new year resolution in marathi

New year resolution in marathi – नवीन वर्षाचे स्वागत आणि Pareto चा ८०-२० नियम

नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प एका नव्या वर्षांमध्ये आपल्या प्रगतीला जरूर पूरक ठरतात. New year resolution in marathi ह्या लेखात ह्यावर थोडी चर्चा केलेली आहे. एका आर्थिक वर्षात सुद्धा से काही संकल्प करून त्यावर काम करता येईल.

नवीन वर्ष येते आणि हळूहळू निघून जाते, मग परत एक नव्या वर्षाची सुरुवात होते. हे कालचक्र नियमित सुरु असते. जुने वर्ष जाणे आणि नवीन येणे ही काही नवीन गोष्ट नाही, पण ह्यावेळेस काही नवे प्रश्न स्वतःला विचारले तर कदाचित नवीन उत्तरे आणि नवीन दिशा सापडतील. जेवढा वेळ आपल्याला एका दिवसात मिळतो आपण त्याचा किती उपयोग करतो? वर्षात १२ महिने असतात , मग आपण १२ वेगवेगळ्या लक्ष्यांवर कधी काम करतो का? किंवा दर तीन महिन्यांत एक असे एकूण ४ लक्ष्य पूर्ण करायचा आपण कधी प्रयत्न करतो का? वगैरे वगैरे..बाकी अनेक लक्ष्यांपैकी Financial tasks or Investing हे सुद्धा एक लक्ष्य इथे अभिप्रेत आहे.

New year resolution in marathi ठरवताना असेच काही लक्ष्य आपण निश्चित करू शकतो. हे लक्ष्य छोटे किंवा मोठे असू शकतात. आपण नवीन काही लक्ष्य सुद्धा ठरवू शकतो आणि त्यावर काम करू शकतो. मागील वर्ष कसे गेले ह्याची आपण समीक्षा करू शकतो. नवीन वर्षाचे स्वागत करताना मागील वर्षातील चुका आपण लक्षात घेऊ शकतो. त्यानुसार आपली नवीन योजना बनवू शकतो?असे कित्येक प्रश्न स्वतःने स्वतःला विचारायचा योग्य  दिवस म्हणजे ३१ डिसेम्बर ते १ जानेवारी हा होय.

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच बरेच जण काही संकल्प करतात; पण थोडेच लोक त्यावर काम करत असावेत. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी आपल्या संकल्पाला कशा प्रभावित करत असतात ह्याबद्दलची अनभिज्ञता हे असावे. न झेपणारे संकल्प करणे आणि मग हे काही आपल्याकडून होणार नाही असे कबूल करणे म्हणजेच आपल्या काम पूर्णत्वास न नेण्याऱ्या सवयींना अजून खतपाणी घालणेच होय असे म्हटले तरी हरकत नाही. प्रगतीला पूरक अशा सवयी कशा लावाव्यात आणि आपल्या मेंदूला एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी कसे प्रेरित करावे ह्याबद्दल अधिक वाचण्यासाठी मिनी हॅबिट ह्या पुस्तकाची समीक्षा आपण मिनी हॅबिट – छोट्या सवयीचे मोठे परिणाम इथे वाचू शकता.

new year resolution in marathi

New year resolution in marathi ठरवताना अशाच काही गोष्टीवर आपण काम करू शकतो.नवीन वर्षात काही प्रभावी संकल्प आपण खालील क्षेत्रात ठरवू शकतो.

  • आरोग्यासाठी चांगल्या सवयी: ह्यामध्ये आहार, व्यायाम इत्यादी येतील.
  • समाजोपयोगी कार्यात सहभाग: आपल्यात काही तरी विशेष गुण असतोच. ह्याचा कुणाला आणि कसा उपयोग होईल ह्याचा निस्वार्थ विचार करून आपली सेवा समाजात देणे हा सुद्धा एक चांगला संकल्प होईल. भलेही ह्यावर ३-४ महिन्यात एकदा काम केले तरी आपल्याला देण्याचे समाधान नक्कीच मिळेल.
  • निसर्ग, पर्यावरण सुरक्षा: ह्यासाठी पूर्ण वर्षात थोडासा वेळ काढणे हा सुद्धा काही जणांच्या संकल्पाचा विषय असू शकेल. ह्यावर तर प्रत्येकानेच एक छोटा संकल्प केला तर तो सगळ्यांच्याच हिताचा असेल.
  • आपल्या छंदाला वेळ देण्याचा संकल्प करणे: रोजची कामे करतांना आपल्या आवडीच्या कामाला जोपासणे म्हणजे आपल्याला बाकीच्या कामात सुद्धा ऊर्जा मिळते.
  • गुंतवणूक विषयाला शिकणे: आर्थिक बाबतीत बचत , गुंतवणूक इत्यादी गोष्टीची सूत्रे हातात घेऊन त्यावर काम करणे म्हणजे ह्यातून जास्त लाभ होण्याची खात्री असते. ह्यावर जास्त वाचण्यासाठी ह्या ब्लॉग वरील बरेच लेख उपयोगी पडतील. वाचा: गुंतवणूक कशी करावी?
  • अजून काही ज्यामुळे आपल्याला खरंच आनंद मिळणार असे विविध विषयावरील संकल्प.

हे तर झाले संकल्प काय असतील ह्याबद्दल पण त्यांच्यावर काम कसे करावे हा जास्त मोठा प्रश्न असणार आहे.त्यासाठी आपल्याला Pareto चा ८०-२० नियम उपयोगाचा होईल. Pareto चा नियम आपल्याला जवळपास सगळ्याच क्षेत्रात कामाचा आहे. आर्थिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो.

Parote  चा ८०/२० नियम तुम्हाला माहित आहे का? Parote च्या नियमानुसार तुमचा २० टक्के वेळ हा ८० टक्के काम पूर्ण करण्यासाठी खर्च होतो. अजून सोपे करून सांगतो. तुम्ही एखादे काम पूर्ण करण्यासाठी जेव्हा हाती घेता तेव्हा तुमच्या २० टक्के प्रयत्नांनी त्या कामाचा  ८० टक्के भाग पूर्ण होतो. एखाद्या कंपनी मधील २० टक्के लोक हे कामाचा ८० टक्के भाग पूर्ण करतात. २० टक्के ग्राहकांमुळे विक्रीच्या लक्ष्याचा ८० टक्के हिस्सा पूर्ण होतो, हे Parote चे ८०-२० नियमाचे काही उदाहरणे आहेत. New year resolution in marathi पूर्ण करण्यासाठी ह्या नियमाचा काही उपयोग होऊ शकतो.

अगदी सुरुवातीला  इटली मधील ८० टक्के संपत्ती ही फक्त २० टक्के लोकांच्या ताब्यात आहे हे  Parote ह्यांचे निरीक्षण होते. ह्यामध्ये ८० अधिक २० म्हणजे १०० असे समजू नका. एखाद्या कंपनीमधील २० टक्के लोक हे कदाचित १० टक्के काम करतील, किंवा ५० टक्के काम करतील, किंवा ८० वा ९९ टक्के सुद्धा काम करतील. सांगायचा अर्थ हा कि जीवनात समान वितरण न दिसता  ८०/२० किंवा थोडे कमी अधिक अशा प्रमाणात आढळते. काही लक्ष्य गाठताना काही गोष्टी इतर गोष्टीपेक्षा जास्त परिणाम दाखवतात. आपल्याला हवे   कि आपण ह्या २० टक्के गोष्टींवर आपली शक्ती खर्च केली पाहिजे.

गोष्टींचे समान वितरण नसते  (Things are not distributed evenly ) म्हणजे  काय ? म्हणजे एखादे काम करण्यासाठी जर एक ठराविक वेळ लागत असेल तर तेवढ्या वेळेचा प्रत्येक क्षण हा समान रूपाने ते काम पूर्ण  करण्यासाठी लागेलच असे नाही. त्या ठराविक वेळेचा २० टक्के हिस्सा हा त्या कामाला ८० टक्के पर्यंत पूर्ण करण्यास हातभार लावू शकतो.

new year resolution in marathi

हा नियम इथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे आपण सुद्धा अनेक काम करताना ह्या नियमाचा वापर करू शकतो. आपल्या मेहनतीच्या २० टक्के भागाने एखादे काम ८० टक्के पूर्ण करू शकतो. आपल्याला निकाल ह्या २० टक्के प्रयत्नांनी भेटेल. त्यामुळे अशा कामाची यादी बनवा कि जे आपल्या लक्ष्याच्या ८० टक्के भागाला पूर्ण करण्यासाठी मदत करतील.  अर्थात हे गुणोत्तर ८०-२० असू शकते, ९०-१० असू शकते किंवा ९०-२० असेही असू शकते (बेरीज १०० च आली पाहिजे असे जरुरी नाही ).

सांगायचं मुद्दा असा कि एक काम करताना एक भाग  input ने (श्रम, मेहनत , मजूर ) एक भाग काम पूर्ण होईलच असे जरुरी नसते. काही गोष्टी ( इथे २० टक्के )ह्या त्या कामाला पूर्ण करण्यासाठी (इथे ८० टक्के काम ) जास्त हातभार लावतात आणि काही कमी हातभार लावतात.

येणाऱ्या वर्षात जेव्हा आपण एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्यावर मेहनत करणे सुरु कराल तेव्हा ह्या नियमाचा वापर करा आणि काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतील ह्यावर विचार विनिमय करा. हा नियम नेहमीच अगदीच जसाच्या तसा काम करेलच असे नाही;  पण Parote  ह्यांनी सांगितलेले  most things in life are not distributed evenly हे निरीक्षण  बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कामात पडेल. New year resolution in marathi लिहून घ्या आणि त्यावर काम करून आपल्या क्षमता अजून वाढवा. सोबतच गुंतवणूक क्षेत्रात अजून शिकण्यासाठी ह्या नियमाचा वापर करा.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.. 

हे सुद्धा वाचा:- योजना आगामी आर्थिक वर्षाच्या

Similar Posts

2 Comments

  1. नवीन वर्ष नवे संकल्प पण संकल्प कसे पुर्ण करायचे किंवा त्याचा मार्ग कोणता असेल हे कोणालाही आखता येत नाही. मात्र वरील लेखाप्रमाणे त्याच यश लहान लहान गोष्टीतुन चाखत आपला संकल्प गाठण हे सर्वोत्तम मार्गदर्शन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *