Who moved my cheese marathi translation-वेळेनुसार कसे बदलावे ह्यावर छान पुस्तक

who moved my cheese marathi translation

Favorite marathi Book ह्या पुस्तकांच्या समीक्षा लेखांच्या मालिकेत Who moved my cheese marathi translation ह्या पुस्तकाची थोडी माहिती बघूया. हे पुस्तक जरी दैनंदिन जीवनातील छोट्या बदलांवर असले तरी ह्या पुस्तकाच्या साहाय्याने आपण बदलत्या वेळेनुसार आर्थिक क्षेत्रात कसे बदल होत आहेत आणि त्यासाठी आपण कसे तयार राहावे ह्याची एक भविष्यदृष्टी बघू शकतो.

काही दिवसांअगोदर मी एक पुस्तक दुसऱ्या तिसऱ्यांदा वाचून पूर्ण केले. काही पुस्तके जितके अधिक अधिक तुम्ही वाचाल काही नियम अधिक स्पष्टपणे समजून येतात. पुस्तकाचे नाव आहे who moved my cheese किंवा मेरा चीज किसने हटाया? मी हे पुस्तक हिंदी मध्ये वाचले आहे,  पण ते मराठीत सुद्धा उपलब्ध आहे. मला सर्वाधिक आवडलेल्या पुस्तकामध्ये who moved my cheese marathi translation ह्याचा नंबर लागतो, त्याचे एक मुख्य कारण म्हणजे ह्यामध्ये बदलत्या वेळेनुसार तुम्हाला बदलणे किती आवश्यक आहे हे फारच सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

तसेही आपण नेहमीच बोलतो किंवा ऐकतो कि आमच्यावेळेस असे नव्हते बुआ किंवा आता काळ फार बदलला आहे किंवा येणाऱ्या १५-२० वर्षात बघा माणूस कोठे जाईल वगैरे वगैरे. असे काही ऐकले कि मला क्षणभर वाटते कि कि जग बदलत आहे हे तर खरे पण आपण जगानुसार किती बदलत आहोत? समीक्षा केली कि फार समाधानकारक उत्तर दिसत नसे. ह्या who moved my cheese marathi translation पुस्तकाच्या वाचनानंतर किमान काही प्रश्न तर उलगडले. 

who moved my cheese marathi translation

who moved my cheese marathi translation पुस्तकात चार काल्पनिक पात्रांची गोष्ट आहे. त्यामध्ये दोन छोटे उंदीर असतात त्यांचे नाव स्निफ आणि स्करी. दोन छोटे माणसे आहेत त्यांचे नाव हेम आणि हॉ. हि दोन माणसे म्हणजे वय, राष्ट्रीयता, धर्म, लिंग ह्यांच्या पलीकडे आपल्या सगळ्यामधील माणसाचे एक प्रतीक आहे.

पुस्तकाची सुरुवात होते एका गुंतागुंतीच्या मार्गावरून. त्याला लेखकाने भूलभुलैया म्हटले आहे. मराठीत अर्थ चक्रव्यूव्ह किंवा नागमोडी वाटांचे जाळे असा होईल. होते काय कि स्निफ आणि स्करी आणि हेम व हॉ हे चार जण ह्या चक्रव्यूव्ह सारख्या रस्त्यामध्ये सारखे फिरत असत. रोज, दर आठवड्याला, दर महिन्याला, दर वर्षाला.  ह्या चक्रव्यूहात अनेक खोल्या होत्या. त्यामध्ये हे चौघे जण चीजचा शोध घेत असत.

हे चीज म्हणजे अशा वस्तूचे प्रतीक आहे कि ज्यांना आपण आपल्या जीवनात प्राप्त करू इच्छितो. हे चीज म्हणजे कुणासाठी मोठी नोकरी असू शकते, कुणासाठी संपत्ती, कुणासाठी मोठे घर, चांगले आरोग्य, मान सम्मान, आध्यात्मिक शांती वगैरे वगैरे.  हे चीज काय असेल ह्यासाठी प्रत्येकाचा एक विचार असतो. आपण ह्या चीजचापाठलाग ह्यासाठी करतो कि आपल्याला वाटते कि हे चीज भेटले कि आपण खुश होऊ, सुखी होऊ.

मग जेव्हा हे चीज आपल्याला भेटते तेव्हा आपण सुखाचा अनुभव करतो आणि जर का काही कारणाने ते चीज दूर गेले कि आपण दुःखी होतो.  कारण आपल्याला त्या चीजच्या तुकड्याची सवय होते, नव्हे ती आपण करून घेतो. भूलभुलैया किंवा चक्रव्यूव्ह अशा जागेचे प्रतीक आहे कि जिथे आपण हे चीज शोधत असतो. हा चक्रव्यूव्ह तुमचे ऑफिस असू शकते किंवा तुमचा व्यवसाय असू शकतो. 

who moved my cheese marathi translation ह्या गोष्टीतील छोटे माणसे हेम आणि हॉ बुद्धिमान असतात व त्यांना विश्वास असतो कि त्यांचे आवडते चीज त्यांना भेटले कि ते खरंच सुखी होतील. स्निफ आणि स्करी ह्यांना एक सहज बुद्धी असते आणि ते सुद्धा भूलभुलैया मध्ये आपल्या चीजचा शोध करत असतात. चारही जण सुरुवातीला आपले जॉगिंग सूट आणि धावण्याचे जोडे घालून आपला शोध सुरु ठेवतात.

कालांतराने चौघांना पण आपले आवडते चीज भेटते. छोटी माणसे चीजचा मोठा साठा सापडल्यावर निश्चित होतात आणि मग रोजचे पळणे आणि नवीन चीज शोधत राहणे बंद करतात. पण उंदीर आपली सहज बुद्धी वापरतात आणि चीज चा मोठा साठा भेटल्यावर काही दिवसांनी त्यांना सहज बुद्धीने समजते कि जसा जसा वेळ जात आहे तसतसे चीज हळू हळू कमी होत आहे.

एव्हाना हेम आणि हॉ खूपच आरामप्रेमी झाले असतात. कार्यालयात उशिरा येणे, नवीन शोध घेणे बंद करणे आणि धावण्याचे जोडे आणि जॉगिंग सूट अडगळीला फेकून देणे ही त्यांची आता सवयच झाली असते. ते म्हणत असतात कि चला आता ह्या सुंदर चीज वर आपला अधिकार आहे आणि हे माझे चीज आहे, ह्याला कोणी घेऊ शकत नाही, हे कधी संपू शकत नाही, आता ह्या चीजमुळे माझे पूर्ण जीवन सुखात जाईल वगैरे वगैरे.

तिकडे उंदीर बदलत्या वेळेचा सुगावा लागल्याने सावध होतात आणि परत आपापले जोडे आणि जॉगिंग सूट घालून चक्रव्यूहात नवीन चीज चा शोध घेणे सुरु ठेवतात. एकंदरीत ते आता नवीन खोल्यांचा शोध घेतात. इकडे छोटी माणसे निष्काळजी बनतात, आपले विचार बंद करतात आणि हळूहळू निष्क्रिय बनतात.

मग एक दिवस उजाडतो, हेम आणि हॉ आपल्या चीज ब्लॉक मध्ये येतात आणि काय आश्चर्य? त्यांना विश्वासच होत नाही. तिथले चीज नाहीसे झाले असते. एका रात्रीतून सगळ्या चीजचा साठा एकदम नाहीसा झाला असतो. ते म्हणतात माझे चीज कुणी हलवले ?   who moved my cheese? 

ते खूप आकांडतांडव करतात. आमचे चीज आमचा अधिकार आहे, हे असे कुणीही घेऊ शकत नाही, आता आम्ही काय खावे? आमचे जीवन कसे चालेल वगैरे वगैरे. ते खूप प्रश्न करतात. दुसऱ्या दिवशी परत ते चीजच्या खोलीत जातात. पण आजही चीज तिथे नसते. हेम काही एक ऐकायच्या तयारीत नसतो, पण हॉ ला हळूहळू समजते कि चीज एका दिवसात गायब झालेले नसते ते हळूहळू नाहीसे होत होते पण त्या दोघाच्या ते लक्षात आलेले नव्हते. 

आता हॉ म्हणतो कि आपण आता नवीन चीज शोधायला पाहिजे. त्यांना उंदरांची आठवण येते. ते काही आजूबाजूला दिसत नाहीत. हॉ म्हणतो कि उंदीर हुशार होते त्यांनी ही स्थिती अगोदरच ओळखली होती. मग शेवटी हेम आणि हॉ नाईलाजाने परत धावायला तयार होतात. पण आता त्यांचे जोडे, जॉगिंग सूट शोधायला वेळ जातो. त्यांना आता धावायची सवय नसते, मग त्यांना परत सगळी सवय करावी लागते. त्यात त्यांचा फार वेळ जातो.

शेवटी त्यांना भूल भुलैया मध्ये धावताना छोटे मोठे चीजचे तुकडे सापडत राहतात. पण आता ते शहाणे झालेले असतात. ते आता नेहमीच नवीन चीज साठी शोध घेत राहतात. शेवटी त्यांना एक खूप मोठा चीज चा तुकडा सापडतो. स्निफ आणि स्करी पण इथे अगोदरच पोहोचले आहेत हे छोट्या लोकांना समजून येते. आता ते चारही जण नेहमीच नवीन नवीन चीज साठी आपला शोध सुरु ठेवतात आणि वर्तमानात भेटलेल्या चीजचा पण आनंद घेतात. 

who moved my cheese marathi translation ह्या पुस्तकात प्रत्येक प्रकरणात काही सुंदर सुविचार सारखे वाक्य दिले आहेत. ते वाचून वाचून वाचक थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करेन असे वाटते. बदलत्या वेळेनुसार आपल्याला भूतकाळातील यशावर निर्भर राहणे चालणार नाही तर नवीन जगातील नवीन आव्हानाचा सामना करण्यासाठी नवीन कौशल्य अंगी बाणावी लागतील हा संदेश ह्या पुस्तकात खूपच मनोरंजक पद्धतीतीने दिलेला आहे.

थोडक्यात आपली नोकरी, आपला व्यवसाय हे आपले चीज असून ते कधीही हलवल्या जाऊ शकते आणि तेव्हा तुम्हाला नवीन चीज चा शोध घेण्याऐवजी अगोदरच थोडे थोडे होमवर्क करत राहावे लागेल हा संदेश कुणी ह्या पुस्तकातून घेऊ शकतो. अर्थात नवीन काळात संपत्ती ही नवीन क्षेत्रातून निर्माण होईल आणि त्यासाठी आपल्याला नवीन रस्त्यांवर, नवीन कौशल्यांसोबत चालावे लागेल हा संदेश सुद्धा हे पुस्तक देऊन जाते.

हे सुद्धा वाचा:- Learn investing habits-Mini habits book in marathi

Similar Posts

One Comment

  1. Swapnil Thakare says:

    Great sir,very clear and short summary to encourage us to read this book,it create interest for reading many more books.
    Thanks

Leave a Reply

Your email address will not be published.