टेक्निकल एनालिसिस कसे करावे? Technical analysis in marathi

technical analysis in marathi

What is technical analysis in marathi?

एखाद्या शेअरच्या गुंतवणुकीत सद्यस्थितीत किंमतीच्या (Price) आणि व्यवहार करीत असलेल्या संख्येच्या (Volume) आधाराने सांख्यिकीय कल (statistical trend) बघता केलेले त्या गुंतवणुकीचे विश्लेषण म्हणजेच Technical Analysis होय.

शेअर बाजारात उपयोगी माहितीच्या आधारे एखाद्या शेअरचे मूल्यांकन केले असता अशी गुंतवणूक दीर्घ काळासाठी फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आपण बाळगू शकतो. आपल्या आकलनानुसार जर गोष्टी व्यवस्थित होत गेल्या व त्या क्षेत्रात किंवा शेअरमध्ये अनपेक्षित व लाभ कमी होण्याची काही भीती समोर आली नाही तर अशा शेअर्समधील गुंतवणुकीबाबत कुणी ठाम राहू शकतो. परंतु अशा अभ्यासानंतरसुद्धा कधी कधी त्या शेअरमध्ये खरेदी किंवा विक्रीचा वेळ महत्वपूर्ण असतो. विशेषतः कमी काळासाठी गुंतवणूक करतांना अशी वेळ साधणे अधिक कौशल्याचे काम ठरते. योग्य वेळ साधल्यास नफ्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढू शकते. Technical analysis अशी योग्य वेळ साधण्यास बऱ्याच अंशी मदत करू शकते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास भूतकाळातील किंमत Price आणि Volume चे अध्ययन करून सध्याच्या trend चा अभ्यास करून नजीकच्या किंमतीचे लक्ष्य निर्धारित करणे म्हणजे Technical analysis होय.

शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांच्या कानावर नेहमी पडत राहणाऱ्या काही शब्दांपैकी Technical Analysis in marathi हा एक शब्द आहे. Fundamental Analysis मध्ये जसे आपण एखाद्या कंपनीच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देतो त्याच्या उलट Technical analysis मध्ये एखाद्या कंपनीचा बाजारातील कल म्हणजेच market trend बघतो.

एक प्रश्न इथे पडणे साहजिक आहे कि काय अशी योग्य वेळ Technical analysis च्या आधारे ओळखता येणे शक्य आहे? उत्तरादाखल , “होय, निश्चितच” असे म्हणता येईल. परंतु ह्यासाठी एक दीर्घ वेळ आवश्यक असते. योग्य शेअर ओळखून त्याचे निरीक्षण करणे व कमी किंमतीत उपलब्ध झाल्यास तेव्हा खरेदी करणे अशी रणनीती आपल्या नफ्याचे प्रमाण वाढवू शकते. ह्यामध्ये दिवसांच्या, आठवड्यांच्या ,महिन्यांच्या candlestick chart चा अभ्यास करून व त्यातील होत असलेला बदल ताडून कमी अवधीत होणाऱ्या किंमतीच्या बदलाला आगाऊ ओळखता येते.

मागील काळात ह्या कंपनीच्या शेअरची किंमत (Price) आणि त्या शेअरच्या खरेदी विक्रीच्या संबंधित आकड्यांचा (Volume) कसा संबंध होता, हे पाहून नजीकच्या भविष्यात त्याच शेअरची किंमत कुठे जाऊ शकते ह्याचा अंदाज Technical analysis in marathi मध्ये गुंतवणूकदार करतात. Supply आणि Demand, Volume आणि Volatility ह्या सगळ्या गोष्टी ह्यात बघितल्या जातात.

technical analysis in marathi

इथे गुंतवणूकदार न म्हणता Trader म्हटले तरी चुकीचे होणार नाही. कारण एखाद्या शेअरला विकत घेऊन कमी वेळासाठी त्याला ठेवून आपली अपेक्षित किंमत मिळवण्यासाठी कमी अवधीचे लोक Technical analysis बघू शकतात. इथे Fundamental analysis बघणारे लोक सुद्धा आपली जास्तीची स्थिती Extra Position अशा शेअरमध्ये बनवू शकतात. ह्यामध्ये Chart बघून त्या शेअरची Support Price, Resistance Price, Target Price, Stop Loss वगैरेचा अंदाज गुंतवणूकदार लावतात.

Candlestick Chart चा सविस्तर अभ्यास करून कुशल गुंतवणूकदार आपल्याला पाहिजे असलेली माहिती मिळवतात आणि त्या आधारे आपल्या गुंतवणुकीच्या -Investment- व Profit Booking च्या योग्य वेळा आणि मात्रा ठरवतात.

बऱ्याच शेअरच्या किमती एका एका Range मध्ये काम करतात. जसे एखादा शेअर ४० ते ५० रुपयांच्या पट्ट्यात बरेच दिवस फिरतो पण एकदा जर त्याने ५० पार केले कि मग पुढची रेंज ५१ ते ६० असते आणि जर काही महिन्यांनी तो ५० च्या खाली आला तर मग त्याची किंमत ४० पर्यंत खाली घसरू शकते.

आता ह्यात असे बदल का होतात तर ह्या शेअरच्या बाबतीत किमतीत होणारे हे बदल भूतकाळात पण बरेचदा झालेले आहेत आणि त्याच्या आधाराने किमतीत अशी हालचाल भविष्यात सुद्धा होईल ह्याचा तो एक अंदाज असतो.

किंमतीत होणारा हा बदल काही अंशी Technical Analysis च्या मदतीने ताडता येतो. त्या किंमतीच्या पट्ट्यात सुरुवातीलाच आपण तो शेअर विकत घेऊ शकतो, जेणेकरून त्या पट्ट्याच्या शेवटाला विकून आपण नफा मिळवू शकू किंवा ५० रुपयाच्या लगेच खाली शेअरची किंमत आल्यास आपण तो विकू शकतो आणि मग परत ४१ – ४२ रुपयाला विकत घेऊ शकतो.

इथे हे लक्षात ठेवावे लागेल कि किमतीचे हे अंदाज मागील प्रदर्शनावर आधारित आहेत आणि ते खरे होण्याची शक्यता जरी जास्त असली तरी ती नेहमीच अचूक ठरेल ह्याची खात्री कुणी देऊ शकत नाही. ह्या सगळ्या हालचाली बरेचदा behavioral economics शी संबंधित असतात behavioral finance वर जास्त वाचण्यासाठी मला आवडलेले पुस्तक – Stocks to Riches ह्या लेखाला आपण इथे वाचू शकता.

technical analysis in marathi

टेक्निकल एनालिसिस मध्ये आपण खालीलप्रमाणे एखादी रणनीती ठरवू शकतो.

५० दिवस आणि २०० दिवसांचा मुविंग ऍव्हरेज
इथे जर एखाद्या शेअरची मागील ५० दिवसांची moving average (50 DMA) किंमत मागील २०० दिवसांच्या moving average (200 DMA) पेक्षा जास्त झाली असेल तर नजीकच्या काळात अशा शेअरची किंमत अजून वर जाण्याची शक्यता असते. म्हणजेच इथे आपल्याला BUY Signal मिळू शकतो. ह्याच्या उलट परिस्थिती झाल्यास हा शेअर नजीकच्या काळात खालची किंमत दाखवू शकतो. परत एकदा सगळेच शेअर ह्या रणनीतीवर खरे उतरतील हे सांगता येणार नाही. ह्यामध्ये काही लोक Trend line, Patterns किंवा Candlestick Chart चा सुद्धा वापर करू शकतात. ह्याव्यतिरिक्त अशा वेळेस Bollinger bands, RSI अशा संकल्पनांचा सुद्धा कुणी उपयोग करतात.

काही जण Top Down किंवा Bottom Up रणनीती ठरवू शकतात. म्हणजे अगोदर एकूण अर्थव्यवस्थेचा कल बघता आणि त्या त्या क्षेत्रातील घडामोडी बघता त्या क्षेत्रातील एखादी चांगली कंपनी निवडणे म्हणजेच Top Down Approach. ह्या बाबतीत तो गुंतवणूकदार वरून खालच्या दिशेने अभ्यास करत आला आहे. ह्याउलट Fundamental analysis मध्ये कुणी Bottom Up Approach म्हणजेच खालून वरच्या दिशेने जाणारा रस्ता निवडू शकतो. ह्यामध्ये एखादी कंपनी आपल्या क्षेत्रात कसे चांगले प्रदर्शन करत आहे आणि ह्यामुळेच भविष्यात ही कंपनी फायद्यात राहील ह्याचा कयास गुंतवणूकदार लावू शकतो.

Technical analysis करतांना शेअरच्या Price व Volume मधील बदल ,Advance-Decline line, New high or low indicator, Trends, Patterns इत्यादी अनेक पद्धतीचा उपयोग होतो.

एकंदरीत कमी वेळेसाठी एखाद्या शेअर मध्ये Entry घेऊन त्यावर नफा कमावण्यासाठी Technical Analysis in Marathi च्या अभ्यासाची मदत होते. बरेच कुशल गुंतवणूकदार Fundamental Analysis आणि Technical Analysis चा दुहेरी फायदा घेत एखाद्या गुंतवणुकीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि आपल्या ज्ञानाने घसघशीत फायदा करून घेतात.

हे सुद्धा वाचा: शेअरचे मूलभूत विश्लेषण कसे करावे ?

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *