Bearish Candlestick Chart Patterns

Bearish Candlestick Chart Patterns
Basics of Bearish Candlestick Chart Patterns
Candlestick chart बद्दल माहिती वाचल्यास एखाद्या शेअरच्या किंमतीतील होणाऱ्या बदलामुळे एकतर Bullish candlestick chart patterns तयार होतात किंवा Bearish candlestick chart patterns तयार होतात हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. कधी फक्त एक कॅण्डल पुढील किंमतीचा अंदाज पुरवू शकते तर कधी दोन तीन कॅन्डलच्या समूहाने अशी किंमतीतील शक्यता सांगता येते. हे चार्ट कसे वाचावे ह्याबद्दल वाचण्यासाठी कॅन्डलस्टिक चार्ट कसा वाचावा? हा लेख वाचता येईल.
जेव्हा सगळ्या बाजूने फारसे आशादायक चित्र नसेल तेव्हा अनेक शेअरच्या किंमती कमी होताना दिसतात. घसरणीच्या काळात investors ची ही खरी परीक्षा असते. आपण केलेली गुंतवणूक जर कमी वेळेसाठी असेल तर मग अशा वेळेस योग्य किंमतीवर थोडे नुकसान सोसून ह्या शेअर्स मधून बाहेर निघणे काही गुंतवणूकदार पसंत करतात. मात्र अशी वेळ ओळखणे ही पण एक परीक्षाच असते. त्यासाठी जिज्ञासू वाचकांना Bearish Candlestick Chart Patterns चा अभ्यास उपयोगी ठरू शकतो.
Some common Bearish Candlestick Patterns
Hanging Man Pattern
HANGING MAN PATTERN हा शेअर्समधील मंदीचा REVERSAL CANDLESIC PATTERN आहे ज्यामध्ये मुख्य भाग (BODY) लहान असून खालच्या दिशेने एक लांब सावली (SHADOW) दिसते.
जेव्हा हा पॅटर्न UPREND च्या शेवटी दिसतो तेव्हा ह्यापुढे अजून किंमत वाढणार नाही असा एक अंदाज असतो आणि ह्यावेळेस चालू असलेल्या किमतीत अजून जास्त वाढ न होता पुढे किंमतीत घसरण येईल अशी शक्यता असते.
Bearish Engulfing Pattern
Engulf म्हणजे पूर्ण झाकून घेणे. ह्या Pattern मध्ये दोन कॅण्डल दिसतात. पहिली green candle ही लहान असते व पुढील red candle ही अगोदरच्या green candle ला पूर्णपणे झाकून घेऊन आपला Bearish trend दाखवते. पहिल्या तेजीच्या green candle ला पूर्णपणे निष्प्रभावी ठरवून पुढील red candle आपला घसरणीच्या दिशेतील हेतू दर्शवते.

Dark Cloud Cover
जेव्हा शेअरचा कल जास्त काळासाठी तेजीकडे असतो तेव्हा uptrend च्या शेवटी पहिली green व नंतर red candle निर्माण होते अशा वेळेस Reversal trend दर्शविला जातो. Red candle मागील दिवसाच्या बंद (close) किमतीपेक्षा वर (high) उघडते व अर्ध्यावर किंवा त्यापेक्षा कमी किमतीवर बंद होते.

Evening Star
Evening Star हा सुद्धा एक मंदीचे भाकीत वर्तवणारा Bearish Candlestick Pattern आहे. एखाद्या शेअरमधील तेजीचा कल संपुष्टात आल्याचे सूचित करणारा हा Pattern आहे. ह्यात पहिली green candle दिसते आणि त्यानंतर एक लहान candle कि जी पहिल्या candle पेक्षा high open आणि close किंमत दाखवते. तिसरी red candle परत bearish trend दाखवते. दुसरी लहान candle ही अनिर्णयाची स्थिती दर्शवते.

Gravestone Doji
एखाद्या शेअर मध्ये जेव्हा सलग खरेदीचा जोर असतो तेव्हा एखाद्या निश्चित किमतीवर खरेदीदार थकल्याचे लक्षण दाखवतात. अशा वेळेस green candle मागील candle पेक्षा जास्त किमतीवर उघडते पण खरेदीदार त्या किमतीवर जास्त वेळ किंमत कायम ठेवू शकत नाहीत आणि विक्रते किंमत खाली आणतात. ह्यामध्ये वरच्या बाजूची मोठी सावली दिसते.

ह्याव्यतिरिक्त आणखी Bearish Candlestick Chart Patterns आहेत. हे एखाद्या शेअरच्या किंमतीत होणाऱ्या बदलाचे संकेत देऊ शकतात आणि येऊ घातलेल्या bearish trend ची चाहूल देऊ शकतात.