How to become rich in marathi तिशीतील दहा आर्थिक चुका टाळा आणि श्रीमंत व्हा

how to become rich in marathi

काही साध्या आर्थिक चुका टाळून How to become rich in marathi हा लेख नुकतेच कमावणे सुरु केलेल्या तरुणांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल.

How to become rich in marathi? ह्या प्रश्नाचे एकदम सरळ असे काही उत्तर नाही त्यासाठी आपल्याला स्वतःचे कठोरपणे आत्मपरीक्षण करावे लागेल.

वयाच्या तिशीत घेतलेले काही आर्थिक निर्णय आणि बचत व गुंतवणूक ह्याबद्दलच्या लावून घेतलेल्या सवयी एखाद्याच्या पुढील जीवनात फार  महत्वाची भूमिका बजावतात. 

पैशांच्या सवयीच एखाद्याला आर्थिक जीवनात यशस्वी बनवतात किंवा एखाद्याला जीवनभर मागे ठेवण्यात हातभार लावतात. असे का असावे? ह्याचा विचार क्वचितच कुणी करत असेल किंबहुना ह्या गोष्टीवर चर्चा किंवा एखाद्या माहितगार व्यक्तीचे मार्गदर्शन  घेण्यातही फारसा रस दाखवत नसेल. तुमच्या आर्थिक क्षेत्रातील उज्वल भविष्यासाठी काही साधारण वाटणाऱ्या चुका टाळणे फार जरुरी आहे.

how to become rich in marathi
अशाच काही चुका आणि त्यांचे होणारे परिणाम ह्याची चर्चा करणारा How to become rich in marathi by avoiding financial mistakes हा लेख श्रीमंतीच्या वाटेवर मार्गक्रमण करण्यात उपयोगी होईल.

१) आर्थिक लक्ष्य स्पष्ट नसणे: जर तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष्य (financial goal) निर्धारित केले नसेल तर वयाच्या तिशीमध्ये  दीर्घ आणि लघु अवधीचे आर्थिक लक्ष्य (long term and short term goal) निर्धारित करणे तुम्हाला फार मोठा फायदा करून देईल.

वयाच्या साठीमध्ये जर कुणी म्हणेल कि जर मी तिशीमध्ये बचत आणि गुंतवणूक केली असती तर…?असा प्रश्न तेव्हा पड्ल्यापेक्षा आजच सुरुवात करणे योग्यच होईल. Retirement planning साठी किती पैसे पुरेसे राहतील? आकस्मिक निधी emergency fund किती आणि कसा तयार करावा? घर घेण्यासाठी किती वर्षाचा वेळ आणि किती पैसे पुरेसे होतील? असे लहान मोठे
सगळे नियोजन सुरु करण्याची तिशी ही अति उत्तम वेळ आहे.

लक्ष्य निर्धारित न करणे ही एक मोठी चूक म्हणता येईल कारण लक्ष्य नसले कि काम करण्याची योग्य दिशा समजत नाही.

२) सेवानिवृत्तीसाठी बचत सुरु न करणे: तिशीत सेवानिवृत्तीचा विचार करणेही काही जण चेष्टेचा विषय ठरवतील. परंतु जे समजदार लोक वेळेचे महत्व समजतात त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असते कि ज्या भविष्याच्या आपण गोष्टी करतो ते एक दिवस नक्कीच येणार आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी अगोदरपासून सुरुवात करणे शहाणपणाचे पाऊल आहे. 

लहानपणी गोष्टींच्या पुस्तकात वाचलेली एक गोष्ट आठवली. मुंगी आणि टोळ ह्यांची ती गोष्ट होती. सुगीच्या हंगामात मुंग्या आपल्या घरी हळूहळू खाद्यपदार्थ गोळा करत असतात आणि टोळ तेव्हा मजेत इकडे तिकडे फिरत असतो. 

टोळ मुंग्यांना म्हणतो कि अजून तर पावसाळा सुरु व्हायला  फार वेळ आहे, तुम्ही एवढ्या लवकर कशाला कामाला सुरुवात करता? माझ्यासारखे खेळा, बागडा. पण मुंग्या आपल्या कामात मग्न राहतात. लवकरच पावसाळा सुरु होतो आणि टोळ उपासमारीने मरू लागतो.

गोष्ट साधीच होती पण त्यात समजावलेला धडा फार मोठा होता. तेव्हा गोष्ट म्हणून करमणूक झाली पण नंतर अशा गोष्टींचे महत्व समजले. त्यामुळे दुसरी चूक जी टाळता येणे शक्य आहे ती  म्हणजे जे भविष्य एक ना एक दिवस येणार आहे त्यासाठी तयारी आज, सध्या, ह्याक्षणीच सुरु करणे आणि ठराविक काळाने त्याची समीक्षा करत राहणे व जरुरी असल्यास फेरबदल करणे.

३) खर्चाचा हिशेब न ठेवणे: ही चूक सगळ्याच वयातील लोकांसाठी लागू होते. परंतु तिशीत ही सवय जास्तच महत्वाची आहे असे वाटते . ह्याला विशेष असे काय कारण असा प्रश्न कुणी विचारू शकतो. तिशीत खर्चाचा हिशेब न ठेवणे हे चांगल्या आर्थिक आरोग्यासाठी जास्त घातक आहे  कारण ही एक सवय बनते आणि जी सवय बनते ती लवकर सुटत नाही.

अशा घातक सवयी बदलण्याचे दोन उपाय आहेत. एक तर सातत्याने चांगल्या आर्थिक सवयीचे good financial habits वाचन आणि मनन करणे, जेणेकरून हळूहळू तुम्हाला अशा सवयीचे महत्व समजू  लागेल. ह्यासाठी paisamantra ह्या ब्लॉगवरील बाकी लेख नक्कीच उपयोगी वाटतील. दुसरा उपाय म्हणजे जे कुणी आपल्या मित्रपरिवारातील आर्थिक बाबतीत समजदार असे लोक असतील त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन शिकणे.

पण थांबा, मी निरीक्षण केलेले काही मुद्दे सांगतो. वर सांगितलेले दोन्ही उपाय फार प्रभावी आहेत परंतु ते अंगीकारणे इतकेही सोपे नाही. कारण एक तर असे लिखाण तुम्हाला शोधून शोधून वाचावे लागेल आणि दुसरे म्हणजे आर्थिक सवयीत कुणाचे अनुसरण करावे हा प्रश्नही तेवढाच कठीण आहे कारण आपल्या आजूबाजूचे बरेच जण कदाचित ह्या सवयींच्या विरुद्ध काम करत असतील. How to become rich in marathi साठी योग्य पुस्तकांचे वाचन सुद्धा उपयोगी पडते.

४) परवडत नसलेले मोठे घर विकत घेणे: कुणी ह्याला चूक म्हणत नसणार.  त्यांच्या मते घर ही एक संपत्ती आहे. परंतु इथे ह्याला एक चूक ह्यासाठी म्हटले आहे कि जर का home loan घरकर्जाच्या हफ्त्यांना EMI भरता भरता बाकी गोष्टींवर ताण येत असेल तर ह्याला चूक ह्या श्रेणीत ठेवणेच योग्य राहील. आर्थिक नियोजनात भावनिक गोष्टींची सरमिसळ न होऊ देणे हे एक कठीणच काम असते. पण एक चांगला आर्थिक  नियोजन सल्लागार financial advisor भावनेवर मात करून जी गोष्ट तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी फायद्याची आहे ती सुचवू शकतो.

अशा वेळेस सुरुवात करण्याअगोदर निष्णात व्यक्तीचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. Home loan ह्याच्याशी संबंधित एक नियम आहे त्याला २८/३६ चा नियम म्हणतात. Home loan कर्ज देणाऱ्या संस्था  कर्ज घेण्यास  इच्छुक व्यक्तीच्या credit score क्रेडिट  स्कोर  सोबतच  त्या व्यक्तीची सांपत्तिक स्थिती तपासण्यासाठी  २८/ ३६ च्या नियमाचा वापर  करत असतात.  २८/३६ मधील पहिला भागानुसार housing cost महिन्याच्या मिळकतीच्या monthly income २८ टक्क्यापेक्षा जास्त नसावी. ह्यामध्ये principal, interest, taxes and insurance ह्या गोष्टी येतात.

दुसरा भाग सांगतो कि एकूण कर्ज (म्हणजे पहिल्या भागातील housing cost + बाकीचे काही कर्ज जसे Vehicle loan वाहन कर्ज, Personal loan वैयक्तिक कर्ज इत्यादी ) हे महिन्याच्या मिळकतीच्या monthly income ३६ टक्क्यापेक्षा जास्त नसावे. ह्या नियमाचा वापर एक व्यक्ती सुद्धा करून घेऊ शकतो जेणेकरून आपल्या आर्थिक आरोग्याची स्थिती समजून घेण्यास मदत होईल.

५) खर्च केल्यानंतर बचत करणे: ही काय चूक आहे असे कुणी विचारेल. परंतू जर तुम्हाला आर्थिक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ह्या चुकीला वारंवार बाजूला सारावे लागेल. सुरवात कशी करायची? तर एखाद्या महिन्याची मिळकत म्हणजे वेतन salary, व्यवसायातील कमाई business income इत्यादी आल्यानंतर सर्वप्रथम त्यातील बचतीचा हिस्सा saving वेगळा करा. कधी? त्याच दिवशी. ज्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा credit होतील त्याच दिवशी बचतीसाठीचा हिस्सा वेगळा करा.

हा हिस्सा आपण एका दुसऱ्या बँक खात्यामध्ये ठेवू शकता. हे वेगळे खाते कधीही खर्चासाठी म्हणून वापरायचे नाही. आता मूळ खात्यात जितकी रक्कम शिल्लक राहील त्यातूनच महिन्याचा पूर्ण खर्च monthly expenditure भागवा. सुरुवातीला कठीण वाटेल पण लवकरच ही सवय अंगवळणी पडेल. ह्या एका सवयीने तुमच्या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीला वेगाने आकार येईल असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. काही महिने ही रक्कम वाढत राहील आणि नंतर तिचा योग्य जागी गुंतवणुकीसाठी वापर करावा. This is one important habit for how to become rich in marathi.

investment tips in marathi


टीप:-ह्यातील एक भाग चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवू शकता. जेव्हा तुमचा कालावधी अगोदरच ठरलेला असतो तेव्हा कमी काळात गुंतवणूक कमी जरी झाली तरी तुम्ही जवळ असलेल्या तरल भागातील liquid fund काही रक्कम अतिरिक्त गुंतवू शकता. कमी दरामध्ये घेतलेली SIP काही काळातच जास्त होऊ शकते तेव्हा त्यातील काही फायदा काढून परत liquid fund मध्ये भरपाई करू शकता.

अशाच काही योजना बनवून त्यानुसार काम केले तर जेव्हा शेअर stocks किंवा म्युच्युअल फंड mutual funds च्या किमती कमी होतात तेव्हा ती संधी मानून तुम्ही त्याचे सोने करू शकता.

तुम्हाला मिळणारा फायदा हा तुमची खरेदी किती किमतीवर झाली आहे ह्यावर अवलंबून असतो त्यामुळे कमी NAV त घेतलेले म्युच्युअल फंड चे युनिट्स त्यांच्या मूळ किमतीवर १०-१२ महिन्यात जरी आले तरी तुम्हाला एक चांगला परतावा त्यावर मिळू शकतो. इथे अजून एक योजना बनवता येईल, जर टप्प्याटप्प्यात NAV कमी कमी होत गेली तर थोडे जास्त युनिट्स घेतले जाऊ शकतात म्हणजे जेव्हा बाजारात वरच्या दिशेने uptrend हालचाली सुरु होतील तेव्हा तुमची एकूण गुंतवणूक लवकरच सरासरीच्या बरोबरीत किंवा जास्त होऊ शकते.

६) आकस्मिक निधी Emergency Fund तयार न करणे: जरी तुम्ही चांगली बचत केली  आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक सुद्धा केली,  तरीही एक पुरेसा emergency fund तयार न करणे ही एक मोठी चूक ठरू शकते. का? कारण यदाकदाचित जर काही कारणाने कुणाची मिळकत थांबली तर महिन्याचे सगळे खर्च भागतील एवढी रक्कम जवळ असणे फार आवश्यक आहे.  ही रक्कम  काही अगदी नगद स्वरूपात cash किंवा बचत खात्यामध्ये saving account मधे असणे जरुरी आहे. जेणेकरून गरज पडल्यास क्षणात तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. 

काही रक्कम liquid फंड मध्ये सुद्धा ठेवता येईल. ह्यातील पैसे एका कामकाजी दिवसात (T +१) तुम्ही काढू शकता.  इमर्जन्सी फंडच्या अभावी तुम्हाला एखाद्या गुंतवणूक साधनात गुंतवलेले पैसे वेळेअगोदर काढावे लागतील आणि प्रसंगी त्यावर नुकसान सुद्धा सहन करावे लागेल

७) जोडीदारासोबत आर्थिक विषयावर बोलणे टाळणे: लग्नानंतर जोडीदारासोबत आर्थिक विषयावर चर्चा करणे किंवा त्याचे/तिचे मत लक्षात घेणे ही एक चांगली सवय म्हणावी
लागेल. तुमची गुंतवणूक investment, बचत saving , खर्चाची शैली expenditure habits वगैरे गोष्टीवर अभ्यासपूर्वक चर्चा झाली पाहिजे. ही चर्चा होताना दोघांच्याही लग्नाअगोदरच्या खर्चाच्या सवयीचा परिणाम स्वतःवर असतो हे ध्यानात घेतले पाहिजे. जोडीदारासोबत ह्या विषयावर चर्चा झाली कि तुमच्या एकापेक्षा दोन जणांचे विचार अधिक चांगले काम करतात आणि ठरलेल्या योजनेवर जास्त चांगले काम तुम्ही करू शकाल.

८) पुरेसा विमा नसणे: तिशीत पुरेसा जीवन विमा life insurance आणि आरोग्य विमा health insurance नसणे ही एक मोठी चूक म्हणावी लागेल. तुमच्या वार्षिक मिळकतीच्या yearly income किती पट जीवन विमा असणे आवश्यक आहे हे तुमच्या सध्याच्या खर्चाच्या हिशेबाने काढता येईल. काही दुर्देवी घटनाक्रमात कुटुंबासाठी तजवीज म्हणून योग्य रक्कमेचा विमा असणे अत्यंत जरुरी आहे. तसेच आजारपणापासून होणाऱ्या खर्चातून वाचण्यासाठी पुरेसा आरोग्य विमा असणे सुद्धा तेवढेच जरुरी आहे. इमर्जन्सी फंड नंतर जीवन विमा व आरोग्य विमा असणे आणि नंतरच बाकी गुंतवणुकीकडे वळणे जास्त योग्य आहे असे म्हणता येईल. Before investing buy life insurance and health insurance.

९) मुलांवर  जास्त खर्च करणे: हा खर्च तर जरुरी आहे. ह्याला मी कोणत्याही परिस्थितीत कमी करणार नाही असे इथे कुणी म्हणेल. पण परत एकदा वाचा मुलांवर जास्त खर्च करणे असे लिहिलेले आहे. इथे जास्त हा शब्द ठळक आहे. होते काय कि मला जे मिळाले नाही ते मी मुलांना देईलच अशा विचाराचे सुद्धा काही नवीन आईवडील आजकाल बघायला मिळतात. इथे एका ठिकाणी वाचलेले वाक्य परत उद्धृत करावेसे वाटते ते वाक्य काहीसे असे आहे  “आजकाल आईवडील आपल्या मुलांना अशा गोष्टी देण्यामध्ये व्यस्त आहेत कि ज्या त्यांना मिळाल्या  नव्हत्या. पण ह्या सगळ्यात ते अशा गोष्टी आपल्या मुलांना देणे विसरले कि ज्या त्यांना मिळाल्या होत्या.”

सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी, शिकवणी बिना पैशांच्या मिळाल्या आणि त्या गोष्टी, शिकवणी अजूनही टिकून आहेत. पण आजकाल मोठी फी आकारून वेगवेगळे वर्ग, प्रशिक्षण मुलांना लक्ष्य ठेवून आयोजित केले जातात. त्यातून मुले किती शिकतात हा दुसरा प्रश्न असला तरी पालकांचे मात्र खिसे रिकामे होत जातात हे खरे.

शिवाय ह्या सगळ्या खर्चातून मुलांचा विकास होण्याऐवजी त्याला शिकणे म्हणजे पैसे देऊन महागड्या क्लासमध्येच जाणे हे सत्य वाटू लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात अनेक बाजूने प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि ह्यातील बऱ्याच गोष्टींना खूप पैसे जरुरी नसतो असे एक मत आहे.

१०) आर्थिक क्षेत्रात शिकत न राहणे: ही सवय लावून घेतलेल्या व्यक्तीला फार मोठी समस्या कधी येणार नाही असे म्हटले तरी वावगे होणार नाही. आर्थिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वतःला प्रशस्त करून वेळेनुसार नवीन गोष्टी शिकत राहणे फार महत्वाचे असते. तशी ही सवय स्वतःला लावून घेणे हे कोणत्याही क्षेत्रात तेवढेच महत्वाचे असते.

आर्थिक क्षेत्रात शिकत राहण्यासाठी वाचन, अनुभवी लोकांसोबत चर्चा, आर्थिक  नियतकालिके इत्यादी उपयोगी पडतात. प्रसंगी चांगल्या अनुभवी लोकांनी चालवलेला एखादा सेमिनार financial seminar, चर्चासत्र सुद्धा नोंदणी करणे फायद्याचे सिद्ध होऊ शकते. परंतु त्यामध्ये नेमके काय शिकवले जाईल आणि त्याचे शुल्क दिल्यानंतर तुम्हाला काय फायदा होऊ शकेल ह्याची शहानिशा करून घेणे ठीक राहील असे वाटते. आपल्यापेक्षा अधिक माहितगार व्यक्तीकडून शिकून घेतल्याने फायद्याचीच शक्यता राहते. Marathi investment blog paisamantra वर सुद्धा ह्या दृष्टीने बरेच लिखाण आपण वाचू शकता व आवडल्यास मित्रांसोबत सामाईक करू शकता.

तर अशा काही सामान्य वाटणाऱ्या चुका आपल्या तिशीत टाळा आणि श्रीमंतीच्या रस्त्याने वाटचाल करा.आता तुम्ही स्वतःला How to become rich in marathi हा प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी असलेले रस्ते सुद्धा माहीत करून घेऊ शकता.

Happy investing..

हे सुद्धा वाचा: Financial literacy in marathi

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.