Value investing

value investing

What is value investing?

Value investing ही गुंतवणुकीची अशी एक रणनीती आहे कि ज्यामध्ये आपल्या Intrinsic value पेक्षा कमी मूल्यावर व्यवहार करत असलेल्या शेअरला खरेदी केले जाते. असे Shares आपल्या Book Value पेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध असतात. काही अवधीनंतर हे शेअर आपल्या मजबूत आर्थिक गुणोत्तरानुसार योग्य किमतीवर पोहोचतात आणि गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर नफा कमावतात.

एखादा शेअर आपल्या रास्त भावापेक्षा कमी किमतीवर का व्यवहार करत असतो? ह्याचे उत्तर आपल्याला Behavioral Finance मध्ये सापडू शकते. शेअर बाजारात एखाद्या शेअरच्या किंमतीमध्ये तर्कहीन व अत्याधिक चढ उतार पाहायला मिळतात कारण बहुतांश लोक आपल्या गुंतवणूक धोरणावर greed व fear चा परिणाम कसा होत आहे ह्याबद्दल जागरूक नसावेत.

Value investing चे जनक बेंजामिन ग्रॅहम (Father of value investing) यांनी नमूद केल्याप्रमाणे, ‘Most of the time common stocks are subject to irrational and excessive price fluctuations in both directions due to tendency of most people to speculate.’ ह्या वाक्याने अशा वागण्याला दुजोरा मिळतो.

What is Margin of safety?

Value investing मुळे आपण योग्य शेअर कमी किमतीवर खरेदी करून भविष्यात योग्य परतावा मिळण्याची शक्यता तर निर्माण करत असतोच पण ह्यासोबतच त्या शेअरसाठी मोजलेली किंमत आणि प्रत्यक्षात तो शेअर दिलेल्या किंमतीसाठी किती योग्य आहे ह्यातील फरक जास्त नसेल ह्याची सुद्धा खातरजमा करत असतो.

Value investing तत्त्वानुसार, Margin of safety म्हणजे एखाद्या शेअरच्या आताच्या बाजारभावाच्या आणि त्याच्या Intrinsic value मधील फरक होय. Intrinsic value म्हणजे कंपनीच्या मालमत्तेचे वास्तविक मूल्य होय. Value investing नुसार गुंतवणूकदार केवळ तेव्हाच काही शेअर्स खरेदी करेल जेव्हा बाजारातील त्याची किंमत त्याच्या अंदाजे Intrinsic value पेक्षा कमी असेल. हे लिहीत असतांना कुठेतरी वाचलेले एक संबंधित वाक्य मला आठवले कि ‘तुम्हाला खरा फायदा विकतांना नव्हे तर खरेदी करतांना होत असतो’.

Value investors कंपनीच्या आर्थिक आकड्यांचे Financial statements विश्लेषण करतात आणि गर्दीच्या उलट वागतात. आणि त्यामुळेच चांगल्या शेअरचे ते दीर्घकालीन गुंतवणूकदार असतात. Value investors चे मत स्पष्ट असते. जर का आपल्याला बाजारातील एखाद्या गोष्टीचे खरे मूल्य माहित असेल तर आपण त्यासाठी जास्त पैसे चुकवणार नाही आणि अशा वस्तूवर काही सूट मिळत असेल तर मग ती खरेदी जास्त आकर्षक आणि फायद्याची होते.Margin of safety समजण्यासाठी हे एक सोपे उदाहरण आहे.

value investing

Value investing strategy

काही शेअर्सच्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे होते. म्हणजे कंपनीचे मूल्य Value किंवा मूल्यांकन Valuation स्थिर असले तरीही बाजारातील हालचालीमुळे कंपनीच्या शेअरची किंमत बदलू शकते. Demand, supply आणि गुंतवणूकदारांचे त्यानुसार बदलत असलेले मत, trend, अंदाज इत्यादीनुसार त्या शेअरच्या किंमतीत चढ-उतार होतात.

Value investing strategy ठरवताना ह्या सगळ्या गोष्टींचे आकलन उपयोगी पडते. Value investing साठी अभ्यास आणि संयम आवश्यक आहे. एखाद्या शेअर्सचे मूल्य का कमी होते आणि ह्यासाठी Behavioral Finance, market moves व Herd Mentality कशी जबाबदार असते ह्याबद्दल stocks to riches ह्या लेखात अधिक विस्ताराने लिहिलेले आहे.

एखाद्या कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन (Value) किंवा Intrinsic value माहित करून घेण्यासाठी हुशार गुंतवणूकदार अनेक आर्थिक गुणोत्तरे (Financial Ratios) व वेगवेगळी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतात. तसेच कंपनीचे प्रदर्शन, earning, profit तसेच कंपनीचे Business model कसे आहे व भविष्यातील अशा कंपनीची profitable फायद्यात राहण्याची निश्चिती किती आहे यासह Fundamental analysis मधील इतर अनेक बाबींचा अभ्यास करतात. ह्यामध्ये P/B value, P/E value, Free cash flow वगैरे अभ्यास केल्या जातो.

Value investing strategy ठरवतांना Value investor खालील काही गोष्टींवर विशेष लक्ष देतो.

  • कंपनीद्वारे आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणे.
  • विक्रीचे आकडे वाढत आहेत असे निदर्शनास येणे.
  • एकंदरीत खर्च कमी होणे.
  • कंपनीद्वारे फायद्याचे नसलेले विभाग विकणे किंवा बंद करणे.
  • नवीन फायदेशीर क्षेत्रात उतरण्याची योजना असणे.

हे सुद्धा वाचा: शेअर्सचे Fundamental Analysis कसे करावे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *