share market in marathi

Share market in Marathi – शेअर बाजारातील नुकसान कसे टाळावे?

Share market in marathi – शेअर बाजार म्हणजे काय?

Share market शिकण्याची बऱ्याच लोकांना इच्छा असते परंतु नवीन गुंतवणूकदाराने ह्यात फायद्यापेक्षा नुकसानीची शक्यता देखील असते हे लक्षात घ्यायला हवे. Share market in marathi हा लेख शेअर बाजारातील नुकसान कसे टाळता येऊ शकते ह्यावर लिहिलेला आहे.

ह्या लेखात साध्या वाटणाऱ्या परंतु संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टींची चर्चा केलेली आहे. what is share market? ह्या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी वाचकांना माहिती असेलच. पण How to invest in share market किंवा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? ह्या प्रश्नाबद्दल ठराविक असे एक उत्तर लगेच कुणी सांगू शकत नाही.

share market in marathi

हा लेख मुद्दामच काही निवडक प्रश्नांच्या उत्तरादाखल लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. बऱ्याच ठिकाणी share market वर अशा प्रकारचे प्रश्न वाचण्यात आले. हा छोटा लेख जे लोक share market मध्ये अगदीच नव्याने येण्याची योजना करत आहेत त्यांचेसाठी लिहिला आहे. Professional Investor आपल्या share investment मधून बऱ्याच गोष्टी स्वतःच शिकलेले असतीलच. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? ह्या प्रश्नाचे उत्तर जर आपण शोधत असाल तर ह्या लेखातील काही माहिती उपयोगी पडू शकते.

Share market books मध्ये कुठेतरी वाचलेले एक वाक्य आठवले. ते असे कि ‘चुका करणे हे तुमच्या प्रगतीला पूरक आहे; कारण जर चुका केल्या नाहीत तर तुम्ही आज जेवढे बुद्धिमान आहेत तेवढेच बुद्धिमान ५ वर्षानंतर सुद्धा असाल’.  ह्याचा अर्थ चुका करणारा आणि त्यातून शिकणारा मनुष्य चुका न करणाऱ्या मनुष्यापेक्षा जास्त हुशार गणल्या जाईल असा घेता येईल. Share market investment शिकतांना सुरुवातीला काही investment mistakes होण्याची शक्यता असतेच.पण शेअर मार्केटचा अभ्यास आणि मार्गदर्शन घेऊन हळूहळू आपणही share market शिकू शकतो.

Investment हा विषय आला कि शेअर बाजार ह्या विषयावर अगदी भरभरून बोलल्या जाते. High Risk and High Return जास्त जोखीम आणि जास्त परतावा ह्या नियमात मी मोडतो असे सुद्धा बरेच जण मनमोकळेपणाने कबुल करतात. पण एखाद्या share मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तो जर का खालच्या दिशेने जायला सुरुवात झाली कि मग जास्त जोखीम आणि वजा परतावा High Risk Less Return हि स्थिती निर्माण होते. 

आपल्या कुण्या मित्राचे अनुसरण करून Share market मध्ये Investment करून Profit करून घेण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. पण बरेचदा Profit ऐवजी Loss व्हायला लागतो आणि तेव्हा ही माहिती उपयोगी पडू शकते. Share market in marathi मध्ये काही सर्रास आढळणाऱ्या चुका काय आहेत आणि त्यातून होणाऱ्या संभाव्य नुकसानाला कसे टाळावे? ह्याबद्दल माहिती देण्याचा हा प्रयत्न.

How to learn share market in marathi

एखाद्या share मध्ये Investment करण्याअगोदर खालील काही निरीक्षणे उपयोगी पडू शकतील.

१) दुसऱ्याच्या शिफारशीवरून एखादा शेअर विकत घेणे. Buying share on tips ही एक सर्रास आढळणारी चूक आहे.जर पुढच्याची शिफारस चुकीची निघाली तर1 तुमची Investment वजा चिन्हांमध्ये (Loss) जाण्याला कोणी वाचवू शकत नाही. फक्त Investment Tips वर अवलंबून न राहता त्या शेअरचे मूलभूत विश्लेषण Fundamental analysis of share केल्यानंतरच त्याला घ्यायचे अथवा काही काळ प्रतीक्षा करायची ह्याचा निर्णय घ्यावा. बाजारात संधी ही फक्त एकदाच येते असे नाही.share ची book  value , त्या शेअरची 52 week High Low Price ,आणि शेअरने मागील वर्षात किती रुपयांची कमाई दिली आहे Earning per share (EPS ) वगैरे पाहता येईल. 

बरेच Professional Investor नियमित लाभांश देणारे शेअर निवडतात जेणेकरून जरी कोण्या कारणाने किंमत कमी झाली तरी Dividend येण्याची शक्यता राहतेच. जर आपण Stock Chart बघणे, share market Technical analysis in marathi थोडे फार शिकलो तर तो share कधी घ्यावा ह्याची थोड्या अंशी तरी कल्पना येते.  शिफारस असलेला शेअर जर Market Capital च्या आधारावर  पहिल्या ५०-१०० कंपनीचा असेल तर सहसा खूप जास्त नुकसान होण्याची शक्यता लगेच नसते (बाजारातील घडामोडी वेगवान असू शकतात त्यामुळे हे नेहमीच खरे ठरेल असेही नाही). ह्याउलट जर कोणताही Share कधीही घेतला तर त्याची Invested price किंमत अगदी आपल्या गुंतवलेल्या किमतीपेक्षा अर्धी व्हायची उदाहरणे सुद्धा आहेत. त्यामुळे New investors नी अगोदर Index च्या काही मोजक्या शेअर मध्ये अनुभव घेणे उपयोगी ठरेल.

२) सगळी जमा एखाद्या विशिष्ट शेअर मध्ये गुंतवणे. Investing all amount in specific stocks कधी कधी एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक न करणे म्हणजे चांगल्या फायद्याला वंचित होणे असे समजल्या जाते. पण इथे त्या शेअरची योग्य किंमत किती Price आणि आपण तो किती किमतीला विकत घेत आहोत ह्याकडे गुंतवणूकदार दुर्लक्ष करतो. मग नंतरच्या काळात हे shares loss मध्ये यायला सुरुवात होते. share market in marathi मध्ये Behavioral Finance (ह्यासाठी वाचा: Stocks to Riches) चे अध्ययन केले तर ह्या गोष्टीस दुजोरा मिळू शकतो. 

बऱ्याच चांगल्या कंपन्यांचे शेअर रास्त भावापेक्षा जास्त किमतीवरच trade होत असतात म्हणजेच अशा stocks ची आजची  किंमत ही भविष्यातील महत्व आणि परतावा ह्यावर आधारित असते. कधी काही कारणांनी बाजार खाली गेला कि हेच stocks थोड्या कमी किमतीत उपलब्ध होण्याची संधी मिळू शकते. आता जर गुंतवणुकीचा अवधी न ठरवता अशा stock मध्ये जवळचे सगळे पैसे गुंतवले तर गरज भासल्यास तोटा सहन करून Investor ला ह्या Stock मधून बाहेर पडावे लागेल ह्याची शक्यता जास्त असते. 

what is share market in marathi

३) बाहेर पडण्याची योजना नसणे.  No plan to exit. इथे गुंतवणूकदाराची खरी कसोटी असते. कारण त्याने घेतलेल्या शेअरची किंमत वाढली कि तो विकून मोकळा व्हावे हे कुणालाही न पटण्यासारखे आहे. इथे Greed आणि Fear मधील Greed आडवी येते. शेअर मध्ये मध्ये तो दोन्ही दिशेने प्रवास करतो. तिनमाही निकालावरून एखाद्या कंपनीचा फायदा Profit वाढत आहे किंवा कमी होत आहे हे बघून अशा शेअर मध्ये Entry किंवा त्यातून बाहेर पडता येते. जर कंपनीचा फायदा वाढला असेल तर बरेच नवीन लोक हे shares घेऊ इच्छितात म्हणजेच नजीकच्या काळात share price वाढण्याची शक्यता  असते.

कधी कधी सरकारच्या बदलत्या धोरणानुसार सुद्धा कंपन्यांचे आगामी फायदे नुकसान काही अंशी ओळखता येतात. आता फायदा किती झाला तर विकावा इथे प्रत्येकाचे आपापले मत असू शकते.  share market in marathi हा लेख आपल्याला ह्यासाठी काही अंशी उपयोगी वाटू शकेल.

४)चुकीच्या वेळी शेअर विकत घेणे: ह्यामध्ये इथे Time  Is  Money ही म्हण इथे अगदी मस्त बसते.  तशी ही चुकी वरच्या चुकांमधील सुद्धा एक भाग आहे. पण ही चूक स्वतःसुद्धा एक स्वतंत्र्य भूमिका (अर्थातच गुंतवणूकदाराच्या नुकसानीसाठी) निभावते. वेळ योग्य कि अयोग्य हे समजून घ्यायला थोड्या विस्ताराने लिहावे लागेल. इथे (काही अंशी ) Technical Analysis मदत करते. नेहमी आपले Stock Analysis आपल्याला संधी देईलच असे पण नाही; कारण बाजारातील शेअरची दिशा ही अनेक कारणांमुळे ठरत असते.

पण तरीही योग्य वेळ साधता येणे बहुतांश वेळी शक्य आहे. Technical analysis मध्ये double top , double  bottom आणि असेच अजून काही share chart बघून अनेक गुंतवणूकदार एखादा share कधी विकावा आणि कधी घ्यावा हे ठरवू शकतात. एकदम अचूक हे घडेलच असे नसते. पण बऱ्याच संदर्भात असे share cahrt बघून एखादा शेअर कधी घेतला तर फायदा होईल हे ठरवता येते. जास्तच सावध रणनीती असेल तर जितके shares घ्यायचे असतील ते ३-४ टप्प्यात विभागून विकत घेणे हा एक पर्याय काही जण निवडतात. 

५) एकंदरीत गुंतवणुकीत सुसूत्रता नसणे.  Optimize your investments. ह्या गोष्टीला चुकी  म्हणता येईल का असा प्रश्न कुणाला पडणे स्वाभाविक आहे. पण ह्या चुकीचा मोठा प्रभाव एखाद्याच्या Investment plan योजनेवर पडणे क्रमप्राप्त आहे.  ह्यामध्ये Asset Allocation ला ध्यानात न घेता शेअर मध्ये पैसे गुंतवणे ही बाब येते. share market in marathi लेखात वर सांगितल्याप्रमाणे फक्त शेअर आणि शेअर मध्ये रक्कम गुंतवणे  आणि बाजार वर कधी जातो आणि परतावा कधी मिळतो ह्याकडे लक्ष ठेवणे एवढे करण्यातच एखाद्याची शक्ती खर्ची पडते.

ह्याला टाळण्यासाठी अनुभवी अशा सल्लागाराकडून पूर्ण योजनेवर काम करून मगच तुम्हाला योग्य असलेले गुंतवणूक प्रमाण ठरवावे. Share market in marathi ह्यातील मुद्द्यांवर विचार केल्यास व त्याचे अनुसरण केल्यास मधील संभाव्य नुकसान टाळता येणे नक्कीच शक्य आहे.

हे सुद्धा वाचा: शेअरचे मूलभूत विश्लेषण (Fundamental analysis) कसे करावे?

Similar Posts

4 Comments

  1. नवीन लोकांसाठी खूप चांगले मार्गदर्शन करणारा लेख

  2. खूप चांगले मार्गदर्शन करणारा लेख लोकांसाठी

  3. प्रोत्साहनपर टिपेबद्दल मनस्वी धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *