Share market book in marathi

share market book in marathi

Share market book in marathi शेअर बाजारासाठी उपयोगी पुस्तके.

शेअर बाजार म्हणजे गुंतवणूकदारांचा आवडता बाजार. जो तो आपापल्या अभ्यासाने, अपेक्षेने वेगवेगळ्या कंपनीच्या share मध्ये पैसे गुंतवतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल ह्यासाठी प्रयत्नशील असतो. हे सगळे करतांना share market book in marathi आपल्याला बऱ्याच अंशी फायद्याचे ठरू शकतात.

share market book in marathi

Share market book in marathi वाचल्याने नवीन गुंतवणूकदाराचे ज्ञान वाढते व अगोदरच काम करत असलेल्या गुंतवणूकदारांना नवीन रणनीती कशा वापराव्या , संभाव्य नुकसान कसे टाळावे? इत्यादींबद्दल अनुभवी लेखकांचे मत फायदा देऊन जाते. पण काय Stock market books वाचल्याने खरंच काही फायदा होतो ? Share market books marathi इतकी महत्वाची आहेत?

माझा मागील १०-१२ वर्षाचा वैयक्तिक अनुभव सांगायचं झाल्यास होय.. पुस्तके वाचल्याने आपल्यात योग्य बदल घडतात. मी जरी खूप वेगाने अनेक पुस्तके वाचून संपवू शकलो नसलो तरी हळूहळू, जसा वेळ मिळाला तसे Share market book चे वाचन केले आहे. त्यातील बरीच पुस्तके एकापेक्षा जास्त वेळा सुद्धा वाचलीत आणि त्या आधारे Share market मध्ये सुद्धा गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजेच share market books in marathi उपयोगी ठरतात.

Which share market book in marathi are useful?

तर असे Share market book in marathi आहेत तरी किती आणि कोणती? असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल. मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल खाली विस्ताराने लिहिलेले आहेच. काही पुस्तके मी वाचली पण मला ती जास्त गुंतवून ठेवू शकली नाही. ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यात लेखकाने श्रम केले नसतील परंतु कदाचित मला त्यातील भाषा जड वाटली असावी. असो.

Stock market book मध्ये खालील पुस्तके मला विशेष आवडून गेलीत. ती का आवडलेत ह्याबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विस्ताराने वाचायचे झाल्यास काही पुस्तकांवर ह्याअगोदर लिहिलेल्या लेखांचे धागे (Link) दिलेले आहेत.

The Intelligent Investor: हे पुस्तक जरी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिले असले तरीही value investing वर अगदी शीर्ष स्तरावर आहे. अशा प्रकारचे पुस्तके वाचल्याने बाजारात असलेली Short term movement किंवा intraday momentum मुळे गुंतवणूकदार विचलित होत नाही. गुंतवणुकीत संयम असणे जरुरी आहे आणि हा संयम येण्यासाठी अशा पुस्तकांचे वाचन, चिंतन, मनन जरुरी ठरते.

Stocks to Riches: हे Share market book marathi पुस्तक छोटे जरूर आहे पण ह्यातील सामग्री अतिशय दर्जेदार आहे. नव्यानेच शेअर मार्केट मध्ये येणाऱ्याला आणि फारसे श्रम न घेणाऱ्यांना हे पुस्तक सुचवता येणार नाही पण जो व्यक्ती share market learning मध्ये शिकू इच्छितो त्याला हे पुस्तक बराच परतावा देऊन जाईल असे वाटते. Behavioural finance सारख्या गहन विषयाला ह्या पुस्तकात चर्चेला घेतले आहे. हे पुस्तक मराठीत नाही पण अशा पुस्तकाला वाचल्याने वाचकाने दिलेल्या वेळेचे चीज होते. लेखक पराग पारीख. विस्तृत समीक्षा वाचा. Stocks to Riches

Value investing and behavioral finance: हे लेखक पराग पारीख ह्यांचे अजून एक पुस्तक मला विशेष आवडले. परत एकदा हे पुस्तक सुद्धा उपयोगी सामग्रीने भरपूर आहे; परंतु हे वाचण्यासाठी आणि अचूक समजण्यासाठी वाचकाचा सुद्धा कस लागतो. अगदीच उथळ स्वरूपाचे हे पुस्तक नाही त्यामुळे वाचक सुद्धा गंभीर असला तर ह्या पुस्तकाच्या वाचनाचे निकाल त्याला शेअर बाजारातील ज्ञानाच्या रूपाने मिळतात. ह्यामध्ये Understanding behavioral trends, obstacles to value investing, investor behavior based finance इत्यादी बद्द्ल लिहिल्या गेलेले आहे.

Rich dad Poor Dad: हे पुस्तक आपल्याला ढोबळमानाने गुंतवणूक काय असते किंवा त्यातून आपण काय साध्य करणे हिताचे ठरते?, पैशाबद्दलची साक्षरता आपले गुंतवणूक निर्णय Investing decision कसे प्रभावित करते वगैरे वगैरे सांगते. प्रत्यक्ष गुंतवणूक करतांना या सगळ्या गोष्टींची गुंतवणूकदाराला नितांत आवश्यकता पडते. एखाद्या सफल गुंतवणुकीमागे जे ज्ञान असते त्याचा पाया वाचकाला ह्या पुस्तकातून मिळू शकते. जरी हे पुस्तक प्रत्यक्ष शेअर बाजारातील घडामोडी स्पष्ट करत नसले तरीही गुंतवणूक करतांना ह्याचे महत्व नाकारता येत नाही. विस्तृत समीक्षा वाचा. Rich Dad Poor Dad

share market book in marathi

Cash Flow Quadrant: ह्या पुस्तकातून एकूणच गुंतवणुकीचा हेतू काय आणि आपल्याला काय अपेक्षित आहे? हे वाचकांना समजून घेण्यास मदत होते. हे पुस्तक फक्त आणि फक्त शेअर बाजारावर लिहिले नाही, पण गुंतवणूक ह्या विषयात share बाजार हा सुद्धा येतोच. हे पुस्तक वाचून Cash Flow हा किती महत्वाचा आहे आणि शेअर बाजाराचा उपयोग करून Cash flow कसा प्राप्त करता येईल ह्याचा विचार करण्यासाठी वाचक प्रवृत्त झाल्यास नवल नाही. विस्तृत समीक्षा वाचा. Cash flow quadrant

Retire young Retire Rich: Investment योजना आणि Leverage, गुंतवणूकदारांचे प्रकार आणि त्यांच्या सवयी ह्याबद्दल ह्या पुस्तकात लिहिले आहे. वेगवेगळ्या गुंतवणूकदाराचे निरीक्षण हे आपल्याला शेअर बाजारामध्येही उपयोगी ठरते. आपण काय केल्यास लवकर Retire होऊ आणि ते पण Rich ह्याबद्दल ह्या पुस्तकात लिहिले गेले आहे. जरी पुस्तकातील बराच भाग रिअल इस्टेट बद्दल वाटत असला तरी त्याचा उपयोग शेअर बाजारातही करता येऊ शकतो. विस्तृत समीक्षा वाचा. Retire Young Retire Rich

Why We Want You to Be Rich: हे Donald Trump आणि Robert Kiyosaki ह्यांचे सयुंक्त पुस्तक आहे. आणि personal finance व आपण श्रीमंत कसे बनू शकू? ह्याबद्दल दोघा लेखकांचे विचार त्यात मांडले आहेत. हे पुस्तक वाचण्याआधी वरील तीन पुस्तके आधी वाचले तर जास्त योग्य होईल असे वाटते. कारण हे वाचण्या अगोदर वाचकाला ह्या विषयातील सुरुवातीची माहिती कंठस्थ करणे गरजेचे आहे.

शेअर बाजार जुगार कि बुद्धिबळाचा डाव: हे पुस्तक पूर्ण मराठीत आहे आणि अगदीच शेअर बाजाराशी संबंधित आहे. नवीन वाचक ह्यातून शेअर बाजाराची बाराखडी शिकू शकतो. नव्या गुंतवणूकदाराला गरजेचे ज्ञान ह्या पुस्तकातून मिळू शकते. शेअर काय असतात ते चांगले शेअर म्हणजे काय आणि ते कसे ओळखावे? अशी पूर्ण माहिती विस्तारित स्वरूपात ह्या पुस्तकातून वाचायला मिळते. विस्तृत समीक्षा वाचा. शेअर बाजार जुगार कि बुद्धिबळाचा डाव

ह्याशिवाय शेअर मार्केटबद्दल अधिक माहिती करण्यासाठी आपण इतर शेअर मार्केट संबंधित वेबसाईट वरून सुद्धा शैक्षणिक उपयोगासाठी काही माहिती वाचू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.