लेखकाविषयी

अभिमन्यू काळणे (M Tech ) ह्यांचे पदव्यूत्तर शिक्षण खाद्य प्रसंस्करण अभियांत्रिकीत झाले असून ते ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. लेखक हे आवडीने सखोल वाचक आहेत आणि विविध विषयावर वाचन करणे हा त्यांचा जोपासलेला छंद आहे.
लेखकाचा गुंतवणूक विषयात विशेष ओढा आहे आणि वाचनाने, प्रशिक्षणाने, चर्चासत्रांनी अनुभवलेले ज्ञान हौशी वाचकांशी सामायिक करण्यासाठी त्यांनी “पैसा मंत्र” ह्या मराठी ब्लॉगची निर्मिती केली आहे. लेखकाला ग्रामीण विकास, पर्यावरण, छोटे व्यवसाय उभारणी आणि मनुष्यबळ विकास, प्रक्रिया व मूल्यसंवर्धीत पदार्थ व त्यांचे विपणन इत्यादी विषयात विशेष आवड आहे.
लेखक कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक साधनांच्या विक्रीमध्ये किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही सेवा कंपनीशी संबंधित नाहीत त्यामुळे वाचक इथे लेखकाला आवडलेल्या गुंतवणूक विषयाबद्दल निःपक्षपातीपणे माहिती वाचण्याची अपेक्षा करू शकतात.
लेखकाचे अन्य संकेतस्थळ- www.myeblackboard.com

पैसा मंत्र अनुदिनीबद्दल थोडंस हितगुज

“पैसा मंत्र”   ही गुंतवणूक विषयाला उलगडून दाखवणारी एक मराठी अनुदिनी आहे. ह्यामध्ये वैयक्तिक अर्थकारण (Personal Finance) तसेच शेअर बाजार, म्युच्युअल फंडस्, गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र, बचतीच्या सवयी इत्यादी अनेक विषयाला वेगवेगळ्या लेखातून चर्चेला घेतले आहे. ह्याचा  एकमेव  उद्देश गुंतवणुकीच्या क्षेत्रातील माहिती सोप्या शब्दांत आणि निःपक्षपातीपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. लेखक स्वतः ह्या क्षेत्रात एक सखोल वाचक आणि प्रयत्नशील लेखक आहे आणि आपल्या अनुभवानुसार आर्थिक क्षेत्रातील लेख लिहिण्यासाठी आवडीने कार्यरत आहे.

“पैसा मंत्र”  ह्या अनुदिनीचे लेखक कोणत्याही अन्य कंपनीच्या कसल्याही प्रकारच्या गुंतवणूक साधनामध्ये विक्रीमध्ये सामील नाहीत त्यामुळे वाचक इथे योग्य आणि निखळ ज्ञानवर्धक माहिती मिळण्याची अपेक्षा करू शकतात. 

जर एखादा गुंतवणूकदार आर्थिकदृष्ट्या साक्षर असेल तर कोणीही त्याला / तिला चुकीच्या आर्थिक उत्पादनांची/ गुंतवणूक साधनांची विक्री करू शकत नाही. मराठी वाचकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रांजळ प्रयत्न आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1) “पैसा मंत्र” काय आहे?

“पैसा मंत्र”  बचत गुंतवणूक आणि वैयक्तिक अर्थकारणावर एक मराठी अनुदिनी आहे जिथे  बचत,  गुंतवणूक योजना, शेअर बाजार, म्युच्युअल फंडस् आणि वैयक्तिक अर्थकारणावर तसेच गुंतवणूक विषयावरील पुस्तकांच्या समीक्षा आणि संबंधित लिखाण वाचक वाचू शकतात. गुंतवणूक विषयात नव्याने प्रवेश करणाऱ्या वाचकांना ह्यामुळे नक्कीच लाभ मिळेल अशी आमची खात्री आहे.

2) “पैसा मंत्र” अनुदिनीची निर्मिती का झाली?

आर्थिक क्षेत्रातील व्यवहारासंबंधी जेवढे पाहिजे तेवढे शिक्षण सामान्य गुंतवणूकदारांमध्ये सहसा आढळत नाही. मराठी भाषेत अशी माहिती ही अजूनही कमी प्रमाणात आहे आणि म्हणून गुंतवणूक क्षेत्रात निःपक्षपातीपणे लिहिलेली अशी माहिती नव्याने गुंतवणूक क्षेत्रात आलेल्या व्यक्तींसाठी  फायदेशीर ठरणारी आहे. आर्थिक साक्षरतेवर काम करण्याच्या हेतूने मराठी वाचकांसाठी ह्या अनुदिनीची निर्मिती झाली आहे.

3) “पैसा मंत्र” ही अनुदिनी कुणासाठी आहे ?

जे वाचक आर्थिक क्षेत्रात अधिक शिकण्याच्या इच्छेचे आहेत आणि ह्या संबंधित माहितगार व्यक्ती, पुस्तके व इतर साहित्याच्या मदतीने नवनवीन गोष्टी शिकण्याच्या तयारीचे आहेत अशा वाचकांसाठी ह्या अनुदिनीवरील लेख उपयोगी सिद्ध होतील अशी आमची खात्री आहे. नुकतेच नोकरीत लागलेले तरुण किंवा नव्याने सुरुवात केलेले तरुण व्यावसायिक हे सुद्धा ह्या अनुदिनीच्या काही लेखांद्वारे काही साध्या परंतू भविष्यात मोठा फरक घडवणाऱ्या चुका टाळून स्वतःसाठी बचत आणि गुंतवणुकीची योजना बनवून भविष्यात लाभ करून घेऊ शकतील.

4) माझ्या वैयक्तिक माहितीचे “पैसा मंत्र” अनुदिनी काय करते ?

“पैसा मंत्र” ह्या अनुदिनीवर आम्हाला वाचकांची गोपनीयता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. सदर ब्लॉगवर आम्ही  वाचकांना कुठल्याही प्रकारची वैयक्तिक माहिती विचारत नाही. एखाद्या लेखावर टिप्पण्या करताना वाचक आपले नाव व ई-मेल लिहितात ती माहिती फक्त आम्हाला दिसू शकते. अशी नावे व ई-मेल आम्ही कसल्याही प्रकारे इतर लोकांना व कंपनीला देत नाही. ई-मेल चा वापर “पैसा मंत्र” वरील नवीन उपक्रमांची माहिती वाचकांना ई-मेल द्वारे देण्यासाठी केल्या जाऊ शकतो. ह्यावर अधिक माहितीसाठी आमची Privacy Policy आपण वाचू शकता.

5) पैसा मंत्र अनुदिनीला आर्थिक लाभ कसा होतो ?

“पैसा मंत्र” ब्लॉग वर आमच्यासाठी वाचकवर्ग सगळ्यात अधिक महत्वाचा आहे.   मराठी भाषिक वाचकांना वैयक्तिक अर्थकारणावर  निखळ माहिती पुरवण्यासाठी ह्या ब्लॉग ची निर्मिती झाली आहे. ह्या अनुदिनीमध्ये आम्ही स्वतः वाचलेल्या   पुस्तकांच्या समीक्षा केलेल्या आहेत व वाचकांना उपयोगी ठरणाऱ्या अशा पुस्तकांच्या अफिलियट लिंक द्वारे पुस्तके खरेदी झाल्यास वाचकांना कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त किमतीशिवाय आम्हाला अल्प प्रमाणात कमिशन  मिळू शकते. ह्या ब्लॉग वर असलेल्या जाहिरातीवर क्लिक केल्यास गुगल ऍडसेन्स द्वारे आम्हाला अल्प प्रमाणात लाभ होऊ शकतो. ह्यामुळे मिळालेल्या अल्प रकमेचा उपयोग आम्हाला ह्या अनुदिनीला संचालित करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी, अजून नवीन पुस्तके, माहिती, प्रशिक्षण इत्यादी घेण्यासाठी होऊ शकतो, ज्यामुळे  “पैसा मंत्र” अनुदिनीवर अजून दर्जेदार माहिती देण्यासाठी आम्हाला मदत होऊ शकते. वाचकांच्या सहकार्याने ही अनुदिनी अजून वृद्धिंगत झाल्याने आर्थिक क्षेत्रातील नवनवीन माहिती देण्यासाठी आम्ही अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरित होऊ शकू.