शेअरचे मूलभूत विश्लेषण कसे करावे? Fundamental analysis of share in marathi

fundamental analysis of share in marathi

एखाद्या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर त्याचे Fundamental analysis कसे करावे?ह्याची माहिती आपण Fundamental Analysis of share in Marathi ह्या लेखातून समजून घेऊया.

Fundamental analysis of share in marathi ह्यावरील ही माहिती  आपल्याला एका चांगल्या शेअरची निवड कशी करावी ह्याबद्दल थोडी मदत करू शकेल. समजा आपल्याला काही वस्तू  विकत घ्यायची आहे तर आपण बाजारात जाऊन ती वस्तू लगेच विकत घेऊ शकतो, पण तुम्हाला एखादा व्यवसाय विकत घ्यायचा असेल तर आपण काय बघू?

फायद्याची कंपनी म्हणजे जी कंपनी आपल्या शेअरधारकांसाठी फक्त  पैसे निर्माण करते ती नसून अशी कंपनी कि जी आपल्या खर्चाच्या तुलनेत जास्त फायदा मिळवते (ह्याला high margin असे म्हणूया) ही होय. जेव्हा व्यवसाय चांगला असतो तेव्हा तो पैसे देऊनच जाईल ह्याची खात्री आपण ठेवू शकतो. एखादा व्यवसाय विकत घेण्याअगोदर तो किती चांगला व्यवसाय आहे हे पाहणे म्हणजे मूलभूत विश्लेषण म्हणजेच Fundamental Analysis of share करणे.

मूलभूत विश्लेषण Fundamental Analysis of share in Marathi करतांना कंपनीची नफ्याची शक्यता लक्षात घेतली जाते. मूलभूत विश्लेषण प्रत्येकच जण लक्षात घेत नाही. कमी अवधीचे लक्ष्य असलेले लोक Technical Analysis बघतात. ज्यांना  चांगल्या व्यवसायामध्ये खरेदी करायची असते  आणि दीर्घ अवधीची गुंतवणूक करायची असते (५-७ वर्षे) ते लोक मूलभूत विश्लेषण Fundamental Analysis बघतात.

चांगले शेअर घ्या हे सगळेच जण सांगतात, पण चांगले शेअर म्हणजे नेमके कोणते? हे माहित करण्यासाठी आपण Fundamental Analysis of share in Marathi खालील काही गोष्टीवर विचार करू शकतो.

 • कंपनीचे उत्पादन Production सुरळीत असते, कधी कधी उत्पादन वाढत्या क्रमात (Ascending) असते,
 • विक्री आकडा Sales Figures हा दरवर्षी हळूहळू वाढत असतो.
 •  त्यायोगे होणार फायदा More Profit सुद्धा मागील वर्षापेक्षा जास्त असतो.
 • सगळे कर दिल्यानंतर होणारा निव्वळ नफा सुद्धा वाढत्या प्रमाणात असतो.
 • कंपनीजवळ आपल्या कारभाराचा विस्तार करण्यासाठी पुरेशी नगदी Liquidity उपलब्ध असते.
 • कंपनीने काही ठिकाणी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन हालचाली सुरु केलेल्या असतात.
 • वेगवेगळ्या ग्राहकाकडून कंपनीकडे बऱ्याच मूल्यांच्या ऑर्डर लंबीत High Order book असतात.
 •  कंपनीवर कर्ज नसते किंवा असल्यास अतिशय कमी असते किंवा जितके कर्ज असते ते कंपनी आपल्याजवळील उपलब्ध संपत्तीद्वारे कधीही चुकवू शकते. थोडक्यात असलेले कर्ज कंपनीसाठी जास्त धोका नसतो.
 • कंपनी आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीसोबत योग्य स्पर्धा करू शकते.

Fundamental Analysis of share बघतांना अशा कंपनीच्या भविष्याच्या प्रदर्शनाबद्दल बऱ्यापैकी निश्चिती होऊ शकते.  परंतु बऱ्याच वेळी असे शेअर हे थोड्या जास्तच किमतीवर  व्यवहार करत असतात त्यामुळे किती किमतीवर आणि किती प्रमाणात हे शेअर घ्यावेत हे कुणी ठरवून घेऊ शकतो. कधीकधी बाजारात थोडी पडझड झाली कि तेव्हा असे शेअर काही प्रमाणात आपण जोडू शकतो.

जी कंपनी दरवर्षी लाभांश जाहीर करते अशा कंपनीचे शेअर घेणे काही गुंतवणूकदार पसंत करतात कारण अशा शेअरमधून एकतर बाजारभाव वाढत राह्ल्याने फायदा होतो आणि दुसरे म्हणजे अशी कंपनी दरवर्षी होणाऱ्या लाभामधून काही हिस्सा शेअरधारकांना लाभांश रूपाने परत करत राहते.  अशा पद्धतीने दोन बाजूने फायदा मिळण्याची शक्यता असते.

Fundamental Analysis of share बघतांना काही गुंतवणूकदार लाभांशाच्या मोहात न पडता ज्या कंपन्या लाभांश न देता झालेला फायदा परत कंपनीच्या विस्तारासाठी राखून ठेवतात अशा कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे पसंद करतात. कारण एकच, जवळ पैसे घेतल्यापेक्षा परत व्यवसायात गुंतवणे जास्त योग्य असे त्यांचे मत असावे. अशा कंपनीला Growth Company म्हणतात. अशा कंपन्या विक्रीच्या आकड्यामध्ये , नफ्यामध्ये  सातत्याने चांगले प्रदर्शन करतात पण झालेला नफा लाभांश रूपाने जास्त न वाटता परत कंपनीच्या कारभारात गुंतवणूक करतात. आता ह्या दोन प्रकारातील कोणती कंपनी चांगली? ह्या प्रश्नाचे एक नक्की उत्तर नसून ते गुंतवणूकदाराच्या विचारांवर अवलंबून असते .

Fundamental Analysis of share in Marathi म्हणजेच मूलभूत विश्लेषण करताना आपण खालील काही गोष्टी अभ्यासू शकतो.
 • EPS (Earning Per Share): ह्याचा अर्थ कंपनीने एका शेअरमागे मिळवलेले उत्पन्न. हे काढण्यासाठी आपल्याला कंपनीने कमावलेला निव्वळ नफा आणि त्या कंपनीच्या एकूण शेअर ची संख्या  माहित असायला हवे. हे आकडे आपण काही वेबसाइट्वरुन सहज मिळवू शकतो. Moneycontrol.com सारख्या वेबसाईट वर EPS आयताच दिलेला असतो. प्रॉफिट आणि लॉस च्या तक्त्यात सुद्धा आपण तो पाहू शकतो.
 • P /E RATIO: ह्याचे पूर्ण नाव म्हणजे Price to Earning Ratio  नावाप्रमाणेच ह्याला माहित करण्यासाठी शेअरच्या सध्याच्या बाजारभाव (Price ) ला  EPS ने भाग द्यावा लागेल. शेअरच्या विश्लेषणासाठी   ही एक लोकप्रिय पद्धत आहे. समजा एखाद्या शेअरची किंमत ३५ रुपये आहे आणि मागील वर्षीचा EPS ७ रुपये आहे तर ह्या शेअरचा PE ३५/७ म्हणजेच ५ इतका येईल. ह्याचाच अर्थ असाही घेता येईल कि शेअरने  कमावलेल्या प्रत्येक १ रुपयांसाठी गुंतवणूकदार ५ रुपये देण्यास तयार आहे. अजून सोपे करून बघूया. गुंतवणूकदाराला १ रुपया कमावण्यासाठी ह्या शेअरमध्ये ५ रुपये गुंतवावे लागतील किंवा ५ रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला १ रुपये नफा मिळेल. ह्यामागील संकल्पना स्पष्ट आहे. आपल्या क्षेत्रातील बाकी कंपनीच्या तुलनेत  कमी PE असलेल्या शेअरला निवडणे. आता ज्या कंपनीच्या शेअरचा PE जास्त आहे, एकतर त्याचे प्रदर्शन भविष्यात चांगले होणार आहे असा गुंतवणूकदारांचा विश्वास आहे किंवा असा शेअर सध्या जास्त किमतीवर व्यवहार करत आहे. ह्याउलट एखाद्या शेअरचा PE कमी असेल तर एकतर गुंतवणूकदार ह्या कंपनीच्या भविष्यातील प्रदर्शनावर अनिश्चित असतील किंवा हा शेअर सध्या कमी किमतीवर व्यवहार करत आहे. सामान्यपणे एका क्षेत्रातील कंपन्यांचा PE तुलनेसाठी घेतला जातो.
 • Book value: एखाद्या शेअरचा सध्याचा बाजारभाव एखाद्या शेअरचा सध्याचा बाजारभाव (CMP म्हणजेच Current market  price ) योग्य आहे कि तो शेअर कमी किमतीवर व्यवहार करत आहे (Underpriced ) कि त्याची किंमत जास्त फुगलेली आहे (Overpriced)  हे सांगणे कठीण काम असते. ह्याला बरीच कारणे असतात.  Book  Value समजण्यासाठी अशी कल्पना करा कि एखादी कंपनी आपली सारी देणी घेणी भागवून नंतर आपल्याजवळ काय संपत्ती उरली आहे तिची किंमत ठरवते. आता ह्या किमतीला एकूण शेअर किती ह्या संख्येने भाग द्यायचा. जे उत्तर येईल ते म्हणजे त्या शेअरचे कागदोपत्रीचे मूल्य म्हणजेच Book  Value. जवळपास सगळ्याच चांगल्या कंपन्या आपल्या Book  Value पेक्षा कितीतरी पटीने जास्त मूल्यावर व्यवहार करत असतात. म्हणजेच भविष्यातील चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा ग्राह्य धरून आजच असे शेअर त्यांची भविष्यातील किंमत मागत असतात असे समजायला हरकत नाही. Book  Value १०० रुपये असलेला शेअर ४०० रुपयात जेव्हा आपण घेतो तेव्हा रिस्क नक्कीच घेत असतो.  आणि नंतर आपण अपेक्षा करतो  कि हा शेअर माझ्याकडून कुणी ६०० रुपयात विकत घेईल.(आणि मजेची गोष्ट म्हणजे जेव्हा हा शेअर काही कारणाने ६०० झाला जरी तर मग आपण ८०० रुपयाची अपेक्षा ठेवतो आणि मग काही काळात तो परत ३५० रुपये होतो आणि मग आपण आता ५०० झाला कि विकू म्हणून जवळ ठेवतो. (ह्यावर अधिक माहितीसाठी वाचा:   मला आवडलेले पुस्तक Stocks to Riches ). अर्थात फक्त book  value  वर १०० टक्के विसंबून राहता येणार नाही पण शेअर निवडताना एक संदर्भ बिंदू म्हणून आपण ह्याला बघू शकतो. कधी पडझडीच्या काळात एखादा चांगला शेअर book  value  च्या जवळपास आला कि तो घ्यायचा निर्णय करू शकता (अर्थात बाकीच्या काही गोष्टी पाहून)   म्हणजे तुम्ही खरेदी किंमत कमी राहील. तुमचा फायदा हा खरेदी किमतीवर अवलंबून असतो हे सूत्र ध्यानात ठेवा.
 • NET SALES: ह्याला सुद्धा तुम्ही कंपनीच्या वेबसाईट वरून किंवा इतर काही आर्थिक संकेतस्थळावरून बघू शकता.  विक्रीचे आकडे एखाद्या शेअरच्या वर्तमान आणि भविष्यासाठी महत्वाचे असतात. त्यावरून तुम्हाला पुढील परिस्थितीचा एक एक अंदाज येऊ शकतो. ह्या आकड्याला तुम्ही मागील वर्षाच्या त्या कालावधीतील आकड्यासोबत तुलना करून पाहू शकता. किंवा मागल्या तिमाहीचे आकडे बघून वर्तमान तिमाहीचे आकडे तुलनात्मक रूपाने अभ्यासू शकता.

Fundamental Analysis of share in Marathi बघतांना ह्याव्यतिरिक्त Reserves (म्हणजे शिलकीत ठेवलेली  अधिकची रक्कम ), Sales growth (विक्रीत होणारी वाढ) , NET PROFIT आणि Net profit growth (नफ्यात होत असणारी वाढ), Dividend history, Promoters holding ह्या काही गोष्टी सोबत आपण बघू शकतो.

हे सुद्धा वाचा: शेअरचे टेक्निकल एनालिसिस कसे करावे ?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *