REIT Real Estate Investment Trust

REIT Real Estate Investment Trust

What is Real Estate Investment Trust (REIT)?

REIT Real Estate Investment Trust रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी) ह्या अशा प्रकारच्या कंपनी असतात कि ज्यांचेकडे काही Real Estate जसे कि ऑफिस, अपार्टमेंट, गोदामे, व्यावसायिक केंद्र Commercial Business Centre इत्यादींची मालकी असते.

अशा कंपन्यांना REIT म्हणून पात्र होण्यासाठी अनेक आवश्यकता पूर्ण कराव्या लागतात. ह्या REITs कंपनी स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणीकृत असतात आणि गुंतवणूकदार अशा REIT द्वारे Real Estate क्षेत्रात आपली गुंतवणूक करू शकतात Real Estate Investment Trust REIT कंपन्या High Value Real Estate मालमत्ता पोर्टफोलिओ व्यवस्थापित करतात. उदाहरणार्थ, ते अशा प्रकारच्या मालमत्ता भाड्याने देतात आणि त्यावर भाडे वसूल करतात. अशा प्रकारे गोळा केलेले भाडे नंतर उत्पन्न आणि लाभांशाच्या Dividend रूपात भागधारकांमध्ये वितरीत केले जाते.

REIT Real Estate Investment Trust

How REIT Works?

REITs गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडाप्रमाणे गुंतवणुकीची संधी प्रदान करतात, REITs असंख्य गुंतवणूकदारांचे भांडवल गोळा करतात. अशा REIT मध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदाराला स्वतः कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा व्यवस्थापित न करता लाभांश स्वरूपात उत्पन्न मिळते. शिवाय गुंतवलेल्या रक्कमेवर काही प्रमाणात व्याज सुद्धा मिळते. Stock Exchange वर ह्यांचे व्यवहार चालत असल्यामुळे NAV च्या दरात बदल होत राहतो. ह्याचा उपयोग अल्प अवधीत ट्रेडर्स आपल्यासाठी नफा मिळवण्यासाठी सुद्धा करू शकतात.

Eligibility for REIT – REITs साठी पात्रता

एखाद्या कंपनीला REIT म्हणून पात्र होण्यासाठी खालील निकषांची पूर्णता करणे आवश्यक आहे.

  • आपल्या उत्पन्नाच्या एकूण 90% उत्पन्न हे गुंतवणूकदारांना लाभांशाच्या रूपात वितरित करणे आवश्यक आहे.
  • आपल्या गुंतवणुकीपैकी 80% गुंतवणूक ही महसूल उत्पन्न करण्यास सक्षम असलेल्या मालमत्तेमध्ये गुंतवणे आवश्यक आहे.
  • एकूण गुंतवणुकीच्या केवळ 10% गुंतवणूक रिअल इस्टेट निर्माणाधीन मालमत्तांमध्ये केली जाईल.

REIT Real Estate Investment Trust

REITs मध्ये कोणी गुंतवणूक करावी?

REITs कडे उच्च-मूल्य असलेल्या रिअल इस्टेट (High Value Real Estate) मालमत्तेची मालकी आणि व्यवस्थापन असते. अशा प्रकारच्या मालमत्ता ही महागडी गुंतवणूक म्हणता येईल ज्यांच्याकडे पुरेसे भांडवल आहे. असे गुंतवणूकदार REIT मध्ये आपला निधी ठेवतात लहान गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीपैकी काही भाग अशा रेट मध्ये ठेवू शकतात.

REIT REAL ESTATE INVESTMENT TRUST

Benefits of REIT – REITs चे फायदे


जे गुंतवणूकदार REIT मध्ये आपला निधी ठेवतात त्यांना पुढील मार्गांनी फायदा होऊ शकतो.

  • नियमित लाभांश आणि Capital Appreciation ची संधी.
  • विविधिकारणाचा फायदा: गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओ मध्ये Real Estate चा समावेश करू शकतो.
  • Liquidity (तरलता): Stock Exchange वर व्यवहार करत असल्याने गुंतवणूकदार त्वरित खरेदी विक्री करून आपल्या गुंतवणुकीवर तरलतेचा लाभ घेऊ शकतो.

REIT Real Estate Investment Trust

REITs च्या मर्यादा

  • Tax Benefit नाही. लाभांश उत्पन्न हे करमुक्त नाही.
  • Market Risk पासून मुक्त नाहीत. लघु अवधीच्या गुंतवणूकदारांनी त्यामुळे अशा गुंतवणुकीत आपली योजना बनवून गुंतवणूक करावी.

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे मूल्यांकन करण्यासाठी टिपा

गुंतवणुकदार REIT मध्ये गुंतवणूक करण्याआधी खाली काही गोष्टींचा अभ्यास करू शकतात

  • REIT कंपनीची विश्वसार्हता तपासावी. तसेच Dividend Yield बघता येईल.
  • अशी REIT निवडता येईल जी अनेक ठिकाणी आपली गुंतवणूक ठेवते.
  • व्यवस्थापन करणारी टीम व त्यांचा अनुभव तसेच कामगिरीत सातत्य असलेली कंपनी निवडता येईल.

सारांश

मी कधीतरी एकूण चार प्रकारच्या REIT मध्ये काही गुंतवणूक केली होती. त्यातून काही नियमित लाभांश मिळाला. त्याचे Statement ई-मेल वर मिळतात. प्रत्येक तिमाहीला Per unit किती Interest आणि किती Dividend मिळाला हे Statement मध्ये समजते. आपल्या per unit खरेदी किमतीवर कोणत्या REIT मध्ये किती लाभांश मिळाला ह्यावरून Dividend Yield ची गणना केली जाऊ शकते.

बाजाराच्या परिस्तिथिनुसार NAV मध्ये बदल होत राहतो. सध्या कोणत्या REIT मंजुरात आहेत त्याची नावे आपण REIT IN INDIA इथे क्लिक करून बघू शकता.

हे देखील वाचा: शेअर मार्केट म्हणजे काय?

2 thoughts on “REIT Real Estate Investment Trust”

Leave a Comment

error: Content is protected !!