candlestick chart in marathi कँडलस्टिक चार्ट कसा वाचावा?

Candlestick chart in marathi कँडलस्टिक चार्ट कसा वाचावा?

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी उडी मारल्यावर जसजसा वेळ जातो तसे तसे नवीन नवीन प्रश्न पडायला लागतात. ज्या शेअरवर अपेक्षा असते तो वाढत का नाही? एखादा ध्यानीमनी नसलेला share अचानकच का वधारतो? बहुतांश वेळेला आपण घेतलेलाच share का घसरत जातो आणि आपण नुकताच विकलेला शेअरच का वाढतो हे सुद्धा कधी समजण्यापलीकडचे असते.

मग त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न काही जिज्ञासू व्यक्ती करतात आणि असे करत असतांना त्यांचा शोध एका गोष्टीवर जरूर येऊन थांबतो तो म्हणजे Candlestick Chart.

आपणही जर Candlestick chart चा अभ्यास करण्याच्या विचारात असाल तर ह्या लेखाची आपल्याला मदत होऊ शकते.

Candlestick chart म्हणजे काय?

Candlestick chart हा एखाद्या शेअरच्या Technical Analysis मध्ये उपयोगी chart आहे. कॅन्डलस्टिक चार्टचा इतिहास शोधल्यास अठराव्या शतकात जपान देशात तांदुळाच्या व्यापारात ह्या चार्ट पद्धतीचा उपयोग केल्याचे उल्लेख मिळतात. कालांतराने शेअर बाजारात ह्याचा उपयोग सुरु झाला.

कमी अवधीत एखाद्या शेअरची खरेदी विक्री करण्यास इच्छुक गुंतवणूकदार Candlestick chart कॅन्डलस्टिक चार्ट बघतात जेणेकरून त्यांना त्या शेअरची दिशा समजावी. त्यातील ठराविक प्रकारचे Patterns पाहून ते हा शेअर वरच्या दिशेत जाण्याच्या तयारीत आहे कि खाली घसरू शकतो ह्याचा अंदाज लावू शकतात.

एका कोणत्याही ठरवलेल्या वेळेसाठी असलेली Candle चार किंमती दाखवते. Open, High, Low आणि Close. एका शेअरच्या किमतीत होणारा बदल हा त्या कंपनीच्या fundamentals सोबतच investors आणि traders च्या भावनिक व्यवहारानुसारसुद्धा (behavioral finance) काही प्रमाणात बदलण्याची शक्यता असते.

candlestick chart in marathi

चित्रात दाखवलेल्या candles पाहल्या तर हे लक्षात येते कि ह्याच्या वर आणि खाली एक एक उभी रेष आहे. त्यांना shadow असे म्हणतात. त्यातील upper shadow ला wick तर खालील shadow ला tail असे सुद्धा म्हणतात. Wick चा सगळ्यात वरचा आणि Tail चा सगळ्यात खालचा बिंदू ह्या पूर्ण Candle ची High आणि Low किंमत दर्शवतो.

Candle मधील जो आयताकृती भाग आहे, त्याला Body असे म्हणतात. Bullish candle साठी त्यातील वरची बाजू Close व खालची बाजू Open किंमत दर्शवते तर Bearish candle साठी वरची बाजू Open व खालची बाजू Close किंमत दर्शवते.

हे झाले एका ठराविक वेळेतील कॅण्डल आपल्याला किंमतीतील काय बदल दाखवते त्याबद्दल. आता अशा खूप साऱ्या कॅण्डल मिळून काही विशिष्ट प्रकारचे पॅटर्न दाखवू शकतात, जसे तीन सलग चढत्या दिशेतील कॅण्डल (Three white soldiers), तीन सलग घसरणाऱ्या दिशेतील कॅण्डल (Three black crows), खूप साऱ्या कॅण्डल वर चढत गेल्यानंतर एखादी खालच्या दिशेला संकेत देणारी कॅण्डल (Hanging man) वगैरे वगैरे…

म्हणजेच असे pattern एकतर काही कॅण्डलच्या समूहाने तयार होतात किंवा फक्त एक विशिष्ट कॅण्डल सुद्धा काही प्रकारचा pattern दाखवते. असे तयार होणारे Pattern हे एकतर ह्या शेअरची Bullish दिशा दाखवतात किंवा Bearish दिशेकडे संकेत देतात.

एव्हाना आपल्याला कळून चुकले असेलच कि किंमतीच्या चढउतारामुळे त्या त्या वेळेतील एक प्रत्येक कॅण्डल तयार होते आणि Bullish candle किंवा bearish candle क्रमाने संभाव्य तेजीची किंवा मंदीची शक्यता दर्शवते. पण परत इथे हे लक्षात घेतले पाहिजे कि शेअरच्या किमतीत अशा प्रकारचे बदल होण्याची ही शक्यता असते, खात्री नव्हे.

candlestick chart in marathi

Candlestick pattern चे बरेच प्रकार आहेत आणि ते इतर बऱ्याच संकेतस्थळांवर उपलब्ध सुद्धा आहेत. काही pattern बघण्याअगोदर आपण अगोदर एका candle ला थोडे खोलात समजण्याचा प्रयत्न करूयात. समजा, आपण एक १५ मिनिटांची कॅण्डल बघितली तर ही पूर्ण कॅण्डल आपल्याला वरकरणी Open, High, Low आणि Close ह्या चार गोष्टी दाखवते.

थोडे अजून बारकाईने पाहल्यास आपल्याला ह्याच कॅन्डलच्या upper shadow आणि lower shadow मधून त्या वेळेदरम्यान त्या शेअर वर किती Buying pressure होते आणि किती Selling pressure होते हे सुद्धा समजते.

Buying and selling pressure म्हणजे काय? तर कुणी विकण्याचा प्रयत्न करीत शेअरची किंमत कशी खाली आणली आणि मग कसे खरेदीदारांनी शेअर विकत घेत किंमत परत वर कशी नेली आणि सरतेशेवटी ती कॅण्डल किती किंमतीवर बंद झाली असे काहीसे. Wick आणि Tail च्या लांबीनुसार सुद्धा ह्या व्यवहारातील अधिक बारकावे समजून घेता येतात.

हे समजणे का गरजेचे आहे? कारण वरकरणी जरी आपण Open आणि Close किंमतीला महत्व देत असलो तरीही त्या वेळेत शेअर घेणारे आणि शेअर विकणारे हे कशा प्रकारे वागले ह्याचे चित्र समजते. विक्रेते विकत गेले कि किंमत कमी कमी होत जाते आणि जेव्हा खरेदी करणारे सलग खरेदी करत राहले तर किंमत वाढत जाते. कधी कधी ह्यात फक्त विक्रेते मजबूत असतात आणि तेव्हा तो शेअर खालचीच दिशा दाखवतो हे आपल्याला माहित असेलच.

ह्याउलट एखाद्या शेअर मध्ये फक्त (किंवा जास्त) खरेदीदार असतात आणि तेव्हा असा शेअर जास्त किमतीवर व्यवहार करत जातो. ह्याचे उदाहरण पाहायचे असल्यास only buyers किंवा only sellers चे शेअर बघून आपण त्या दिवसाच्या candlestick चा अभ्यास करू शकतो.


आता उदाहरणादाखल काही प्रकारचे candlestick chart pattern बघुयात.


Bearish reversal: हा pattern तेव्हा बनतो कि जेव्हा मागील तेजीचे दिवस संपून पुढे शेअरचा भाव खाली जाण्याची शक्यता निर्माण होते. अशा घसरणी अगोदर हे pattern अभ्यासू लोकांना एक संकेत देऊ शकतात.

Hammer: हा pattern एखाद्या हातोड्यासारखा दिसतो. हा pattern सहसा downtrend च्या तळाशी बनतो कि जो एक bullish संकेत असतो.

Bullish engulfing: हा pattern दोन candle मिळून बनतो. ह्यात पहिली छोटी Red candle असते आणि दुसरी Green candle कॅण्डल पहिल्या Red candle ला पूर्णपणे झाकून घेऊन वरच्या दिशेने बंद होत bullish संकेत दर्शवते.

Morning star: हा पॅटर्न downtrend मार्केटमध्ये एक आशेचा किरण दाखवतो. हा pattern तीन कॅण्डलनी मिळून बनतो. ह्यात एका छोट्या body च्या Red candle च्या अगोदर मोठ्या body ची Red candle असते आणि नंतर मोठ्या body ची Green candle बनलेली असते.

Three white soldiers: हा pattern तीन दिवसात दिसतो. ह्यामध्ये मोठी body असते आणि तुलनेने लहान shadow असते किंवा नसतेच. ह्या pattern मध्ये सलग लांब हिरव्या (किंवा पांढर्‍या) candles असतात, ज्या मागील दिवसाच्या तुलनेत जरा जास्त किमतीत उघडतात आणि बंद होतात.

candlestick pattern

ह्याशिवाय Candlestick chart चे अजून अनेक मजेदार नावांचे पॅटर्न आहेत कि जे शेअरच्या संभाव्य किमतीच्या वेगवेगळ्या स्थिती दर्शवतात.

थोडक्यात candlestick chart चा अभ्यास केल्यास गुंतवणूकदार एखाद्या शेअर मध्ये Entry आणि Exit ची योग्य वेळ ठरवू शकतो आणि आपल्या गुंतवणुकीवर लाभ मिळवू शकतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.