share market portfolio meaning in marathi

share market portfolio meaning in marathi

share market portfolio meaning in marathi

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला Portfolio, Portfolio Management, Asset Allocation, Risk Management आणि Investment Planning असे शब्द वारंवार ऐकायला किंवा वाचायला मिळतात. पण Portfolio म्हणजे नेमके काय? Share market portfolio कसा तयार करावा? Portfolio management म्हणजे काय? आणि योग्य asset allocation का महत्त्वाचे आहे? हे समजून घेणे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी उपयुक्त ठरते.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना जोखीम व्यवस्थापन म्हणजेच Risk Management करणे महत्त्वाचे ठरते. आपल्या अपेक्षेनुसार बाजारातील परतावा मिळाला नाही किंवा गुंतवणुकीचा परतावा वजा चिन्हात गेला तर आपण काय करणार? किती काळ गुंतवणूक ठेवणार? किंवा कोणती investment strategy वापरणार? यावर गुंतवणुकीचे यश काही प्रमाणात अवलंबून असते.

या सगळ्यामध्ये Portfolio मधील वेगवेगळ्या गुंतवणुकीचे वाटप म्हणजेच Asset Allocation महत्त्वाचे ठरते. दीर्घकालीन financial planning करताना योग्य asset allocation केल्यामुळे जोखीम आणि अपेक्षित परतावा यामध्ये संतुलन साधण्यास मदत होऊ शकते.

What is portfolio in marathi? Portfolio म्हणजे काय?

Portfolio (पोर्टफोलिओ) म्हणजे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकींचा एकत्रित समूह.

ह्यात shares, Mutual funds, ETF, Index funds, Liquid funds, Bonds, सोने किंवा Gold Bonds, Fixed deposits (मुदती ठेवी) यांचा समावेश होऊ शकतो.

अजून विस्तारित स्वरूपात बोलायचे झाल्यास Real Estate, Cash in hand ची पण नोंद ह्यात ठेवता येईल. एकंदर आपली Net worth सांगणारा तक्ता म्हणजेच पोर्टफोलिओ.

म्हणजेच आपल्या वेगवेगळ्या financial assets आणि गुंतवणुकींची एकत्रित माहिती देणारा तक्ता म्हणजे Portfolio असे सोप्या भाषेत म्हणता येईल. व्यापक अर्थाने हे आपल्या personal financial planning आणि wealth management चा एक भाग असू शकते.

Share market portfolio meaning in marathi. Share Market Portfolio म्हणजे काय?

शेअर बाजारातील Portfolio पोर्टफोलिओ म्हटला कि वरकरणी कुणी किती कंपन्यांचे शेअर्स घेतले आहेत हा साधा अर्थ आपण लक्षात घेतो पण शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकी जसे कि वेगवेगळे Mutual funds, ETF, index funds आणि इतर market-linked investments ह्याचा सुद्धा ह्यात समावेश होईल.

म्युच्युअल फंडस् तसे बरेच गुंतवणूकदार दीर्घ काळासाठी घेतात पण त्यामानाने शेअर्स मध्ये buying/selling कमी अंतराने सुरूच असते म्हणजेच शेअर्सचा पोर्टफोलिओ -share market portfolio- हा बदलता राहतो. त्यातही बरेच जण काही विशिष्ट शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक तर काही शेअर्समध्ये कमी वेळेसाठी ट्रेडिंग करून फायदा करून घेण्यासाठी आपली गुंतवणूक योजना बनवतात.
असा हा विस्तृत पोर्टफोलिओ म्हटला कि ह्याचे नियोजन काही फार सोपे नसते. सगळ्या गुंतवणुकीची नोंद ठेवणे, Buy price, Sell price, Profit/ Loss, Holding period इत्यादीची लक्षपूर्वक नोंद ठेवावी लागते.

काही गुंतवणूकदार काही विशिष्ट शेअर्समध्ये long-term investment करतात, तर काही शेअर्समध्ये कमी कालावधीसाठी trading करून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराची investment strategy, risk appetite आणि financial goals वेगवेगळी असू शकतात.

एका निश्चित अवधीनंतर सगळ्या गुंतवणुकीत काय बदल झालेत, वेळेनुसार परतावा कमी झाला कि वाढला ह्या गोष्टींचा अभ्यास करायचा आणि मग निर्णय घ्यायचा असे काहीसे करता येईल. आता ब्रोकर कडून मिळालेले statement पाहले कि Profit, loss च्या नोंदी एका ठिकाणी कळण्याची पण सोय आहे.

म्युच्युअल फंड्स मध्ये सहसा गरज नसल्यास गुंतवणूक कायम ठेवता येईल पण जोडीला अनपेक्षित घसरणीच्या वेळेस जास्तीची रक्कम गुंतवण्यासाठी एक चांगला हिस्सा liquid funds मध्ये सुद्धा ठेवता येईल. शेवटी शेअर मार्केट म्हटले कि चढ उतार हा आलाच.

Portfolio Management म्हणजे काय?

Portfolio Management म्हणजे आपल्या सर्व गुंतवणुकींचे नियोजन, नोंद, निरीक्षण आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करणे.

यामध्ये खालील गोष्टींची नोंद ठेवता येते:

  • Buy Price
  • Current Price
  • Sell Price
  • Profit / Loss
  • Holding Period
  • Dividend Income
  • Asset Allocation
  • Sector Allocation
  • Investment Amount
  • Overall Portfolio Return

Types of portfolio in marathi

Portfolio मधील Asset Allocation नुसार Portfolio चे वेगवेगळे प्रकार सांगता येतात.

उदाहरणार्थ:

  • Conservative Portfolio
  • Moderate Portfolio
  • Aggressive Portfolio
  • Defensive Portfolio
  • Income Portfolio
  • Speculative Portfolio

ह्यातील प्रत्येक गटाच्या नावानुसार हे पोर्टफोलिओ कमी अधिक चढ-उतार, जोखीम, स्थिरता-अस्थिरता दाखवतात.

share market portfolio meaning in marathi

How to make good share market portfolio

Share market portfolio in marathi वर इतकी चर्चा झाल्यावर आता एक चांगला share market portfolio कसा निर्माण करावा हा प्रश्न समोर येणे साहजिक आहे. चांगला पोर्टफोलिओ म्हणजे एका अवधीत चांगला फायदा करून देण्यात उपयोगी असणारे शेअर्स, म्युच्युअल फंड्स , ETF इत्यादी.

असा पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष गुंतवणुकीआधी योजना जरुरी असेल किंवा आधीच असलेली गुंतवणूक परत नव्याने वेगवेगळ्या प्रमाणात Allocate करणे शक्य आहे.

“भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानामुळे उद्भवलेल्या चिंतेपेक्षा सध्या कमी लाभावर समाधान मानणे हे मी योग्य मानतो” असे एक वाक्य मी वाचले होते आणि ते मला आवडले देखील. पण वेगवेगळ्या विचारसरणीच्या गुंतवणूकदारांना वेगेवेगळी रणनीती आवडेल आणि कोणतीही एक रणनीती सगळ्यांनाच उपयोगी वाटणार नाही हे तितकेच खरे आहे.

Sector Wise Stock Selection

Share Market Portfolio तयार करताना खालील काही सामान्य मुद्द्यांचा विचार करता येईल:

  1. Segment Leader Company ची निवड: आपल्या अभ्यासानुसार संबंधित क्षेत्रातील मजबूत business model आणि चांगली आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांचा विचार करता येतो.
  2. प्रत्येक Sector मध्ये किती Allocation करायचे ते ठरवणे: एकाच Sector मध्ये Portfolio ची मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी विविध sectors मध्ये योग्य प्रमाणात diversification करण्याचा विचार करता येतो.
  3. प्रत्येक Sector मधील Stocks चे Allocation: एखाद्या Sector मध्ये एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्यास प्रत्येक कंपनीला किती allocation द्यायचे हे ठरवता येते.
  4. Income Portfolio साठी Dividend Paying Stocks: Income-oriented Portfolio तयार करताना Dividend देणाऱ्या कंपन्यांचा अभ्यास करता येतो. मात्र dividend हा भविष्यात निश्चित मिळेलच असे नाही आणि कंपनीची आर्थिक स्थिती व dividend policy तपासणे महत्त्वाचे आहे.
  5. Mutual Fund Portfolio आणि Direct Stocks मध्ये Overlap तपासा: आपल्या Mutual Fund मध्ये एखाद्या कंपनीचा मोठा हिस्सा आधीपासून असेल तर त्याच कंपनीचे Direct Stocks खरेदी केल्यामुळे Portfolio मध्ये अनावधानाने concentration वाढू शकते. म्हणून mutual fund portfolio आणि direct equity portfolio मधील overlap वेळोवेळी तपासता येतो.
  6. आपल्या Risk Profile नुसार Investment करा: सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीचे allocation हे आपल्या risk profile, financial goals आणि investment horizon नुसार असावे.

Portfolio Rebalancing म्हणजे काय?

समजा एखाद्या Asset Class चे Portfolio मध्ये सुरुवातीला 40% allocation होते. बाजारातील वाढीमुळे त्याचे प्रमाण 55% झाले. अशा वेळी आपल्या मूळ asset allocation नुसार Portfolio पुन्हा संतुलित करण्याच्या प्रक्रियेला Portfolio Rebalancing म्हणता येते.

त्याचप्रमाणे बाजारातील घसरणीनंतर Equity चे allocation कमी झाले असेल तर आपल्या ठरवलेल्या Asset Allocation नुसार पुन्हा गुंतवणूक करण्याचा विचार करता येतो.

Portfolio Rebalancing हा long-term investment planning मधील एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

शेअर मार्केट Portfolio मध्ये Diversification का महत्त्वाचे?

Portfolio मध्ये एकाच कंपनीत, एकाच Sector मध्ये किंवा एकाच Asset Class मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असल्यास concentration risk वाढू शकतो. त्यामुळे Portfolio Diversification करण्याचा विचार केला जातो.

Shares, Mutual Funds, Bonds, Gold आणि इतर Assets मध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक केल्यास Portfolio ची एकूण रचना अधिक संतुलित करण्याचा प्रयत्न करता येतो. मात्र Diversification म्हणजे प्रत्येक उपलब्ध Asset मध्ये गुंतवणूक करणे नव्हे. आपल्या financial planning आणि investment objectives नुसार योग्य allocation करणे महत्त्वाचे आहे.

शेवटी…

Portfolio Management म्हणजे फक्त एक-दोन शेअर्समध्ये झालेला फायदा किंवा नुकसान पाहणे नव्हे. त्याऐवजी संपूर्ण Portfolio चा परतावा, जोखीम, Asset Allocation, Sector Allocation आणि आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी त्याचा संबंध पाहणे महत्त्वाचे आहे.

एखादा Asset Group तेजीमध्ये असताना काही लाभ काढून घेऊन दुसऱ्या Asset Group मध्ये गुंतवणूक करून Portfolio Rebalance करता येऊ शकते. त्याचप्रमाणे बाजारातील घसरणीच्या काळात उपलब्ध Cash किंवा Liquid/Debt Investments मधील रक्कम आपल्या ठरवलेल्या Asset Allocation नुसार Equity मध्ये गुंतवण्याचा विचार करता येतो.

शेवटी Personal Finance, Investment Planning, Wealth Management आणि Risk Management या सगळ्यांचा उद्देश एकच आहे—आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार उपलब्ध पैशाचे योग्य नियोजन करणे.

टीप: शेअर बाजारातील गुंतवणुकीत बाजारातील जोखीम असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी, फंड, जोखीम आणि आपल्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करावा. हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि वैयक्तिक गुंतवणूक सल्ला नाही.

हे सुद्धा वाचा: Asset allocation म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Are you human? Please solve:Captcha