Rich Dad Poor Dad in Marathi – रिच डॅड पुअर डॅड

Rich dad poor dad marathi

Financial Literacy समजण्यासाठी Rich Dad Poor Dad in Marathi हे पुस्तक एक उत्कृष्ट पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे जगमान्य असलेल्या ” नोकऱ्यांसाठी शिकणे व त्यातून पैसे कमावणे” असल्या विचारांना ह्या पुस्तकाने कडवे आव्हान दिले आहे. ह्यात लेखकाने दोन भिन्न व्यक्तींकडून (Rich Dad आणि Poor Dad) मिळालेली पैशांबद्दलची भिन्न शिकवण सांगितली आहे.

माझ्या अर्थविषयक वाचलेल्या पुस्तकांपैकी Rich Dad Poor Dad in Marathi हे पुस्तक अजूनही प्रथम पसंतीचे  आहे, ह्याचे कारण सांगायचे झाले तर अर्थसाक्षरता म्हणजेच Financial Literacy किती महत्वाची आहे ह्यावर सदर पुस्तकात केलेली विस्तृत पण सोप्या शब्दात केलेली मांडणी.  एका बाजूला आधुनिक शिक्षापद्धतीवर सडेतोड टीका करत असतांनाच वाचकाला रंजक शब्दात अर्थसाक्षरता शिकवण्याचा यशस्वी प्रयत्न  रॉबर्ट कियोसाकी ह्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.

Rich Dad Poor Dad चा माझा पहिला परिचय 2004 साली महाविद्यालयीन शिक्षण घेतांना झाला. आमच्या एका प्राध्यापकांनी ह्या पुस्तकाबद्दल सांगून हे अवश्य वाचले पाहिजे हे मत दिले आणि काही दिवसांतच पुस्तकांच्या दुकानावर मला हे शीर्षक दिसल्यावर मी ते खरेदी केले. त्यानंतरच्या काळात Rich Dad ची सगळीच पुस्तके माझ्या Favourite Investment Books च्या रांगेत जाऊन बसली आणि मी आपोआपच रॉबर्ट कियोसाकी ह्यांच्या पुस्तकांचा एक कट्टर वाचक बनलो.

शाळेत जा, शिका, चांगले मार्क्स मिळवा आणि नोकरी करा म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल; ह्या सल्ल्याला rich dad poor dad च्या लेखकाने रॉबर्ट कियोसाकी ह्यांनी विरोध व्यक्त केला असून शाळेत जा, शिका आणि व्यवसाय निर्माण करून आर्थिक स्वातंत्र्य म्हणजेच Financial Freedom मिळवा ह्यावर भर दिला आहे.  Rich Dad Poor Dad जरी कुणाला एक पुस्तक वाटत असले तरी माझ्या दृष्टीने ही एका नवीन दृष्टीकोनाची सुरुवात आहे. एक असा दृष्टिकोन की जो आपल्याला परंपरागत शिक्षणात शिकायला भेटणे महाकठीणच काम वाटते.

Rich dad poor dad quotes in marathi

Financial freedom, Assets आणि liabilities, Cash Flow असे अनेक शब्द RICH DAD POOR DAD MARATHI हे पुस्तक सोप्या शब्दात आपल्याला कधी शिकवून जाते कळतदेखील नाही.

ह्या पुस्तकात वर्णन केलेले RICH  DAD  म्हणजे लेखकाच्या मित्राचे वडील असतात आणि POOR DAD म्हणजे लेखकाचे स्वतःचे वडील असतात.  दोघांमधील फरक सांगताना लेखक लिहितो कि POOR  DAD उच्चशिक्षित असतात आणि अनेक पदव्या घेऊन ते सरकारी नोकरीत एका उच्च पदावर असतात. RICH  DAD  हे आठवी इयत्ता पास असतात आणि आपले काही व्यवसाय करीत असतात. जसजसा वेळ जातो तसतसे दोघेही आपापल्या क्षेत्रात यशाच्या पायऱ्या चढू लागतात. पण दोघांच्या बाबतीत एक छोटा फरक असतो आणि हाच फरक पुढे दोघांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल घडवून आणतो.

दोघेही जण शिक्षणावर भर देतात पण POOR  DAD शाळेतील आणि महाविद्यालयातील शिक्षणालाच सगळे काही मानतात आणि  RICH  DAD  आर्थिक शिक्षणाला सर्वोपरी मानतात. रॉबर्ट दोघांचेही म्हणणे ऐकायचे पण जीवनात शेवटी कुणाचा सल्ला मानायचा ह्याबद्दल त्यांच्यात प्रचंड गोंधळ उडायचा,कारण दोघेही अगदी विरुद्ध सल्ला द्यायचे. जसे POOR  DAD  म्हणायचे कि पैशांचा लोभ हेच साऱ्या पापाचे मूळ आहे तर RICH  DAD  म्हणायचे कि पैशांचा अभाव हेच पापाचे मूळ आहे.

शेवटी नऊ वर्षाच्या वयात त्यांनी RICH  DAD ह्यांच्या सल्ल्याला मानायचे नक्की केले. पुस्तकातील एकूण दहा प्रकरणांत आर्थिक शिक्षणाच्या खूप महत्वाच्या संकल्पना उदाहरणासहित विशद केलेल्या आहेत. श्रीमंत लोक पैशांसाठी काम करीत नसून पैसा त्यांच्यासाठी काम करत असतो हा RICH  DAD  चा सल्ला जागोजागी अनुभवायला मिळतो. रॉबर्ट सांगतात कि जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही अर्थसाक्षर (Financially Literate) असायलाच हवे. त्यासाठी तुम्हाला मालमत्ता म्हणजेच Asset आणि देणी म्हणजेच Liabilities ह्यातील फरक कळायलाच हवा.

Rich dad poor dad marathi

Rich dad poor dad मराठी ह्या पुस्तकातील धडा सहावा मला विशेष आवडला. त्यात स्पष्टच सांगितले आहे कि पैशांसाठी काम करायची सवय सोडा आणि शिकण्यासाठी काम करा. हा सल्ला अनेक आर्थिक बाबतीत लिहिलेल्या पुस्तकामध्ये सुद्धा थोड्याफार फरकाने दिलेला आहे. होते काय कि एकदा तुम्ही पैशांसाठी काम करणे सुरु केले कि ही एक सवय बनून जाते आणि जर तुम्ही शिकण्यासाठी काम करणे सुरु केले कि हे शिकणे मग पैसे आपोआपच कमावून देते. पण हेच प्रकरण अंमलात आणणे हे एक कठीण काम आहे हे सुद्धा विसरता येणार नाही.

ह्या पुस्तकात लेखकाने Asset आणि Liabilities जबाबदाऱ्या ह्यामधील फरक फार चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आहे. जेव्हा आपण पैशासाठी काम करणे सोडून पैशाकडून आपल्यासाठी काम करवून घेणे शिकतो तेव्हा Cash Flow ही संकल्पना महत्वाची वाटू लागते. हे पुस्तक एक सुरुवात आहे; अशा प्रवासाची की ज्यात तुम्ही प्रत्येक थांब्यावर काहीतरी नवीन शिकत जाता. सुरुवातीला ह्याला एक छोटे पुस्तक समजून वाचतांना आपण एका वेगळ्या जगात कधी प्रवेश करतो हे कळत सुद्धा नाही. Rich Dad Poor Dad quotes in Marathi पुस्तकात जागोजागी दिलेले आहेत आणि फारच प्रभावी आहेत.

जगातील करोडो लोकांच्या पैशाबद्दलच्या विचारांना रॉबर्ट ह्यांनी ह्या पुस्तकात जबरदस्त आव्हान दिले आहे. पुस्तकातील  काही गोष्टी जरी कुणाला कडू वाटल्या तरी त्या स्वीकारल्या तर वाचकांना फायदाच होईल ह्यात काही शंका  नाही. Passive Income सारख्या महत्वाच्या शब्दांना लेखकाने हळू हळू वाचकांच्या डोक्यात शिरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ह्या पुस्तकास वाचून काढल्यावर खऱ्या वाचकाला रॉबर्ट ह्यांची इतर पुस्तके वाचण्याचा मोह आवरत नाही. Cash Flow Quadrant आणि Retire Young Retire Rich ही पुस्तके दुसऱ्या टप्प्यात वाचली तर Rich Dad वाचण्याचा अधिकच लाभ मिळतो.

टीप: हे पुस्तक जरी कुणाला पहिल्यांदा नीरस, कठीण आणि वेगळ्या शब्दावलीचे वाटले आणि समजण्यासाठी कंटाळवाणे वाटले तरीही फावल्या वेळात काही पाने वाचत राहावे. आर्थिक शिक्षण किंवा अर्थसाक्षरता हे मराठीतील शब्द जरी थोडे जड किंवा किचकट वाटत असले तरी Financial Literacy ह्या इंग्रजीतील मोहक शब्दाला रॉबर्ट ह्यांच्या लेखणीने सरळ करून सांगितले आहे. Rich Dad Poor Dad quotes in Marathi वाचून वाचून आपल्या शब्दांचा भाग होतील असे प्रयत्न करावे. पुस्तक जरी साध्या भाषेतील असले तरी पहिल्यांदा वाचणाऱ्याला जड वाटू शकते. पुस्तकातील लिखाण साधे आणि सरळ आहेत मात्र सोपे नाहीत-Simple but not easy- असे माझे मत आहे.

हे सुद्धा वाचा: Share bajar jugar ki buddhibalacha daav

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *