Financial literacy in marathi – चांगल्या आर्थिक सवयी कशा लावून घ्याव्यात ?

Financial literacy in marathi म्हणजे पैशाबद्दलच्या आणि त्याच्या व्यवहारासंबंधित असलेल्या चांगल्या सवयी.
Financial literacy in marathi हा काय प्रकार आता? आर्थिक सवयी ? अशाही काही सवयी असतात का? Financial Education पण एवढे महत्वाचे आहे काय? वगैरे वगैरे..
असले काही प्रश्न आपल्याला सुद्धा पडले असतीलच. पडायलाही पाहिजेत, कारण आपल्या मेंदूत कुठलाही प्रश्न आला तरच मेंदू त्याचे उत्तर शोधतो. त्यामुळे प्रश्न पडणे म्हणजे एका नवीन क्षेत्रात शिकण्याचे दरवाजे उघडणे असे वाटते. काही दिवसाअगोदर मलाही हे नवीनच समजले.
झाले काय कि माझ्याकडे जॉर्ज क्लासन ह्या लेखकाचे एक पुस्तक Richest man in Babylon बरेच दिवस झाले पडून होते. तसे वाचले पण होते पण त्यातील गोष्टी जशाच्या तशा अंगिकारल्या नव्हत्या. मग काही दिवसांअगोदर अजून एक पुस्तक वाचण्यात आले. टी हार्व एकर या लेखकाचे secrets of millionaire mind.

Financial literacy बद्दल असलेल्या माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक असलेल्या ह्या पुस्तकात हार्व एकर आपल्या पत्नीची एक सवय सांगतात कि तिला पैसे दिले कि ती खर्च करायची. मग लेखक तिला जास्त पैसे द्यायचा; ते शिलकीचे पैसे पण ती खर्च करायची.
आता लेखकाला कळायचे नाही कि असे का होत आहे ? शेवटी तो निष्कर्षाला पोहोचला कि पत्नीने तिच्या लहानपणी हे शिकले होते कि घरचे सगळे पैसे पुरुषांकडे असतात आणि जेव्हा पैसे पाहिजेत तेव्हा ते त्यांच्याकडून मागून घ्यावेत. आता ह्यामध्ये Financial literacy चा एक महत्वाचा धडा समजल्या जाऊ शकतो
त्यासाठी ते पत्नीची एक लहानपणीची आठवण सांगतात कि ती जेव्हा आपल्या आईला आईस्क्रीम विकत घेण्यासाठी पैसे मागायची तेव्हा आई सांगायची कि पैसे बाबांना माग. ह्या साध्या गोष्टीवरून ती ही शिकली कि स्त्रियांनी आपल्याकडे पैसे शिल्लक ठेवणे जरुरी नाही. ह्यालाच हार्व एकर Mind programming on financial literacy असे म्हणतात.
Mind programming on financial aspects म्हणजे तुम्ही पैसे खर्च करण्याच्या money expenditure, जमा करण्याच्या saving money, निवेश करण्याच्या Investing money विषयावर काय विचार मांडता? खूप शक्यता आहे कि हे आपले विचार सहसा आपल्या अवती भोवती असलेल्या लोकांच्या सवयींवर (financial habits) अवलंबून असतील. खिशातील पैसे संपवून टाकणे,वारंवार कुणाला पैसे मागणे Frequently borrowing money, Credit card ने गरज नसलेल्या वस्तू खरेदी करणे, महिन्याचा पगार २५ तारखेपर्यंत खर्च करणे आणि मग पुढील महिन्याच्या पगाराची प्रतीक्षा करणे अशा साधारण वाटणाऱ्या गोष्टी ह्या mind programming ची उदाहरणे आहेत.
पहिल्यांदा हे पुस्तक मी वाचले तेव्हा अशाही काही सवयी Financial habits अंगवळणी पडलेल्या असतात हे मलासुद्धा पहिल्यांदा जाणवले. Financial literacy in marathi मध्ये ह्या गोष्टीवर सुद्धा चर्चा करणे क्रमप्राप्त ठरते.

Financial literacy in marathi लेखात सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्यापैकी सुद्धा खूप लोकांचे म्हणणे असते कि पैसे शिल्लकच राहत नाहीत. त्यामुळे मला वाटले कि हार्व एकर च्या पुस्तकातील काही मुद्दे ह्या बाबतीत फायद्याचे ठरतील.
हार्व एकर म्हणतात कि तुम्ही धन किंवा संपत्ती ह्याबद्दल काय विचार करता Financial blueprint of your mind त्यावर तुम्ही किती कमवाल किंवा किती टिकवाल हे अवलंबून असते. आता हे पण काही विचित्रच वाटेल पण आहे मात्र खरे.
लेखक म्हणतो कि बऱ्याच लोकांना पैसे कमावण्यामध्ये (money earning) काही अडचण नसते, अडचण असते ते टिकवून ठेवण्यामध्ये (Saving of money). इथे गरज पडते ते तुमच्या धन किंवा संपत्तीच्या ब्लू प्रिंटची. ही financial blue print म्हणजे तुमच्या विचारांचा भाग असतो.
विचारांना शक्तिशाली बनविल्याशिवाय संपत्ती निर्माण होत नाही. अशा ब्लू प्रिंट शिवाय कमावलेले धन जास्त काळ टिकत नाही. मग परत सुरु होते धावाधाव. Financial habits किंवा Financial literacy इथे कामी येते.
लेखक म्हणतो कि कल्पना करा कि एक झाड आहे, त्याला छोटी छोटी फळं लागली आहेत. ह्या फळांना लेखक आपले साध्य (Current earning or asset) म्हणतो कि जे आपण सध्या मिळवले आहे. आता लोक ह्या फळांपासून म्हणजेच मिळालेल्या परिणामापासून समाधानी नाहीत. ते म्हणतात कि फळांचा आकार मोठा झाला पाहिजे (More money) म्हणजे जे जे सध्या मिळाले आहे त्यापेक्षा जास्त मिळाले पाहिजे.
ते फळांवर (Final money) लक्ष केंद्रित करतात. पण ही फळं आली कुठून? फळं तर मुळांचा परिणाम आहेत. मुळे
खोलवर असतील, त्यांना चांगले खाद्य (Financial literacy) मिळत असेल तर फळं आपोआपच स्वादिष्ट आणि मोठी होतील. असाच काही परिणाम आर्थिक बाबतीत Financial Habits आपल्या विचारांचा असतो.

लेखकाच्या अनुसार जर परिणामांना बदलावयाचे असेल तर आपल्याला कारणांना बदलायला हवे आणि हे कारण आहे आपल्या विचारांची दिशा. एकदा का विचारांची दिशा बदलली कि परिणाम बदलायला वेळ लागत नाही. म्हणूनच आपण म्हणतो कि अमुक अमुक माणूस ज्या गोष्टीत हात टाकतो त्याचे सोने करतो ह्या मागे त्याच्या विचारांची ब्लू प्रिंट हेच एकमेव कारण असते. Financial literacy एकदा अंगवळणी पडली कि मग Financial goals हे साध्य होतीलच.
“Richest man in Babylon” ह्या पुस्तकात असेच काही शक्तिशाली विचार सांगितले आहेत, जसे “आपल्या कमाईचा कमीत कमी १० % हिस्सा वाचवा”. ह्याही पुढे आपण म्हणू शकतो कि जर तुमच्या जबाबदाऱ्या कमी असतील तर २०, ३० अथवा ५०% हिस्स्याची बचत करावी. ही बचत तुम्हाला श्रीमंतीच्या रस्त्याने way to wealth घेऊन जाईल. पुढे लेखक म्हणतो कि हळू हळू तुमच्या जवळ ही बचत वाढू लागेल, त्यातील एक हिस्सा अश्या गोष्टीत गुंतवावा कि ज्यामुळे तुमच्या खिशात परत धन येणे सुरु होईल. Saving money, investing money and get the return ही Financial success ची त्रिसूत्री आहे असे म्हणायला हरकत नाही.
ह्या गोष्टीलाच रॉबर्ट कियोसाकी “Cash Flow” असे म्हणतात. लेखकाचे Cash flow quadrant ह्या पुस्तकातील बरेच लिखाण वाचून Financial literacy in marathi हा लेख लिहिण्यास मी प्रेरित झालो. जेवढा तुमचा Cash Flow अधिक तेवढे तुम्ही अधिक श्रीमंत होत राहता.
अर्थात ह्याला थोडा वेळ लागेल पण ज्या दिवशी ही गोष्ट सुरु होईल तेव्हापासून तुमची विचार करण्याची दिशा Thoughts on financial aspects बदलून जाईल आणि हेच एक कारण तुम्हाला भविष्यात अधिक संपत्ती more assets मिळवण्यासाठी कारणीभूत ठरेल. इथे एक सावधगिरीचा इशारा म्हणजे वाचवलेले पैसे शहाण्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवावे कारण मूर्ख लोकांच्या सल्ल्याने गुंतवलेले धन नष्ट होण्याची शक्यता असते.
तर अशा काही चांगल्या आर्थिक सवयी Financial literacy in marathi हळूहळू अंगी बाणवा आणि आपले भविष्य अधिक सुखी बनवा. तुम्ही जर चांगल्या आर्थिक सवयी शिकू इच्छित असाल तर बॅबीलॉन का सबसे अमीर आदमी हे पुस्तक नक्कीच वाचा.
हे छोटेसे पुस्तक तुम्हाला खूप काही देऊन जाईल. प्राचीन बॅबीलॉन देशातील नागरिकांनी ज्या नियमांचे पालन करून अगणित संपत्ती मिळवली आणि ती वाढवली त्या नियमांचे सोप्या सुटसुटीत भाषेत लेखकाने ह्या पुस्तकात वर्णन केले आहे. तसेच ‘सिक्रेट्स ऑफ द मिलेनिअर माईंड’ हे पुस्तक तुम्हाला संपत्ती मिळवण्यासाठी तुमच्या विचारांचा कसा उपयोग करावा हे फार उत्कृष्ट पद्धतीने शिकवून जाते.
Financial literacy in marathi समजण्यासाठी अजून एक सुंदर पुस्तक म्हणजे रॉबर्ट कियोसाकी ह्यांचे Rich dad poor dad. हे Book माझे All time favourite book आहे. तुमच्या सध्याच्या आर्थिक विचारांच्या आधाराला हे पुस्तक नवीन अशा विचारांकडे घेऊन जाते कि जिथे तुम्हाला पाहिजे असलेले निकाल मिळायला सुरुवात होते.
हे सुद्धा वाचा: माझे आवडते पुस्तक बॅबीलॉन का सबसे अमीर आदमी