Share market in Marathi – शेअर मार्केट म्हणजे काय?
Share market information marathi – शेअर मार्केट म्हणजे काय?
Share market in marathi ह्या लेखात शेअर मार्केट बद्दल माहिती लिहिलेली आहे.
आजच्या सूचनायुगात गुंतवणूक म्हटले कि जास्त चर्चेत येणारे नाव म्हणजे शेअर बाजार. Share market in marathi आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण शेअर बाजाराच्या समुद्रात उडी मारतात. सावध गुंतवणूकदार मात्र अनुभवाशिवाय जास्त अशी रक्कम कुठेही गुंतवणार नाही.
नविन गुंतवणूकदाराना योग्य प्रकारे share market information मिळाल्यास Share market मधील संभाव्य नुकसान कमी होऊ शकते व यशाचे प्रमाण वाढू शकते. नवीन गुंतवणूकदाराने शेअर मार्केट मध्ये फायद्या सोबतच नुकसानीची देखील शक्यता असते हे लक्षात घ्यायला हवे.
Share market in marathi ह्या लेखात शेअर बाजार बद्दल माहिती दिली आहे.
शेअर मार्केट म्हणजे काय ह्याचे उत्तर बहुतांश वाचकांना माहित असेलच. पण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? ह्या प्रश्नाबद्दल ठराविक असे एक उत्तर लगेच बहुतांश जण सांगू शकणार नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या रणनीति आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेली माहिती ह्यातून नेमकी कोणती माहिती वापरावी हा सुद्धा एक प्रश्नच असतो.
Table of Contents
Share market in marathi-शेअर मार्केट बद्दल प्राथमिक माहिती
शेअर बाजार Stock Market म्हणजे सूचिबद्ध Listed कंपनीतील भाग भांडवलाच्या (Equity) खरेदी विक्री साठी असलेला बाजार. एखादी कंपनी जेव्हा आपल्या व्यवसायासाठी गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारते तेव्हा अर्थातच आपल्या व्यवसायातील काही हिस्सा equity गुंतवणूकदारांना देते. पूर्वीच्या काळात हा हिस्सा कागदोपत्री शेअर सर्टिफिकेट share holding certificate स्वरूपात मिळायचा आता Demat म्हणजेच electronic प्रतीच्या स्वरूपात मिळतो.
नवीन कंपनी IPO Initial Public Offer द्वारे भांडवल उभारते. हे शेअर्स मग नंतर Stock Exchange मध्ये Listed होऊन Secondary market मध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध होतात. शेअर्सची खरेदी करण्यासाठी कुण्या व्यक्तीला एखाद्या Stock Broker सोबत Trading Account व Demat Account उघडावे लागेल. Trading Account मध्ये फंड ठेवला जातो व Demat Account मध्ये शेअर्स Electronic स्वरूपात Credit केल्या जातात.
Investors (गुंतवणूकदार) आणि Borrowers (कंपनी) ह्यांचे मधील व्यवहार सुगम करण्यासाठी Depository Participants, Stock Exchanges, Stock Brokers इत्यादीचा समावेश होतो. Depository Participants द्वारे गुंतवणूकदाराचे Demat Account उघडले जाते जे कि National Securities Depository Ltd किंवा Central Securities Depository Ltd सोबत जोडलेले असते. ह्यामध्ये शेअर्स Electronic स्वरूपात ठेवले जातात. एका अर्थाने Depository Participants (DP) हे Depository चे Agent स्वरूपात काम करतात. SEBI ही संस्था Security Market ची मुख्य नियंत्रक म्हणून काम पाहते.
Primary and Secondary Market
Primary Market म्हणजे ज्याद्वारे कंपनी आपल्या व्यवसायासाठी गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारतात आणि त्याऐवजी Securities (Shares)प्रदान करतात. Secondary Market हे existing securities ना Liquidity आणि Marketability प्रदान करतात. जर कुणी Investor आपल्याजवळील securities विकू इच्छितो तर Secondary market द्वारे तो असे करू शकतो. ह्याउलट कुण्या नवीन गुंतवणूकदाराला New investor एखाद्या Stock/Bond मध्ये खरेदी करायची झाल्यास तो वर्तमान गुंतवणूकदारांकडून अशा कंपनीचे shares/bonds खरेदी करू शकतो.
How to learn share market in marathi शेअर मार्केट कसे शिकावे?
शेअर मार्केट शिकण्यासाठी थोडा समर्पित वेळ देणे आणि त्याबद्दल वाचन करणे फायद्याचे ठरते. ह्याशिवाय Share market books in marathi चे वाचनसुद्धा आपल्याला खूप चांगले परिणाम देऊन जाईल. Share market investment शिकण्यासाठी एखाद्या शेअरचे Fundamental Analysis आणि Technical Analysis कसे करावे हे महत्वाचे ठरते. त्यासाठी विस्तृत माहितीसाठी ह्या ब्लॉगवरील Fundamental analysis of share in marathi आणि Technical analysis in marathi हे लेख वाचक वाचू शकतात.
Share market tips in marathi
आपल्या कुण्या मित्राचे अनुसरण करून Share market मध्ये Investment करून Profit करून घेण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. Share market tips in marathi मध्ये अगदीच tips न देता काही सर्रास आढळणाऱ्या चुका काय आहेत आणि त्यातून होणाऱ्या संभाव्य नुकसानाला कसे टाळावे? ह्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
१) दुसऱ्याच्या शिफारशीवरून एखादा शेअर विकत घेणे: Buying share on tips ही एक सर्रास आढळणारी चूक आहे.जर पुढच्याची शिफारस चुकीची निघाली तर Investment ची किंमत कमी होणे अपरिहार्य आहे. फक्त share market tips वर अवलंबून न राहता त्या शेअरचे मूलभूत विश्लेषण Fundamental analysis of share केल्यानंतरच त्याला घ्यायचे अथवा काही काळ प्रतीक्षा करायची ह्याचा निर्णय घेता येईल. बाजारात संधी ही फक्त एकदाच येते असे नाही. share ची book value , PE Ratio in marathi, त्या शेअरची 52 week High Low Price ,आणि शेअरने मागील वर्षात किती रुपयांची कमाई दिली आहे Earning per share (EPS ) वगैरे पाहता येईल.
२) सगळी जमा एखाद्या विशिष्ट शेअर मध्ये गुंतवणे. Don’t put all your eggs in one basket कधी कधी एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक न करणे म्हणजे चांगल्या फायद्याला वंचित होणे असे समजल्या जाते. पण इथे त्या शेअरची योग्य किंमत किती आणि आपण तो किती किमतीला विकत घेत आहोत ह्याकडे गुंतवणूकदार दुर्लक्ष करतो. Diversify your investments.
३) बाहेर पडण्याची योजना नसणे. इथे गुंतवणूकदाराची खरी कसोटी असते. कारण त्याने घेतलेल्या शेअरची किंमत वाढली कि तो विकून मोकळा व्हावे हे कुणालाही न पटण्यासारखे आहे. इथे Greed आणि Fear मधील Greed आडवी येते. शेअर मधे मधे दोन्ही दिशेने प्रवास करतो. तिमाही निकालावरून एखाद्या कंपनीचा फायदा वाढत आहे किंवा कमी होत आहे हे बघून अशा शेअर मध्ये Entry किंवा Exit त्यातून बाहेर पडता येते. जर कंपनीचा फायदा वाढला असेल तर बरेच नवीन लोक हे shares घेऊ इच्छितात म्हणजेच नजीकच्या काळात share price वाढण्याची शक्यता असते.
४) एकंदरीत गुंतवणुकीत सुसूत्रता नसणे. Optimize your investments. ह्या गोष्टीला चुकी म्हणता येईल का असा प्रश्न कुणाला पडणे स्वाभाविक आहे. पण ह्या चुकीचा मोठा प्रभाव एखाद्याच्या Investment plan योजनेवर पडणे क्रमप्राप्त आहे. ह्यामध्ये Asset Allocation ला ध्यानात न घेता शेअर मध्ये पैसे गुंतवणे ही बाब येते. share market in marathi लेखात वर सांगितल्याप्रमाणे फक्त शेअर आणि शेअर मध्ये रक्कम गुंतवणे आणि बाजार वर कधी जातो आणि परतावा कधी मिळतो ह्याकडे लक्ष ठेवणे एवढे करण्यातच एखाद्याची शक्ती खर्ची पडते.
ह्याशिवाय Buying and selling stocks at right time in marathi, Demand and supply of stocks in marathi हे शिकण्यासाठी कुणी Candlestick chart in marathi , share market book in marathi इत्यादींचे वाचन करू शकतात. ह्या लेखात दिलेल्या माहितीवर जेव्हा आपण काम करणे सुरु करू तेव्हा Share market training in marathi आपोआपच सुरु होईल व How to learn share market in marathi ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला हळूहळू मिळणे सुरु होईल. शेअर बाजारातील बातम्या मिळवण्यासाठी आपण www.nseindia.com, www.bseindia.com अशा काही संकेतस्थळावर भेट देऊ शकतो.
Happy investing..
नवीन लोकांसाठी खूप चांगले मार्गदर्शन करणारा लेख
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
खूप चांगले मार्गदर्शन करणारा लेख लोकांसाठी
प्रोत्साहनपर टिपेबद्दल मनस्वी धन्यवाद.