2023 Investment Ideas and strategies

2023Investment ideas

2023 investment ideas

2023 investment ideas

2023 नवीन वर्ष नुकतेच सुरु झाले आणि नव्याचे नऊ दिवस संपले देखील. वेळ असाच जातो, हळूहळू आणि नियमित. ससा आणि कासवाच्या गोष्टीतील कासवासारखा. आपणही कासवाकडून काही शिकू शकतो. नियमित आणि हळूहळू काही उपयोगी काम केले केले कि नंतर त्याची ताकद समजते. Slow but steady wins the race.

2023 च्या 12 महिन्यात investment कशी आणि कुठे करावी? ह्याचे नियोजन करण्याची हा सर्वोत्तम वेळ असावी. तसाही एक नवीन दिवस म्हणजे नवीन २४ तास हे वाक्य मला आवडले. मागच्या दिवसातील काही शिकवणी घ्यायच्या आणि पुढील दिवसांसाठी काही योजना बनवायची म्हणजे वेळेचा बराच भाग कारणी लागतो.

2023 Investment Ideas and Strategy

प्रत्येकाचे आपापले काही Investment उद्दिष्ट्य असतीलच. त्याव्यतिरिक्त खालील काही गोष्टीवर कुणी प्रयत्न करू शकतो.

  • नवीन Investment कुणाच्या नावावर करावी? ठरवा.
  • पूर्ण वर्षाचे एक Budget बनवावे व त्यानुसार नियमित Investment असावी. एकदाच जास्त रक्कम आणि मग बरेच दिवस काहीच नाही असे केल्याने शिस्त लागत नाही.
  • Emotional Investment टाळण्याचा सराव करावा. मला एखादा शेअर आवडतो फक्त म्हणून तो घेतला ह्याला काही नेहमीच योग्य पाऊल म्हणता येणार नाही.
  • Child investment options लक्षात घ्यावे.
  • Invest in Good Health. ही तात्काळ न दिसणारी गुंतवणूक आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ हा वाक्प्रचार मला इथे आठवला.
  • १० वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आहे. त्याची माहिती मिळवू शकता. जवळच्या बँकेत अथवा पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करू शकता.
  • Open PPF Account. चक्रवाढ व्याजाचे महत्व दर्शवणारी ही एक सुरक्षित बचत योजना आहे. अधिक माहितीसाठी वाचा. PPF in Marathi
  • Make Emergency Fund. ह्याला प्रत्यक्ष Investment अगोदर अतिशय महत्वाचे पाऊल म्हणता येईल.
  • Make Monthly Budget. महिन्याचा जमा खर्च लिहिता येईल. जरी छोटी सवय वाटली तरीही अति परिणामकारक. बिनकामाचे खर्च शोधून काढण्यासाठी जमाखर्च अत्यंत उपयोगी आहे.
2023 investment ideas

ह्याशिवाय Better Investment साठी आपण काही Strategy -रणनीती- ठरवू शकतो. काही नवीन गोष्टीवर काम करून बघू शकतो. उदाहरणादाखल काही Strategy खालीलप्रमाणे:

  • Investment Strategy: Buy low sell high. दीर्घ काळ लागू शकतो.
  • Investment Strategy: Buy and Hold. अस्थिरतेच्या -Volatile Market- वेळेत स्वतःवर नियंत्रण ठेवणे शिकता येईल.
  • Investment Strategy: Buy on Dips. अधिकची Investment कधी करावी ह्याचे प्रशिक्षण.
  • Investment Strategy: Growth Investing. भविष्यातील व्यवसाय संधी शोधून आजच त्यात Investment करणे.
  • Investment Strategy: Value Investing. मला आवडलेला गुंतवणूक प्रकार. ह्याबद्दल अधिक वाचा: Value investing
  • Investment Strategy: Dividend Investing. लेखकाचा एक अजून आवडीचा विषय. ह्याबद्दल अधिक वाचा: Dividend portfolio
  • Investment Strategy: Small Cap Investing. आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक क्षमता असणारा गुंतवणूक प्रकार.
  • Investment Strategy: Index Investing. Investment विषयात कमीत कमी लक्ष देणाऱ्यांसाठी सोयीचा प्रकार. अधिक माहितीसाठी वाचा: Index investing

ह्या सगळ्या व्यतिरिक्त आणखी काही लक्ष देता येणारी क्षेत्र खालीलप्रमाणे:

  • Retirement planning. एक दिवस सेवानिवृत्तीचा येईलच तयासाठी आजच नियोजन जरुरी.
  • Close unused bank accounts. कमी उपयोगाचे बँक खाते बंद केल्याने काही नुकसान होणार नाही असे वाटते.
  • स्वतःत गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे. त्यासाठी स्वतःच्या वाढीसाठी पुस्तके वाचावी.फक्त मनोरंजनासाठी पुस्तके वाचणे आणि स्वतःत विकास करण्यासाठी पुस्तके वाचणे ह्यात बरेच अंतर आहे. पुस्तके विकत घेऊन वाचली तर आपण जास्त गांभीर्याने वाचतो असा एक तर्क आहे. ह्यावर्षी 24 पुस्तके वाचावी असा माझा संकल्प आहे. अधिक वाचा: नवीन वर्षाचा संकल्प

आपल्याला आवडणारी Investment strategy काय आहे? comment देऊन जरूर कळवा.

How to Build a Dividend Portfolio लाभांश पोर्टफोलिओ कसा तयार करावा?

how to build a dividend portfolio

How to Build a Dividend Portfolio

Feature image courtesy for this blog post: Image by Gerd Altmann from Pixabay

Portfolio हा शब्द वाचकांना परिचयाचा असेलच. गुंतवणुकीला सुरुवात करणाऱ्या वाचकांनी पोर्टफोलिओ म्हणजे काय हे वाचण्यासाठी Share market portfolio meaning in marathi हा लेख वाचावा.

थोडक्यात गुंतवणुकीच्या सगळ्या साधनांच्या संग्रहाला पोर्टफोलिओ असे म्हणतात. फक्त शेअर बाजाराच्या भाषेत सांगायचे झाल्यास कुणी खरेदी केलेले वेगवेगळे शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींना पोर्टफोलिओ म्हणता येईल.

How to build a dividend portfolio

What is a Dividend Portfolio? लाभांश पोर्टफोलिओ म्हणजे काय ?

ज्ञान ही शक्ती आहे हे वाक्य आपण ऐकले असेलच. हे Investing मध्ये सुद्धा खरेच आहे. पण इथे ज्ञान ही संभाव्य शक्ती आहे असे जर म्हटले तर वावगे होणार नाही. जेव्हा आपण आपले ज्ञान वापरून गुंतवणूक पोर्टफोलिओ Investment portfolio बनवू तेव्हा असा गुंतवणूक पोर्टफोलिओ आपल्याला फायदा देऊन जाईल अशी अपेक्षा आपण करू शकतो.

पोर्टफोलिओ बनवतांना आपण त्यात वेगवेगळ्या रणनीतीचा वापर करतो हे Share market portfolio meaning in marathi ह्या लेखात लिहिलेले आहेच. पण चहुबाजुंनी घसरत्या बाजारात ह्यातील बरेच शेअर्स काही काळासाठी जेमतेम प्रदर्शन दाखवतात. त्या काळात Growth, Return वगैरे विषय बाजूला राहतात.

Dividend Portfolio हा माझा एक आवडता विषय आहे. ह्यात अवास्तव लाभाची अपेक्षा न करता काही हिस्सा स्थिर शेअर्समध्ये गुंतवणूक केल्या जातो. असे शेअर्स घसरत्या बाजारात अजून आकर्षक बनतात. चांगला Dividend Portfolio आपल्या बाजूने काम करतो आणि आपण स्वतः काम करत नसतांना देखील आपल्यासाठी काम करतो. Passive income चे महत्व ओळखणाऱ्या वाचकांना ह्याबद्दल वेगळे सांगायला नको.

How to build a dividend portfolio हा लेख Dividend portfolio ह्या विषयावर केंद्रित आहे आणि ह्यात एक चांगला Dividend portfolio बनवण्यासाठी काय काय गोष्टी समजणे जरुरी आहे ह्या माहितीचा समावेश आहे.

How to build a dividend portfolio

how to build a dividend portfolio
Image by Alexsander-777 from Pixabay

How to build a dividend portfolio

What is dividend? लाभांश म्हणजे काय?

कंपनीच्या कमाईतून एक हिस्सा नियमित अंतराने Shareholders ना वाटप करणे म्हणजे Dividend -लाभांश- देणे होय. अर्थात त्यासाठी कंपनीची कमाई सातत्यपूर्ण -Consistent earnings- असली पाहिजे. आपण निवडलेल्या कंपनीचे प्रदर्शन कसे आहे ह्यावरून Dividend -लाभांश- हा तिमाही, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपाचा असू शकतो.

What is Dividend Yield ? Dividend Yield म्हणजे काय?

एखाद्या शेअरने फक्त जास्त Dividend दिला म्हणून तो घ्यावा एवढेच महत्वाचे नाही, त्या शेअरची किंमत किती व त्याने किती Dividend दिला ह्या दोन्ही गोष्टी इथे विचारात घेतल्या पाहिजेत. ह्यालाच Dividend Yield असे म्हणतात.

एका १०० रुपये किंमत असलेल्या शेअरने ५ रुपये Dividend दिला व दुसऱ्या २०० रुपये किंमत असलेल्या शेअरने १० रुपये Dividend दिला तर दोन्ही शेअरचे Dividend yield हे ५ % आहे [(५/१००) X १००] किंवा [(१०/२००) X १००]. शेअरच्या किमती ह्या वर्षभर बदलत असल्याने Dividend yield हे आपल्याला बदलते दिसते. घसरत्या बाजारात असे शेअर घेतल्यास Dividend Yield जास्त मिळते

How to build a dividend portfolio

High Dividend Yield is good? -उच्च लाभांश उत्पन्न- ही सर्वोत्तम निवड आहे का?

इथे high dividend yield ही एक आकर्षक गोष्ट वाटणे साहजिक आहे. जास्त Dividend दिला की Dividend yield वाढते किंवा शेअरची किंमत कमी झाल्यास सुद्धा हे Dividend yield वाढलेले दिसते.

जर किंमत खूप कमी झाली तर हे Dividend yield अजूनच वाढते. पण अशा वेळेस पुढील जाहीर होणारा Dividend हा कमी केल्या जाऊ शकतो किंवा कंपनीच्या कमाईत घट झाली तर एखाद्या वर्षी (किंवा तिमाही, सहामाही साठी) असा Dividend जाहीर न करणे शक्य आहे. हे त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार आणि कंपनीच्या धोरणांनुसार ठरते.

How to build a dividend portfolio

Benefits of Dividend Portfolio? लाभांश पोर्टफोलिओचे फायदे

Dividend Portfolio गुंतवणूकदाराला एक नियमित Cash Flow तर देतातच शिवाय Capital Appreciation चा सुद्धा लाभ देण्यात सक्षम असतात.

Cash Flow म्हणजे काय? हे वाचण्यासाठी My Favorite Book Essay in Marathi- Cash Flow Quadrant हा लेख वाचावा.

How to build a good Dividend Portfolio? चांगला लाभांश पोर्टफोलिओ कसा तयार करावा ?

गुंतवणुकीतील इतर साधनांत प्रचलित असलेल्या भिन्न मतांसारखेच, Dividend Portfolio कसा बनवावा? ह्यासाठी देखील अनेक वेगवेगळे मते असू शकतील.

ह्या लेखात How to build a good dividend portfolio ह्यासाठी काही सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे मांडलेली आहेत. कुशल गुंतवणूकदारांची ह्या संदर्भांत आपली वैयक्तिक मते असू शकतील.

how to build a dividend portfolio
Image by PublicDomainPictures from Pixabay

How to build a dividend portfolio

Buy Individual Stocks And/Or Buy Mutual funds/ETF शेअर्स किंवा म्युच्युअल फंड किंवा दोन्हींमध्ये गुंतवणूक करा

ह्यासाठी गुंतवणूकदार सातत्यपूर्ण कामगिरी दाखवणारे शेअर्स विकत घेऊ शकतो किंवा चांगली Dividend History असलेले स्थिरावलेले म्युच्युअल फंडस् निवडता येतील.

शेअर्स निवडताना पूर्व अभ्यास असणे आवश्यक ठरते. चांगले शेअर कसे निवडावे हा एक लांब आणि स्वातंत्र्य विषय आहे. म्युच्युअल फंडस् Units घेतल्याने आपण तज्ज्ञ फंड मॅनेजरच्या कौशल्याचा फायदा करून घेऊ शकतो.

Select Stocks/Mutual Funds With Consistent Track Record सातत्यपूर्ण कामगिरी असलेले शेअर्स किंवा म्युच्युअल फंड निवडा

Dividend Portfolio बनवतांना सातत्यपूर्ण कामगिरी असलेले शेअर्स किंवा म्युच्युअल फंड निवडणे योग्य ठरते. इथे Dividend Yield, Payout Ratio, Dividend History वगैरे बाबी तपासता येतील. ह्यासाठी अधिक आकडेवारी आपण Moneycontrol किंवा screener ह्यासारख्या financial websites वर पाहू शकतो.

How to build a dividend portfolio

Diversify investments गुंतवणुकीत विविधता ठेवा

आपला Dividend Portfolio बनवतांना गुंतवणुकीत विविधता असणे चांगली गोष्ट आहे. सगळी गुंतवणूक एक किंवा दोन शेअर्समध्ये किंवा सेक्टरमध्ये केंद्रित केल्याने पोर्टफोलिओ मध्ये जोखीम वाढू शकते.

म्युच्युअल फंड आणि ईटीएफ मधील गुंतवणूक ही आपोआपच वैविध्य प्रदान करते तरीही वेगवेगळ्या सेक्टर मधील म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

Plan for Downturn मंदीसाठी योजना करा

शेवटी, तुमचा Dividend Portfolio बनवतांना, तुम्ही मंदीसाठी देखील योजना करत असल्याची खात्री करा. हा देखील एक फारसा विचारात न घेतलेला आणि स्वातंत्र्य विषय आहे.

थोडक्यात इथे हे समजा कि जर कुणी Retirement साठी Dividend Portfolio बनवत असेल आणि त्याला सेवानिवृत्तीच्या काळात ‘क्ष’ रुपये प्रति महिना गरज असेल पण त्याच काळात जर अर्थव्यवस्थेत काही फरक पडल्याने Dividend च्या दरांमध्ये सुद्धा घट आली तर काय?

जरी ही जर-तर ची गोष्ट असेल तरीही आपल्या गुंतवणुकीला एक संरक्षण -Cushion- असणे फायद्याचेच ठरते. कदाचित लेखक आपल्या वैयक्तिक मताप्रमाणे ह्या गोष्टीला महत्व देत असावे. अशा वेळेस काही उत्पन्न इतर गुंतवणुकीतून मिळण्याची तजवीज करण्याचा विचार कुणी करू शकतो.

Investment Diary कशी लिहावी?

investment diary

Investment diary म्हणजे आपण नोंद केलेल्या गुंतवणुकीची एक वही. Track all your investments in one place by writing investment diary regularly.

Investment Diary म्हणजे काय ?

डायरी म्हटले कि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दुकानात सजलेल्या अनेक वेगेवेगळ्या प्रकारच्या आकर्षक diary डोळ्यासमोर येतात आणि ह्या वर्षात तरी आपण काही तरी विशेष लिहू ह्या आशेने बरेच जण (मी सुद्धा) ती विकत घेतात. पण ‘नव्याचे नऊ दिवस’ ह्या म्हणीप्रमाणे डायरीची काही पाने भरली की मग अनेकांची ती डायरी कपाटात किंवा पुस्तकांच्या ढिगाखाली लपत जाते आणि मग परत एक नवे वर्ष येण्याची चाहूल लागते.

Investment Diary म्हणजे ज्यात आपण गुंतवणुकीच्या नोंदी ठेवतो ती वही. असे म्हटले जाते कि कि जे लक्ष्य लिखित स्वरूपात असते तेच मिळवता येते. जे लिहिले जात नाही त्या नुसत्या फिरत राहणाऱ्या काल्पनिक गोष्टी. इथे लक्ष्य ह्यासाठी म्हटले आहे कि जेव्हा आपण Investment diary बनवतो त्यात लक्ष्य आणि ते गाठण्यासाठी केलेल्या कृती ह्या दोन्ही गोष्टी सोबत सोबत लिहिल्या जातात.

My Investment Diary

मला चांगले आठवते, मी २००७ साली अशाच एका डायरीमध्ये -investment diary- गुंतवणुकीचे पहिले लक्ष्य लिहिले होते. ते होते ‘शेअर बाजारात १ लाख रुपये गुंतवणे’. तेव्हा मी नागपूरला माझा पहिला जॉब करत होतो आणि मी ५००० रुपये देऊन NFO द्वारे पहिला वाहिला म्युच्युअल फंड विकत घेतला होता. पण ते लक्ष्य काही पूर्ण झाले नाही आणि यथावकाश मी घेतलेला फंड सुद्धा विकला.

मग नवीन नोकरीमुळे दोन तीन शहरात जाणे झाले आणि काही SIP वगळता खर्च वगैरे होत राहिल्याने core investment विषय बाजूला राहला. ह्या सगळ्या धामधुमीत फक्त सुटले किंवा दुरावले नाही ते म्हणजे माझे वाचन. उलट माझा पुस्तकांवरचा खर्च वाढत गेला आणि जसजसे माझे पुस्तकांचे कपाट भरत गेले तशा तशा माझ्या नोंदवह्यासुद्धा वाढत गेल्या. त्या Investment diary म्हणजेच नोंदवह्या आजही मी मध्ये मध्ये वाचतो.

Investment Diary कशी लिहावी?

आता Investment Diary कशी लिहावी हा काही फार कठीण विषय नाही, तरीही मला उपयोगी वाटलेल्या लिखाण पद्धती ह्या लेखात लिहिल्या आहेत.

investment diary

गुंतवणुकीचा हिशेब ठेवण्याच्या ह्या प्रवासात सुरुवातीला मला नेहमीच कठीण वाटणारी गोष्ट म्हणजे जी माहिती आपण लिहिली आहे ती नेमकी कोठे लिहिली आहे हे शोधणे किंवा आठवणे. कारण माहितीच्या ढिगामध्ये एखादी छोटी नोंद लगेच शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखे होय. ह्या गोष्टीत माझा बराच वेळ बरेचदा व्यर्थ गेला आहे.

सुरुवातीला एका वर्षात माझ्या २-3 डायरी संपत असत. दरमहा SIP ने केलेल्या गुंतवणुकी, त्याचे पूर्ण विवरण, घेतलेल्या विकलेल्या शेअरचे विवरण, झाला असेल तर फायदा नाहीतर बऱ्याच शेअरमध्ये झालेले काही नुकसान; अशी सांगोपांग माहिती त्यात लिहिल्या जायची. त्यातल्या त्यात वर्तमानपत्रातील आणि गुंतवणूक मासिकातील मार्गदर्शन आपल्या शब्दांत लिहिणे आणि नवीन गुंतवणूक कुठे करायला हवी त्याची माहिती सुद्धा त्याच डायरीत लिहिली जात असे आणि कालांतराने ती डायरी मग कपाटात इतर पुस्तकांच्या बोझ्याखाली पडून राहायची.

सुरुवातीला असे होणे काही नवीन गोष्ट नसावी, परंतु एके दिवशी मी ह्या अव्यवस्थितपणातून एक धडा घेतला. नवीन डायरी च्या सुरुवातीला index लिहिणे आणि संबंधित माहिती त्याच भागात लिहिणे पक्के केले. हेतू एकच- जुन्या नोंदी शोधतांना उगाच जास्तीचा वेळ जायला नको.

Some Tips for Writing Investment Diary

Investment diary लिहितांना किंवा tracking all investment at one place करतांना मला उपयोगी वाटलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे:

  1. सुरुवातीच्या काही पानांवर वेगवेगळे user id, passwords इत्यादी लिहिल्याने, विसरल्यास वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात.
  2. म्युच्युअल फंडाचे तीन-सहा महिन्याच्या printed statements चिपकवता येतील. NAVमध्ये जास्त बदल होत असतील तर असा फरक दर महिन्याला लक्षात ठेवून अतिरिक्त Buying करता येणे शक्य होते. SIP च्या तारखेला आलेले SMS पाहून अशी नोंद लगेच सुद्धा करता येते पण ह्यात सातत्य हवे.
  3. खूप साऱ्या शेअरमध्ये कमी कमी संख्येत वारंवार खरेदी विक्री केल्यापेक्षा ५०-१०० अशी संख्या ठरवून किंवा एका शेअरमध्ये ५ किंवा १० हजार अशी रक्कम ठरवून घेतली तर मग नोंदवहीत लिहायला व त्यावर लक्ष ठेवायला सोपे होते.
  4. मोठ्या डायरीशिवाय एक छोटी खिशातील डायरी जवळ बाळगल्यास त्यात बारीक सारीक नोंदी करता येतात ह्याच नोंदी मग मोठया डायरीत उतरवू शकतो.
  5. अतिरिक्त मिळालेल्या पैशांचा हिशेब ठवण्यासाठी एक वेगळा भाग अनुक्रमणिकेत समाविष्ट करावा. बोनस, पगारवाढ किंवा अजून काही मानधन वगैरे सारखी रक्कम दोन तीन विशिष्ट शेअरमध्ये, फंड मध्ये किंवा gold bond मध्ये गुंतवता येईल. असे केल्याने लांबच्या काळात असे मिळालेले पैसे कोठे गुंतले आहेत आणि त्याची वर्तमान स्थिती काय आहे हे लगेच समजून येते.
  6. Goal setting साठी एक भाग वेगळा असावा. ह्यात दर तीन महिन्याने लक्ष द्यावे. असे केल्याने आपल्याला भूतकाळातील आणि भविष्यकाळातील गुंतवणुकीमध्ये ताळमेळ बसवता येतो.
  7. मी सुरुवातीला बऱ्याच online website वर अशा नोंदी ठेवायचो पण कालांतराने त्यापेक्षा हाताने लिहिलेल्या नोंदी मला जास्त सोयीस्कर वाटल्या.
  8. Moneycontrol सारख्या website वर एकदा SIP ची तारीख, पहिली NAV अशी काही माहिती भरली कि मग भविष्यातील प्रत्येक सिप ची NAV व प्राप्त युनिट्स आपोआप update होत राहते. त्यात एकूण पोर्टफोलिओ आणि त्यात काय बदल झाला ते सुद्धा लगेच समजते. भूतकाळातील प्रत्येक महिन्याच्या गुंतवलेल्या रक्कमेत (SIP) फायदा आहे कि तोटा हे सुद्धा कोणत्याही दिवशी पाहता येते. त्यानुसार कोणत्या NAV च्या आसपास जास्तीची खरेदी करावी ह्याचा एक अंदाज येऊ शकतो. एखाद्या long term च्या म्युच्युअल फंड SIP साठी अशी tracking method उपयोगी असू शकते.
  9. एकंदर सगळ्या श्रेणीतील गुंतवणुकी एका जागी पाहण्यासाठी आपण स्वतः तयार केलेली Excel ची एक spreadsheet वापरू शकतो. ह्याला Investment at a glance असे नाव देता येईल. ह्या file ला दर तीन महिन्याने update करता येईल.
  10. एका वर्षात किती लाभांश मिळाला ह्यासाठी एक वेगळा विभाग डायरीत असावा. शेअरचे व म्युच्युअल फंडचे नाव , शेअरची संख्या किंवा MF युनिट्स किती होते? किती Dividend per share किंवा Per unit मिळाला हे लिहिता येईल. दर वर्षीच्या डायरीतून हा आकडा मिळाला कि मग किती वर्षात किती लाभांश मिळाला? त्याचे Dividend yield किती वगैरे गोष्टी समजू शकतात. वार्षिक रिटर्न मध्ये हा लाभांश जोडावा म्हणजे एकूण खरा रिटर्न किती हे समजून येईल.

Investment diary लिहितांना आपल्याला काय मुद्दे जास्त महत्वाचे वाटतात? टिप्पणी करून जरूर कळवा.

हे सुद्धा वाचा: Financial planning in marathi

Value investing and Behavioral Finance

value investing and behavioral finance

Value investing and behavioral finance: Insights into Indian Stock Market Realities

Value investing and behavioral finance

Investment wisdom, Value investing, Trading tricks, Lectures, Seminars, Join our channel, Chart sites, Investment gurus ह्यांनी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया ओतप्रोत भरलेला आहे. प्रत्येक जागी जबरदस्त यशाची हमी, जगावेगळी रणनीती, हमखास परतावा इत्यादींची तोंडभरून केलेल्या जाहिराती दिसून येतात. पण कोणत्या मार्गाने किती रिटर्न मिळाला हे खरे सांगणारे कमीच असावेत किंवा कुणी सांगितलेला रिटर्न हा किती खरा किती खोटा हे तपासण्याची काही सोय नाही. त्यामुळे अशा गोष्टी नुसत्या ऐकण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसते. शेवटी कोणत्या इन्व्हेस्टमेंट पद्धतीचा आपल्याला कसा आणि किती फायदा झाला आणि कोणत्या पद्धतीने आपले किती नुकसान झाले हे ज्याचे त्यालाच चांगल्या प्रकारे ठाऊक असते.

सगळ्या क्लुप्त्या  माहित असूनही एखाद्याला गुंतवणुकीत नुकसान कसे होऊ शकते? ह्याचे एक उत्तर ‘ झटपट फायद्याच्या इच्छेवर नियंत्रण नसणे’ हे असू शकते. Delayed gratification ही संकल्पना मला आवडते. जेव्हा कुणी Delayed gratification च्या विरुद्ध काम करतो तेव्हा त्याची greed जास्त असते आणि financial market मध्ये अशा वेळेस तो अडचणीत सापडतो.

Delayed gratification ला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो. Delayed gratification म्हणजे दीर्घकाळाने मिळणाऱ्या मोठ्या आणि जास्त टिकाऊ बक्षिसासाठी (more favorable reward at a later time) त्वरित मिळणाऱ्या छोट्या बक्षिसाच्या (immediate reward) आमिषाला बळी न पडणे म्हणजे होय. हे Delayed gratification म्हणजे आजच्या छोट्या आनंदाला पुढे ढकलणे सुरुवातीला कठीणच काम असते. पैशांच्या आणि गुंतवणुकीच्या क्षेत्राशिवाय ही संकल्पना अजूनही अनेक क्षेत्रात काम करते. ह्या गोष्टीला समजण्याअगोदर मी कित्येक चांगले शेअर्स छोट्या फायद्यात विकले होते.

Value investing and Behavioral Finance

‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अशी मराठीत एक म्हण आहे. त्यालाच अनुसरून Value investing, Long term investment, Capital protection वगैरे वगैरे शब्द बोलणारे, बाजार लाल अंकात डुबकी मारताना ह्याउलट आचरण करताना दिसतात. म्हणजेच  शब्द आणि कृती ह्यात फरक आढळतो. गर्दीपासून दूर होण्याची भीती आपल्याला crowd behavior चे अनुसरण करायला भाग पाडते.

आता ह्या सगळ्या विषयाला उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाकडे वळूया. Value Investing and Behavioral Finance: Insight into Indian Stock Market Realities हे लेखक पराग पारीख ह्यांनी लिहिलेले पुस्तक वाचकाला गुंतवणूक विषयात बऱ्याच खोलात घेऊन जाते. पराग पारीख ह्यांची लेखनशैली मला आवडून गेली. एक वाचक म्हणून मी जसे विस्तृत लिखाण अपेक्षित करतो तसे भेटल्यावर जसे समाधान होते ते मला हे पुस्तक वाचतांना जाणवले.

खऱ्या वाचकाला जसजसा वाचनाचा आनंद मिळत जातो तसतसा तो पुस्तकाचे पुढील पान उलगडत जातो. एक वाचक म्हणून मी जसे विस्तृत लिखाणाची अपेक्षा करतो त्याला आठवण ठेवून “पैसा मंत्र” ह्या Marathi Money Blog वरील बरेच लेख विस्तृत स्वरूपात लिहिले आहेत आणि ह्यातील बरेच लेख सर्च इंजिन द्वारे  शीर्ष स्तरावर आहेत ह्याला वाचकांची पसंतीच  म्हणावी लागेल.

value investing and behavioral finance

Value investing and Behavioral Finance

एकूण 12 धड्यात लिहिलेल्या  ह्या पुस्तकातील सामग्री बघूया.

1. Success and Failure

ह्या प्रकरणात सुरुवातीलाच लोक अयशस्वी का होतात? ह्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. अगोदरच्या काळापेक्षा अधिक माहिती ती सुद्धा सोप्या पद्धतीने उपलब्ध असतांना देखील लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी का होतात ? अर्थशास्त्र्यांच्या मते Economic failure साठी inability to delay gratification हे एक प्राथमिक कारण असावे.

Instant gratification आपल्याला अडचणीत आणू शकते. Instant gratification म्हणजे आता पैसे दिले तर आताच सेवा/वस्तू/परतावा पाहिजे. ह्यात लोक वेळेला शून्य महत्व ठेवतात. आज शेअर घेतला कि आज किंवा उद्याच वाढला पाहिजे ही अपेक्षा जेव्हा शेअरची किंमत घसरते तेव्हा निराशाच देणार.

ह्याउलट Delayed gratification म्हणजे त्वरित काहीतरी मिळवण्याच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे होय. Delayed gratification मी कित्येकदा वापरतो आणि ह्यामुळे बरेचदा आपल्या पैशांची बचत देखील होते. Impulse buying मुळे आपल्याला तात्काळ योग्य निर्णय घेणे कठीण होते पण ह्याला थोडा वेळ दिला कि मग आपण जास्त चांगल्या प्रकारे निर्णय घेतो असे काही कारण ह्यामागे असावे.

खरे तर, मानवी स्वभावाच्या नैसर्गिक गुणांमुळे मनुष्य हा मुळातच काही मिळवण्यासाठी त्वरित व सोप्या पद्धतीला महत्व देतो आणि सामान्यतः गोष्टी लवकर मिळाव्यात म्हणून तो प्रयत्नशील असतो. त्यामुळे ही गोष्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतांना तशी सामान्यच म्हटली पाहिजे. पण सगळेच जण अशा गोष्टी करतील तर मग ती गर्दीची मानसिकता -Herd mentality-होते.

गोष्टी सोप्या मार्गाने व लवकर मिळवणे ह्याचे दैनंदिन जीवनात खालील काही उदाहरणे पाहता येतील. Crash course साठी मोठी रक्कम भरून लगेच चांगला निकाल मिळण्याची अपेक्षा ठेवणे, नोकरी लागल्या-लागल्याच मोठी गाडी घेणे, जितके वेतन फक्त तेवढेच काम करण्याची मानसिकता, सोपे पण यशस्वी जीवनासाठी अनुपयोगी असणारे काम करणे; ह्याउलट कठीण पण यशस्वी जीवनासाठी उपयोगी काम न करणे वगैरे वगैरे.

2. Understanding behavioral trends

Equity market ला Volatile आणि Risky म्हटले जाते. ह्याउलट Fixed instruments ला Safe आणि Stable म्हटले जाते. पण जर Inflation factor विचारात घेतला तर Fixed हे जास्त Risky ठरू शकते. ह्यासाठी लेखकाने 1991 ते 2007 च्या दरम्यानचा Sensex चा परतावा दिला आहे.

Equity market मध्ये दोन प्रकारचे परतावे मिळू शकतात. एक तर कंपनीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे तिच्या कमाईत व पर्यायाने संपत्तीत झालेली वाढ; जी की Dividend वगैरे स्वरूपात दिसते आणि दुसरे Speculative म्हणजे लोकांच्या मतानुसार शेअरच्या किंमतीत झालेला बदल.

आपल्या शेअरची खरेदी किंमत ही त्या शेअरवरील परतावा किती हे ठरवते. जेवढी खरेदी किंमत कमी तेवढा भविष्यातील परतावा जास्त (सगळ्या गोष्टी वेळेनुसार व्यवस्थित चालल्या तर). पण Market, Greed आणि Fear च्या मध्ये झुलत असल्याने आपली शिस्त तेवढी महत्वाची ठरते.

3. Behavioral obstacles to value investing

ह्या प्रकरणात परत एकदा Behavioral finance हे Investing च्या क्षेत्रात कसे काम करते ह्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. Behavioral finance साठी Stocks to Riches हा लेख वाचता येईल. हरणारे शेअर्स जवळ ठेवतांना जिंकणारे शेअर्स विकणे हे Behavioral finance चा परिणाम आहे. Asset Allocation आणि Risk Aversion बद्दल लिहिताना लेखक म्हणतो, Asset Allocation म्हणजे गुंतवणूक कशी करावी? ह्याच्या सुद्धा अगोदर उचललेले पाऊल होय.

Asset Allocation म्हणजे काय हे वाचण्यासाठी Asset Allocation हा लेख वाचावा. ह्या प्रकरणात Value investing व Growth investing बद्दल सुद्धा बऱ्याच विस्ताराने लिहिलेले आहे. Value investing म्हणजे काय हे वाचण्यासाठी Value investing हा लेख वाचता येईल.

4. Contrarian Investing: The psychology of going against the crowd

Contrarian Investing हा एक माझा आवडता विषय आहे. Contrarian Investing अंमलात आणायला नक्कीच कठीण आहे, हे मी तरी अनुभवले आहे. हे जरी एकदम सोपे नसले तरी ह्यावर काम करताना आपण बऱ्याच गोष्टी शकतो.

एका शेअरमध्ये बऱ्याच दिवस मी चिकटून होतो पण तो अचानक घसरत असताना मी माझी धारणा सोडून त्यातून बाहेर पडलो आणि काही दिवसांनी तो पूर्व स्थितीला येऊन मग त्यात वरच्या दिशेने प्रगती झाली. त्याचा अभ्यास करून मग पुढे अशा स्थिती मला काही अंशी टाळता आल्या.

सगळेच चुकले तर मग आपली चूक आपल्याला चूक वाटत नाही तसेच एखाद्या जवळ असलेल्या एखाद्या शेअरची किंमत घसरली आणि बऱ्याच लोकांजवळ हा शेअर असला व त्यांचाही परतावा Negative असला कि मग कुणाला जास्त दुःख होत नसावे.

पण इतरांच्या नुकसानीमुळे आपल्या नुकसानाला काही योग्य म्हणता येणार नाही. त्यामुळे यशस्वी Contrarian investing कसे करावे? ह्याबद्दल हा धडा महत्वाचा वाटतो.

ह्या प्रकरणात Contrarian Investing म्हणजे काय? आणि ते अंमलात आणायला कसे कठीण आहे ह्यावर सविस्तर लिहिले आहे. Conventional vs Contrarian portfolio बद्दल विस्तृत स्वरूपात लिहिले आहे. जोडीला दोन portfolio चे 1995-96 ते 2005-06 मधील Average PE चे तुलनात्मक विश्लेषण दिलेले आहे आणि Contrarian portfolio चा परतावा कसा जास्त भरला हे स्पष्ट केले आहे.

5. Growth trap: 

एखादी चांगली वाटणारी कंपनी ही चांगली गुंतवणूक आहे आणि ती पुढे वाढेलच असा ठाम विश्वास ठेऊन शेअर्स खरेदी करणे म्हणजे Growth trap होय. Benjamin Graham ने सुद्धा त्याच्या The intelligent investor ह्या प्रसिद्ध पुस्तकात सांगितले आहे कि एखाद्या कंपनीची Growth ही Investor च्या संपत्तीत देखील वाढ करेल हे जरुरी नाही.  कंपनी वाढते पण त्याचे प्रतिबिंब गुंतवणूकदाराच्या फायद्यात दिसत नाही हा Growth trap बऱ्याच ठिकाणी आढळतो.

6. Commodity investing:

Commodity stocks लोक का विकत घेतात? आणि त्यासाठी काय Research करावा? Commodity cycles बद्दल लिहिले आहे. ह्या विषयात Behavioral finance चे महत्व मांडलेले आहे.

7. Public Sector Units मध्ये PSU company बदल इत्यंभूत माहिती दिली असून खाजगी कंपन्यांच्या growth story ने दिपून जाऊन तुलनेने PSU ला कुणी दुय्यम ठरवत असेल तर त्यांच्यासाठी हे प्रकरण वाचनीय ठरते. अनेक PSU कंपन्यांची growth story आणि त्यांनी दिलेले लाभांश प्रमाण बघितले तर असे PSU stocks आपल्या पोर्टफोलिओ मध्ये अवश्य असावेत असे वाटते.

8. Sector investing ह्या प्रकरणात sector investment ह्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. जो सेक्टर favorable आहे त्यातील कंपन्यात गुंतवणूक करणे व फायदा करून घेणे ही एक सर्रास आढळणारी रणनीती आहे. पण परत एकदा सगळेच जण जर एकाच रणनीतीवर काम करतील तर तर मग किती वाढ अपेक्षित असेल हा प्रश्न नक्कीच येतो.

9.Initial public offerings मध्ये मागील २ दशकापासून IPO चा performance काय? Investor ह्यातून काय धडा घेऊ शकतात?  लोभ कसा अडसर ठरतो? हे स्पष्ट केले आहे. IPO Value investor साठी नाही कारण Value ही Bear market मध्ये मिळते व IPO हे Bull market मार्केट चे Product आहे. 

10. Index investing:

ह्यात Index investing बद्दल भरपूर माहिती दिलेली आहे. Index investing काय आहे आणि गुंतवणूकदारांनी index investing का करावी हे काही उदाहरणांच्या मदतीने स्पष्ट केले आहे. Index investing बद्दल अधिक वाचण्यासाठी Index fund in marathi हा लेख वाचक वाचू शकतात.

11. Bubble trap:

Bubble म्हणजे बुडबुडा आणि बुडबुडा म्हटला कि तो कधीतरी फुटणारच. Stock market मध्ये Bubble का बनतो? आणि त्यात Behavioral finance ची कशी भूमिका असते? ह्यावर ह्या प्रकरणात भाष्य केलेले आहे. Bubble formation कसे ओळखावे? आणि गुंतवणूकदाराने ह्यातून काय धडा घ्यावा? हे सुद्धा लिहिले आहे.

अधिक आशावाद, गुंतवणूकदारांचा लोभ आणि अति आत्मविश्वास बुडबुड्याला कारणीभूत ठरतात. कुण्या शेअर्सच्या अति प्रेमात पडू नये हा ह्या प्रकरणातील मुद्दा मला आवडून गेला. Stocks to Riches ह्या पुस्तकात सुद्धा बुडबुडा  कसा निर्माण होतो, वाढतो व फुटतो हे लिहिले आहे. गर्दीची मानसिकता बाजाराला Bull व Bear market बनवते. Stocks to Riches ची समीक्षा वाचण्यासाठी Investment book in marathi हा लेख वाचता येईल.

12. Investor behavior based finance: एखाद्या शेअरची किंमत ही त्या कंपनीची खरी Value नसते. शेअरची किंमत तर एक गुंतवणूकदारांच्या समजावर आधारित एक किंमत असते. गुंतवणूकदार जर त्या कंपनीवर आशावादी असतील तर ही किंमत वाढते आणि ह्याउलट जर अधिक आशावादी नसतील तर त्याची किंमत कमी होते.

गुंतवणूकदारांची भूमिका एखाद्या कंपनीसाठी महत्वाची असते. एखाद्या कंपनीचे प्रदर्शन जसे shareholders साठी महत्वाचे असते तसे shareholders सुद्धा कंपनीसाठी तेवढेच महत्वाचे असतात. त्यामुळे त्यांच्या वर लिहिलेले हे प्रकरण वाचकांना अधिक माहिती देऊन जाते.

सारांश: Value investing and Behavioral Finance

थोडक्यात Value investing and behavioral finance: Insights into Indian Stock Market Realities ह्या पुस्तकाचे वाचन मला बाकी कामांच्या गराड्यात बरेच दिवस पुरले. काही पुस्तके एकदा वाचून त्यातील मजकूर पूर्णतः लक्षात राहत नाही, कारण अशी पुस्तके दर्जेदार आणि विस्तृत लिखाणाने परिपूर्ण असतात.अशा पुस्तकांचे मध्ये मध्ये किंवा एखाद्या गुंतवणूक रणनीतीवर काम करतांना गरज पडल्यास वाचन करता येते.

Value investing and behavioral finance by Parag Parikh हे पुस्तक ह्याच पठडीतील आहे. McGraw Hill ने प्रकाशित केलेले Value investing and behavioral finance हे पुस्तक English भाषेत लिहिलेले आहे आणि आतील दर्जेदार मजकुराप्रमाणेच पुस्तकाची Hardcover बांधणी आणि Page quality सुद्धा उत्कृष्ट आहे.

share market portfolio meaning in marathi

share market portfolio meaning in marathi

share market portfolio meaning in marathi

शेअर मार्केट मध्ये Portfolio किंवा Portfolio management असे शब्द वारंवार कानावर पडतात किंवा वाचनात येतात. ह्या लेखात ह्याच विषयावर काही माहिती लिहिलेली आहे.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना जोखीमीचे व्यवस्थापन म्हणजेच Risk management करणे महत्वाचे ठरते. आपल्या अपेक्षेनुसार बाजारातील परतावा मिळाला नाही किंवा परतावा वजा चिन्हात गेला तर आपण काय करणार? किंवा किती वेळ काय रणनीती वापरणार? ह्यावर गुंतवणुकीचे कमी अधिक यश अवलंबून असते आणि ह्या सगळ्यामध्ये Portfolio मधील वाटप प्रमाण Asset Allocation महत्वाचे ठरते.

What is portfolio in marathi

Portfolio पोर्टफोलिओ म्हणजे आपल्या वेगेवेगळ्या वर्गातील असलेल्या सगळ्या गुंतवणुकी. ह्यात shares, Mutual funds, ETF, Liquid funds, Bonds, सोने किंवा Gold Bonds, मुदती ठेवी हे सगळे येईल.

अजून विस्तारित स्वरूपात बोलायचे झाल्यास Real Estate, Cash in hand ची पण नोंद ह्यात ठेवता येईल. एकंदर आपली Net worth सांगणारा तक्ता म्हणजेच पोर्टफोलिओ.

Share market portfolio meaning in marathi

शेअर बाजारातील Portfolio पोर्टफोलिओ म्हटला कि वरकरणी कुणी किती कंपन्यांचे शेअर्स घेतले आहेत हा साधा अर्थ आपण लक्षात घेतो पण शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकी जसे कि वेगवेगळे म्युच्युअल फंडस्, ETF, index funds ह्याचा सुद्धा ह्यात समावेश होईल.

म्युच्युअल फंडस् तसे बरेच गुंतवणूकदार दीर्घ काळासाठी घेतात पण त्यामानाने शेअर्स मध्ये buying/selling कमी अंतराने सुरूच असते म्हणजेच शेअर्सचा पोर्टफोलिओ -share market portfolio- हा बदलता राहतो. त्यातही बरेच जण काही विशिष्ट शेअर्समध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक तर काही शेअर्समध्ये कमी वेळेसाठी ट्रेडिंग करून फायदा करून घेण्यासाठी आपली गुंतवणूक योजना बनवतात.
असा हा विस्तृत पोर्टफोलिओ म्हटला कि ह्याचे नियोजन काही फार सोपे नसते. सगळ्या गुंतवणुकीची नोंद ठेवणे, Buy price, Sell price, Profit/ Loss, Holding period इत्यादीची लक्षपूर्वक नोंद ठेवावी लागते. मी ह्या सगळ्यासाठी अगोदर लिखित आणि मग excel मध्ये नोंदी ठेवण्याची सवय लावली आहे.

एका निश्चित अवधीनंतर सगळ्या गुंतवणुकीत काय बदल झालेत, वेळेनुसार परतावा कमी झाला कि वाढला ह्या गोष्टींचा अभ्यास करायचा आणि मग निर्णय घ्यायचा असे काहीसे करता येईल. आता ब्रोकर कडून मिळालेले statement पाहले कि Profit, loss च्या नोंदी एका ठिकाणी कळण्याची पण सोय आहे.
प्रत्येकाची असा अभ्यास करण्याची शैली वेगवेगळी असेल. Long term च्या शेअर्स मध्ये जमा करण्याची वेळ बघून नवीन खरेदी करता येईल तसेच Short terms च्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळाला कि बाहेर पडण्याची योग्य वेळ होईल.

म्युच्युअल फंड्स मध्ये सहसा गरज नसल्यास गुंतवणूक कायम ठेवता येईल पण जोडीला अनपेक्षित घसरणीच्या वेळेस जास्तीची रक्कम गुंतवण्यासाठी एक चांगला हिस्सा liquid funds मध्ये सुद्धा ठेवता येईल. शेवटी शेअर मार्केट म्हटले कि चढ उतार हा आलाच.

Types of portfolio in marathi

Portfolio मधील allocation नुसार Portfolio चे Aggressive, Defensive, Income, Speculative असे काहीसे वर्गीकरण करता येईल. ह्यालाच Conservative, Moderate, Aggressive अशा समूहात सुद्धा विभागता येते.

ह्यातील प्रत्येक गटाच्या नावानुसार हे पोर्टफोलिओ कमी अधिक चढ-उतार, जोखीम, स्थिरता-अस्थिरता दाखवतात.

‘पैसामंत्र’ च्या लेखकाचा कल Defensive आणि Income Portfolio कडे तुलनेने अधिक असल्यामुळे Aggressive आणि Speculative वर इथे जास्त लिहिण्यात आले नाही.

share market portfolio meaning in marathi

How to make good share market portfolio

Share market portfolio in marathi वर इतकी चर्चा झाल्यावर आता एक चांगला share market portfolio कसा निर्माण करावा हा प्रश्न समोर येणे साहजिक आहे. चांगला पोर्टफोलिओ म्हणजे एका अवधीत चांगला फायदा करून देण्यात उपयोगी असणारे शेअर्स, म्युच्युअल फंड्स , ETF इत्यादी.

असा पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष गुंतवणुकीआधी योजना जरुरी असेल किंवा आधीच असलेली गुंतवणूक परत नव्याने वेगवेगळ्या प्रमाणात Allocate करणे शक्य आहे.

“भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानामुळे उद्भवलेल्या चिंतेपेक्षा सध्या कमी लाभावर समाधान मानणे हे मी योग्य मानतो” असे एक वाक्य मी वाचले होते आणि ते मला आवडले देखील. पण वेगवेगळ्या विचारसरणीच्या गुंतवणूकदारांना वेगेवेगळी रणनीती आवडेल आणि कोणतीही एक रणनीती सगळ्यांनाच उपयोगी वाटणार नाही हे तितकेच खरे आहे.

Share market portfolio निर्माण करताना खालील काही सामान्य गोष्टींवर विचार करता येईल.

  1. Sector wise Stock Selection
  2. Selecting Segment leader company
  3. Decide percentage allocation in each sector
  4. Decide percentage allocation in stocks of each sector
  5. For income portfolio, select dividend paying stocks (Add in parts in market correction at specific levels subjected to market situation)
  6. Avoid buying direct stocks (Or buy in less quantity) which are already in your mutual fund portfolio
  7. Always allocate funds on basis of which type of investor you are.

शेवटी Portfolio management म्हणजे एक दोन शेअर्समध्ये झालेल्या फायदा किंवा नुकसानीपेक्षा एकूण पोर्टफोलिओचा परतावा बघणे आणि गुंतवणूकदाराला साजेशा Asset Allocation नुसार त्यात बदल करणे किंवा कायम ठेवणे असे म्हणता येईल.

एखादा Asset समूह तेजीत असताना काही लाभ काढून घेऊन दुसऱ्या Asset समूहात गुंतवून Portfolio Rebalance सुद्धा करता येईल किंवा बाजार मंदीत असताना अतिरिक्त Cash किंवा liquid/Debt मधील गुंतवणूक equity त टाकून Portfolio returns boost सुद्धा करता येईल.

हे सुद्धा वाचा: Asset allocation म्हणजे काय?

Bearish Candlestick Chart Patterns

Bearish Candlestick Chart Patterns

Basics of Bearish Candlestick Chart Patterns

Candlestick chart बद्दल माहिती वाचल्यास एखाद्या शेअरच्या किंमतीतील होणाऱ्या बदलामुळे एकतर Bullish candlestick chart patterns तयार होतात किंवा Bearish candlestick chart patterns तयार होतात हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. कधी फक्त एक कॅण्डल पुढील किंमतीचा अंदाज पुरवू शकते तर कधी दोन तीन कॅन्डलच्या समूहाने अशी किंमतीतील शक्यता सांगता येते. हे चार्ट कसे वाचावे ह्याबद्दल वाचण्यासाठी कॅन्डलस्टिक चार्ट कसा वाचावा? हा लेख वाचता येईल.

जेव्हा सगळ्या बाजूने फारसे आशादायक चित्र नसेल तेव्हा अनेक शेअरच्या किंमती कमी होताना दिसतात. घसरणीच्या काळात investors ची ही खरी परीक्षा असते. आपण केलेली गुंतवणूक जर कमी वेळेसाठी असेल तर मग अशा वेळेस योग्य किंमतीवर थोडे नुकसान सोसून ह्या शेअर्स मधून बाहेर निघणे काही गुंतवणूकदार पसंत करतात. मात्र अशी वेळ ओळखणे ही पण एक परीक्षाच असते. त्यासाठी जिज्ञासू वाचकांना Bearish Candlestick Chart Patterns चा अभ्यास उपयोगी ठरू शकतो.

Some common Bearish Candlestick Patterns

Hanging Man Pattern

HANGING MAN PATTERN हा शेअर्समधील मंदीचा REVERSAL CANDLESIC PATTERN आहे ज्यामध्ये मुख्य भाग (BODY) लहान असून खालच्या दिशेने एक लांब सावली (SHADOW) दिसते.
जेव्हा हा पॅटर्न UPREND च्या शेवटी दिसतो तेव्हा ह्यापुढे अजून किंमत वाढणार नाही असा एक अंदाज असतो आणि ह्यावेळेस चालू असलेल्या किमतीत अजून जास्त वाढ न होता पुढे किंमतीत घसरण येईल अशी शक्यता असते.

Bearish Engulfing Pattern

Engulf म्हणजे पूर्ण झाकून घेणे. ह्या Pattern मध्ये दोन कॅण्डल दिसतात. पहिली green candle ही लहान असते व पुढील red candle ही अगोदरच्या green candle ला पूर्णपणे झाकून घेऊन आपला Bearish trend दाखवते. पहिल्या तेजीच्या green candle ला पूर्णपणे निष्प्रभावी ठरवून पुढील red candle आपला घसरणीच्या दिशेतील हेतू दर्शवते.

bearish candlestick chart patterns bearish engulfing

Dark Cloud Cover

जेव्हा शेअरचा कल जास्त काळासाठी तेजीकडे असतो तेव्हा uptrend च्या शेवटी पहिली green व नंतर red candle निर्माण होते अशा वेळेस Reversal trend दर्शविला जातो. Red candle मागील दिवसाच्या बंद (close) किमतीपेक्षा वर (high) उघडते व अर्ध्यावर किंवा त्यापेक्षा कमी किमतीवर बंद होते.

dark cloud cover bearish candlestick pattern

Evening Star

Evening Star हा सुद्धा एक मंदीचे भाकीत वर्तवणारा Bearish Candlestick Pattern आहे. एखाद्या शेअरमधील तेजीचा कल संपुष्टात आल्याचे सूचित करणारा हा Pattern आहे. ह्यात पहिली green candle दिसते आणि त्यानंतर एक लहान candle कि जी पहिल्या candle पेक्षा high open आणि close किंमत दाखवते. तिसरी red candle परत bearish trend दाखवते. दुसरी लहान candle ही अनिर्णयाची स्थिती दर्शवते.

Evening Star Bearish Candlestick Pattern

Gravestone Doji

एखाद्या शेअर मध्ये जेव्हा सलग खरेदीचा जोर असतो तेव्हा एखाद्या निश्चित किमतीवर खरेदीदार थकल्याचे लक्षण दाखवतात. अशा वेळेस green candle मागील candle पेक्षा जास्त किमतीवर उघडते पण खरेदीदार त्या किमतीवर जास्त वेळ किंमत कायम ठेवू शकत नाहीत आणि विक्रते किंमत खाली आणतात. ह्यामध्ये वरच्या बाजूची मोठी सावली दिसते.

Gravestone Doji bearish candlestick chart pattern

ह्याव्यतिरिक्त आणखी Bearish Candlestick Chart Patterns आहेत. हे एखाद्या शेअरच्या किंमतीत होणाऱ्या बदलाचे संकेत देऊ शकतात आणि येऊ घातलेल्या bearish trend ची चाहूल देऊ शकतात.

Asset allocation in marathi

Asset allocation in marathi

Asset allocation in marathi

Asset allocation म्हणजे गुंतवणूक करतांना अगोदर ठरवलेली एक अशी योजना की ज्यामुळे गुंतवणुकीची एकूण रक्कम विविध Asset class मध्ये गुंतवली जाते; जेणेकरून गुंतवणुकीतील धोका कमी होईल. हे Asset Class तीन वर्गात मोडतात: Equity, Fixed Income आणि Cash. तसे संपत्तीचे अजूनही अनेक Asset class आहेत पण ते इथे गृहीत धरले नाहीत.

What is Asset allocation in marathi? Asset allocation म्हणजे काय?

Asset म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता आणि Allocation म्हणजे अशा संपत्तीची कोठेतरी केलेली काही प्रमाणात गुंतवणूक. Asset allocation हे एक असे गुंतवणूक धोरण आहे की ज्याचा उद्देश गुंतवणूकदार व्यक्तीच्या Goals, Risk tolerance आणि Time Horizon नुसार पोर्टफोलिओच्या रक्कमेचे विभाजन करून Risk आणि Reward संतुलित करणे हा आहे. व्यक्तिपरत्वे ह्या तीन वर्गातील (Equity, Fixed Income आणि Cash) गुंतवणूक प्रमाण कमी अधिक असू शकते आणि त्यानुसार त्यातील परतावा हा सुद्धा कमी अधिक असेल.

Why Asset allocation is important? Asset allocation का महत्त्वाचे आहे?

ह्याच्याशी काही मिळतीजुळती एक गोष्ट आठवली. मी शिकत असतांना बाहेर राज्यातून घरी येण्यासाठी प्रवासात होतो, तेव्हा अचानकच वडिलांनी सांगितलेली एक सूचना आठवली कि प्रवास करतांना कधीही पैसे २-३ जागी ठेवावे आणि मी तसे केले. Train मध्ये चढल्यावर कळले कि गर्दीत खिशातील पैशांचे पाकीट कुणीतरी काढून घेतले होते. त्या वेळेस तिकीट, पैसे आणि ओळखपत्रे चोरीला गेले पण बॅगमध्ये ठेवलेले शिलकीचे पैसे असल्याने मला दुसरे तिकीट घेऊन प्रवास करता आला. त्यादिवशी जर सगळे पैसे एका ठिकाणी ठेवले असते तर वेळेचा अपव्यय आणि त्रास दोन्ही झाले असते. कधी कधी अशी एखादी छोटी सूचना देखील महत्वाची ठरू शकते.

ह्याच उदाहरणाप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीची संपूर्ण investment कोणत्या एका समूहात असेल व काही कारणाने त्या व्यवसायावर/क्षेत्रावर काही संकट आल्यास अशी गुंतवणूक धोक्याची ठरू शकते किंवा त्यावर मिळणारा परतावा हा अगदीच कमी असू शकतो. हे संभाव्य धोके टाळण्यासाठी आपण पूर्ण रक्कम कोणत्याही एका वर्गात ठेवणे टाळतो व वेगवेगळ्या Asset Class मध्ये ही रक्कम गुंतवतो. मला आवडलेला एक नियम आहे तो म्हणजे ‘परतावा कमी असला तरी चालेल पण मूळ रक्कम बुडू नये याची सावधगिरी बाळगा’, ह्यानुसार Asset allocation ची उपयोगिता आपण समजू शकतो.

‘DON’T PUT ALL YOUR EGGS IN ONE BASKET’ हे वाक्य आपण बरेचदा गुंतवणुकीसंदर्भात वाचले असेल. ह्याचा देखील Asset Allocationशी संबंध आहे. भविष्यात होणाऱ्या जास्त पश्चातापापेक्षा आज थोडी सावधगिरी असणे अधिक महत्वाचे ठरते.

Asset allocation in marathi
Asset allocation in marathi

Factors Affecting Asset Allocation Decision

Asset allocation करतांना खालील काही गोष्टींचा विचार करणे महत्वाचे ठरते.

  1. तुमचे Goals: एखाद्याचे Goals हे काही विशिष्ट कारणास्तव असतात. व्यक्तिपरत्वे Goals किंवा इच्छा वेगवेगळ्या असतात आणि त्यानुसार तो व्यक्ती वेगवेगळ्या साधनांत गुंतवणूक करण्याचे ठरवतो. Aggressive investor हा जास्त भाग Equity मध्ये ठेवू इच्छितो तर जास्त जोखीम घेण्याची तयारी नसेलला व्यक्ती सुरक्षित साधनांत गुंतवणूक करतो. एखादी व्यक्ती कशी गुंतवणूक करते आणि जोखीम कशी घेते यावर त्यांचे Asset allocation ठरते.
  2. जोखीम सहनशीलता (Risk tolerance): जास्त परतावा मिळवण्याच्या इच्छेचे गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीवर किती नुकसान सहन करण्यासाठी सक्षम असतात ह्यावर देखील त्यांचे Asset allocation ठरू शकते. अधिक आक्रमक गुंतवणूकदार जास्त परताव्याच्या अपेक्षेने त्यांची बहुतेक गुंतवणूक धोक्यात घालतात (हे अगदीच पूर्ण सत्य नसले तरीही अशी एक संभावना नाकारता येत नाही). त्याउलट जास्त धोका न पत्करता हळूहळू पण नियमित परतावा मिळवू इच्छिणारे गुंतवणूकदार लांबच्या काळात एक आकर्षक पोर्टफोलिओ निर्माण करू शकतात.
  3. वेळ (Time horizon): हा घटक मला जास्त आवडतो. गुंतवणूकदार किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहे यावर देखील Asset allocation अवलंबून असू शकते. कारण कमी काळात जरी एखादी गुंतवणूक आपल्या अपेक्षेविरुद्ध कामगिरी दाखवत असेल (म्हणजेच Negative returns) तेव्हा आपला Time horizon जास्त असल्याने अशा वेळेस अधिक रक्कम त्यात गुंतवून आपण अशा स्थितीचा फायदा घेऊ शकतो. जास्तीची रक्कम कधी गुंतवावी ह्याची भिन्न गुंतवणूकदारांची वेगवेगळी रणनीती असते. अनुकूल वेळ आल्यानंतर अशी गुंतवलेली रक्कम काढून घेऊन परत आपला पोर्टफोलिओ Rebalance करता येतो.
  4. Type of investor: हा घटक सर्वप्रथम विचारात घ्यावा असे मला वाटते. थोडक्यात आपली झोप खराब होऊ नये किंवा जास्त चिंता करावी लागू नये अशा प्रकारे गुंतवणूक केली तर ती जास्त समाधान देऊन जाईल असे मत आहे. आपण गुंतवणूक करतो ती आपल्यासाठी किंवा परिवारासाठी पण त्यायोगे जर आपला बहुमूल्य वेळ चिंतेत जात असेल तर अशी गुंतवणूक आपल्याला आनंदापेक्षा काळजीच देऊन जाईल. आपण कोणत्या प्रकारात मोडतो ह्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीसोबत चर्चा करावी किंवा अधिकृत Financial planner सोबत संपर्क करता येईल.

Example of Asset Allocation

  • चाळिशीतील एखादा गुंतवणूकदार जर आपल्या सेवानिवृत्तीसाठी Portfolio निर्माण करत असेल तर त्याला त्याचा सल्लागार खालीलप्रमाणे सल्ला देऊ शकतो.
  • गुंतवणुकीसाठी उपलब्ध वर्ष: 20 वर्षे (60 वर्षात सेवानिवृत्ती गृहीत धरल्यास)
  • महिन्याला करता येणारी SIP Amount: ……. रुपये
  • SIP Amount ची विभागणी: 40 टक्के Large cap fund, 20 टक्के Mid cap fund, 10 टक्के Small cap fund, 10 टक्के PPF, 10 टक्के Cash आणि 10 टक्के Gold असे काहीसे. आता ह्यात गुंतवणूकदाराच्या प्रकाराप्रमाणे काही बदल करता येतील. बाजारात थोडे अनुभवी लोक Small and Mid cap मध्ये जास्त रक्कम गुंतवू शकतील तर जास्त माहिती नसलेले फक्त Large cap किंवा Index मध्ये investment करू शकतील.

ह्याशिवाय काही रक्कम Cash/FD/Liquid स्वरूपात ठेवून घसरणीच्या काळात गुंतवणे व अनुकूल काळ झाल्यास परत Cash/FD मध्ये परिवर्तीत करणे हे सुद्धा एक काम करता येईल. ह्यासाठी मला आवडलेला एक पर्याय म्हणजे Liquid Fund व STP हा होय. ह्यासाठी अधिक वाचा: Liquid Fund म्हणजे काय?

Asset allocation in marathi

सरतेशेवटी प्रत्यक्ष Market शी संबंधित नसलेली व जास्त चर्चेत नसलेली परंतु मला आवडलेली एक Asset allocation method म्हणजे काही गुंतवणूक स्वतःत सुद्धा करणे ही होय. ह्यासाठी वाचन, शिक्षण ह्यावर काही रक्कम खर्च केल्यास भविष्यात त्यायोगे देखील आपल्याला अधिक परतावा मिळू शकेल.

हे सुद्धा वाचा: शेअर मार्केटमधील नुकसान टाळण्यासाठी काही उपयोगी नियम: शेअर मार्केट म्हणजे काय?

The psychology of money marathi-पैशाचे मानसशास्त्र

rhe psychology of money marathi

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र

The psychology of money marathi हे मॉर्गन हाऊजेल ह्या लेखकाचे पुस्तक मी नुकतेच वाचून संपवले आणि पैशाबद्दलच्या विविध लोकांच्या विविध विचारांना एका लहान पुस्तकात एवढ्या समर्पकरीत्या लेखकाने कसे मांडले ह्याचे नवल वाटले. अर्थात ह्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना अनुवादक श्री जयंत कुलकर्णी ह्यांनी त्याच तोलामोलाची उत्कृष्ट शब्दरचना करत ह्या पुस्तकाच्या भाषांतराला न्याय मिळवून देण्यात काहीच कसर ठेवली नाही हे वेगळे सांगायला नको.

The psychology of money marathi ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखक तीन लोकांच्या आणि त्यांच्या पैशांच्या सवयींबद्दल लिहितो. लेखक आपल्या महाविद्यालयीन जीवनात एका हॉटेल मध्ये काम करायचा.

पहिला व्यक्ती एक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असलेला एक यशस्वी उद्योजक असतो आणि ह्या हॉटेलचा नेहमीच ग्राहक असतो. त्याचेजवळ बक्कळ पैसे असत, पण त्याची पैशाबद्दल एक विचित्र सवय होती.

शंभर डॉलरच्या नोटांची एक गड्डी तो नेहमी लोकांना दाखवत असे, भले कुणाला त्यात काही रस नसो.

एकदा त्याने लेखकाच्या एका सहकाऱ्याला काही पैसे दिले आणि सोनाराच्या दुकानातून काही सोन्याची नाणी आणण्यास सांगितले. ती नाणी घेऊन तो आणि त्याचे मित्र समुद्रकिनाऱ्यावर गेले आणि कुणाचे नाणे दूर पर्यंत जाते ह्याचा खेळ खेळायला लागले.

सोन्याची नाणी पाण्यात फेकण्याचा हा खेळ विचित्रच म्हणायला हवा. कालांतराने अशा गर्विष्ठ व्यक्तिजवळचे पैसे लवकरच संपले आणि त्याचे दिवाळे निघाले.

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र ह्यात उल्लेख केलेला दुसरा व्यक्ती म्हणजे रोनाल्ड जेम्स रीड. रोनाल्ड रीड हा एक सामान्य माणूस होता. त्याने २५ वर्षे पेट्रोलपंपावर गाड्या धुतल्या आणि १७ वर्षे इमारतीतील फरशा सुद्धा पुसल्या.

ह्या अतिसामान्य माणसाच्या गोष्टीत काय विशेष? असे तुम्हाला वाटले असेलच. जेव्हा रोनाल्ड रीड ९२ व्या वर्षी स्वर्गवासी झाला तेव्हा त्याच्याकडे ८० लाख डॉलर एवढी प्रचंड रक्कम होती आणि हा साधा कामगार मृत्यूनंतर जगभरात प्रसिद्ध झाला.

आता तिसऱ्या व्यक्तीकडे वळूया. रोनाल्ड रीडच्या मृत्यूच्या काही महिने आधीच रिचर्ड फुस्कॉन ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्याही मृत्यूची दखल वर्तमानपत्रांनी घेतली पण वेगळ्या विषयासाठी.

रिचर्डचे शिक्षण म्हणजे हार्वर्ड मधून MBA आणि नंतर वित्त क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी. प्रचंड यश मिळवून वयाच्या चाळीशीत तो निवृत्त झाला. नंतर त्याने भव्य अशा घरासाठी मोठे कर्ज काढले आणि नंतर २००८ च्या आर्थिक मंदीत त्याच्या मालमत्तेचा लिलाव करावा लागला. न्यायालयात त्याचे शब्द होते- आता माझे उत्पन्न शून्य आहे.

The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र

इथे हे सगळे सांगण्याचा काय उद्देश आहे? तर पैशाचा योग्य उपयोग करण्याचा आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा फारसा संबंध नसतो हे सांगण्यासाठीच The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र हे पुस्तक लिहिले गेले आहे. रोनाल्ड रीड आणि रिचर्ड फुस्कॉन एकाच वेळी कसे अस्तित्वात येऊ शकतात? ह्याची लेखकाने दोन स्पष्टीकरणे दिली आहेत.

पहिले म्हणजे लेखकाच्या मते आर्थिक यशाचा आणि तल्लख बुद्धी व श्रमाचा फारसा संबंध नसावा. बरेचदा कुणी नशिबाने सुद्धा आर्थिक क्षेत्रात यशस्वी होतो.

दुसरे म्हणजे आर्थिक क्षेत्रातील यश हे काही एक नियमबद्ध असे शास्त्र नाही. आल्या वेळेला तुम्ही कसे वागता ह्यावर देखील पुढील प्रचंड यश-अपयश अवलंबून असते. हे एक असे कौशल्य आहे कि तुमच्याजवळ असलेल्या ज्ञानापेक्षा तुम्ही त्यावेळेस कसे वागता? ह्याला महत्व असते आणि ह्या कौशल्यालाच लेखक The psychology of money – पैशाचे मानसशास्त्र असे म्हणतो.

हे पैशाचे मानसशास्त्र व अशी कौशल्ये नेहमी दुर्लक्षितच राहिली आहेत. लेखकाने ह्या पुस्तकातून लहान लहान गोष्टींद्वारे हे मानसशास्त्र वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. पैसा मंत्र ह्या आपल्या Marathi investment blog मध्ये सुद्धा नेमक्या ह्याच विषयावर लेख लिहिले आहेत. The psychology of money marathi हे पुस्तक आणि आपल्या ब्लॉग वरील लेख बऱ्याच अंशी साधर्म्य ठेवतात.

the psychology of money marathi
Photo by Shiromani Kant on Unsplash

एकूण २० प्रकरणात विभागलेल्या The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र ह्या पुस्तकात लोकांचे पैशाबद्दलचे समज, अनुभव, त्यांनी पाहिलेल्या गोष्टी, त्यांच्या बचतीच्या सवयी, आशा-निराशेच्या काळातील पैशाबद्दलचे बदलते विचार, पैसे आणि स्वातंत्र्य, श्रीमंत होणे व श्रीमंती टिकवणे ह्यातील फरक, भाग्य आणि जोखीम अशा अनेक विषयांवर प्रभावी चर्चा केलेली आहे.

अगदी सुरुवातीच्याच प्रकरणात – ज्याचे शीर्षक “कोणीही मूर्ख नसतं !” असे आहे – “लोक पैशाबद्दल विचित्र वागतात पण ते विचित्र नसतात” असे म्हटले आहे. मला देखील हा प्रश्न कित्येकदा पडायचा कि अनेक जण वेगवेगळा दृष्टिकोन ठेवतात पण कुणीच स्वतःला चूक ठरवत नाही. मग खरा बरोबर कोण ? त्यावर निरीक्षणाने मी ह्या निर्णयावर आलो होतो कि जो तो आपल्या परीने योग्य तेच करतो. ह्या प्रकरणात ह्याच गोष्टीबद्दल सविस्तर लिहिलेले आढळले.

म्हणजे नेमके आहे तरी काय? थोडे विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ह्यात लिहिले आहे कि वेगवेगळ्या पिढीतील लोक, वेगवेगळ्या संस्काराखाली वाढलेले लोक, वेगवेगळ्या गोष्टींनी प्रोत्साहित होणारे लोक, वेगवेगळे भाग्य घेऊन जन्मणारे लोक हे आपापल्या परीने वेगवगेळे धडे शिकतात आणि त्याचाच अवलंब करतात.

गरिबीत वाढलेला मुलगा त्याचे मोठेपणीचे निर्णय त्याच्या गरिबीच्या अनुभवावरून घेतो तर पैशाची कमतरता नसलेला श्रीमंतांचा मुलगा त्याच्या निर्णयात वेगळेपणाने वागतो. दोघेही आपल्या दृष्टिकोनाला ठाम चिकटून असतात. मंदीत वाढलेल्या लोकांना आणि तेजीत जन्मलेल्या लोकांना पैशांचे वेगवेगळे अनुभव येतात. एका पिढीतील लोक सावधपणे फिक्स्ड मध्ये रक्कम जमा ठेवतात व एका पिढीतील लोक फिक्स्ड मधील रकम काढून शेअर्स मध्ये टाकतात. दोघेही आपण कसे योग्य हे सांगतात व दुसरे कसे चुकीचे ते देखील बोलून दाखवतात.

