Think and Grow Rich

think and grow rich

Think and Grow Rich is the famous book written by Napoleon Hill.

Think and Grow Rich म्हणजेच सोचिये और अमीर बनिये हे पुस्तक पहिल्यांदा मी 2004-2005 मध्ये वाचले असावे. Manjul Publication चे निळ्या चमकत्या कव्हरचे हे पुस्तक आजही माझेजवळ आहे. हे पुस्तक हिंदी भाषिक पुस्तकांमध्ये माझे दुसरे तिसरे पुस्तक असावे.

व्यक्तिमत्व विकासाच्या पुस्तकांचे वाचन करतांना सुरुवातीलाच मला ह्या उत्कृष्ट पुस्तकाचे वाचन आणि मनन करण्याचे भाग्य मिळाले. भाग्य ह्यासाठी कारण हे प्रसिद्ध पुस्तक जगभरात आजही Personality Development च्या क्षेत्रात उत्कृष्ट मानले जाते. 1937 मध्ये झालेल्या पहिल्या प्रकाशनानंतर तब्बल ८५ वर्षानंतर देखील यश व संपत्तीबद्दल लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीला एक व्यवस्थित आकार देण्यात हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर प्रभावशाली आहे.

ह्या पुस्तकाबद्दल मला कुणी जर अभिप्राय विचारला तर मी फक्त ‘Must Read’ हे दोनच शब्द म्हणेल. माझ्या विचारांना सुरुवातीला कलाटणी देणारे तीनच पुस्तके मला आज आठवतात. ते म्हणजे Rich Dad Poor Dad, The Magic of Thinking Big आणि Think and Grow Rich.

Think and Grow Rich ह्या पुस्तकाला मी तेव्हा दोन तीनदा वाचले असावे. तेव्हा असे जाणवायचे कि पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी आणि आपण बघत असलेले जग हे अगदी विरुद्ध आहेत आणि पुस्तकातील सगळेच काही जसेच्या तसे काम करत नसावे. पण जसजसा वेळ गेला आणि इतर अनेक पुस्तकांनी मी समृद्ध होत गेलो तसतसे ह्या पुस्तकाचे महत्व मला जाणवत गेले आणि म्हणूनच मी ह्या पुस्तकासाठी ‘Must Read’ हे शब्द वापरतो.

कोळ्याचे जाळे कसे अनेक धाग्यांनी अनेक दिशांनी विणलेले असते आणि म्हणूनच सगळ्या धाग्यांच्या संतुलनामुळे ते आपल्या कामासाठी अधिक परिणामकारक ठरते. तसेच एका एका विषयाचे एकापेक्षा जास्त पुस्तके वाचत गेल्यास प्रत्येक पुस्तकाचा अधिक अधिक फायदा होऊन त्या वाचनाचा आपल्या विचारांवर अत्याधिक आणि टिकाऊ प्रभाव होत असावा.

ह्या पुस्तकाचे जर नाव आपण वाचले तर Think and Grow Rich विचार करा आणि श्रीमंत व्हा हे आहे. ‘पैसे गुंतवा आणि श्रीमंत व्हा’ असे नाही किंवा ‘काम करा आणि श्रीमंत व्हा’ असे सुद्धा नाही. यशस्वी होण्यासाठी माझेजवळ ‘हे नाही किंवा ते नाही’ अशा वाक्यांना आपल्या बोलण्यात स्थान देणाऱ्या सगळ्यांनाच हे पुस्तक एक मंत्र शिकवते. तो म्हणजे सफलता किंवा श्रीमंती ही विचारांवर अवलंबून असते. हेन्री फोर्ड साहेबांचे एक वाक्य आहे. Thinking is the hardest work there is, which is probably the reason why so few engage in it. म्हणूनच यशस्वी लोक आपल्या विचारांना एवढे महत्व देत असावेत.

think and grow rich

Think and grow rich

प्रस्तावनेत प्रकाशकाने लिहिले आहे कि ‘हे पुस्तक व्यक्तिगत सफलतेवर लिहिलेल्या त्या अनेक प्रभावी पुस्तकांपैकी एक आहे कि जे आपल्याला आर्थिक स्वतंत्रता कशी मिळवावी हे सांगते आणि सोबतच अशी समृद्धी देखील कि जी पैशांच्या मोजपट्टी (scale) वर मोजू शकत नाही.’ लेखकाने ह्या पुस्तकाबद्दल स्वतःचे शब्द लिहितांना म्हटले आहे कि ‘सगळी उपलब्धी आणि सगळ्या कमावलेल्या संपत्तीची सुरुवात एका विचारापासून होते.’

लेखकाच्या दाव्यानुसार ह्या पुस्तकाची प्रेरणा लेखकाला Andrew Carnegie ह्यांनी त्यांच्या व्यक्तिगत उपलब्धीच्या सूत्रांनी दिली होती. कार्नेगी हे एक अतिश्रीमंत अमेरिकन उद्योगपती होते. आपल्या सूत्रांवर काम करून कार्नेगी ह्यांनी स्वतःला तर अरबपती बनवलेच; सोबत त्या अनेक लोकांना देखील ज्यांना Carnegie ह्यांनी त्यांचे रहस्य शिकवले. लेखकाच्या दाव्यानुसार अजून 500 श्रीमंत लोकांनी आपल्या श्रीमंतीचे रहस्य लेखकाला सांगितले आणि लेखकाने आपले जीवन हे रहस्य लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून ह्या पुस्तकाच्या निर्मितीत समर्पित केले.

Think and Grow Rich हे पुस्तक Andrew Carnegie (1835-1919) ह्यांच्या मृत्यूनंतर 1937 साली लिहिले गेले आहे आणि जरी Andrew Carnegie व Napoleon Hill ह्यांची भेट झाली होती कि नाही ह्याची खात्रीलायक काही बातमी internet वर नसली तरी त्यामुळे ह्या पुस्तकाची ताकद कमी होत नाही.

ह्या पुस्तकात अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आणि सफल व्यक्तींबद्दल लिहिले आहे. माझ्या जवळ असलेल्या पुस्तकातील मी रेखांकित केलेल्या वाक्यांपैकी काही काही वाक्य खाली दिले आहेत.

Think and grow rich

प्रकरण एक: विचार ही वस्तु है
  • जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी खरंच तयार होतो तेव्हा ती गोष्ट मिळतेच.
  • संपत्ती येण्याची सुरुवात ही मानसिक स्तरावर लक्ष्याची निश्चिती केल्यानंतर होते.
  • यश हे त्यांनाच मिळते की जे त्याबद्दल जागृत असतात.
प्रकरण दोन: इच्छा

कोणत्याही उपलब्धी साठी महत्वपूर्ण म्हणजे इच्छा. नुसती इच्छा नको, प्रबळ इच्छा हवी. ह्या प्रकरणात प्रबळ इच्छेला संपत्तीत बदलण्यासाठी सहा उपाय दिले आहेत. हे उपाय खरंच खूप परिणामकारक आहेत. निश्चित इच्छा किंवा रक्कम कशी ठरवावी आणि त्यासाठी निश्चित वेळेची सीमा सुद्धा का हवी? ह्याबद्दल विस्तृत लिहिले आहे.

प्रकरण तीन:आस्था

ह्या धड्यात अवचेतन मनाची शक्ती आणि आत्मविश्वासाचे सूत्र ह्यावर सविस्तर लिहिले गेले आहे. ह्यातील एका लांब कवितेचे शेवटचे वाक्य मला आवडून गेले.

“जीवन के युद्ध में हमेशा वही नहीं जीतता जो सबसे ताकतवर या तेज होता है, बल्कि जल्दी या देर से जीतता वही है जो सोचता है की वह जीत सकता है!”

प्रकरण चार: आत्मसुझाव
  • Autosuggestion कसे द्यावे आणि त्याचा अवचेतन मेंदूवर कसा परिणाम होतो?
  • एकाग्रतेच्या शक्तीचा कसा उपयोग करावा?
  • अवचेतन मेंदूला प्रेरित करण्याचे उपाय
प्रकरण पाच: विशेषज्ञीय ज्ञान

खूप लोक म्हणतात के ‘ज्ञान शक्ती आहे.’ पण हे पूर्णतः खरे नाही. ज्ञान हे केवळ संभावित शक्ती आहे. ज्ञान शक्ती तेव्हाच बनते जेव्हा त्याचा कोणत्यातरी निश्चित योजनेत किंवा निश्चित लक्ष्य प्राप्तीसाठी उपयोग केला जातो. विशेष ज्ञान ह्याबद्दल मी नुकतेच एका पुस्तकात (The Almanack Of Naval Ravikant: A Guide to Wealth and Happiness) सविस्तर वाचले आहे. त्या पुस्तकाची चर्चा कधीतरी होईलच. Think and Grow Rich पुस्तकातील ह्या प्रकरणाचा मला दुसऱ्या पुस्तकातील विशेष ज्ञानावर सविस्तर लिहिलेल्या माहितीला सोपी करून समजण्यासाठी उपयोगच झाला.

प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्या क्षेत्राशी संबंधित विशेष ज्ञान मिळवत राहतात. विशेष ज्ञान मिळवत राहण्याची ही क्रिया कधी संपत नाही. दुसरीकडे हजारो लोक हे समजतात की एकदा शाळा महाविद्यालय झाले कि शिकण्याची प्रक्रिया बंद होते.

प्रकरण सहा: कल्पना
  • मनुष्य जिस चीज की कल्पना कर सकता है, उसकी रचना भी कर सकता है। पैसामंत्र Marathi Money Blog वर कोणत्यातरी लेखात लिहिलेल्या ‘आपल्या योजनेला लिहून त्यावर काम करण्याचे महत्व’ मी ह्याच प्रकरणातून शिकलो होतो.
  • सुरुवातीला तुम्ही आपल्या विचारांना जपता, त्यांचे संरक्षण करता, त्यांना वाढवता, मार्गदर्शन देता. मग हे विचार स्वतः शक्तिशाली बनतात आणि आपल्या रस्त्यातील सर्व अडथळ्यांना हटवतात.
इतर प्रकरणे:

प्रकरण सात ते पंधरा मध्ये सुव्यवस्थित योजना बनवून इच्छेला कार्यात कसे रूपांतरित करावे?, निर्णय कसा करावा? चालढकल करण्याच्या सवयींवर मात करण्याचे उपाय, लक्ष्य मिळवण्यासाठी आवश्यक निरंतर प्रयत्न कसे महत्वाचे आहेत, Master Mind म्हणजे इतर उपयोगी लोकांच्या समूहाची शक्ती; इत्यादींवर अनेक गोष्टींच्या साहाय्याने विस्ताराने लिहिले आहे.

सारांश:

इतर अनेक पुस्तकांच्या समीक्षेसारखेच ह्या पुस्तकाला देखील माझे Five star असले तर नवल नाही. जगात एकाहून एक सरस पुस्तके लिहिल्या गेली आहेत आणि मी वाचलेल्या काही थोडक्या पुस्तकांच्या यादीत Think and Grow Rich आपले महत्व तेवढेच टिकवून आहे असे माझे मत आहे.

हे पुस्तक यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांसाठीच एक प्रारंभिक स्तराचे पुस्तक आहे. समजेल अशी सोपी भाषा, वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टींतून सहजच मिळणारी मोलाची शिकवण ह्या सगळ्यांचा विचार करून कोणत्याही क्षेत्रात श्रीमंत (म्हणजेच आत्मविश्वास, निर्णयक्षमता, लक्ष्य निर्धारण आणि त्याला गाठणे, संपत्तीअर्जन इत्यादी इत्यादी) होण्यासाठी हे पुस्तक आवश्यक म्हणावे लागेल.

मी Think and Grow Rich सोचिये और अमीर बनिये हे पुस्तक Manjul Publication चे हिंदी भाषेत वाचलेले आहे. मी काही दिवस भोपाळ ला राहलेलो असल्याने आणि Manjul Publication तिथेच असल्याने अशा पुस्तकांची उपलब्धता तेथे नेहमीच असायची.

शिवाय Manjul Publication ची हिंदी भाषा (सहसा अनुवादक डॉ सुधीर दीक्षित व रजनी दीक्षित) मला खूपच आवडते. ह्या लेखकांनी अनुवादित केलेली पुस्तके मी डोळे बंद करून विकत घेतो असे म्हटले तरी चालेल. सध्या हे मराठीत सुद्धा भाषांतरित दिसत आहे.

हे सुद्धा वाचा: आवडत्या पुस्तकातील पैशांच्या गोष्टी

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *