म्युचुअल फंडस् विकत घेण्यापूर्वी – Mutual fund in Marathi

mutual fund in marathi

Mutual fund in marathi

Mutual fund in marathi

Mutual fund in marathi – म्युच्युअल फंड म्हणजे काय? आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? असे प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न नव्याने Investment क्षेत्रात आलेल्या व्यक्तींना पडणे साहजिक आहे. आजच्या त्वरित माहिती युगात म्युच्युअल फंड बद्दल बरेच प्राथमिक ज्ञान वेगवेगळ्या माध्यमांद्वारे गुंतवणूक करण्यास इच्छुक व्यक्तींकडे कमी अधिक प्रमाणात असेलच.

Mutual fund in marathi

म्युच्युअल फंड मध्ये अगदीच सुरुवात करणाऱ्या व्यक्तींना हा लेख उपयोगी होईल. Mutual Fund Information In Marathi, Types of Mutual Fund in marathi, Mutual Fund मध्ये गुंतवणूक कशी करावी? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय? What is Mutual Fund In Marathi? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ह्या लेखात केलेला आहे. वाचा Mutual fund in marathi हा लेख.

हळू हळू गुंतवणूक करायची असल्यास Mutual fund SIP किंवा Market तुलनेने खालच्या स्तरावर असल्यास mutual fund Lumpsum investment केल्याने दीर्घ अवधीमध्ये गुंतवणूकदार चांगला परतावा मिळवू शकतो.

Mutual Funds Meaning in Marathi- म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंडस् म्हणजे अगदीच मराठीत Mutual fund in marathi रूपांतर केले तर परस्पर निधी. काही लोक (छोटे गुंतवणूकदार) एकत्र येऊन काही पैसे गोळा करतात. जास्त किमतीच्या गुंतवणुकीला हे सगळे लोक आपापल्या छोट्या छोट्या रक्कमेच्या एका सामायिक कोषातून खरेदी करतात, म्हणजे कुणाजवळ कमी रक्कम असेल तरीही त्याला त्या मोठ्या गुंतवणुकीत काही हिस्सा मिळतो.

ह्या एकत्रित पैशातून कुणी गुंतवणुकीची अद्यावत माहिती असलेला व्यक्ती – ह्याला Fund Manager म्हणूया- एखाद्या कंपनीच्या कारभाराखाली – म्युच्युअल फंड हाऊस किंवा Asset Management Company –  ह्या एकत्र केलेल्या पैशांची वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करतो आणि अर्थातच ह्याबद्दल गुंतवणूकदारांकडून काही शुल्क -Expense Ratio – घेतात. ही फारच प्राथमिक स्वरूपाची माहिती जवळपास सगळ्यांनाच माहिती असेलच. Mutual Fund in Marathi मध्ये अजून माहिती करून घेऊया.

Mutual fund in marathi

आता निरीक्षण केले तर दोन दृश्य दिसतात. एक म्हणजे ज्याला Mutual Fund ची चांगल्यापैकी ओळख आहे आणि दुसरे म्हणजे ज्यांनी Mutual Funds तर घेतले आहेत पण  नेमका कोणता फंड घेतला आहे? त्याचे उद्दिष्ट्य काय आहे? तो कशात गुंतवणूक करतो? हे सांगणे त्यांना  थोडे कठीणच जाते.

Mutual Fund  बरेच जण आपल्या कुण्या मित्राने घेतला आहे म्हणूनही  घेण्याची उदाहरणे सुद्धा असतीलच. थोडक्यात काय तर Mutual Fund हे अशा लोकांसाठी आहेत कि ज्यांना काही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी Equity बाजारात गुंतवणूक तर करायची आहे पण त्यांना त्याबद्दल जास्त काही माहित नाही आणि म्हणून ते एखाद्या निष्णात व्यक्तीच्या मदतीने बाजारात गुंतवणूक करतात.

इथे Investment goal via investing in mutual funds – लक्ष्य – हा शब्द महत्वाचा म्हणावा लागेल. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या  ३० वर्षाच्या तरुणाचे लक्ष्य वेगळे असते आणि सेवानिवृत्तीजवळ असलेल्या व्यक्तीचे लक्ष्य वेगळे असू शकेल. मुलांचे शिक्षण आणि बाकी खर्च असलेल्या मध्यमवयीन व्यक्ती वेगळ्या लक्ष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करतो.

Mutual fund in marathi

आता वयाचा आणि त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या वेळेचा फरक लक्षात घेता ह्या सगळ्यांसाठी कोणता एकमात्र suitable mutual fund investment plan गुंतवणूक पर्याय योग्य म्हणता येणार नाही. तिशीतील तरुणाची गुंतवणूक थोडी आक्रमक स्वरूपाची असू शकते. त्याला काही कारणाने नुकसान जरी झाले तरी त्याच्यासमोर हे नुकसान भरून काढण्यासाठी कामाची काही वर्षे उपलब्ध असतात  तर निवृत्तीजवळ पोहोचलेल्या व्यक्तीने आपली जमा रक्कम सुरक्षित ठेवणे योग्य समजले जाते. ह्या सगळ्या बाबींसाठी वेगवेगळे उद्दिष्ट्य असलेले Mutual Fund निवडणे रास्त ठरते.

Mutual Fund Investment Information in Marathi हा विषय ह्या लेखात थोडा विस्ताराने चर्चेला घेतला आहे.

mutual fund investment information in marathi

Mutual Funds चे फायदे तोटे सुद्धा जाणून घेऊया. फायदा म्हणजे थोड्या पैशांत तुम्हाला Systematic investment plan SIP Mutual Funds द्वारे stock market शेअर बाजारात गुंतवणूक करता येते. तुमच्याजवळ एक तरबेज व्यक्ती ह्या रक्कमेच्या व्यवस्थापनासाठी -Mutual Fund Management- असते. तुम्ही हा पैसे कधीही काढू शकता (कर बचतीचे फंडस् वगळता) .

तोटे म्हणाल तर फार कमी आहेत. एका निश्चित अवधीच्या आत फंडस् विकले तर Exit  Load लागेल. फंड व्यवस्थापनाचे काही शुल्क द्यावे लागेल. आपली गुंतवणूक बाजाराच्या अधीन राहणार, म्हणजे बाजार कमी अधिक झाला तर गुंतवणूक सुद्धा कमी अधिक होण्याची शक्यता राहणार आणि परतावा Mutual fund return नक्की सांगता येणार नाही.

ह्यातील शुल्क घेण्याला तोटा म्हणता येणार नाही कारण ही एक प्रकारची गुंतवणूकदारांसाठी दिलेली सेवा आहे आणि त्या सेवेचे हे शुल्क आहे. बरेचदा आपण वाचतो कि मोफतच सल्ला मुबलक उपलब्ध असतो आणि व्यावसायिक स्वरूपाचा सल्ला घेण्यासाठी तरबेज लोक शुल्क आकारतात.

Mutual fund in marathi

त्या त्या क्षेत्रातील कौशल्य असलेल्या लोकांकडून व्यावसायिक सल्ला घेणे ही गोष्ट मला आवडते कारण जर आपल्याजवळ वेळ आणि कौशल्य नसेल तर अशा लोकांकडून विकतचा सल्ला घेणे हे आपल्याला फायद्याचेच ठरते. शिवाय व्यावसायिक सल्लागार हा तुम्हाला तुमच्यासाठी काय योग्य वाटते ह्यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य असेल ह्या पातळीवर विचार करून सल्ला देतो; म्हणजेच त्या सल्ल्यात गुंतवणूक करतांना भावनिक पातळीवर होणार गोंधळ नसतो. 

mutual fund details in Marathi

इथे एक गोष्ट अजून लक्षात घेऊया कि सल्ला देणारा Mutual Fund Investment Advisor हा मात्र कौशल्य असलेला व्यक्ती किंवा कंपनी हवी. आजकाल उठसुठ कुणीही सल्ला देऊन कोणताही गुंतवणूक पर्याय Investment plan समोरच्याला विकतात आणि मग त्या गुंतवणुकीचे प्रदर्शन वाईट झाले कि तथाकथित सल्लागार दिसेनासा होतो. शेवटी नुकसान गुंतवणूकदाराचेच होते. असे दृश्य सहसा चढत्या बाजारात फार प्रमाणात बघायला मिळतात. जर आपण थोडा वेळ देऊ शकलो तर कोणता फंड हा आपल्या लक्ष्यानुरूप आहे हे स्वतः सुद्धा निर्धारित करता येते. मात्र ह्याला थोडा अभ्यास लागेल.  आज एवढ्या Mutual Funds scheme उपलब्ध आहेत कि नेमका कोणता फंड निवडू हे तुम्हाला गोंधळात टाकू शकेल.

How to select good mutual fund in marathi – योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा?

योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याअगोदर Types of mutual funds मच्युअल फंड्स चे प्रकार बघूया.

Types of mutual funds in marathi

योजनेच्या आधारावर Mutual Funds हे open ended आणि  close ended मध्ये विभागु शकता. ह्यातील पहिल्या प्रकारात गुंतवणूक कधीही करता येते तसेच रक्कम कधीही काढता सुद्धा येते. close ended मध्ये गुंतवणुकीची प्रारंभिक ऑफर संपल्यावर नवीन गुंतवणूकदार त्यात गुंतवू शकत नाही आणि ही योजना काही विशिष्ट काळासाठी locked राहते. त्यानंतर गुंतवणूकदाराचे पैसे परताव्यासहित परत मिळतात. secondary market  मध्ये ह्यातील काही फंडस् खरेदी विक्री होऊ शकतात. एकंदरीत close ended funds  मध्ये तरलता कमी म्हणता येईल. 

open ended mutual funds and close ended mutual funds

Open ended mutual funds अधिक लोकप्रिय असतात पण जर गुंतवणूकदार चांगला अभ्यास करून एखादा close ended mutual funds निवडत असेल तर तो सुद्धा चांगला पर्याय सिद्ध होतो. बाजारातील कमी अधिक चंचलतेचा परिणाम कधी कधी open ended mutual funds च्या विक्रीला कारणीभूत ठरतो पण close ended mutual funds वर  अशा चंचलतेचा परिणाम होत नाही कारण ह्या फंड मॅनेजर ला फंडचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वेळेअगोदर आपल्या गुंतवणुका विकण्याचे बंधन नसते. दुसऱ्या शब्दात ह्यातील गुंतवणूकदार आपली रक्कम निश्चित वेळेअगोदर काढायला फंड मॅनेजर ला प्रवृत्त करू शकत नाही.

Actively managed mutual funds and passively managed funds

दुसरे वर्गीकरण फंडस् मधील शुल्काच्या आधारावर करता येईल. ह्यात सक्रिय रूपाने व्यवस्थापित केलेले फंडस् Actively Managed Mutual Funds   व निष्क्रिय  रूपाने व्यवस्थापित केलेले फंडस् Passively  Managed Mutual Funds असे वर्गीकरण करता येईल. सक्रिय रूपाने व्यवस्थापित केलेले फंडस् मध्ये आपण कुण्या तरबेज व्यक्तीला अधिकार देतो कि ज्यामुळे तो त्याच्या निर्णयानुसार कमी अधिक पैसे विभिन्न कंपन्यांमध्ये कमी अधिक मात्रेत गुंतवून आपल्याला जास्त परतावा द्यायचा प्रयत्न करील. अशा फंडचा  Expense  Ratio Passively  Managed  Funds च्या तुलनेत जास्त असतो.

Passively  Managed  Mutual Funds हे एखाद्या सूचकांकाची नक्कल करीत त्या सूचकांकाप्रमाणे विभिन्न शेअरमध्ये किंवा क्षेत्रात गुंतवणूक करतात.  उदाहरणार्थ Sensex किंवा Nifty 50 हे दोन मुख्य सूचकांक आहेत आणि Passively  Managed  Mutual Funds म्हणजे Index Fund किंवा ETF (Exchange  Traded  Fund ) ह्या सूचकांकानुसार अशी गुंतवणूक त्या त्या सूचकांकातील कंपन्यांमध्ये  त्या त्या प्रमाणात गुंतवतात. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास Passively  Managed  Funds मध्ये कुणी फंड मॅनेजर आपले डोके न लावता जसा तो सूचकांक ज्या ज्या प्रमाणात पैसे गुंतवतो तसे पैसे त्या प्रमाणात गुंतवतो. म्हणूनच ह्या प्रकारच्या फंड चे व्यवस्थापन शुल्क फार कमी असते.

गुंतवणूकदार आपला कल ओळखून Index Fund किंवा Actively Manged Mutual Funds  मध्ये गुंतवणूक करू शकतो. बरेच गुंतवणूकदार Index fund ला सुद्धा आजकाल प्राधान्य देताना दिसतात. Index fund  मध्ये आपण एकाच वेळेला त्या वेळचे सगळ्यात चांगले शेअर कि जे Index मध्ये समाविष्ट असतात त्यात गुंतवणूक करत असतो. जर वेळेनुसार बाजार चांगले प्रदर्शन करत राहला तर हा इंडेक्स सुद्धा वाढत जातो आणि Index fund मधील गुंतवणूक त्या त्या इंडेक्स प्रमाणे परतावा देत राहते.

mutual fund details in marathi
Liquid funds in marathi

Debt mutual funds, Equity mutual funds, Liquid mutual funds and Hybrid mutual funds

तिसरे Mutual fund classification वर्गीकरण गुंतवणूकदारांचा पैसे कोणत्या क्षेत्रात गुंतवण्यात येतो त्यानुसार म्हणता येईल. ह्यामध्ये डेट फंड Debt  Mutual Fund , Equity Mutual Fund , Liquid Mutual Fund आणि Hybrid Mutual Fund येतील. पैकी डेट म्युच्युअल फंड Fixed income आणि Government Bonds वगैरे मध्ये गुंतवणूक करतात. Equity Mutual Funds जास्त लोकप्रिय आहेत आणि ह्याद्वारे Share market मध्ये गुंतवणूक शक्य आहे. ह्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये जास्त जोखीम असते. Liquid Mutual fund हे तरलता आणि सुरक्षितता दोन्ही देतात. ह्याद्वारे गुंतवणूकदारांचा पैसा Certificate of deposit , Treasury bills, Money market instrument  इत्यादी कमी अवधीच्या गुंवणूक साधनांत गुंतवला जातो. गुंतवणूकदार Liquid Mutual Funds चा उपयोग आपले अगदी कमी अवधीचे लक्ष्य गाठण्यासाठी करू शकतो. 

Hybrid Mutual Funds जे कि नावानुसार गुंतवणूकदारांचा पैसा Equity तसेच Debt Fund दोन्हीमध्ये गुंतवतात. ह्या प्रकारात परत दोन प्रकार आपण करू शकतो. पहिला म्हणजे ज्यात जास्त पैसे Equity मध्ये आणि कमी हिस्सा डेट मध्ये असतो; ह्या प्रकाराला Equity Oriented Hybrid Mutual Funds  म्हणता येईल. दुसऱ्या मध्ये जास्त पैसा Debt  मध्ये आणि कमी पैसा Equity मध्ये गुंतवला जातो; ह्याला Debt  oriented hybrid mutual fund म्हणता येईल.  Equity oriented hybrid mutual fund  मध्ये Equity चा हिस्सा जास्त परतावा देण्याचा प्रयत्न करतो व Debt चा हिस्सा गुंतवणुकीला स्थैर्य  देण्याचा प्रयत्न करतो. Debt  oriented hybrid mutual fund मधील जास्त Debt भाग हा जास्त स्थैर्य देतो व Equity चा भाग थोडा अधिक परतावा देण्यासाठी मदत करतो.

Direct mutual fund plan and Regular mutual fund plan

एक अजून Mutual fund classification वर्गीकरण म्हणजे Direct mutual fund आणि Regular mutual fund . हे सुद्धा सगळ्या म्युच्युअल फंड मध्ये उपलब्ध असतात (फारच तुरळक अपवाद वगळता). ह्यातील Direct Mutual fund म्हणजे आपण बिना कुण्या मध्यस्थांच्या डायरेक्ट फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. Regular mutual fund मध्ये कुणी मध्यस्थ कि ज्याला त्या विक्रीचे कमिशन मिळते; काम करतो आणि आपली गुंतवणूक एखाद्या फंड मध्ये करायला आपली मदत करतो. Direct mutual fund ची NAV  रेगुलर फंड च्या NAV पेक्षा थोडी जास्त असते कारण ह्यामध्ये कमिशन वितरित न होता तो पैसा तुमच्याच गुंतवणुकीत टाकला जातो. दुसऱ्या शब्दात Direct mutual fund चा Expense  Ratio  कमी असतो.

Growth mutual funds and Dividend mutual funds

शेवटचे वर्गीकरण हे सामान्यपणे आपण बघतो त्यानुसार Growth  किंवा Dividend वर आधारित असते. Growth  फंडस् मधील रिटर्न त्या फंडस् च्या NAV (NET  ASSET  VALUE)  त वाढ करतो तर डिविडेंड फंडस् गुंतवणूकदाराला वेळोवेळी काही रक्कम लाभांश म्हणून देतो. कोणत्याही योजनेतील म्युच्युअल फंड ला Growth किंवा Dividend पर्याय असतो. 

टीप: प्रत्येकाने आपापली जोखीम क्षमता, लक्ष्य, त्यासाठी उपलब्ध असलेला वेळ हे सगळे अभ्यासून योग्य म्युच्युअल फंडची  निवड करणे योग्य ठरते. Equity बाजारातील म्युच्युअल फंड हे पूर्णतः बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतात त्यामुळे गुंतवणूंकदाराने आपल्याला सोयीच्या रणनीतीनुसार अशा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील.   

हे सुद्धा वाचा:- नवीन वर्षाचे स्वागत आणि Pareto चा ८०-२० नियम

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *