share bajar jugar ki buddhibalacha daav-शेअर मार्केट शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उत्तम पुस्तक

my favourite book in marathi

शेअर बाजारात शिकायची इच्छा आहे? share bajar jugar ki buddhibalacha daav हे पुस्तक शेअर बाजारात शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकानेच वाचायला हवे.

Share bajar jugar ki buddhibalacha daav च्या वाचनाने आपण आपले Investment Decision जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.

Investment आणि तेही शेअर बाजारात करण्याच्या गोष्टी बहुतांश जणांना जरा किचकटच वाटतात. बहुतांश म्हणजे ज्यांचा फार जास्त संबंध investment विषयाशी येत नाही त्यांना आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे, कारण माहित नसताना काही गोष्ट करायला जाणे म्हणजे फायद्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता असते. जे काही लोक ह्यात वावरतात कदाचित त्यांचेही दोन तीन प्रकार पडत असावेत. कुणाचे ऐकून गुंतवणूक करणारे, टीव्ही वगैरे पाहून निर्णय घेणारे आणि काही थोडके जे सगळे पाहतात, ऐकतात आणि आपले सुद्धा काही निरीक्षण, अभ्यास करतात असे. असेच एक पुस्तक म्हणजे मला आवडलेले पुस्तक share bajar jugar ki buddhibalacha daav ‘शेअर बाजार जुगार?छे बुद्धिबळाचा डाव’ ह्याबद्दल हा समीक्षा लेख.शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या बाबतीत आर्थिक साक्षर असणे फार महत्वाचे असते आणि त्यासाठी इतर अनेक गोष्टीसोबत चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे क्रमप्राप्त ठरते. अशा पुस्तकांचे वाचन करून आपण केवळ आपले ज्ञानच वाढवत नसतो, सोबतच नवीन क्षेत्र असल्यामुळे काही सहज साध्या पण भविष्यात नुकसानदायक ठरू शकणाऱ्या चुकांची पुनरावृत्ती सुद्धा टाळू शकतो.

share bajar jugar ki buddhibalacha daav

शेअर घेण्याआधी त्या कंपन्यांची थोडी तरी माहिती जमा करावीच लागेल कारण असा अभ्यास केल्याने यशाची निदान थोडी तरी शक्यता आहे.बिना अभ्यासाचे कोणतेच कष्ट न घेता केवळ अंदाजे खरेदी केलेले शेअर तोट्यातच जाण्याची शक्यता जास्त. आता एवढेही कष्ट घ्यायची तयारी नसलेल्या व्यक्तीने शेअर बाजारातून श्रीमंत होण्याची इच्छा करू नये असे परखड वक्तव्य सुद्धा share bajar jugar ki buddhibalacha daav पुस्तकात लेखक करतो.

share bajar jugar ki buddhibalacha daav पुस्तकात खालील तीन सल्ले नक्कीच आवडण्यासारखे आहेत.

  • शेअर बाजारात स्वतःचा तोटा करून दुसऱ्यांना श्रीमंत करण्याचा आपला हेतू नाही तेव्हा मुळात चांगल्याच कंपनीचे शेअर घ्यावे.
  • असे शेअर त्यांच्या बाजारातील किमती उतरलेल्या असताना खरेदी करावी.
  • आणि जेव्हा त्यांचे दर वाढलेले असतील तेव्हा ते विकून पैसे कमवावे.

म्हणजे आपल्याला खालील गोष्टी माहीत असायला हव्यात.

  • चांगले शेअर कोणते?
  • शेअरच्या किमती केव्हा उतरतात?
  • शेअरच्या किमती केव्हा चढतात?

ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल share bajar jugar ki buddhibalacha daav पुस्तकात ‘शेअर म्हणजे असते तरी काय?’ ह्या प्रकरणात शेअर काय असतात? Face value, share capital,Primary and Secondary Market, Buying and Selling, IPO and FPO, Premium, Depository, Demat, Settlement, Delivery, Brokerage वगैरे गोष्टी सोप्या करून सांगितल्या आहेत.

Intra day आणि Delivery Trade, Margin, Upper and Lower circuit, Brokerage, Tax, इतर छुपे खर्च वगैरे बद्दल जरा विस्तारानेच चर्चा केलेली आहे. ज्याला अगदीच सुरुवात शिकायची आहे त्यांचेसाठी मात्र हे सगळे वाचणे अगदी सोपे करून दिलेले आहे. Intra day कि Delivery trade ह्यावर मनोरंजक पद्धतीने चर्चा केलेली आहे. Long term investment करावी कि Short term trading ह्यावर पुस्तकाच्या लेखकाचे परखड मत आवडून गेले. मी ट्रेडिंग करणारच नाही अशी प्रतिज्ञा करणारे नेहमीच बरोबर असतील असे नाही आणि ट्रेडिंग करून झटपट श्रीमंत मी होईल असे म्हणणारे सुद्धा नेहमीच बरोबर नसतील.

आपले एकमेव उद्दिष्ट्य शेअर बाजारातून पैसे कमवायचे असायला हवे हे दाखवून देण्यासाठी Trading आणि Investment बद्दल सविस्तर आकडेमोड करून दाखवून कोणत्या एका पद्धतीबद्दल मोह अथवा द्वेष न दाखवता फायद्याची पद्धत आपली आपण ठरवायची ह्याचा सल्ला लेखक देतो.

Sensex, Nifty, BSE100, BSE200, BSE500, BSE Mid cap, BSE small cap आणि वेगवेगळे index जसे Information Technology, Metal, Oil and Gas तसेच शेअरचे वेगवगेळे ग्रुप इत्यादी बद्दल माहिती देताना Stop Loss order, Trigger Price सगळे विस्ताराने समजावलेले आहे. हे पुस्तक २००८ ची आवृत्ती असल्यामुळे त्यावेळेस असेलेल्या share buying and selling च्या स्क्रीन शॉट सहित उदाहरणे आताच्या मोबाइलला युगात थोडे कमी महत्वाचे वाटतील पण त्यावेळेस आपल्या वाचकांना सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न प्रशंसनीयच म्हणावा लागेल.

Fundamental Analysis मध्ये काय गोष्टीची माहिती करून घ्यावी? येथपासून ती माहिती कोठून गोळा करावी आणि त्याचे कसे विश्लेषण करावे हे सुद्धा बऱ्यापैकी विस्तारात लिहिले आहे. Balance sheet मधील Reserve, Net Sale, Net worth, Liability, Inventory, Net current Assets इत्यादी सगळ्या बारीक सारीक बाबी समजून याव्यात ह्यासाठी Balance sheet वर चांगली माहिती दिल्याने नवीन व्यक्तीला हे सगळे समजून यायला चांगलीच मदत होईल असे वाटते. शेअरच्या व्यवहाराशी संबंधित अनेक Ratio जसे liquidity ratio, solvency ratio, profitability ratio, valuation ratio, payout ratio वगैरे काय आहेत आणि ते कसे वाचावे ह्याच्यावर सुद्धा चर्चा केलेली आहे.

इंटरनेट वरून सगळी माहिती मिळविताना आपली स्वतःची Investment related Excel तयार करून त्यात माहिती कशी भरावी, जेणेकरून आपल्या सोयीच्या माहितीचा आपल्याला अभ्यास करता येईल ह्याबद्दलचे इत्यंभूत मार्गदर्शन (अगदी Excel File मध्ये Formulae कसा भरावा ह्यासहित) केले गेल्याने स्वतःच stock analysis करण्याची इच्छा असणाऱ्या वाचकांना ह्या गोष्टीची माहिती आयतीच मिळते.

BSE WEB PAGE -अलिबाबाची गुहा ह्या प्रकरणात BSE Website चा उपयोग करून सखोल माहिती कशी मिळवावी ह्याचे मार्गदर्शन तर वाचकाला खजिना सापडल्यासारखे वाटू शकते. शेवटी बाजारभाव चढण्याचा किंवा पडण्याचा अंदाज कसा येऊ शकतो? हे लिहिताना शेअरचे share charts वाचून त्यावरून भविष्यातील share price चा कसा अंदाज लावता येऊ शकते ह्यावर चर्चा केलेली आहे.

Financial planning ह्या विषयात stock market शी निगडित रवींद्र देसाई लिखित आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक share bajar jugar ki buddhibalacha daav नव्याने share market marathi प्रवेश करणाऱ्याला तर नक्कीच उपयोगी आहे किंबहुना जे अगोदरच ह्या क्षेत्रात आहेत त्यांनाही बऱ्याच गोष्टी नव्याने शिकवून जाईल.

हे सुद्धा वाचा: मला आवडलेले पुस्तक “सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माईंड”

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *