सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना Sovereign gold bond in marathi

What is Sovereign gold bond in marathi?
सोन्याची चकाकी कधी फिकी पडत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. अस्थिर वातावरणामध्ये सुद्धा सोने आपले महत्व दाखवून जाते. Sovereign gold bond in marathi मध्ये आपण सोन्यातील गुंतवणुकीला Gold Bond हा पर्याय कितपत योग्य आहे ह्याबद्दल काही माहिती बघूया.
तुम्ही देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सॉवरेन गोल्ड बॉन्ड नक्कीच एक आकर्षक योजना असू शकेल. वाचा Sovereign gold bond in marathi.

सोन्यामध्ये गुंतवणूक हा विषय काही भारतीयांसाठी नवीन नाही. सोन्याचे भाव कितीही वाढत गेले तरीही त्याचे ग्राहक काही कमी होत नाहीत. सोन्याचे दागिने हा भारतात एक असा विषय आहे कि ज्याचा मोह ज्याला त्याला टाळता येत नाही. सोन्याचे दागिने बनवून घेणे आणि त्याला काही काळानंतर परत नवीन रूपात बदलवत राहणे हे गुंतवणुकीच्या दृष्टीतून काही गुंतवणूकदार पसंत करत नसावेत, कारण त्यात नाही म्हटले तरी मेकिंग चार्जेस वगैरे नावाखाली ग्राहकाकडून काही पैसे वसूल केल्या जातात.
sovereign gold bond in marathi ह्या विषयावरील हा लेख काही प्रमाणात Physical Gold जवळ ठेवून अतिरिक्त रक्कम गोल्ड बॉण्ड मध्ये गुंतवण्याचा विचार करत असलेल्या गुंतवणूकदाराला निर्णय घेण्यात मदत करू शकेल.
Sovereign gold bond योजना सरकारने वर्ष २०१५ मध्ये सुरु केली होती. ह्या योजनेचा लाभ असे गुंतवणूकदार घेऊ शकतात कि जे भौतिक स्वरूपात सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या विचाराचे आहेत.
Asset allocation प्रमाणे एखादा व्यक्ती त्याच्या portfolio मध्ये काही प्रमाणात सोने ठेवू शकतो. आता सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे एकतर दागिने करून घेणे किंवा सोन्याचे नाणे बनवून ते सांभाळून ठेवणे. ह्या प्रकाराला Physical Gold म्हणूयात. हे सांभाळणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागते कारण प्रवासात, घरून Physical Gold चोरी होण्याची भीती कुणी नाकारू शकत नाही. प्रवासात कुणाची सोने असलेल्या बॅग चोरी झाल्याची घटना वारंवार आपल्या कानावर येतातच. असो.
सॉवरेन गोल्ड बॉन्डशी ह्याचा काय संबंध? हे सांगण्याचा उद्देश एकच कि Asset Allocation मध्ये एकाच प्रकारच्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले आणि काही कारणाने त्यामध्ये काही नुकसान झाले तर गुंतवणूकदाराला प्रचंड नुकसान होऊ शकते.
Physical Gold च्या व्यतिरिक्त काही सोने आपण सॉवरेन गोल्ड बॉन्ड च्या रूपात खरेदी करू शकतो. हे अमूर्त (Demat) स्वरूपात म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यामुळे ह्याला चोरीची भीती वगैरे नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास ह्यामध्ये गुंतवलेले आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड -sovereign gold bond in marathi- भारत सरकारच्या वतीने Reserve Bank of India द्वारा जारी केले जातात. रहिवासी व्यक्ती (Resident Individuals), HUF, विश्वस्त, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था आदी ह्याला खरेदी करू शकतात.
ह्या Bond ला सोन्याच्या एका ग्रॅमच्या गुणकामधे खरेदी करता येते. ह्याचा परिपक्वता अवधी (Maturity time) तसा आठ वर्षाच्या अवधीसाठी असतो पण पाच वर्षानंतर सुद्धा त्यातून बाहेर पडत येते.
Soverign gold bond मध्ये कमीत कमी १ युनिट खरेदी केल्या जाऊ शकते. जास्तीत जास्त मर्यादा एका व्यक्तीसाठी ४ किलोग्रॅम आहे; ज्यात वेळोवेळी सरकारद्वारे बदल केल्या जाऊ शकतो. खरेदी करताना ह्याची किंमत वेळोवेळी जाहीर केलेल्या दराप्रमाणे करता येते आणि Digital/Online पद्धतीने खरेदी केल्यास त्यात रुपये ५० प्रति ग्रॅम सूट (वेळोवेळी कमी जास्त होऊ शकते) सुद्धा मिळते.
२० हजारापर्यंत रोख रक्कमेद्वारे आणि त्यापेक्षा जास्त Cheque/Online/Demand Draft द्वारे कुणी हे Gold bond खरेदी करू शकतो. खरेदीदाराला ह्याचे एक धारक प्रमाणपत्र मिळते कि जे Demat स्वरूपात पण परिवर्तित करता येते. ह्याला Bank, Post Office, Stock Exchange वगैरे द्वारे खरेदी करता येते.
गुंतवणूकदाराला खरेदी केलेल्या Bond वर 2.5% वार्षिक व्याज (दर सहामाहीला खात्यात जमा होणारे) मिळते. ह्याचा वापर कर्ज वगैरे घेताना तारण ठेवण्याप्रमाणे सुद्धा होतो. KYC नियमानुसार गरजेचे असते, PAN कार्ड असणे सुद्धा आवश्यक आहे गोल्ड बॉन्ड्सवरील व्याज करपात्र असेल, म्हणजेच तुमच्या सध्याचा Tax slab नुसार तुम्हाला ह्या व्याजावर कर द्यावा लागेल.
८ वर्षाच्या परिपक्वता अवधीनंतर मिळालेल्या Capital Gain वर कर लागू नाही, म्हणजेच पूर्ण अवधीसाठी गोल्ड बॉण्ड ठेवल्यास मिळालेल्या परताव्यावर कोणत्याही प्रकारचा कर लागू नाही. Physical Gold ऐवजी Sovereign gold bond मध्ये गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवावे ह्यासाठी ही एक आकर्षक बाब आहे . परिपक्वता अवधीच्या अगोदर बाँड विक्री केल्यास नियमानुसार कर द्यावा लागेल.
Sovereign gold bond in marathi लेख वाचून सोन्यात गुंतवणूक करतांना, भौतिक स्वरूपात काही हिस्सा ठेवून बाकी गुंतवणूक Sovereign gold bond मध्ये करणे हा पर्याय कुणी ज्याच्या त्याच्या सोयीने विचारात घेऊ शकतो.
हे सुद्धा वाचा: आवडत्या पुस्तकातील पैशांच्या गोष्टी
Very informative, useful and worth reading article, keep publishing such articles.
Good Basic Information to Invest In SGB.