|

The psychology of money marathi-पैशाचे मानसशास्त्र

rhe psychology of money marathi

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र

The psychology of money marathi हे मॉर्गन हाऊजेल ह्या लेखकाचे पुस्तक मी नुकतेच वाचून संपवले आणि पैशाबद्दलच्या विविध लोकांच्या विविध विचारांना एका लहान पुस्तकात एवढ्या समर्पकरीत्या लेखकाने कसे मांडले ह्याचे नवल वाटले. अर्थात ह्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना अनुवादक श्री जयंत कुलकर्णी ह्यांनी त्याच तोलामोलाची उत्कृष्ट शब्दरचना करत ह्या पुस्तकाच्या भाषांतराला न्याय मिळवून देण्यात काहीच कसर ठेवली नाही हे वेगळे सांगायला नको.

The psychology of money marathi ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखक तीन लोकांच्या आणि त्यांच्या पैशांच्या सवयींबद्दल लिहितो. लेखक आपल्या महाविद्यालयीन जीवनात एका हॉटेल मध्ये काम करायचा.

पहिला व्यक्ती एक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेला एक यशस्वी उद्योजक असतो आणि ह्या हॉटेलचा नेहमीच ग्राहक असतो. त्याचेजवळ बक्कळ पैसे असत, पण त्याची पैशाबद्दल एक विचित्र सवय होती.

शंभर डॉलरच्या नोटांची एक गड्डी तो नेहमी लोकांना दाखवत असे, भले कुणाला त्यात काही रस नसो.

एकदा त्याने लेखकाच्या एका सहकाऱ्याला काही पैसे दिले आणि सोनाराच्या दुकानातून काही सोन्याची नाणी आणण्यास सांगितले. ती नाणी घेऊन तो आणि त्याचे मित्र समुद्रकिनाऱ्यावर गेले आणि कुणाचे नाणे दूर पर्यंत जाते ह्याचा खेळ खेळायला लागले.

सोन्याची नाणी पाण्यात फेकण्याचा हा खेळ विचित्रच म्हणायला हवा. कालांतराने अशा गर्विष्ठ व्यक्तिजवळचे पैसे लवकरच संपले आणि त्याचे दिवाळे निघाले.

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र ह्यात उल्लेख केलेला दुसरा व्यक्ती म्हणजे रोनाल्ड जेम्स रीड. रोनाल्ड रीड हा एक सामान्य माणूस होता. त्याने २५ वर्षे पेट्रोलपंपावर गाड्या धुतल्या आणि १७ वर्षे इमारतीतील फरशा सुद्धा पुसल्या.

ह्या अतिसामान्य माणसाच्या गोष्टीत काय विशेष? असे तुम्हाला वाटले असेलच. जेव्हा रोनाल्ड रीड ९२ व्या वर्षी स्वर्गवासी झाला तेव्हा त्याच्याकडे ८० लाख डॉलर एवढी प्रचंड रक्कम होती आणि हा साधा कामगार मृत्यूनंतर जगभरात प्रसिद्ध झाला.

आता तिसऱ्या व्यक्तीकडे वळूया. रोनाल्ड रीडच्या मृत्यूच्या काही महिने आधीच रिचर्ड फुस्कॉन ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्याही मृत्यूची दखल वर्तमानपत्रांनी घेतली पण वेगळ्या विषयासाठी.

रिचर्डचे शिक्षण म्हणजे हार्वर्ड मधून MBA आणि नंतर वित्त क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी. प्रचंड यश मिळवून वयाच्या चाळीशीत तो निवृत्त झाला. नंतर त्याने भव्य अशा घरासाठी मोठे कर्ज काढले आणि नंतर २००८ च्या आर्थिक मंदीत त्याच्या मालमत्तेचा लिलाव करावा लागला. न्यायालयात त्याचे शब्द होते- आता माझे उत्पन्न शून्य आहे.

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र

इथे हे सगळे सांगण्याचा काय उद्देश आहे? तर पैशाचा योग्य उपयोग करण्याचा आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा फारसा संबंध नसतो हे सांगण्यासाठीच The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र हे पुस्तक लिहिले गेले आहे. रोनाल्ड रीड आणि रिचर्ड फुस्कॉन एकाच वेळी कसे अस्तित्वात येऊ शकतात? ह्याची लेखकाने दोन स्पष्टीकरणे दिली आहेत.

पहिले म्हणजे लेखकाच्या मते आर्थिक यशाचा आणि तल्लख बुद्धी व श्रमाचा फारसा संबंध नसावा. बरेचदा कुणी नशिबाने सुद्धा आर्थिक क्षेत्रात यशस्वी होतो.

दुसरे म्हणजे आर्थिक क्षेत्रातील यश हे काही एक नियमबद्ध असे शास्त्र नाही. आल्या वेळेला तुम्ही कसे वागता ह्यावर देखील पुढील प्रचंड यश-अपयश अवलंबून असते. हे एक असे कौशल्य आहे कि तुमच्याजवळ असलेल्या ज्ञानापेक्षा तुम्ही त्यावेळेस कसे वागता? ह्याला महत्व असते आणि ह्या कौशल्यालाच लेखक The psychology of money – पैशाचे मानसशास्त्र असे म्हणतो.

हे पैशाचे मानसशास्त्र व अशी कौशल्ये नेहमी दुर्लक्षितच राहिली आहेत. लेखकाने ह्या पुस्तकातून लहान लहान गोष्टींद्वारे हे मानसशास्त्र वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. पैसा मंत्र ह्या आपल्या Marathi investment blog मध्ये सुद्धा नेमक्या ह्याच विषयावर लेख लिहिले आहेत. The psychology of money marathi हे पुस्तक आणि आपल्या ब्लॉग वरील लेख बऱ्याच अंशी साधर्म्य ठेवतात.

the psychology of money marathi
Photo by Shiromani Kant on Unsplash

एकूण २० प्रकरणात विभागलेल्या The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र ह्या पुस्तकात लोकांचे पैशाबद्दलचे समज, अनुभव, त्यांनी पाहिलेल्या गोष्टी, त्यांच्या बचतीच्या सवयी, आशा-निराशेच्या काळातील पैशाबद्दलचे बदलते विचार, पैसे आणि स्वातंत्र्य, श्रीमंत होणे व श्रीमंती टिकवणे ह्यातील फरक, भाग्य आणि जोखीम अशा अनेक विषयांवर प्रभावी चर्चा केलेली आहे.

अगदी सुरुवातीच्याच प्रकरणात – ज्याचे शीर्षक “कोणीही मूर्ख नसतं !” असे आहे – “लोक पैशाबद्दल विचित्र वागतात पण ते विचित्र नसतात” असे म्हटले आहे. मला देखील हा प्रश्न कित्येकदा पडायचा कि अनेक जण वेगवेगळा दृष्टिकोन ठेवतात पण कुणीच स्वतःला चूक ठरवत नाही. मग खरा बरोबर कोण ? त्यावर निरीक्षणाने मी ह्या निर्णयावर आलो होतो कि जो तो आपल्या परीने योग्य तेच करतो. ह्या प्रकरणात ह्याच गोष्टीबद्दल सविस्तर लिहिलेले आढळले.

म्हणजे नेमके आहे तरी काय? थोडे विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ह्यात लिहिले आहे कि वेगवेगळ्या पिढीतील लोक, वेगवेगळ्या संस्काराखाली वाढलेले लोक, वेगवेगळ्या गोष्टींनी प्रोत्साहित होणारे लोक, वेगवेगळे भाग्य घेऊन जन्मणारे लोक हे आपापल्या परीने वेगवगेळे धडे शिकतात आणि त्याचाच अवलंब करतात.

गरिबीत वाढलेला मुलगा त्याचे मोठेपणीचे निर्णय त्याच्या गरिबीच्या अनुभवावरून घेतो तर पैशाची कमतरता नसलेला श्रीमंतांचा मुलगा त्याच्या निर्णयात वेगळेपणाने वागतो. दोघेही आपल्या दृष्टिकोनाला ठाम चिकटून असतात. मंदीत वाढलेल्या लोकांना आणि तेजीत जन्मलेल्या लोकांना पैशांचे वेगवेगळे अनुभव येतात. एका पिढीतील लोक सावधपणे फिक्स्ड मध्ये रक्कम जमा ठेवतात व एका पिढीतील लोक फिक्स्ड मधील रकम काढून शेअर्स मध्ये टाकतात. दोघेही आपण कसे योग्य हे सांगतात व दुसरे कसे चुकीचे ते देखील बोलून दाखवतात.

वाचकाला The psychology of money marathi हे पुस्तक आर्थिक क्षेत्रातील उदाहरणांच्या साहाय्याने उच्च दर्जाचे वैचारिक खाद्य पुरवेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अनेक गोष्टींच्या साहाय्याने सुद्धा हे पुस्तक प्रभावी बनले आहे.

मराठी भाषेत मधुश्री प्रकाशन द्वारे प्रकशित The psychology of money marathi हे पुस्तक वाचतांना पानोपानी मराठीतील शब्दसंपदा पाहून अनुवादक श्री जयंत कुलकर्णी ह्यांनी घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते. सरतेशेवटी ह्या पुस्तकातील दर्जेदार मजकूर वाचतांना वाचकांचा सुद्धा कस लागणार हे निश्चितच.

हे सुद्धा वाचा: आवडत्या पुस्तकातील पैशांच्या गोष्टी

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.