Long term investing

long term investing

Long term investing for maximising returns

Long term investing मुळे कुणी आपल्या गुंतवणुकीवर Maximum returns अधिक परतावा मिळवू शकतो.

टीप: हा लेख फक्त शैक्षणिक माहितीसाठी लिहिला आहे. अशा प्रकारच्या Long term investing नेहमीच परतावा देतील ह्याची निश्चिती नाही. त्यामुळे गुंतवणूक करतांना आपल्या Financial Advisor चा सल्ला घ्यावा.

एखाद्या  कंपनीचे शेअर्स विकत घेणे आणि त्यावर  अपेक्षित फायदा मिळाल्यानंतर विकणे व profit book करणे ही एक सर्रास वापरली जाणारी  रणनीती शेअर बाजारात आपल्याला दिसून येते. Long term साठी एक आकर्षक परतावा  किती असावा? ह्याबद्दल अनेकांचे अनेक मते असतील.

अनुभवी गुंतवणूकदारांना ह्याबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही परंतू शेअर बाजारात नवीन असलेल्या वाचकांना long term investing in stocks ची माहिती देण्यासाठी हा लेख आहे. जर आपल्याजवळ पुरेसा वेळ असला तर गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते.

Long term investing-एक उदाहरण

एका कंपनीचे शेअर्स Mr. A ह्यांनी बऱ्यापैकी संख्येत (quantity) जमा केले होते. किंमतीत  आलेल्या एका लाटेवर स्वार होत त्यातील काही शेअर्स त्यांनी विकले व बाकी जवळ ठेवले. ह्यावेळेस Mr. A ह्यांनी सहसा अगोदर न वापरलेल्या एका रणनीतीवर  काम करण्याचे ठरवले होते. त्याला बहुतेक एक किंवा दीड वर्षापेक्षा जास्त अवधी उलटला असावा व किंमतीत एकदा परत उल्लेखनीय वृद्धी झाली. ह्यावेळेस त्यांनी part of holding परत sell केली.

Long term investing or long term stock holding चा फायदा कुणी  कसा करून घेऊ शकतो फक्त ह्याचे महत्व ह्या लेखात सांगण्यासाठी हे उदाहरण इथे लिहिले आहे. जर long term investing चा वापर  करून आपल्यासाठी फायदा करून घेऊ शकलो तर अशा patience ला चांगलेच म्हटले पाहिजे. परंतू behavioural finance च्या नियमांना धरून अशी holding, long term पर्यंत विचलित न होता जवळ ठेवणे हे पण एक कठीणच कार्य होय.

Maximum return on long term investing साठी खालील काही मुद्दे अशा वेळेस उपयोगी पडतील.

1. जिंकणाऱ्या शेअरची निवड (Selection of winning stock)

ज्या शेअर मध्ये आपण ही रणनीती वापरतो तो विजेता शेअर असावा. कारण हरणाऱ्या शेअरची  किंमत ही वेळेनुरूप कमी होत जाते. शेअर कसा निवडावा आणि त्यासाठी त्याचे विश्लेषण कसे करावे? ह्यासाठी Fundamental analysis of share in Marathi हा लेख वाचावा. ह्यातील माहिती व आपला अनुभव ह्यांच्या साहाय्याने चांगला शेअर निवडता येईल.

2. संख्या (Quantity)

शेअर्स किती संख्येत घ्यावे हा ज्याचा त्याचा आपला निर्णय असतो. कुणी Don’t Put All your Eggs in One Basket ह्या नियमाप्रमाणे वागतो तर कुणी जास्त आकर्षक नफा मिळवण्यासाठी Concentrated portfolio हे तत्व सुद्धा अवलंबतो. वरील उदाहरणात जास्त संख्या हीच Mr. A ची जमेची बाजू ठरली. कारण एखादा शेअर चांगला वधारला पण ते शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये अगदीच कमी असतील तरी त्यातून घसघशीत असा फायदा मिळणे कठीणच असते. ह्यावर वाचकांचे वेगवेगळे मत असू शकतील आणि एकाच शेअर्स मध्ये जास्त संख्या असणे ह्यासाठी त्याचे सखोल विश्लेषण फार जरुरी ठरते.  

3. रणनीती निवडणे व त्याला चिकटून राहणे

शेअर्स कसे घ्यावे? कधी घ्यावे? ह्याच्या बऱ्याच वेगवगेळ्या योजना असू शकतात. आपल्याला साजेशा अशा योजनेची निवड करून त्यानुसार कार्य करणे व आपल्या अनुरूप निकाल न दिसल्यास जास्तीची संख्या कधी वाढवावी? किती वेळ नवीन खरेदी पासून दूर राहावे? अशा काही गोष्टींचा विचार करता येईल.

चांगला शेअर किंमतीत वाढ दाखवतोच पण काही वेळेसाठी त्यात downward movement दिसू शकते. अशा वेळेस त्यावर प्रतिक्रिया न देता शेअर्स मध्ये चिकटून राहणे long term मध्ये चांगला फायदा देऊ शकते. वरील उदाहरणात अशा घसरणीचा फायदा करून मी काही संख्या परत वाढवली होती. पण परत असा निर्णय Stock specific असू शकतो आणि असा निर्णय घेतांना अजूनही काही माहिती बघणे आवश्यक ठरते.

benefits of long term investing

शेअर बाजारातील गुंतवणूक हाताळतांना दीर्घ मुदतीसाठी stocks holding ठेवण्याचे बरेच फायदे इथे लिहिता येतील. दीर्घ कालावधीसाठी stocks hold केल्याने असे काही फायदे मिळू शकतात कि जे कमी मुदतीच्या गुंतवणूकदारांना उपलब्ध नसतात.

शेवटी वेळेचा व्यापार सुद्धा बरेच फायदे देऊन जातो आणि म्हणूनच Time आणि Patience ला गुंतवणुकीच्या विश्वात एक वेगळे स्थान आहे.

Benefits of long term investing

  • दीर्घ काळात (जास्त) परतावा मिळवणे.
  • बाजारातील अस्थिरतेला संयमाने हाताळणे.
  • (बऱ्याच अंशी) अचूक वेळेस खरेदी करणे (कधी एकदा तर कधी अनेक भागात )
  • लॉन्ग टर्म मध्ये Dividend चा वेगळा फायदा मिळवणे.
  • काही शेअर्स संभाव्य जास्त वाढीसाठी अजून दीर्घ काळासाठी ठेवणे.  
  • नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला प्रशस्त करणे.

सारांश:

दीर्घ काळासाठी Stock portfolio hold केल्यास सामान्य परताव्यापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते, मात्र जर कमी वेळात अपेक्षित परतावा मिळाला तर अशा वेळेस फायदा काढून घेऊन बाजूला होणे असे सुद्धा काही गुंतवणूकदारांचे मत असते.

Similar Posts

  • Share market in Marathi – शेअर मार्केट म्हणजे काय?

    Share market information marathi – शेअर मार्केट म्हणजे काय? Share market in marathi ह्या लेखात शेअर मार्केट बद्दल माहिती लिहिलेली आहे. आजच्या सूचनायुगात गुंतवणूक म्हटले कि जास्त चर्चेत येणारे नाव म्हणजे शेअर बाजार. Share market in marathi आहे तरी काय?…

  • |

    Asset allocation in marathi

    Asset allocation in marathi Asset allocation म्हणजे गुंतवणूक करतांना अगोदर ठरवलेली एक अशी योजना की ज्यामुळे गुंतवणुकीची एकूण रक्कम विविध Asset class मध्ये गुंतवली जाते; जेणेकरून गुंतवणुकीतील धोका कमी होईल. हे Asset Class तीन वर्गात मोडतात: Equity, Fixed Income आणि…

  • Bearish Candlestick Chart Patterns

    Bearish Candlestick Chart Patterns Basics of Bearish Candlestick Chart Patterns Candlestick chart बद्दल माहिती वाचल्यास एखाद्या शेअरच्या किंमतीतील होणाऱ्या बदलामुळे एकतर Bullish candlestick chart patterns तयार होतात किंवा Bearish candlestick chart patterns तयार होतात हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. कधी…

  • Value investing

    What is value investing? Value investing ही गुंतवणुकीची अशी एक रणनीती आहे कि ज्यामध्ये आपल्या Intrinsic value पेक्षा कमी मूल्यावर व्यवहार करत असलेल्या शेअरला खरेदी केले जाते. असे Shares आपल्या Book Value पेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध असतात. काही अवधीनंतर…

  • Price Volume Action

    Price volume Action स्टॉक मार्केटमध्ये Price आणि Volume Action समजून घेणे Price आणि Volume चा अभ्यास करून कुणी स्टॉक मार्केटचे वागणे जास्त खोलात जाऊन समजून घेऊ शकतो. ह्यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील गतिशीलता (market dynamics) समजून घेण्यास मदत होऊ शकते. What is…

  • Value investing vs Growth Investing

    Value investing vs growth investing Value investing vs growth investing-An Introduction Value Investing आणि Growth Investing ह्या दोन पद्धतींबद्दल कुशल गुंतवणूकदार परिचित असतातच. दोघांची तुलना करून एकाला सरस सांगणे व दुसऱ्या पद्धतीला कमी ठरवणे हे ह्या लेखाचे उद्दिष्ट्य नाही. प्रत्येक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *