गुंतवणूक कशी करावी?Investment Tips in Marathi

वाचा: Investment Tips in Marathi गुंतवणूक कशी करावी?

Investment tips in marathi म्हटले कि लगेच कमी वेळात काहीतरी जास्त पैसे असा बऱ्याच जणांचा (गैर) समज होतो. गुंतवणूक ह्या शब्दाचा अर्थ वेगवेगळे लोक वेगवेगळ्या अर्थाने घेतात.

Investment tips in marathi, गुंतवणूक कशी करावी? ह्या लेखात काही निवडक मुद्द्यावर बोलूयात. गुंतवणूक शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा असू शकतो; जसे कि काही जण सहा महिन्यात थोडा फायदा घेऊन आपली गुंतवणूक तोडू शकतात तर काही जण पुढील २०-२५ वर्षासाठी Investment कायम ठेवण्याच्या गोष्टी करतात.

गुंतवणुकीसंबंधी अशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांसाठी कोणता एक नियम लागू होऊ शकत नाही. Investment tips in marathi ह्या लेखातील मुद्दे आपल्या जीवनात उतरवण्याअगोदर आपण नेमके कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत हे स्वतः ठरवणे आवश्यक ठरेल.

गुंतवणूक हा विषय समजणाऱ्यासाठी सोपा तर न समजणाऱ्यासाठी अतिशय गुंतागुंतीचा होऊ शकतो. इथे Tips हा शब्द गुप्त माहिती असा न वापरता उपयोगी माहिती अशा अर्थाने घेतलेला आहे. त्यामुळे कमी वेळात आणि कमी ज्ञानात भरपूर फायदा करून देणाऱ्या माहितीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा लेख उपयोगी नाही हे वेगळे सांगायला नको.

investment tips in marathi

ही ब्लॉग पोस्ट लिहिताना माझ्या केंद्रस्थानी असे वाचक आहेत कि जे आपल्या investment planning ला सुरुवात करण्याच्या इच्छेचे आहेत परंतु त्यांना नेमकी सुरवात कोठून करावी ह्याबद्दल काही अधिक माहिती हवी आहे. तर मी आपल्याला साजेशी INVESTMENT TIPS देण्याअगोदर तुम्हाला एक अजून महत्वाचे काम करावे लागेल. हे जरी प्रत्यक्ष guntavnuk kashi karavi ह्याबद्दल Marathi tips नसली तरीही पहिली पायरी ठरते.

 • तुम्ही आज कोठे आहेत ते माहित करून घ्या: म्हणजे काय? आज सुरुवात करण्याअगोदर तुमच्याकडे येत असलेला पैसा आणि तुमच्याकडून जात असलेला पैसा ह्याचे ज्ञान करून घ्या. त्यासाठी तुम्हाला ASSETS आणि LIABILITIES ह्याचा विचार करावा लागेल (ASSETS आणि LIABILITIES ह्यावर जास्त वाचण्यासाठी Rich dad poor dad ही Blog Post वाचावी). संक्षिप्त शब्दांत आपल्या खिशात पैसे टाकणाऱ्या गोष्टी ASSETS तर तुमच्याकडून खर्च करवत असलेल्या गोष्टी LIABILITIES. एकदा तुमचा हा जमाखर्च कागदावर उतरवला कि मग पुढच्या गोष्टी अजून सोप्या होतील. मी कागदावर लिहिण्याची शिफारस ह्यासाठी करत असतो कि अशा लिहिण्याने आपल्याला खूप गोष्टी अशा कळतात कि ज्या फक्त वरकरणी विचार केल्याने लक्षात येत नाहीत. दुसरे असे कि जेव्हा जेव्हा आपण आपली Investment diary वाचतो तेव्हा त्यात अजून काही सुधारणा करत जातो म्हणजेच आपला plan हळूहळू अधिक वास्तविक बनतो.
 • तुम्हाला कोठे जायचे आहे ते ठरवा: आता हे आणखी काय? ह्याचा साधा सोपा अर्थ हा कि तुमचे Investment goal काय आहेत? तुमचे Goal जेवढे स्पष्ट असतील तेवढी investment planning अधिक सोपी होईल. ह्यांना आपण short term goal आणि long term goal असे विभागतो. Short term मध्ये गाडी, लग्नासाठी गरज असलेली रक्कम, आणखी काही रोख रक्कम अशा काही गोष्टी येतात. ह्याला जवळपास पुढील 1- 5 वर्षाचा कालावधी आपण गृहीत धरतो. ह्यामध्ये जर खूप मोठी रक्कम पाहिजे असेल तर त्यात आपण काही बदल करू शकतो. उदारणार्थ जर गाडी घेण्यासाठी १० लाखाची गरज असेल तर एक तर हे goal थोडे नंतर पूर्ण करण्यासाठी पुढे ढकला किंवा मग कमी रक्कमेचा पर्याय असलेली गाडी वगैरे घेऊ शकतो. (टीप: इथे कर्ज घेऊन गाडी घेणे हा पर्याय लक्षात घेतलेला नाही).

Long term मध्ये १०-३० वर्षासाठी असलेले goal येतात. मुलांचे शिक्षणासाठी हवी असणारी रक्कम, Retirement साठी लागणारी रक्कम, घर घेण्यासाठी जरुरी रक्कम, व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी लागणारी धनराशी व व्यक्तिनुरूप असलेले अजून काही specific goal अशा काही गोष्टी. ह्यातील घर हे goal जर आपण home loan काढून पूर्ण करणार असलो तर ते ह्यातून ते कमी होईल; परंतु त्याजागी EMI च्या व्यतिरिक्त, कर्जाच्या मूळ रक्कमेत जास्तीचा भरण्यासाठी मध्ये मध्ये काही रक्कम जुळवण्यासाठी वेगळी योजना बनवण्याची योजना कुणी विचार करू शकतो.

investment tips in marathi
 • When should I start investing and How much should I invest? आता तुमच्याकडे खूप सारे goal आहेत आणि खूप सारे प्रश्न आणि शंका. Confused at this point? Investment कधी सुरु करावी? आणि किती? ह्या प्रश्नाचे उत्तर काही Fix प्रकारचे नसेल. कधी सुरु करावी? अगदी पहिल्या पगारापासून….. आणि किती गुंतवावे?अगदी पगाराच्या 50 टक्क्यापर्यंत ही……. आता ही उत्तरे प्रत्येकाच्या अनुषंगाने बदलतील. प्रत्येकजण चांगल्या Return साठी invest करतो ह्यात काही शंका नाही. हा Return दोन गोष्टीवर अवलंबून असेल. किती पैसे गुंतवता? आणि किती वेळेसाठी? बरेच जण ह्यातील Time factor कडे दुर्लक्ष करतील पण Time factor मुळे भरपूर फरक पडतो. ह्यासाठी तुम्ही कोणत्याही Financial Calculator ची मदत घेऊन आपले Goal तपासून पाहू शकतो.

 • Asset allocation: ह्या टप्प्यात कुणी आपली पूर्ण investment वेगवेगळ्या ठिकाणी आणि किती प्रमाणात ठेवायची ह्याची planning करतो किंवा कुण्या अनुभवी व्यक्तीकडून करवून घेतो. ह्यासाठी investor स्वतः कोणत्या प्रकारचा investor आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे aggressive किंवा conservative nature प्रमाणे equity किंवा Debt, वेगवेगळ्या प्रकारचे mutual funds, PPF, Bonds, Gold इत्यादी साधनांत invest करण्याचे ठरवतो. Mutual Fund मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे Funds आढळतात. ( अधिक माहितीसाठी वाचा: म्युच्युअल फंडस् विकत घेण्यापूर्वी ) ह्या सगळ्या गोष्टींचा पसारा ध्यानात घेऊन आपण स्वतःचा Portfolio निर्माण करतो आणि मग त्याला वाढण्यासाठी योग्य वेळ देतो.

ह्या व्यतिरिक्त investment tips in marathi , guntavnuk kashi karavi मध्ये मुख्यतः समाविष्ट नसले तरी Life insurance , Health Insurance, Emergency fund ह्या गोष्टी सुद्धा महत्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे ह्या क्षेत्रातील योग्य सेवा निवडून योग्य plan घेणे फायदेशीर ठरते.

हे सुद्धा वाचा: Financial literacy in marathi-How to Adopt Good Financial Habits in Marathi – चांगल्या आर्थिक सवयी कशा लावून घ्याव्यात ?

Similar Posts

4 Comments

 1. Mahfooz alam says:

  Nice article sir ji, it help me lot

 2. Shyam Shrihari Mhaisne says:

  Useful post.

 3. श्याम श्रीहरी म्हैसणे says:

  खूप सुंदर लेख.

Leave a Reply

Your email address will not be published.