Moving average indicator

Moving average indicator

what is a moving average?

Moving average indicator (MA) हे शेअर्सच्या Technical Analysis मध्ये वापरले जाणारे एक indicator आहे.

Moving average indicator. Moving average म्हणजे हलती सरासरी किंमत. Moving average indicator एका विशिष्ट कालावधीसाठी (जसे कि ५० DMA, २०० DMA) किंमतीच्या पॉइंट्सची जोडणी असते. ह्या कालावधीत एखाद्या शेअरच्या किंमतीने कसा आलेख दाखवला ह्यालाच त्या किंमतीचा Moving average असे म्हणतात.

ह्या किमतीला ‘हलती सरासरी’ Moving average ह्यासाठी म्हणतात कि दिवसागणिक त्या शेअरच्या किंमतीत होत असलेल्या बदलाप्रमाणे ह्याची सरासरी किंमत बदलत राहते. असा बदल हा मागील तेवढ्या दिवसांची किंमत वापरून दर्शविल्या जातो.

moving average indicator
Image by Sergei Tokmakov, Esq. https://Terms.Law from Pixabay

Moving average indicator

Moving average indicator हे त्या शेअरच्या किंमतीची वाढती किंवा घसरती दिशा दाखवत नाही. त्याऐवजी, ते त्या शेअरची वर्तमान दिशा परिभाषित करते. गुंतवणुकदार एखाद्या शेअरच्या किंमतीतील अचानक झालेला बदल (Noise) टाळून खऱ्या किंमतीचा अंदाज घेण्यासाठी ह्याचा वापर करतात.

अगदीच सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास Moving average indicator मूव्हिंग एव्हरेजचा वापर ट्रेंडची (Trend) दिशा ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. Trend is your friend हे वाक्य वाचकांनी ऐकले असेलच. कुणी जर एखाद्या शेअर्समध्ये Buy position घेतली असेल आणि त्याचा Moving average हा मात्र दिवसोंदिवस खालच्या किंमती दाखवत असेल तर त्या व्यवहाराचा पुनर्विचार केल्या जाऊ शकतो किंवा आणखी काही योजना बनवली जाण्याची गरज असू शकते.

simple moving average and exponential moving average

Moving average चे दोन प्रकार गुंतवणूकदारांकडून सर्रास वापरल्या जातात, ते म्हणजे Simple Moving Average (SMA) आणि Exponential Moving Average (EMA). सिंपल मूव्हिंग अ‍ॅव्हरेज (SMA) ही एका ठराविक कालावधीतील (जसे कि ५० DMA) किमतींची नेहमीच्या पद्धतीने काढलेली सरासरी असते, तर एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (EMA) ह्यात नावाप्रमाणेच सर्वात नवीन (Recent) किमतींना अधिक महत्त्व दिले जाते . दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास Exponential Moving Average ची किंमत सगळ्यात अलीकडील (Recent) किंमतीमुळे जास्त वेगाने बदल दाखवते.

Lag Factor in Moving Averages

Lag म्हणजे दोन घटनांतील वेळ किंवा उशीर (In English Lag means a period of time between two events; a delay). Moving Average हे मागील data (past price) वर आधारित असतात त्यामुळे आजच्या किंमतीत आणि moving average च्या किंमतीत एक फरक आढळतो. जास्त दिवसांचे मूव्हिंग एव्हरेज जास्त फरक दाखवते. ह्या व्यतिरिक्त, मूव्हिंग एव्हरेजचा प्रकार देखील ह्या फरकावर परिणाम करतो. Recent price मुळे EMA कमी फरक दाखवतो आणि मागील सगळ्या किमतींना समान महत्व देणारा SMA जास्त फरक दाखवतो.

उदाहरणादाखल १० दिवसांचा Moving Average हा ५० दिवसांच्या Moving Average पेक्षा शेअरच्या आजच्या किंमतीच्या जास्त जवळ असतो. तसेच १० दिवसांचा EMA हा १० दिवसांच्या SMA पेक्षा शेअरच्या आजच्या किंमतीच्या जास्त जवळ असतो. कमी कालावधीचा Moving Average हा किंमतीत बदल झाल्यास त्वरेने बदल दाखवतो, ह्याउलट जास्त दिवसांचा Moving Average ह्या बदलाला जास्त ठळक रीतीने दाखवणार नाही.

ह्या फरकाचा अभ्यास प्रत्यक्ष ट्रेडिंग करतांना फायद्याचा ठरतो. कॅन्डलस्टिक बद्दल Candlestick Chart in Marathi ह्या लेखात चार किंमतीचे (Open, High, Low, Close) वर्णन केलेले आहे (पैसा मंत्र-Marathi Money Blog वर Candlestick Chart in Marathi हा लेख सगळ्यात जास्त संख्येने वाचला गेला आहे आणि आजही हा लेख वाचकांद्वारा जास्त प्रमाणात वाचला जातो. त्याबद्दल सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार). Moving average सुद्धा ह्या चारही किंमतीचा असू शकतो. बरेच जण Close किंमतीचा अभ्यास करून निर्णय घेत असावेत.

Moving Average Indicator
Red Line 10 DMA, Green Line 50 DMA

How to calculate moving average?

अगोदर लिहिल्याप्रमाणे Moving Average मागील किंमतीच्या आधाराने काढलेली एक सरासरी किंमत असते. SMA हा साध्या सरासरी पद्धतीने काढता येतो तर EMA साठी एक सूत्र वापरले जाते. शेअरच्या मागील काही ठराविक दिवसांच्या किंमती जवळ असल्या कि त्याआधारे Excel Software मध्ये सुद्धा हा काढता येतो. तशा ह्या सगळ्या गोष्टी न करता बऱ्याच chart website वर Moving Average च्या किंमती सहज पाहता येतात. (Chart साठी मला आवडलेली एक website म्हणजे investing.com ह्याचा उपयोग करून बरीच माहिती गोळा करता येईल.

सारांश

Moving Average बद्दल काही सोपी माहिती ह्या लेखात दिली आहे. Moving Average मध्ये काही प्रकारची Advanced setting करून सुद्धा ह्याचा अभ्यास केला जातो. ह्याशिवाय Moving Average च्या अभ्यासामुळे Trend कसा ओळखावा? Moving Average Crossover ची strategy कशी वापरावी? Price crossover कसा समजावा? Multiple Moving Average चा उपयोग कसा करावा? इत्यादी गोष्टी शिकता येतील.

Moving Average सोबतच अजूनही काही indicator वापरून आपला Buy/Sell निर्णय बऱ्यापैकी नक्की करू शकतो.

हे सुद्धा वाचा: Candlestick Chart in Marathi

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!