Price Volume Action

PRICE VOLUME ACTION

Price volume Action

स्टॉक मार्केटमध्ये Price आणि Volume Action समजून घेणे

Price आणि Volume चा अभ्यास करून कुणी स्टॉक मार्केटचे वागणे जास्त खोलात जाऊन समजून घेऊ शकतो. ह्यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील गतिशीलता (market dynamics) समजून घेण्यास मदत होऊ शकते.

What is price action?


Price action म्हणजे एखाद्या स्टॉकची किंमत कालांतराने कशी बदलते हे पाहणे. हे बाजारातील सर्व सहभागींच्या (गुंतवणूक व ट्रेडर ) ह्यांच्या एकत्रित भावना प्रतिबिंबित करते आणि पॅटर्न, कल (Trend), तसेच संभाव्य घसरणीचा अंदाज दर्शवते. ट्रेडर्स प्रामुख्याने कँडलस्टिक चार्ट, सपोर्ट आणि रेसिस्टन्स स्तर, तसेच ट्रेंड लाईन्सचा वापर करून Price volume action चा अंदाज बांधतात.

हेड अँड शोल्डर्स (Head and shoulders), डबल टॉप्स (Double top) , किंवा बुलिश फ्लॅग्स (Bullish flag) यांसारखी पॅटर्न्स भविष्यातील किंमतींच्या हालचालींबाबत संकेत देतात. Price volume action, Technical Analysis चा मुख्य घटक आहे, कारण Price volume action बाह्य घटकांऐवजी (external factors) केवळ बाजारातील हालचालींवर लक्ष केंद्रित करते.

What is volume action?

Volume action म्हणजे विशिष्ट कालावधीत किती शेअर्सची देवाणघेवाण झाली याचे प्रमाण. Volume action हे Price trend साठी पुष्टीकरणाचे (support) साधन म्हणून कार्य करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या स्टॉकची किंमत High Volume सहित Resistance ला पार करत असेल, तर ही हालचाल (movement) दृढ असल्याचे संकेत मिळतात आणि पुढील काळात सुद्धा अशी हालचाल कायम राहण्याची शाश्वती असू शकते. उलट, कमी volume असल्यास किंमतीतील हालचालींबद्दल खात्री नसते आणि अशी किंमत दिशाभूल करणारी ठरू शकते.

price and volume action

Why Price and Volume Action study together? Price आणि Volume Action यांचा एकत्र अभ्यास का करावा?


Price आणि Volume यांचा एकत्र अभ्यास केल्याने बाजारातील हालचालींचे व्यापक चित्र तयार होते. Price Action काय घडत आहे हे सांगते, तर Volume हे का घडत आहे ह्याची कल्पना देते. उदाहरणार्थ, जर स्टॉकची किंमत चढत असेल आणि volume सुद्धा वाढत असेल, तर ती एक strong uptrend दर्शवते. त्याच वेळी, किंमतीतील वाढ कमी volume सह असेल, तर ती momentum weak होत असल्याचे संकेत देते.

Application of Price-Volume action in trading


Price आणि Volume action चा वापर अनेक trading strategy मध्ये केला जातो. Day Traders त्याचा वापर दिवसातील लहान हालचालींसाठी करतात, तर Swing Traders मध्यमकालीन ट्रेंड ओळखण्यासाठी याचा वापर करतात. Long term investors, Volume analysis द्वारे Accumulation किंवा Distribution phase ओळखू शकतात.

Why investors should look Price and Volume action before investing?

गुंतवणूकदारांनी Price आणि Volume action पाहावे कारण त्यामुळे market behavior आणि underlying strength of price movements विषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. यासाठी काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. Trend Validation: Volume confirms the strength of a trend.
  2. Spotting Reversals: महत्त्वाच्या किंमत पातळीवर अचानक volume मध्ये वाढ, उलटफेर (Reversal) किंवा ब्रेकआउटचे संकेत देते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना लवकर त्यांचे trades समायोजित (Adjust) करता येते.
  3. Market Sentiment: Price आणि Volume एकत्रितपणे बाजारातील behaviour दर्शवतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना हालचाली मजबूत खरेदी/विक्रीमुळे (institutional buying/selling) आहेत का किंवा केवळ speculation मुळे आहेत हे समजते.
  4. Avoiding False Breakouts: ब्रेकआउटदरम्यान high volume त्याच्या वैधतेला (validity ला) समर्थन देतो, तर कमी volume मुळे false trend होण्याची शक्यता असते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना तोट्यापासून बचाव करता येतो.
  5. Strategic Entry and Exit: Price आणि Volume यांचे विश्लेषण करून गुंतवणूकदारांना त्यांच्या व्यवहारांची वेळ अधिक प्रभावीपणे निश्चित करता येते.

Similar Posts

  • share market portfolio meaning in marathi

    share market portfolio meaning in marathi शेअर मार्केट मध्ये Portfolio किंवा Portfolio management असे शब्द वारंवार कानावर पडतात किंवा वाचनात येतात. ह्या लेखात ह्याच विषयावर काही माहिती लिहिलेली आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना जोखीमीचे व्यवस्थापन म्हणजेच Risk management करणे…

  • Index fund in marathi

    Index fund मधील गुंतवणूक ही आपण एक हुशार गुंतवणुक म्हणू शकतो. Index fund in marathi ह्या लेखात Index funds काय आहे व कसे काम करतात ह्याची माहिती लिहिलेली आहे. अभ्यासू वाचकांनी index fund बद्दल वाचलेले असेलच, तरीही आजूबाजूला इंडेक्स फंड…

  • Bearish Candlestick Chart Patterns

    Bearish Candlestick Chart Patterns Basics of Bearish Candlestick Chart Patterns Candlestick chart बद्दल माहिती वाचल्यास एखाद्या शेअरच्या किंमतीतील होणाऱ्या बदलामुळे एकतर Bullish candlestick chart patterns तयार होतात किंवा Bearish candlestick chart patterns तयार होतात हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. कधी…

  • Moving average indicator

    Moving average indicator what is a moving average? Moving average indicator (MA) हे शेअर्सच्या Technical Analysis मध्ये वापरले जाणारे एक indicator आहे. Moving average indicator. Moving average म्हणजे हलती सरासरी किंमत. Moving average indicator एका विशिष्ट कालावधीसाठी (जसे कि ५०…

  • Share market book in marathi

    Share market book in marathi शेअर बाजारासाठी उपयोगी पुस्तके. शेअर बाजार म्हणजे गुंतवणूकदारांचा आवडता बाजार. जो तो आपापल्या अभ्यासाने, अपेक्षेने वेगवेगळ्या कंपनीच्या share मध्ये पैसे गुंतवतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल ह्यासाठी प्रयत्नशील असतो. हे सगळे करतांना share…

  • Share market in Marathi – शेअर मार्केट म्हणजे काय?

    Share market information marathi – शेअर मार्केट म्हणजे काय? Share market in marathi ह्या लेखात शेअर मार्केट बद्दल माहिती लिहिलेली आहे. आजच्या सूचनायुगात गुंतवणूक म्हटले कि जास्त चर्चेत येणारे नाव म्हणजे शेअर बाजार. Share market in marathi आहे तरी काय?…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *