Value investing vs Growth Investing

value investing vs growth investing

Value investing vs growth investing

Value investing vs growth investing-An Introduction

Value Investing आणि Growth Investing ह्या दोन पद्धतींबद्दल कुशल गुंतवणूकदार परिचित असतातच. दोघांची तुलना करून एकाला सरस सांगणे व दुसऱ्या पद्धतीला कमी ठरवणे हे ह्या लेखाचे उद्दिष्ट्य नाही. प्रत्येक पद्धतीचा एक आधार आहे आणि दोन्ही पद्धती ह्या योग्यच आहेत. फक्त त्यासाठी आपला गुंतवणूकदार प्रकार (Types of investor) व इतर निरीक्षणांची गरज असावी.

What is Value Investing?

Value investing म्हणजे काय? हे पैसा मंत्र Marathi Money Blog वरील Value investing ह्या लेखात अगोदर सविस्तर लिहिलेले आहेच. थोडक्यात सांगायचे झाल्यास Value investor हा शेअर्सना ते वधारण्याच्या अगोदर ओळखतो आणि त्यात बाजारातील हालचालीअगोदर गुंतवणूक करतो किंवा करत राहतो.


अशा कंपन्या ह्या हळूहळू प्रगती दाखवत असतात आणि नजीकच्या काळात ह्यांच्या किंमतीत त्वरित वाढ अपेक्षित नसते. पण एका वेळेनंतर अन्य व्यावसायिक गुंतवणूकदारांचे लक्ष ह्या शेअर्सकडे जाईल व त्यांच्या किंमतीत वाढ होईल अशी एक शक्यता असते. अर्थात अशा शक्यतेमागे त्या कंपन्यांची वाढीची क्षमता असते.

what is Growth Investing?

ह्याउलट Growth investing मध्ये गुंतवणूकदार अशा कंपन्यांची ओळख करतो ज्यांचा वाढीचा दर ‘सरासरीपेक्षा जास्त’ – above average- आहे. अशा कंपन्या Revenue, Cash flows आणि Profit ह्यामध्ये चांगली वाढ दाखवतात. ह्या कंपन्या भविष्यात अजून मोठ्या आकारात येण्याची क्षमता दाखवतात. अर्थात सगळ्याच कंपन्या ह्या अजून मोठ्या होऊन उभ्या राहतील हे अगोदरच नक्की सांगता येत नाही. पण भविष्यातील मोठ्या कंपन्या ह्याच यादीतून येतात हे देखील तेवढेच नक्की.

ह्या कंपन्या सहसा Small आणि Mid Cap क्षेत्रात असतात. काही वेळेस Large cap कंपनी सुद्धा अजून मोठ्या स्वरूपात उदयास येण्याची शक्यता असते. ह्या कंपन्यांजवळ बदलत्या वेळेनुसार नाविन्यपूर्ण सेवा किंवा उत्पादने असतात आणि आपल्या ह्या सेवांच्या जोरावर भविष्यात ह्या अजून जास्त कमाई मिळवण्याच्या पात्रतेच्या असतात. इथे हे समजणे महत्वाचे आहे कि भविष्यातील मोठ्या कंपन्या ह्या नेहमीच Innovative products च्या साहाय्याने मोठ्या होतील.

असे शेअर्स हे अधिक महाग किंमतीवर व्यवहार करत असतात. शेअर मार्केट हे भविष्यातील किंमतीवर काम करत असते. ज्या कंपनीची अधिक कमाई करण्याची शक्यता असेल त्याचे शेअर्स हे महाग असतात. ह्याउलट जिथे भविष्यातील कमाई कमी होण्याची चिन्हे असतील अशा शेअर्सच्या किंमतीत आजच पडझड दिसून येते. आजची कमी किंमत ही फक्त सुरुवात असते आणि ह्यापेक्षा सुद्धा कमी किंमत पुढे दिसू शकते (In most cases). Growth Stocks सुद्धा भविष्याच्या अपेक्षित कमाईला आजच गृहीत धरतात किंबहुना ह्यांचे गुंतवणूकदार तसे समजतात.

value investing vs growth investing

Growth stocks कसे ओळखायचे? How to identify Growth Stocks?


Growth Stocks ओळखण्याच्या काही पद्धती आहेत. त्यातील एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे ह्यांच्या कमाईत निरंतर वाढ दिसून येते, ती सुद्धा चांगल्या आकड्यांनी. इथे वाढ दाखवत असलेले हे आकडे महत्वाचे असतात आणि भविष्यात हे आकडे अजून चांगली वाढ दाखवण्याची अपेक्षा असते. म्हणजेच अशा शेअर्सच्या भूतकाळाला कमी महत्व असते.

शेअर बाजार हा भविष्याला गृहीत धरून चालतो. त्यामुळे एखादी कंपनी भूतकाळात खूप चांगली होती फक्त ह्या गोष्टीमुळे कुशल गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करत नाही. पण भविष्यात एखाद्या क्षेत्रात जास्त मागणी वाटत असल्यास त्या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये जरा अस्थिरता असली तरी तो (इतर अनेक गोष्टींचा अभ्यास करून) अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे योग्य समजू शकतो.

कधी कधी अचानक आलेल्या नकारात्मक बातम्यांमुळे ह्यांच्या किंमतीत मोठी हालचाल होऊ शकते. Market volatility नुसार अशा शेअरच्या किंमती बदलत राहतात. आपल्या अभ्यासानुसार अशा शेअर्समध्ये टिकून राहावे?, वाढीव गुंतवणूक करावी?, कि बाहेर पडावे? हा निर्णय गुंतवणूकदार घेऊ शकतो. ही एक आक्रमक रणनीती असते.

कुणाला वैयक्तिकरीत्या जरी Value investing जास्त योग्य वाटत असली तरीही Growth Stocks हे भविष्याचे Stocks असतात ह्याला नकार देता येणार नाही आणि भविष्यातील चांगले शेअर्स हे अगदीच कमी दरात क्वचितच मिळत असावेत.

Value investing vs growth investing-Comparison

पैकी Value Investing मध्ये गुंतवणूकदाराला दीर्घ वेळपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. कधी कधी काही शेअर्स किंमतीत त्वरित वाढ दर्शवतात पण हे नेहमीच होईल ह्याची ग्वाही कुणी देऊ शकत नाही. दुसरीकडे, Growth Investing मध्ये, अगोदर लिहिल्याप्रमाणे प्रति शेअर किंमत ही जास्तच असते पण ती कंपनीच्या भविष्याच्या योजनेनुसारच आणि अपेक्षित कमाईनुसार असते.

आता दोन्हीपैकी एक पद्धती चांगली आणि दुसरी गचाळ असे काही सांगता येणार नाही. लेखकाला जरी एक गोष्ट स्वतःसाठी योग्य वाटत असली तर दुसरी चुकीची असा अर्थ होत नाही. आपल्या आपल्या योजनेनुसार आणि allocation नुसार गुंतवणूकदार दोन्हीवर विचार करू शकतात.

एक Growth Stocks मी जास्त महाग वाटतो म्हणून चुकवला होता व नंतर थोडा स्वस्तात मिळाला की घेऊ ह्या विचारात होतो पण किंमतीत अजून वाढ होऊन तो मला नंतर कधी स्वस्तात मिळाला नाही. जेव्हा शेअरच्या निवडीचा प्रश्न येतो तेव्हा स्वतःला योग्य वाटणारे धोरण योग्य आणि दुसरे चूक असे लेखकाचे मत नाही. जी पद्धती एखाद्याला फायदा देऊन जाईल ती त्यांचेसाठी साजेशी हे म्हणणे योग्य.

सारांश:

Value stocks: Undervalued असतात. ह्यांचा PE Ratio हा कमी असतो. Dividend Yield उच्च (किंवा चांगले) असते. कमी वेळेत किंमत एकदम वाढण्याची शक्यता नसते.

Growth Stocks: Overvalued असतात. ह्यांचा PE Ratio हा जास्त असतो. Dividend Yield हे नसतेच किंवा कमी असते. कमी वेळेत Market volatility प्रभाव पडू शकतो.

लहान कंपनी पासून मोठी कंपनी होईपर्यंत त्याच कंपनीचा Stock कधी Growth Stock तर कधी Value Stock होऊ शकतो. आपल्या दीर्घ अवधीच्या योजनेवर काम करत असतांना कमी वेळेच्या हालचालींचा जास्त प्रभाव न पडू देता आपल्या गुंतवणूक उद्दिष्ट्याला ओळखत राहणे व त्यानुसार कधी Value Investing तर कधी Growth Investing आणि आपल्या अनुरूप असेल तर दोन्हीचा मेळ ठेऊन काम करत राहणे असे काहीसे कुणी ठरवू शकतो.

हे सुद्धा वाचा: Value Investing And Behavioral Finance

Similar Posts

  • |

    Asset allocation in marathi

    Asset allocation in marathi Asset allocation म्हणजे गुंतवणूक करतांना अगोदर ठरवलेली एक अशी योजना की ज्यामुळे गुंतवणुकीची एकूण रक्कम विविध Asset class मध्ये गुंतवली जाते; जेणेकरून गुंतवणुकीतील धोका कमी होईल. हे Asset Class तीन वर्गात मोडतात: Equity, Fixed Income आणि…

  • Bearish Candlestick Chart Patterns

    Bearish Candlestick Chart Patterns Basics of Bearish Candlestick Chart Patterns Candlestick chart बद्दल माहिती वाचल्यास एखाद्या शेअरच्या किंमतीतील होणाऱ्या बदलामुळे एकतर Bullish candlestick chart patterns तयार होतात किंवा Bearish candlestick chart patterns तयार होतात हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. कधी…

  • Long term investing

    Long term investing for maximising returns Long term investing मुळे कुणी आपल्या गुंतवणुकीवर Maximum returns अधिक परतावा मिळवू शकतो. टीप: हा लेख फक्त शैक्षणिक माहितीसाठी लिहिला आहे. अशा प्रकारच्या Long term investing नेहमीच परतावा देतील ह्याची निश्चिती नाही. त्यामुळे गुंतवणूक…

  • Share market book in marathi

    Share market book in marathi शेअर बाजारासाठी उपयोगी पुस्तके. शेअर बाजार म्हणजे गुंतवणूकदारांचा आवडता बाजार. जो तो आपापल्या अभ्यासाने, अपेक्षेने वेगवेगळ्या कंपनीच्या share मध्ये पैसे गुंतवतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल ह्यासाठी प्रयत्नशील असतो. हे सगळे करतांना share…

  • टेक्निकल एनालिसिस कसे करावे? Technical analysis in marathi

    What is technical analysis in marathi? एखाद्या शेअरच्या गुंतवणुकीत सद्यस्थितीत किंमतीच्या (Price) आणि व्यवहार करीत असलेल्या संख्येच्या (Volume) आधाराने सांख्यिकीय कल (statistical trend) बघता केलेले त्या गुंतवणुकीचे विश्लेषण म्हणजेच Technical Analysis होय. शेअर बाजारात उपयोगी माहितीच्या आधारे एखाद्या शेअरचे मूल्यांकन…

  • Share market in Marathi – शेअर मार्केट म्हणजे काय?

    Share market information marathi – शेअर मार्केट म्हणजे काय? Share market in marathi ह्या लेखात शेअर मार्केट बद्दल माहिती लिहिलेली आहे. आजच्या सूचनायुगात गुंतवणूक म्हटले कि जास्त चर्चेत येणारे नाव म्हणजे शेअर बाजार. Share market in marathi आहे तरी काय?…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *