocks to Riches ची समीक्षा वाचण्यासाठी Investment book in marathi हा लेख वाचता येईल.

12. Investor behavior based finance: एखाद्या शेअरची किंमत ही त्या कंपनीची खरी Value नसते. शेअरची किंमत तर एक गुंतवणूकदारांच्या समजावर आधारित एक किंमत असते. गुंतवणूकदार जर त्या कंपनीवर आशावादी असतील तर ही किंमत वाढते आणि ह्याउलट जर अधिक आशावादी नसतील तर त्याची किंमत कमी होते.

गुंतवणूकदारांची भूमिका एखाद्या कंपनीसाठी महत्वाची असते. एखाद्या कंपनीचे प्रदर्शन जसे shareholders साठी महत्वाचे असते तसे shareholders सुद्धा कंपनीसाठी तेवढेच महत्वाचे असतात. त्यामुळे त्यांच्या वर लिहिलेले हे प्रकरण वाचकांना अधिक माहिती देऊन जाते.

सारांश: Value investing and Behavioral Finance

थोडक्यात Value investing and behavioral finance: Insights into Indian Stock Market Realities ह्या पुस्तकाचे वाचन मला बाकी कामांच्या गराड्यात बरेच दिवस पुरले. काही पुस्तके एकदा वाचून त्यातील मजकूर पूर्णतः लक्षात राहत नाही, कारण अशी पुस्तके दर्जेदार आणि विस्तृत लिखाणाने परिपूर्ण असतात.अशा पुस्तकांचे मध्ये मध्ये किंवा एखाद्या गुंतवणूक रणनीतीवर काम करतांना गरज पडल्यास वाचन करता येते.

Value investing and behavioral finance by Parag Parikh हे पुस्तक ह्याच पठडीतील आहे. McGraw Hill ने प्रकाशित केलेले Value investing and behavioral finance हे पुस्तक English भाषेत लिहिलेले आहे आणि आतील दर्जेदार मजकुराप्रमाणेच पुस्तकाची Hardcover बांधणी आणि Page quality सुद्धा उत्कृष्ट आहे.

The psychology of money marathi-पैशाचे मानसशास्त्र

rhe psychology of money marathi

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र

The psychology of money marathi हे मॉर्गन हाऊजेल ह्या लेखकाचे पुस्तक मी नुकतेच वाचून संपवले आणि पैशाबद्दलच्या विविध लोकांच्या विविध विचारांना एका लहान पुस्तकात एवढ्या समर्पकरीत्या लेखकाने कसे मांडले ह्याचे नवल वाटले. अर्थात ह्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना अनुवादक श्री जयंत कुलकर्णी ह्यांनी त्याच तोलामोलाची उत्कृष्ट शब्दरचना करत ह्या पुस्तकाच्या भाषांतराला न्याय मिळवून देण्यात काहीच कसर ठेवली नाही हे वेगळे सांगायला नको.

The psychology of money marathi ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखक तीन लोकांच्या आणि त्यांच्या पैशांच्या सवयींबद्दल लिहितो. लेखक आपल्या महाविद्यालयीन जीवनात एका हॉटेल मध्ये काम करायचा.

पहिला व्यक्ती एक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेला एक यशस्वी उद्योजक असतो आणि ह्या हॉटेलचा नेहमीच ग्राहक असतो. त्याचेजवळ बक्कळ पैसे असत, पण त्याची पैशाबद्दल एक विचित्र सवय होती.

शंभर डॉलरच्या नोटांची एक गड्डी तो नेहमी लोकांना दाखवत असे, भले कुणाला त्यात काही रस नसो.

एकदा त्याने लेखकाच्या एका सहकाऱ्याला काही पैसे दिले आणि सोनाराच्या दुकानातून काही सोन्याची नाणी आणण्यास सांगितले. ती नाणी घेऊन तो आणि त्याचे मित्र समुद्रकिनाऱ्यावर गेले आणि कुणाचे नाणे दूर पर्यंत जाते ह्याचा खेळ खेळायला लागले.

सोन्याची नाणी पाण्यात फेकण्याचा हा खेळ विचित्रच म्हणायला हवा. कालांतराने अशा गर्विष्ठ व्यक्तिजवळचे पैसे लवकरच संपले आणि त्याचे दिवाळे निघाले.

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र ह्यात उल्लेख केलेला दुसरा व्यक्ती म्हणजे रोनाल्ड जेम्स रीड. रोनाल्ड रीड हा एक सामान्य माणूस होता. त्याने २५ वर्षे पेट्रोलपंपावर गाड्या धुतल्या आणि १७ वर्षे इमारतीतील फरशा सुद्धा पुसल्या.

ह्या अतिसामान्य माणसाच्या गोष्टीत काय विशेष? असे तुम्हाला वाटले असेलच. जेव्हा रोनाल्ड रीड ९२ व्या वर्षी स्वर्गवासी झाला तेव्हा त्याच्याकडे ८० लाख डॉलर एवढी प्रचंड रक्कम होती आणि हा साधा कामगार मृत्यूनंतर जगभरात प्रसिद्ध झाला.

आता तिसऱ्या व्यक्तीकडे वळूया. रोनाल्ड रीडच्या मृत्यूच्या काही महिने आधीच रिचर्ड फुस्कॉन ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्याही मृत्यूची दखल वर्तमानपत्रांनी घेतली पण वेगळ्या विषयासाठी.

रिचर्डचे शिक्षण म्हणजे हार्वर्ड मधून MBA आणि नंतर वित्त क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी. प्रचंड यश मिळवून वयाच्या चाळीशीत तो निवृत्त झाला. नंतर त्याने भव्य अशा घरासाठी मोठे कर्ज काढले आणि नंतर २००८ च्या आर्थिक मंदीत त्याच्या मालमत्तेचा लिलाव करावा लागला. न्यायालयात त्याचे शब्द होते- आता माझे उत्पन्न शून्य आहे.

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र

इथे हे सगळे सांगण्याचा काय उद्देश आहे? तर पैशाचा योग्य उपयोग करण्याचा आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा फारसा संबंध नसतो हे सांगण्यासाठीच The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र हे पुस्तक लिहिले गेले आहे. रोनाल्ड रीड आणि रिचर्ड फुस्कॉन एकाच वेळी कसे अस्तित्वात येऊ शकतात? ह्याची लेखकाने दोन स्पष्टीकरणे दिली आहेत.

पहिले म्हणजे लेखकाच्या मते आर्थिक यशाचा आणि तल्लख बुद्धी व श्रमाचा फारसा संबंध नसावा. बरेचदा कुणी नशिबाने सुद्धा आर्थिक क्षेत्रात यशस्वी होतो.

दुसरे म्हणजे आर्थिक क्षेत्रातील यश हे काही एक नियमबद्ध असे शास्त्र नाही. आल्या वेळेला तुम्ही कसे वागता ह्यावर देखील पुढील प्रचंड यश-अपयश अवलंबून असते. हे एक असे कौशल्य आहे कि तुमच्याजवळ असलेल्या ज्ञानापेक्षा तुम्ही त्यावेळेस कसे वागता? ह्याला महत्व असते आणि ह्या कौशल्यालाच लेखक The psychology of money – पैशाचे मानसशास्त्र असे म्हणतो.

हे पैशाचे मानसशास्त्र व अशी कौशल्ये नेहमी दुर्लक्षितच राहिली आहेत. लेखकाने ह्या पुस्तकातून लहान लहान गोष्टींद्वारे हे मानसशास्त्र वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. पैसा मंत्र ह्या आपल्या Marathi investment blog मध्ये सुद्धा नेमक्या ह्याच विषयावर लेख लिहिले आहेत. The psychology of money marathi हे पुस्तक आणि आपल्या ब्लॉग वरील लेख बऱ्याच अंशी साधर्म्य ठेवतात.

the psychology of money marathi
Photo by Shiromani Kant on Unsplash

एकूण २० प्रकरणात विभागलेल्या The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र ह्या पुस्तकात लोकांचे पैशाबद्दलचे समज, अनुभव, त्यांनी पाहिलेल्या गोष्टी, त्यांच्या बचतीच्या सवयी, आशा-निराशेच्या काळातील पैशाबद्दलचे बदलते विचार, पैसे आणि स्वातंत्र्य, श्रीमंत होणे व श्रीमंती टिकवणे ह्यातील फरक, भाग्य आणि जोखीम अशा अनेक विषयांवर प्रभावी चर्चा केलेली आहे.

अगदी सुरुवातीच्याच प्रकरणात – ज्याचे शीर्षक “कोणीही मूर्ख नसतं !” असे आहे – “लोक पैशाबद्दल विचित्र वागतात पण ते विचित्र नसतात” असे म्हटले आहे. मला देखील हा प्रश्न कित्येकदा पडायचा कि अनेक जण वेगवेगळा दृष्टिकोन ठेवतात पण कुणीच स्वतःला चूक ठरवत नाही. मग खरा बरोबर कोण ? त्यावर निरीक्षणाने मी ह्या निर्णयावर आलो होतो कि जो तो आपल्या परीने योग्य तेच करतो. ह्या प्रकरणात ह्याच गोष्टीबद्दल सविस्तर लिहिलेले आढळले.

म्हणजे नेमके आहे तरी काय? थोडे विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ह्यात लिहिले आहे कि वेगवेगळ्या पिढीतील लोक, वेगवेगळ्या संस्काराखाली वाढलेले लोक, वेगवेगळ्या गोष्टींनी प्रोत्साहित होणारे लोक, वेगवेगळे भाग्य घेऊन जन्मणारे लोक हे आपापल्या परीने वेगवगेळे धडे शिकतात आणि त्याचाच अवलंब करतात.

गरिबीत वाढलेला मुलगा त्याचे मोठेपणीचे निर्णय त्याच्या गरिबीच्या अनुभवावरून घेतो तर पैशाची कमतरता नसलेला श्रीमंतांचा मुलगा त्याच्या निर्णयात वेगळेपणाने वागतो. दोघेही आपल्या दृष्टिकोनाला ठाम चिकटून असतात. मंदीत वाढलेल्या लोकांना आणि तेजीत जन्मलेल्या लोकांना पैशांचे वेगवेगळे अनुभव येतात. एका पिढीतील लोक सावधपणे फिक्स्ड मध्ये रक्कम जमा ठेवतात व एका पिढीतील लोक फिक्स्ड मधील रकम काढून शेअर्स मध्ये टाकतात. दोघेही आपण कसे योग्य हे सांगतात व दुसरे कसे चुकीचे ते देखील बोलून दाखवतात.

वाचकाला The psychology of money marathi हे पुस्तक आर्थिक क्षेत्रातील उदाहरणांच्या साहाय्याने उच्च दर्जाचे वैचारिक खाद्य पुरवेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अनेक गोष्टींच्या साहाय्याने सुद्धा हे पुस्तक प्रभावी बनले आहे.

मराठी भाषेत मधुश्री प्रकाशन द्वारे प्रकशित The psychology of money marathi हे पुस्तक वाचतांना पानोपानी मराठीतील शब्दसंपदा पाहून अनुवादक श्री जयंत कुलकर्णी ह्यांनी घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते. सरतेशेवटी ह्या पुस्तकातील दर्जेदार मजकूर वाचतांना वाचकांचा सुद्धा कस लागणार हे निश्चितच.

हे सुद्धा वाचा: आवडत्या पुस्तकातील पैशांच्या गोष्टी

Best Marathi money quotes आवडत्या पुस्तकातील पैशांच्या गोष्टी

marathi money quotes

Marathi money quotes

Marathi money quotes ह्या लेखात आज Richest man in Babylon ह्या पुस्तकाची समीक्षा बघूया.

पैशांचे काही नियम असतात आणि ते पाळले तर पैसा तुमच्याकडे येतो आणि वाढतो सुद्धा. पैशांच्या गोष्टी पुस्तकातून समजत नाहीत असे बऱ्याच जणांचे मत असेल पण हे पुस्तक वाचल्याबर त्यांचा भ्रमनिरास होईल. हे छोटेसे पुस्तक तुम्हाला आर्थिक सवयींच्या Good Financial Habits खूप महत्वाच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत सांगते.

प्राचीन काळातील बॅबीलॉन हे शहर आपल्या समृद्धीच्या आणि श्रीमंतीच्या नावाने जगप्रसिद्ध होते. त्या शहराच्या वैभवाची आणि संपत्तीच्या नियमांची कशी सांगड आहे ह्याचे ह्या पुस्तकात गोष्टी रूपाने छान वर्णन केले आहे. Marathi money quotes ह्या शीर्षकाशी मिळते जुळते हे पुस्तक आपल्याला संपत्तीशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी शिकवून जाते.

marathi money quotes

माझ्या पैशांबद्दलच्या वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी बॅबीलॉन का सबसे अमीर आदमी हे एक फार परिणामकारक असे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये बंजीर नावाचा एक रथ बनवणारा कारागीर आणि त्याच्या मित्रांच्या पैशाबद्दलच्या चर्चा लिहिल्या आहेत.

बॅबीलॉन नावाच्या प्राचीन शहरात गरीब आणि श्रीमंत लोक सोबत सोबत राहत असत. बंजीरचा चांगला मित्र कोबी हा संगीतकार असतो. ते दोघेही कुणाजवळ जास्त पैसे का असतात? आणि आपल्याकडे कमी का असतात? ह्या उत्तराच्या शोधात आपल्या एका श्रीमंत मित्राकडे जातात.

ह्या श्रीमंत मित्राचे नाव अरकाद असते. अरकाद बॅबीलॉन मधील एक खूप श्रीमंत व्यक्ती असतो. हे सगळे गरीब मित्र अरकाद च्या श्रीमंतीचे रहस्य विचारण्यासाठी त्याचेकडे जातात. त्यांच्या चर्चेतून आपण marathi money quotes हसत खेळत शिकू शकतो.

अरकाद आपल्याजवळील प्रचंड धनाचा काही गुणांसोबत कसा संबंध आहे, हे सांगताना त्याला भेटलेल्या अनेक शिकवणी बंजीर, कोबी आणि इतर मित्रांना सांगतो. ह्या महत्वाच्या सवयींचे Good financial habits, money management वर्णन करताना अरकाद त्याचे अनुभव वेगवेगळ्या गोष्टींच्या रूपाने मित्रांना सांगतो. ह्या गोष्टी प्राचीन बॅबीलॉनच्या वर्णन स्वरूपात लिहिल्या असल्याने वाचकाला जुन्या काळात घेऊन जातात. पण त्या काळातील संपत्ती मिळवण्याचे नियम Rules for money management आजही तेवढेच प्रासंगिक आहेत हे लेखक वारंवार लिहून वाचकांना कळत नकळत ह्या सवयींच्या आजूबाजूला फिरवत राहतो आणि हेच ह्या पुस्तकाचे वेगळेपण आहे असे वाटते.

थोडक्यात लेखक वाचकांना महत्वपूर्ण आर्थिक सवयी घोटून घोटून शिकवण्यामध्ये पूर्ण यशस्वी झाला आहे असे माझे मत आहे. आणि म्हणूनच money management विषयामध्ये हे पुस्तक माझे आवडते पुस्तक आहे.

ह्या पुस्तकात अनेक गोष्टीतून आर्थिक सवयींचे Financial habits वर्णन केले आहे. प्रत्येक प्रकरणातून संपत्तीबद्दलच्या काही शिकवणी Rules for assets मांडल्या आहेत. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातील माहिती जरा लांबच होईल म्हणून How to save money in marathi ह्या शीर्षकाखाली ‘रिकाम्या खिशाचे/पर्सचे सात उपाय’ ह्या प्रकरणातील थोडी माहिती पाहूया.

‘रिकाम्या खिशाचे सात उपाय’ ह्या प्रकरणात लेखकाने कुणाचे पैशांचे खिसे कसे रिकामे असतात आणि ते पैशाने भरण्यासाठी काय उपाय करावेत ह्याचे उपयोगी वर्णन केले आहे. हे नियम सांगताना अरकाद (श्रीमंत मित्र) आपल्या गरीब मित्रांना सांगतो कि हे नियम जरी साधारण वाटत असतील तरी त्यांना कमी मानू नका कारण सत्य नेहमी साधारण असते. खालील नियम हे Marathi money quotes साठी अगदी योग्य आहेत ह्याचा अंदाज तुम्हाला देखील येईलच.

marathi money quotes
  1. आपण कमाविलेल्या प्रत्येक दहा नाण्यांपैकी एक नाणे स्वतःसाठी ठेवा: Pay yourself first. तो गरीब मित्रांना सांगतो कि तुमचा खाली बटवा पैशाने भरण्यासाठी तुम्हाला एक काम नियमाने करावे लागेल. हे काम म्हणजे जेव्हा सुद्धा तुम्हाला कोठून पैसे मिळतील, त्यातील दहा टक्के भाग बाजूला काढायचा आणि तो वाचवून ठेवायचा. कमाई अशा प्रकारे वापरा कि फक्त 90 टक्के कमाई खर्च होईल. 10 पैकी 1 नाणे नेहमी बचत होईल ह्याची खात्री करा.
  2. खर्च नियंत्रित करा: Control your expenses. अरकाद (श्रीमंत मित्र) आपल्या गरीब मित्रांना म्हणतो; तुम्ही म्हणाल कि माझे पूर्ण कमाईमध्ये सुद्धा खर्च भागत नाही मग कमाईच्या 10 टक्के कसे वाचवायचे? ह्यावर उपाय सांगताना अरकाद सांगतो कि त्यासाठी तुम्ही आपले खर्च लिहून ठेवा (Make a list of expenditure) आणि फक्त तेच खर्च लक्षात ठेवा जे तुम्हाला अति आवश्यक आहेत. थोडा विचार केला तर तुम्ही अनावश्यक खर्च सहज ओळखू शकाल आणि माझे (अरकादचे) हे निरीक्षण आहे कि जेव्हा तुम्ही 10 % वाचवता तेव्हा तुमचे उरलेल्या 90 टक्क्यात सुद्धा काम भागते. तुमच्या इच्छा अमर्याद आहेत आणि त्या सगळ्या पूर्ण होऊ शकत नाही. आवश्यक खर्च तुमच्या कमाईच्या प्रमाणात नेहमी वाढत जातील (Essential expenses will always grow in proportion of your income) म्हणजे तुमची कमाई वाढली तर आवश्यक खर्च सुद्धा वाढतील, त्यामुळे नेहमीच अशा काही इच्छा असतील कि त्या पूर्ण होऊ शकणार नाहीत. जास्त पैसे असणाऱ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात हे खरे नाही. त्यांची सगळ्या ठिकाणी फिरण्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही कारण त्यांना वेळेची मर्यादा (Limitation of time) असते, चमचमीत खाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही कारण खाण्याची एक मर्यादा (Limitation of eating) असते. त्यामुळे तुमच्या एका एका रुपयांच्या खर्चाने तुमचे जास्तीत जास्त समाधान झाले पाहिजे. दुसऱ्या शब्दांत खर्च केलेल्या प्रत्येक नाण्याच्या बदल्यात तुम्हाला पूर्ण समाधान वाटले पाहिजे. असा आवश्यक खर्च करताना दहा टक्के रक्कम कधीच खर्च करू नका. हाच भाग तुमच्या खिशाला हळूहळू पैशाने भरण्यासाठी उपयोगी आहे.
  3. आपल्या पैशांपासून काम करवून घ्या: Let money should work for you. प्रत्येक बचत केलेले नाणे अशा प्रकारे गुंतवा जेणेकरून ते अधिक नाणी आणेल. जेव्हा तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतील तेव्हा ते अजून नाणी आणतील आणि अशा प्रकारे ह्या नाण्यांची एक सोनेरी फौज तुमच्यासाठी अखंड काम करत राहील. जेव्हा तुम्ही काम करत नसाल त्या वेळेस सुद्धा तुमच्या नाण्यांची फौज तुमच्या खजिन्यात आणखी नाणे आणण्यासाठी काम करत राहील. This is known as leveraging.
  4. आपल्या खजिन्याची सुरक्षा करा: Secure your savings. अरकाद सांगतो कि आपल्या दहा टक्के बचतीमधून वाढत जाणारा खजिना हा सुरक्षित असला पाहिजे. धूर्त आणि लबाड लोक नेहमीच दुसऱ्यांच्या संपत्तीवर लक्ष ठेवून ते लुबाडण्यासाठी वेगवेगळे प्रलोभन दाखवतील पण अशा लोकांपासून आपल्या धनाची सुरक्षा करणे अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे समजदार लोकांच्या मार्गदर्शनाने ह्या खजिन्यातील रक्कम गुंतवा. जास्त परताव्याच्या मोहाने मुद्दल पण धोक्यात पडू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. हे सांगताना अरकाद एका गोष्टीत काही व्यापारी हिरे दाखवून दुसऱ्याला काचेचे तुकङे कसे विकतात आणि त्याच्या जवळील धन कसे लुबाडून घेतात ह्याची गोष्ट आपल्या मित्रांना सांगतो. अशी महत्वाची माहिती असल्यामुळेच हे पुस्तक माझे आवडते पुस्तक My Favorite Book Essay in Marathi ह्यासाठी निवडले आहे.
  5. आपल्या घराचे मालक व्हा: ह्या शीर्षकाखाली अरकाद (गोष्टीतील पात्र) सांगतो कि जर व्यवस्थित योजना बनवली तर आपण एक स्वतःच्या मालकीचे घर घेऊ शकतो. ह्यासाठी बॅबीलॉन मधील सावकार तुम्हाला घर घेण्यासाठी मदत करू शकतील आणि मग तुम्ही तो खर्च हळू हळू त्यांना परत करू शकता. असे वाटते कि लेखकाने ह्या शीर्षकाखाली आजच्या काळात घर घेण्यासाठी बँकांचा वापर करून घर घेणे शक्य आहे ह्या गोष्टींचा पाठपुरावा केला असेल. फक्त ह्या गोष्टीला प्राचीन काळातील बॅबीलॉन मधील गोष्टींची जोड देऊन स्वतःचे घर असले तर नागरिक कसा समाधानी आणि प्रेरित होऊ शकेल ह्याचे वर्णन केले आहे. वर्तमान काळात घर असणे म्हणजे सुरक्षा आहे असे विचार करणाऱ्यांसाठी हे वर्णन नक्कीच उपयोगी आहे.
  6. भविष्यातील कमाई सुनिश्चित करा: Make assure future income. जीवनात लहानपण, तरुणपण ते वृद्धत्व हे नैसर्गिक आहे; त्यामुळे तुम्ही कमावते झाल्यापासूनच थोडा हिस्सा वृद्धत्वासाठी बाजूला ठेवा जेणेकरून वृद्धपणी ज्यावेळेस तुमची कमावण्याची ऊर्जा कमी होईल त्यावेळेस तुम्ही वाचवलेले पैसे कामात पडतील. वाचवलेले हे पैसे चांगला परतावा देतील ह्याची खात्री करून घ्या. This is also one important money quotes.
  7. तुमची कमावण्याची क्षमता वाढवा: Enhance your earning potential. अरकाद त्याची गोष्ट सांगताना मित्रांना सांगतो कि मी जेव्हा मृदापत्र लिहिण्याचे काम करत होतो तेव्हा माझे काही सहकारी माझ्यापेक्षा जास्त धन कमवायचे. हे फक्त ह्यामुळे शक्य होते कारण ते आपल्या कामात जास्त कुशल होते. ते पाहून मी सुद्धा एकाग्र होऊन प्रयत्न केले आणि मग मला सुद्धा त्याचे फळ जास्त मोबदल्याच्या रूपाने मिळायला लागले. जास्त ज्ञान म्हणजे जास्त कमाई. जर तुम्ही कारागीर असाल तर आपल्यापेक्षा हुशार कारागिरापासून शिकून घ्या; जर तुम्ही व्यापारी असाल तर आपल्यापेक्षा सफल व्यापाऱ्यापासून शिका. माणसाची परिस्थिती नेहमी बदलत असते त्यामुळे बुद्धिमान व्यक्ती नेहमी नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. अरकाद सांगतो कि स्थिर राहू नका, नेहमी थोडे थोडे पुढे सरकत रहा. आपले कर्ज यथासंभव चुकवत रहा. आपल्या परिवारासाठी नेहमी प्रगतीपुरक विचार करत रहा. अनावश्यक खर्च नियंत्रित करत रहा. This is somewhat different marathi money quotes but it has much potential to enhance your future earning.

ह्या पुस्तकाच्या पुढील प्रकरणांत ‘संपत्तीचे पाच नियम’, ‘बॅबीलॉन मधील सावकारापासून काय गुण शिकावेत?’, ‘बॅबीलॉनच्या रुंद आणि मजबूत भिंतीपासून काय बोध घ्यावा?’, ‘बॅबीलॉनमधील उंटाच्या व्यापाऱ्याकडून काय शिकता येईल?’ , ‘बॅबीलॉन मधील मृदापत्र म्हणजे मातीच्या तुकड्यांवर लिहिलेले संपत्ती व्यवस्थापनाचे नियम Rules for money management काय होते?’ आणि ‘श्रीमंत अशा बॅबीलॉन चे वर्णन’ ह्याबद्दल लिहिले असून प्रत्येक भागात आर्थिक गोष्टींबाबत सुंदर बोधकथा आहेत. माझे आवडते हे पुस्तक गोष्टींच्या स्वरूपात लिहिले असल्याने कंटाळा येत नाही आणि वाचकावर सरळ टीका करत नसल्यामुळे दुसऱ्याला शिकवलेले ज्ञान वाचक सहज स्वतःवर सुद्धा लागू करून घेतील असे वाटते.

अशा Money quotes चा उपयोग आपल्या व्यवहारात करून घ्या आणि आर्थिक क्षेत्रात यशस्वी व्हा. स्वतःच्या पुस्तकसंग्रहात अवश्य असावे असे हे पुस्तक पैशांच्या नियमांना शिकवून जाते.

हे सुद्धा वाचा: me vachalele pustak in marathi – मी वाचलेले पुस्तक Retire Young Retire Rich

मी वाचलेले पुस्तक me vachalele pustak in marathi-Retire Young Retire Rich

me vachalele pustak in marathi

me vachalele pustak in marathi मी वाचलेले पुस्तक म्हणजे रॉबर्ट कियोसाकी लिखित Retire Young Retire Rich हे कुणाच्या आर्थिक विचारांबाबत एक डोळे उघडणारे पुस्तक म्हटले तरी चालेल.

me vachalele pustak in marathi म्हणजे Robert Kiyosaki लिखित हे पुस्तक Rich Dad Poor Dad ह्या पुस्तकाचा उन्नत भाग आहे आणि आपल्या विचारांचा संपत्तीशी कसा संबंध असतो हे स्पष्ट करते.

ह्या पुस्तकात संपत्ती तयार करण्यासाठी स्वतःला कसे तयार करावे ह्याबद्दल अनुभवी Robert ने छान मार्गदर्शन केले आहे. Rich Dad Poor Dad आणि Cash Flow Quadrant च्या वाचनानंतर me vachalele pustak in marathi Retire Young Retire Rich ह्या पुस्तकाचे वाचन Personal Finance च्या जगात वाचकाला अजून खोलपर्यंत फिरवून आणते.

me vachalele pustak in marathi म्हणजे Retire Young Retire Rich मध्ये लेखक सांगतो कि Rich Dad ला David and Goliath ची गोष्ट आवडायची.  तुम्ही ही गोष्ट वाचली असेलच ज्यामध्ये Goliath सारख्या विशाल दैत्याला छोटा David एका गुल्लेरच्या आणि नदीतील दगडांच्या साहाय्याने मारतो.  Rich Dad कदाचित स्वतःला David समजत असावे कारण त्यांनीसुद्धा शून्यातून सुरुवात केली होती आणि नंतर व्यावसायिक जगतात मोठ्या मोठ्या व्यावसायिकांशी प्रतिस्पर्धा केली.  Rich Dad म्हणायचे कि David ने Goliath ला हरवले त्यामागे Leverage च्या शक्तीचा हात होता. एक साधारण युवक व गुल्लेर Goliath सारख्या विशाल दैत्यापेक्षा जास्त शक्तिशाली ठरले हीच Leverage ची ताकद होती.

me vachalele pustak in marathi

Rich Dad सांगायचे कि Cash Flow शब्द संपत्तीच्या जगात फार महत्वपूर्ण शब्द आहे.  दुसरा महत्वाचा शब्द आहे Leverage. ते म्हणत Leverage मुळेच काही लोक श्रीमंत बनतात. आता जेव्हा Leverage ताकद आहे तर त्याचा काही लोक सदुपयोग करतात आणि काही लोक दुरुपयोग.

ह्या पुस्तकात लेखक सांगतो कि श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला जे काम करायचे आहेत ते सोपे आणि सरळ आहेत. जवळपास प्रत्येकचजण ते करू शकतो. लेखकाने तीन संपत्ती सांगितल्या आहेत ज्या लोकांना श्रीमंत बनवतात आणि तरुणपणी Retire होण्याची संधी देतात.

  1. Real Estate रियल इस्टेट
  2. Paper Assets पेपर अससेट्स
  3. Business व्यवसाय

लेखकाने सर्वप्रथम मेंदूच्या शक्तीबद्दल सांगितले आहे कि मेंदूची शक्ती सगळ्यात शक्तिशाली Leverage आहे पण ह्या Leverage सोबत समस्या ही आहे कि हे तुमच्या बाजूने काम करू शकते आणि तुमच्या विरुद्ध पण.  तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर आपल्या मेंदूचा आपल्या बाजूकडून उपयोग करून घेतला पाहिजे.  बहुतांश लोक मेंदूच्या शक्तीचा उपयोग स्वतःला गरीब करण्यासाठी करतात.

Rich Dad म्हणायचे तुमचे डोके हे तुमची सगळ्यात मौल्यवान संपत्ती आहे. जर तुम्ही तुमच्या मेंदूत योग्य शब्दाचा उपयोग केला तर तुम्ही खूप श्रीमंत होऊ शकता पण जर गरीब शब्दांचा उपयोग केला तर हाच मेंदू तुम्हाला गरीब बनवण्यासाठी काम करेल.

लेखकाच्या एका मित्राने एका एका नव्या वर्षाच्या सुरवातीला एका वर्षाचा संकल्प न करता लवकर रिटायर होण्याची योजना बनवली आणि लेखकाजवळ मांडली आणि त्यावर आपण मिळून काम करूयात असे सुचवले. परंतु Robert चे डोके माझ्याजवळ जास्त पैसे नाहीत मग रिटायर कसे होणार? असे शब्द सुचवत होते. अचानक त्याला Rich Dad चे शब्द आठवले “तुमचे  सगळ्यात मोठे आव्हान तुमची स्वतःवर शंका आणि आळस आहे. जर तुम्हाला आपले वर्तमान स्वरूप बदलायचे असेल तर आत्म शंका आणि आळस ह्या गोष्टीसोबत लढायला हवे.  बदल न करणे सोपे आहे; जसे आहे तसे राहणे सोपे आहे पण हे तुमच्या उज्वल भविष्यासाठी नुकसानदायक असते”. त्यानंतर दहा वर्षांनी लेखक आर्थिक रूपाने स्वातंत्र्य झाला.

हे कसे झाले ? ह्यापेक्षा हे का झाले? हा प्रश्न महत्वपूर्ण आहे असे लेखक सांगतो.  कोणते काम कसे केल्या जाते ह्यापेक्षा ते का करावे हे महत्वपूर्ण आहे. का? ह्या शब्दामुळेच तुम्हाला प्रेरणा मिळते. Rich Dad म्हणायचे कि बरेच लोक एखाद्या कामाला करू शकतात पण करत नाहीत, कारण त्यांच्याकडे मोठा का? नसतो. जेव्हा तुम्ही का? ह्याचे उत्तर शोधाल तेव्हा  संपत्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग एकदम सोपा होतो.  आपल्याला श्रीमंत का व्हायचे आहे? ह्या कारणाचा  बहुतांश लोक आपल्या हृदयात शोध घेत नाहीत आणि म्हणूनच त्यांना योग्य रस्ता सापडत नसावा. 

ह्या पुस्तकात लेखकाने तीन भागात मेंदूचे leverage, तुमच्या योजनेचे leverage आणि तुमच्या कामाचे leverage ह्याबद्दल विस्ताराने लिहिलेले आहे. पहिल्या भागात मेंदूचे leverage स्पष्ट करतांना सर्रास आढळणाऱ्या चुकीच्या आर्थिक विचारांचे लेखकाने चांगलेच खंडन करीत आर्थिक बाबतीत नव्याने विचार करणे कसे जरुरी आहे ह्यावर भर दिला आहे. मुळात हाच भाग कुणाला कठीण वाटेल पण कमी वयात Retire होऊ इच्छिणाऱ्यांना हा भागच पुरेसे खाद्य पुरवतो. दुसऱ्या भागात योजनेचे कसे आणि किती महत्व आहे हे स्पष्ट केले आहे. तिसऱ्या भागात तुमच्या कामाचे किती leverage आहे हे लिहिताना तुमच्या सवयीचे leverage, पैशाचे leverage, रियल इस्टेट चे leverage, Paper Asset चे leverage आणि Business चे leverage ह्याबद्दल लिहिले गेले आहे.

एकंदरीत हे पुस्तक वाचकाच्या मेंदूच्या खिडक्या उघडण्यात चांगलेच यशस्वी होईल असे वाटते.

हे सुद्धा वाचा: My Favourite Book Essay in Marathi- Cash flow quadrant आर्थिक स्वातंत्रतेची किल्ली

My Favorite Book Essay in Marathi- कॅश फ्लो क्वाड्रंट

my favorite book essay in marathi

पुस्तकांचे विश्व हे एक खरंच वेगळे जग असते. My Favorite Book Essay in Marathi म्हटले तर वेगवेगळ्या वाचकांचे वेगवेगळे पुस्तके असतील. आर्थिक साक्षरतेवर (Financial Literacy) असलेले कॅश फ्लो क्वाड्रंट cash flow quadrant हे माझे My Favorite Book Essay in Marathi.

आर्थिक क्षेत्रातील यश हे बऱ्यापैकी कुणाच्या ह्या क्षेत्रातील सवयींवर अवलंबून असते आणि ह्या सवयी एका रात्रीत बदलत नाहीत. पुस्तके ह्या बाबतीत मात्र फार उपयोगी ठरतात. पुस्तक वाचनात जर अखंडता असली तर अशी पुस्तके खऱ्या वाचकाला अपेक्षेपेक्षाही जास्त देऊन जातात असे वाटते. My Favorite Book Essay in Marathi ह्या नावाने हे पुस्तक नक्कीच आपल्या संग्रही ठेवण्यासारखे आहे.

जर आज कुणी आर्थिक बाबतीत कोणता रस्ता निवडावा? ह्या व्दिधा मनस्थितीत असेल आणि आपले आर्थिक भविष्य बदलवू इच्छित असेल व त्याचे नियंत्रण आपल्या हातात घेऊ इच्छित असेल तर कॅश फ्लो क्वाड्रंट (Cash flow quadrant) हे my favourite book त्यांना ह्या प्रवासाचा एक नकाशा बनवण्यात जरूर मदत करेल. ह्या वेगवेगळ्या quadrant मध्ये E म्हणजे Employee कर्मचारी, S म्हणजे self Employed स्वतःचा व्यवसाय करणारा, B म्हणजे Business चा मालक आणि I म्हणजे Investor किंवा गुंतवणूकदार.

आपल्यातील प्रत्येक व्यक्ती ह्या चार भागांपैकी कमीत कमी एका भागात (quadrant) राहत असते. आपण कोणत्या भागात असू हे आपली कमाई कोणत्या quadrant मधून होते त्यावर अवलंबून असते. ज्यांची कमाई नोकरीतून होते ते E मध्ये असतात. स्वतःचा व्यवसाय करून कमाई करणारे लोक S मध्ये येतात. आपल्या अधीन असलेल्या व्यवसायातून कमाई करणारे लोक B मध्ये तर स्वतःच्या गुंतवणुकीतून कमाई करणारे लोक I quadrant मध्ये येतात. हे पुस्तक माझ्या Favorite book मध्ये आहे कारण ह्या पुस्तकात ह्या चारही भागांबद्दल फारच उत्कृष्ट भाषेत लिहिलेले आहे. पुस्तकाचा लेखक स्वतःला writer of best selling books का म्हणून घेतो? ही गोष्ट हे पुस्तक वाचल्यावर कळून येते.

ह्या पुस्तकात प्रत्येक quadrant मधील लोक कशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करतात हे सांगितले आहे. कॅश फ्लो क्वाड्रंट ह्या पुस्तकाला Rich Dad Poor Dad ह्या पुस्तकाचा दुसरा भाग म्हटलं तरी चालेल. दोन्ही वडिलांचे पैशाबद्दलचे वेगवेगळे विचार आजही विचार करण्याला भाग पाडतात. दोघांचे वेगवगेळे विचार वाचताना पैशाबद्दलच्या एवढ्या सुद्धा गोष्टी असतात हे सुद्धा एखाद्याला पहिल्यांदा कळले तर आश्यर्य वाटायला नको. My Favorite Book essay in marathi ह्या अंतर्गत ही दोन्ही पुस्तके येतातच.

जेव्हा जेव्हा लेखकाला तू मोठा होऊन काय होणार? हा प्रश्न विचारला गेला तेव्हा तेव्हा त्याच्या गरीब वडिलांनी त्याला सल्ला दिला कि शाळेत जा, चांगले मार्क मिळव आणि एक सुरक्षित नोकरी शोध. ह्याउलट Rich dad सांगायचे कि शिका, व्यवसाय तयार करा व यशस्वी गुंतवणूकदार बना. Poor Dad नेहमी Cash flow quadrant च्या डाव्या बाजूत म्हणजे E किंवा S quadrant मध्ये राहण्याचा सल्ला द्यायचे. ते म्हणत कि मोठ्या पगाराची नोकरी असणारा कर्मचारी किंवा Self Employed जसे कि वकील किंवा डॉक्टर बन पण Rich Dad व्यवसाय बनवण्यावर भर देत असत.

ही पुस्तके वाचतांना वाचक हळूहळू लेखकांच्या विचारांशी एकरूप होतो अगोदर जरी लेखकाचे विचार पचायला जड जात असले तरी ह्या my favorite book पुस्तकांच्या नियमित वाचनाने वाचक आर्थिक बाबतीत एक दुसरी बाजू विचारात घ्यायला तयार होतो.

ह्या पुस्तकात लेखकाने Rich Dad च्या सल्ल्याला अंगिकारले आणि नंतर ह्या प्रवासात मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक स्तरावर काय अनुभव आले हे विस्ताराने लिहिले आहे. ह्या पुस्तकात लेखकांमध्ये कसे बदल झालेत हे सुद्धा वाचता येते. लेखकाने पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्या निर्धन अवस्थेचे वर्णन केले आहे कि जेव्हा ते बेरोजगार आणि बेघर होते, तेव्हा पत्नीसोबत एका गाडीतच राहत असत. जेव्हा त्याच्या एका मित्राला हे कळले कि तेव्हा त्याने त्यांना आपल्या तळघरात राहायला जागा दिली. तेव्हा लोक त्यांना नोकरी करण्याचा सल्ला देत असत परंतु लेखकाने हा रस्ता नेहमी टाळला.

हि स्थिती पुस्तकात ह्यासाठी लिहिली कि बरेच लोक हे म्हणतात कि पैसे कमावण्यासाठी पैशाची गरज असते आणि नेमके लेखक ह्याच गोष्टीशी सहमत नाही. मग पैसे कमावण्यासाठी कशाची गरज आहे? त्यासाठी एक स्वप्न, दृढ संकल्प, लवकर शिकण्याची इच्छा आणि तुमची कमाई कोणत्या quadrant मधून होते? हे ओळखण्याची गरज आहे. कॅश फ्लो क्वाड्रंट book फार मनोरंजक पद्धतीने लिहिला आहे. चारही quadrant मध्ये गरीब आणि श्रीमंत लोक आढळतात हे सांगताना लेखक लिहितो कि एखादा व्यक्ती अमुक quadrant मध्ये आहे ह्याचा अर्थ तो आर्थिक बाबतीत यशस्वी आहेच असे नाही.

कॅश फ्लो क्वाड्रंट वरून दिसायला एक चित्र आहे; परंतु ह्या चित्राच्या आत एक वेगळेच जग तुम्हाला आढळेल आणि त्याला पाहण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन आढळेल. लेखक ह्या चित्राच्या डाव्या आणि उजव्या दोनी quadrant मध्ये राहून असल्याने हे सांगतो कि दोन्ही भागातून जग वेगवगेळे दिसते. एक quadrant दुसऱ्या quadrant पेक्षा सरस नाही. प्रत्येक quadrant मध्ये शक्ती आहे आणि प्रत्येकात कमजोरी पण आहे.

ह्या पुस्तकात असे गुण सुद्धा वर्णन केले आहेत कि जे प्रत्येक quadrant मध्ये यशस्वी व्हायला जरुरी आहेत. लेखक म्हणतो कि कुण्या व्यक्तीचा quadrant कोणता आहे हे ओळखायला त्याच्या शब्दावर लक्ष द्यायला हवे. लेखक ९ वर्षाचा असतानापासून Rich Dad जवळ बसायला लागला. Rich dad जेव्हा लोकांना नोकरीवर ठेवायला त्यांची मुलाखत घेत असत तेव्हा ते लेखकाला आपल्याजवळ बसवायचे आणि लोकांच्या शब्दावरून ते कोणत्या quadrant मध्ये आहेत त्याचे विश्लेषण लेखकाला समजावून सांगत.

E मधील लोक म्हणत असत कि ते एका सुरक्षित नोकरीच्या शोधात आहेत. S quadrant मधील लोक म्हणत असत कि माझी फी २००० रुपये आहे किंवा माझे कमिशन ४ टक्के आहे. B चा व्यक्ती म्हणायचा कि माझ्या कंपनीला चालवायला मी एक नवीन संचालक शोधत आहो तर I quadrant मधील व्यक्ती म्हणत असे कि माझा Cash Flow अमुक गुंतवणुकीतून येत आहे वगैरे वगैरे.

लेखकाचे Rich Dad श्रीमंत वडील नेहमी म्हणत असत कि शब्द शक्तिशाली असतात. जर तुम्हाला लोकांचा लीडर बनायचं असेल तर तुम्हाला शब्दांचा उपयोग करण्यात कुशल असले पाहिजे. कॅश फ्लो क्वाड्रंट च्या उजव्या भागातून प्रचंड संपत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी OPT म्हणजेच Other people’s time आणि OPM म्हणजेच Other people’s money काम करतात आणि ह्या दोन्ही गोष्टी उजव्या भागात आढळून येतात.

हे पुस्तक कडू औषधासारखे वाटते पण म्हणूनच मला नेहमी आवडते. लोक व्यवसाय न बनवता गुंतवणूकदार कसे बनतात आणि मग त्यांचे नुकसान कसे होऊ शकते हे सांगताना लेखक लिहितो कि कॅश फ्लो क्वाड्रंट मधील डाव्या बाजूचे लोक जे सुरक्षा ह्या शब्दाला महत्व देतात त्यांचे शब्द बहुधा Diversification, Blue Chip Stock, Mutual Funds इत्यादी असतात. हे Favourite marathi book एक मार्गदर्शिका आहे. प्रत्येक वाचक ह्यातून आपल्या आपल्या क्षेत्रात महत्वाचा धडा घेऊ शकतो. ही पुस्तके आर्थिक शिक्षणात रस नसलेल्या वाचकाला थोडे जड वाटू शकतात; परंतु स्वतःच्या विकासासाठी जागरूक असलेल्या वाचकाला अशी पुस्तके एका दीपस्तंभासारखे वाटू शकतात.

लेखक आपल्या सगळ्या पुस्तकात व्यवसाय बनवण्यावर जास्त भर देतो आणि म्हणूनच व्यवसाय न करता एकदम Investor बनण्यामध्ये काय धोके असतात आणि काय नुकसान होऊ शकते ह्याचे चित्र देखील वाचकांपुढे निर्माण केले आहे. My Favorite Book Essay in Marathi ह्या विषयात ह्या पुस्तकाचा थोडा थोडा भाग निबंध रूपाने लिहिणे जास्त सोयीचे आहे असे वाटते. कारण पुस्तकाची व्याप्ती लक्षात घेता एका लेखात संपूर्ण पुस्तकाचा सार लिहिणे कठीणच आहे.

हे सुद्धा वाचा:  “Rich Dad Poor Dad रिच डॅड पुअर डॅड”

मला आवडलेले पुस्तक “सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माईंड” (हिंदी)

मला आवडलेले पुस्तक

मला आवडलेले पुस्तक ह्या लेखात आज अजून एका छान पुस्तकाची ओळख करून घेऊया. “Secrets of the Millionaire Mind” हे मूळ इंग्रजी पुस्तक भाषांतरित स्वरूपात हिंदी आणि मराठी मध्ये उपलब्ध आहे.

मला आवडलेले पुस्तक

मला आवडलेले पुस्तक- पुस्तकाचे नावात जरी मिलियनेअर शब्द वापरला असला तरी हे पुस्तक वैयक्तिक अर्थकारणात personal finance सर्वसाधारण व्यक्तीसाठी तेवढेच महत्वाचे आहे.

प्रस्तावनेतच लेखक टी हार्व एकर म्हणतात कि जर तुमच्या सुप्त मनाचा ‘आर्थिक ब्लूप्रिंट’ सफल होण्यासाठी ‘निर्धारित (SET)  नसेल तर तुम्ही कितीही शिका, कितीही माहिती करून घ्या किंवा अजून काही पण करा; कोणत्याही गोष्टीने काही खूप जास्त फरक पडणार नाही. 

मला आवडलेले ह्या पुस्तकात लेखक सांगतो कि काही लोकांचे श्रीमंत बनणे आणि बाकी लोकांचे गरीब बनून राहणे हे का निर्धारित होते? लहानपणी आपल्यावर पडलेले प्रभाव आपला ‘आर्थिक ब्लूप्रिंट’ कसा बनवतात? 

ह्यातील भाग १ मध्ये हे सांगितलेले आहे कि आपल्यापैकी प्रत्येक मनुष्याला पैशांच्या बाबतीत विचार करण्याला आणि  काम करायला  कसे तयार केलेले आहे? आर्थिक बाबतीत ‘मानसिक ब्लूप्रिंट’  बदलण्याचे काही उपाय ह्यामध्ये सांगितलेले आहेत. 

भाग २ मध्ये आर्थिक बाबतीत श्रीमंत आणि गरीब लोक कसा विचार करतात हे सांगितले आहे आणि इथे असे सिद्धांत आणि उपाय सांगितले आहेत  कि ज्यामुळे वाचकाची आर्थिक स्थिती बदलायला सुरुवात होईल.  

एकंदरीत मला आवडलेले पुस्तक- ह्या पुस्तकात लेखकाने वास्तविक पैसे कसे कमवावे ह्या ऐवजी पैशाबद्दल कसा विचार केला तर पैसा हाती येईल आणि टिकेल ह्यावर विस्ताराने लिहिलेले आहे.

लेखक म्हणतो कि ‘हे कुणाला विचित्र वाटू शकते पण  ह्या गोष्टी शिकल्यानंतर माझे जुने व्यवसाय आणि नव्याने सुरु केलेल्या व्यावसायिक हालचाली सगळ्याच यशस्वीपणे वाढायला लागल्या. जर तुम्हाला जीवनात अजून उंच स्तरावर पोहोचायचे असेल तर जुन्या विचारांना सोडून नवीन पद्धतीने विचार करायला सुरुवात  करावी लागेल आणि असे केल्याने येणारे निकाल स्वतःच तुम्हाला चकित करून सोडतील.

मला आवडलेले ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखक म्हणतो कि जसे पैशांचे वरून दिसणारे काही नियम आहेत तसेच न दिसणारे पण आतून प्रभावीपणे काम करणारे सुद्धा काही नियम आहेत. काही लोकांजवळ पैसे तर खूप येतात पण ते लवकरच त्याला गमावून देतात. काही लोक एखाद्या व्यवसायात सुरुवात खूप चांगली करतात पण नंतर सगळे एकदम खाली येते. वरून जरी खराब अर्थव्यवस्था, खराब भागीदार वगैरे कारणे दिसत असतील तरी ह्या सगळ्यांच्या पलीकडे आतून हे वेगळेच कारण असते.

लेखक म्हणतो कि ‘तुमच्याकडे खूप पैसे येईलसुद्धा पण जर तुम्ही त्याला सांभाळायला तयार नसाल तर ह्या गोष्टीची खूप शक्यता आहे कि हा पैसा जास्त काळ तुमच्याकडे टिकणार नाही आणि लवकरच तुम्ही त्याला गमावून बसाल.’

ह्या पुस्तकात “दौलत के सिद्धांत” ह्या शीर्षकाखाली जागोजागी काही परिणामकारक सिद्धांत दिलेले आहेत.  

एक सिद्धांत सांगतो कि ‘धन परिणाम आहे, दौलत परिणाम आहे, आरोग्य परिणाम आहे, आजार परिणाम आहे, लठ्ठपणा परिणाम आहे. आपण कारण आणि परिणामाच्या जगात राहतो. आपल्याला जे सुद्धा परिणाम भेटत आहेत; ते फायद्याचे  असो वा नुकसानदायक, चांगले असो किंवा वाईट, सकारात्मक असो किंवा नकारात्मक, हे नेहमीच लक्षात घ्या कि बाहेरचे जग हे आपल्या आतील जगाचा आरसा आहे’.

एखाद्या व्यक्तीची कंडिशनिंग तीन प्रकारे कशी होते हे सांगताना लेखक लिहितो कि पहिला प्रकार म्हणजे शाब्दिक प्रोग्रामिंग म्हणजे  त्याने लहानपणी काय ऐकले होते?

दुसरा प्रकार मॉडेलिंग किंवा अनुसरण म्हणजेच  त्याने लहानपणी काय पाहिले होते?

आणि तिसरा प्रकार म्हणजे त्याने लहानपणी काय अनुभव केला होता?

ह्या तिन्ही प्रकारावर लिहीत असताना लेखकाने स्वतःबद्दल सुद्धा उदाहरणे दिले आहेत आणि स्वतःला रिकंडिशन कसे केले ह्याबाबत जे लिहिले त्याचा वाचकांना फायदाच होतो.

ह्या पुस्तकातून एक गोष्ट स्पष्टच सांगितली आहे होते कि जरी कुणाजवळ जगातील सगळे ज्ञान आणि योग्यता असेल पण त्याचा ब्लूप्रिंट जर यशासाठी निर्धारित नसेल तर आर्थिक दृष्ट्या असा व्यक्ती अपयशीच ठरण्याची दाट शक्यता असते.  

मला आवडलेले पुस्तक Secrets of the Millionaire Mind मध्ये लेखक एक अजून सिद्धांत सांगतो कि जर एखाद्याची पैसे कमावण्याची किंवा यश मिळवण्याची प्रेरणा नकारात्मक असेल; जसे कि भीती, राग, किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज तर असा पैसा किंवा यश त्या व्यक्तीला सुखी बनवू शकणार नाही.

जे लोक पैसा मिळाला म्हणजे मी सुखी होईल हा विचार करत असतील अशा लोकांच्या विचारांना ह्या सिद्धांतामुळे एक धक्का लागणे साहजिक आहे.

अजून एका सिद्धांतात लेखक लिहितो कि पैसा ज्या क्षेत्रात कामाचा आहे त्या क्षेत्रात खूप महत्वपूर्ण आहे आणि ज्या क्षेत्रात तो काम करत नाही त्या क्षेत्रात अगदीच शुल्लक आहे.

ह्यावरून काय अर्थ लागतो? कि सगळीकडे पैसा कामाचाच आहे असे मुळीच नाही. अजून एक सिद्धांतात लेखक लिहितो कि काही लोक सवयीने तक्रारकर्ते असतात. ते जिवंतपणी स्वतःला कष्ट आकर्षित  करणारे चुंबक बनतात.

एका ठिकाणी सांगितले आहे कि जे लोक खरंच श्रीमंत बनू इच्छितात ते आपल्या कामाशी समर्पित असतात पण साधारण लोक फक्त श्रीमंत बनू इच्छितात; त्याचेशी निगडित काम करायची त्यांची तयारी नसते.

एक अजून सिद्धांत सांगतो कि तुम्ही स्वतःच्या कमाईला कधी कोणत्या मर्यादेत बांधू नका. इथे लेखक वाचकांना स्वतःसाठी काम करण्याचा सल्ला देतात; जेणेकरून त्यांच्या मेहनतीचा फायदा त्यांना स्वतःला होऊ लागेल.

एक आणखी सिद्धांत सांगतो कि श्रीमंत स्वतःच्या पैशाकडून खूप काम करवून घेतात आणि गरीब लोक पैशांसाठी खूप काम करतात.  

थोडक्यात मला आवडलेले हे पुस्तक जरी पैशांशी निगडित असले तरी सुद्धा आपल्या विचाराच्या सवयी आपल्याला कसे व कुठे थांबवायचा प्रयत्न करतात ह्यावर वाचकाला विचार करायला भाग पाडते.

वेगवेगळ्या सिद्धांतात खूप परिणामकारक नियम सोप्या पद्धतीने आणि उदाहरणासहित स्पष्ट केले आहेत. वैयक्तिक अर्थकारणात अधिक  शिकू इच्छिणाऱ्या वाचकाच्या संग्रही असले पुस्तक हवेच असे वाटते.

हे सुद्धा वाचा:Investment Book in Marathi Stocks to Riches

error: Content is protected !!