Bearish Candlestick Chart Patterns

Bearish Candlestick Chart Patterns

Basics of Bearish Candlestick Chart Patterns

Candlestick chart बद्दल माहिती वाचल्यास एखाद्या शेअरच्या किंमतीतील होणाऱ्या बदलामुळे एकतर Bullish candlestick chart patterns तयार होतात किंवा Bearish candlestick chart patterns तयार होतात हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. कधी फक्त एक कॅण्डल पुढील किंमतीचा अंदाज पुरवू शकते तर कधी दोन तीन कॅन्डलच्या समूहाने अशी किंमतीतील शक्यता सांगता येते. हे चार्ट कसे वाचावे ह्याबद्दल वाचण्यासाठी कॅन्डलस्टिक चार्ट कसा वाचावा? हा लेख वाचता येईल.

जेव्हा सगळ्या बाजूने फारसे आशादायक चित्र नसेल तेव्हा अनेक शेअरच्या किंमती कमी होताना दिसतात. घसरणीच्या काळात investors ची ही खरी परीक्षा असते. आपण केलेली गुंतवणूक जर कमी वेळेसाठी असेल तर मग अशा वेळेस योग्य किंमतीवर थोडे नुकसान सोसून ह्या शेअर्स मधून बाहेर निघणे काही गुंतवणूकदार पसंत करतात. मात्र अशी वेळ ओळखणे ही पण एक परीक्षाच असते. त्यासाठी जिज्ञासू वाचकांना Bearish Candlestick Chart Patterns चा अभ्यास उपयोगी ठरू शकतो.

Some common Bearish Candlestick Patterns

Hanging Man Pattern

HANGING MAN PATTERN हा शेअर्समधील मंदीचा REVERSAL CANDLESIC PATTERN आहे ज्यामध्ये मुख्य भाग (BODY) लहान असून खालच्या दिशेने एक लांब सावली (SHADOW) दिसते.
जेव्हा हा पॅटर्न UPREND च्या शेवटी दिसतो तेव्हा ह्यापुढे अजून किंमत वाढणार नाही असा एक अंदाज असतो आणि ह्यावेळेस चालू असलेल्या किमतीत अजून जास्त वाढ न होता पुढे किंमतीत घसरण येईल अशी शक्यता असते.

Bearish Engulfing Pattern

Engulf म्हणजे पूर्ण झाकून घेणे. ह्या Pattern मध्ये दोन कॅण्डल दिसतात. पहिली green candle ही लहान असते व पुढील red candle ही अगोदरच्या green candle ला पूर्णपणे झाकून घेऊन आपला Bearish trend दाखवते. पहिल्या तेजीच्या green candle ला पूर्णपणे निष्प्रभावी ठरवून पुढील red candle आपला घसरणीच्या दिशेतील हेतू दर्शवते.

bearish candlestick chart patterns bearish engulfing

Dark Cloud Cover

जेव्हा शेअरचा कल जास्त काळासाठी तेजीकडे असतो तेव्हा uptrend च्या शेवटी पहिली green व नंतर red candle निर्माण होते अशा वेळेस Reversal trend दर्शविला जातो. Red candle मागील दिवसाच्या बंद (close) किमतीपेक्षा वर (high) उघडते व अर्ध्यावर किंवा त्यापेक्षा कमी किमतीवर बंद होते.

dark cloud cover bearish candlestick pattern

Evening Star

Evening Star हा सुद्धा एक मंदीचे भाकीत वर्तवणारा Bearish Candlestick Pattern आहे. एखाद्या शेअरमधील तेजीचा कल संपुष्टात आल्याचे सूचित करणारा हा Pattern आहे. ह्यात पहिली green candle दिसते आणि त्यानंतर एक लहान candle कि जी पहिल्या candle पेक्षा high open आणि close किंमत दाखवते. तिसरी red candle परत bearish trend दाखवते. दुसरी लहान candle ही अनिर्णयाची स्थिती दर्शवते.

Evening Star Bearish Candlestick Pattern

Gravestone Doji

एखाद्या शेअर मध्ये जेव्हा सलग खरेदीचा जोर असतो तेव्हा एखाद्या निश्चित किमतीवर खरेदीदार थकल्याचे लक्षण दाखवतात. अशा वेळेस green candle मागील candle पेक्षा जास्त किमतीवर उघडते पण खरेदीदार त्या किमतीवर जास्त वेळ किंमत कायम ठेवू शकत नाहीत आणि विक्रते किंमत खाली आणतात. ह्यामध्ये वरच्या बाजूची मोठी सावली दिसते.

Gravestone Doji bearish candlestick chart pattern

ह्याव्यतिरिक्त आणखी Bearish Candlestick Chart Patterns आहेत. हे एखाद्या शेअरच्या किंमतीत होणाऱ्या बदलाचे संकेत देऊ शकतात आणि येऊ घातलेल्या bearish trend ची चाहूल देऊ शकतात.

Similar Posts

  • share market portfolio meaning in marathi

    share market portfolio meaning in marathi शेअर मार्केट मध्ये Portfolio किंवा Portfolio management असे शब्द वारंवार कानावर पडतात किंवा वाचनात येतात. ह्या लेखात ह्याच विषयावर काही माहिती लिहिलेली आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना जोखीमीचे व्यवस्थापन म्हणजेच Risk management करणे…

  • candlestick chart in marathi कँडलस्टिक चार्ट कसा वाचावा?

    Candlestick chart in marathi कँडलस्टिक चार्ट कसा वाचावा? Candlestick chart in Marathi Candlestick chart म्हणजे काय? शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी उडी मारल्यावर जसजसा वेळ जातो तसे तसे नवीन नवीन प्रश्न पडायला लागतात. ज्या शेअरवर अपेक्षा असते तो वाढत का नाही? एखादा…

  • Share market book in marathi

    Share market book in marathi शेअर बाजारासाठी उपयोगी पुस्तके. शेअर बाजार म्हणजे गुंतवणूकदारांचा आवडता बाजार. जो तो आपापल्या अभ्यासाने, अपेक्षेने वेगवेगळ्या कंपनीच्या share मध्ये पैसे गुंतवतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल ह्यासाठी प्रयत्नशील असतो. हे सगळे करतांना share…

  • Value investing vs Growth Investing

    Value investing vs growth investing Value investing vs growth investing-An Introduction Value Investing आणि Growth Investing ह्या दोन पद्धतींबद्दल कुशल गुंतवणूकदार परिचित असतातच. दोघांची तुलना करून एकाला सरस सांगणे व दुसऱ्या पद्धतीला कमी ठरवणे हे ह्या लेखाचे उद्दिष्ट्य नाही. प्रत्येक…

  • Price Volume Action

    Price volume Action स्टॉक मार्केटमध्ये Price आणि Volume Action समजून घेणे Price आणि Volume चा अभ्यास करून कुणी स्टॉक मार्केटचे वागणे जास्त खोलात जाऊन समजून घेऊ शकतो. ह्यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील गतिशीलता (market dynamics) समजून घेण्यास मदत होऊ शकते. What is…

  • Long term investing

    Long term investing for maximising returns Long term investing मुळे कुणी आपल्या गुंतवणुकीवर Maximum returns अधिक परतावा मिळवू शकतो. टीप: हा लेख फक्त शैक्षणिक माहितीसाठी लिहिला आहे. अशा प्रकारच्या Long term investing नेहमीच परतावा देतील ह्याची निश्चिती नाही. त्यामुळे गुंतवणूक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Are you human? Please solve:Captcha