वाचकाला The psychology of money marathi हे पुस्तक आर्थिक क्षेत्रातील उदाहरणांच्या साहाय्याने उच्च दर्जाचे वैचारिक खाद्य पुरवेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अनेक गोष्टींच्या साहाय्याने सुद्धा हे पुस्तक प्रभावी बनले आहे.

मराठी भाषेत मधुश्री प्रकाशन द्वारे प्रकशित The psychology of money marathi हे पुस्तक वाचतांना पानोपानी मराठीतील शब्दसंपदा पाहून अनुवादक श्री जयंत कुलकर्णी ह्यांनी घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते. सरतेशेवटी ह्या पुस्तकातील दर्जेदार मजकूर वाचतांना वाचकांचा सुद्धा कस लागणार हे निश्चितच.

हे सुद्धा वाचा: आवडत्या पुस्तकातील पैशांच्या गोष्टी

how to save money in marathi पैशांची बचत कशी करावी?

how to save money in marathi

How to save money in marathi ? पैसे कसे वाचवावे? किंवा पैशांची बचत कशी करावी?

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसोबतच नवीन आर्थिक वर्ष सुद्धा प्रारंभ होते. अशा पुढील एका वित्तीय वर्षासाठी बचत किंवा गुंतवणूक योजना बनवणे महत्वाचे असते.

पैशांची बचत कशी करावी? हा एक महत्वाचा विषय आहे. पैसा मंत्र ह्या marathi investment blog वर पैसे आणि गुंतवणुकीच्या विषयावर जे अनेक लेख लिहिलेले आहेत त्या सगळ्या लेखांच्या मुळाशी असलेली गोष्ट म्हणजे गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेले पैसे किंवा saved money.

How to save money in marathi? किंवा पैशांची बचत कशी करावी? ह्या लेखात गुंतवणुकीसाठी पैसे कसे वाचवावेत ह्याची चर्चा केलेली आहे.

how to save money

Money Management च्या काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले आर्थिक ध्येय सहजतेने साध्य करू शकते. How to save money किंवा पैशांची बचत कशी करावी? ह्यावर विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे म्हणजे प्रभावी पैसे व्यवस्थापनाची पहिली पायरी होय.

नुसता विचार केल्याने पैसे कसे वाचतील? असा प्रश्न पडणे इथे साहजिक आहे, परंतु ज्या गोष्टीवर विचारच केल्या जात नाही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुद्धा क्वचितच होते असे लेखकाचे मत आहे.

Importance of saving money पैसे वाचवण्याचे महत्व

Importance of saving money किंवा पैसे वाचवण्याचे महत्व काय?, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. A Rupee saved is a rupee earned असे आपण म्हणू शकतो.

बचत (Save) केलेले पैसे योग्य प्रकारे गुंतवले (Invest) तर त्यावर चांगला परतावा (Return) मिळतो आणि मूळ रक्कम अजून वाढू शकते.

भविष्यातील आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी आज केलेली बचत गरजेची असते.

How to save money- step by step approach

सोप्या पण प्रभावी पैसे व्यवस्थापनाच्या पायऱ्या काय आहेत? एक एक करून चर्चा करूया.

पैसे वाचवण्याच्या तशा अनेक युक्त्या असू शकतात. खर्च कमी करावा म्हणजे जास्त बचत होईल हे सगळ्यांनाच माहित असते पण त्याची कोण किती अंमलबजावणी करतो ह्यावर परिणाम अवलंबून असतात.

परंतु सगळ्याच ठिकाणी ‘खर्च कमी करावा’ ही गोष्ट सारखीच लागू पडत नाही. काही खर्च जरुरी असतात आणि त्यामुळे बचत कमी होते. म्हणून सगळ्या युक्त्या सगळ्याच लोकांना एकसारख्या उपयोगी नसू शकतात.

ह्या लेखात सगळ्यांना शक्य असलेल्या व करता येण्यासारख्या काही छोट्या गोष्टींवर भर दिलेला आहे.

Save 10% money every month-महिन्याच्या मिळकतीच्या १० % रक्कम वाचवा

पैसे वाचवण्याची ही एक चांगली सुरुवात आहे पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिस्त लागते. कुणाला वाटेल की महिन्याच्या शेवटी नेहमीच पैशाची कमतरता असते, तर मी १०% पैसे कसे वाचवू शकतो? आणि म्हणून तो १०% बचतीची अंमलबजावणी करणार नाही.

परंतु जेव्हा तुम्ही कोणताही प्रश्न न विचारता फक्त हा नियम पाळाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की १०% पैसे बाजूला ठेवल्याने तुमच्या एकूण बजेटवर परिणाम होणार नाही. तुमचे खर्च उर्वरित ९०% रकमेच्या मर्यादेत असतील.

हे १०% पैसे इतर बँक खात्यात वळवा. लक्षात ठेवा, ही १०% रक्कम केवळ गुंतवणुकीसाठी आहे आणि कोणत्याही खर्चासाठी नाही. महिन्याची मिळकत झाल्यानंतर लगेच १०% वेगळ्या बँक अकाउंट मध्ये जमा केल्यास काही महिन्यात आपल्याला ह्या गोष्टीची सवय लागते आणि तेव्हा अशी बचत शक्य होते.

जमा होत असलेली रक्कम खर्चासाठी काढायची नाही हा नियम केल्यास काही महिन्यात गुंतवणुकीसाठी आपल्याजवळ काही पैसे असतील.

How to save money ह्यासाठी हे पहिले प्रभावी पाऊल आहे. इथे १०%, बचत, वेगळे बँक खाते ह्यावर मुद्दाम ह्यासाठी भर दिला आहे कि जेणेकरून ह्या नियमाची आपल्याला जास्त ओळख राहावी व पर्यायाने आपला बचतीचा हेतू साध्य व्हावा.

how to save money in marathi

Make shopping list-तुमच्या खरेदीची यादी बनवा

सुपरमार्केटला जात आहात? तर मग यादी तयार केल्याशिवाय वस्तू खरेदी करायची नाही असा काही नियम आपण आपल्यासाठी बनवू शकतो. जेव्हा तुम्ही अशा वस्तू लिहून खरेदी करत नाही, तेव्हा नको असलेल्या वस्तू खरेदी करण्याची शक्यता जास्त असते.

यादी बनवण्याव्यतिरिक्त, आपण आवश्यक गोष्टी योग्य आकाराच्या पॅकमध्ये देखील खरेदी करू शकता. तुम्हाला तेवढ्या प्रमाणात गरज नसल्यास मोठ्या आकाराच्या पॅकसाठी जाऊ नका.

असे केल्याने, आपण चांगले पैसे वाचवू शकता. सूची बनवून, तुम्ही ‘Impulse buying’ देखील टाळता जे अनियोजित खरेदीमध्ये टाळणे कठीण आहे. ह्यातून वाचलेली रक्कम आपण गुंतवणुकीसाठी वापरू शकता

Maintain Expenditure Diary-खर्चाची डायरी बनवा

तुमच्या खर्चाची नोंद करण्याची ही छोटीशी सवय तुम्हाला पैशांच्या बचतीत मोठा फायदा देईल. कारण जेव्हा तुम्ही तुमचा सर्व खर्च या डायरीत लिहायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्ही असे खर्च कोठे कोठे झाले ह्यावर विचार किंवा चर्चा कराल आणि मग अशा मागील खर्चाची यादी वाचून, तुम्हाला नक्कीच असे काही क्षेत्र सापडेल जिथे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवू शकता. ह्या एका सवयीमुळे मोठ्या रकमेची बचत होऊ शकते.

तुमची खर्चाची डायरी वाचून, तुम्ही खरं तर आकडे वाचण्याची सवय लावत आहात. संख्या स्वरूपात खर्च पाहणारा व्यक्ती पैशाची बचत लवकर करू शकतो.

Write your saving goals- तुमची बचत उद्दिष्टे लिहा

हा सराव तुम्हाला बचतीची शिस्त लावून घेण्यास मदत करते. बचतीची उद्दिष्टे ठरवून, तुम्हाला विशिष्ट कालमर्यादेत (Specific time frame) किती बचत करायची आहे याची स्पष्ट कल्पना येईल. एकदा ध्येय निश्चित झाले की ते साध्य करणे सोपे जाते.

ही सवय नकळत मेंदूला प्रशिक्षित करण्यासही मदत करते. जेव्हा एखादी व्यक्ती कागदावर saving goals उद्दिष्टे लिहिते तेव्हा तो असे ध्येय साध्य करण्याचा विचार करू लागतो. माझ्या investment notes लिहिलेल्या जुन्या नोंदवह्या मला कधीकधी नवीन गोष्टी दाखवून जातात. या व्यायामाद्वारे, एखादी व्यक्ती आपली बचत उद्दिष्टे अधिक सहजपणे साध्य करू शकते असे लेखकाला वाटते.

Avoid unnecessary debt-महत्वाचे नसलेले कर्ज टाळा

जरी हे प्रत्यक्ष बचतीशी थेट संबंधित नसले तरी, कोणतेही अनावश्यक कर्ज टाळून तुम्ही भविष्यात अधिक पैसे वाचवू शकता. कर्जामुळे बचतीसाठी उपलब्ध असलेली रोख रक्कम कमी होते. कोणत्याही अनावश्यक कर्जाला नाही म्हटल्याने, तुम्ही भविष्यातील बचत रक्कम वाढवाल.

पैसे वाचवण्यासाठी या काही सोप्या टिप्स उपयुक्त आहेत. अशा काही पद्धतींवर काम केल्यास काही रक्कम वाचू शकते. ही रक्कम कुठे गुंतवावी ह्यासाठी ‘पैसामंत्र’ ह्या ह्या ब्लॉगवरील काही लेख आपण अभ्यासू शकता.

पैसे वाचवण्याच्या पुढचा भाग म्हणजे चांगला परतावा मिळवण्यासाठी योग्य गुंतवणूक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे. त्यासाठी “पैसामंत्र” ह्या marathi investing blog वरील इतर लेख आपण वाचू शकता.

ह्या लेखात सुधारणा सुचविण्यासाठी किंवा नवीन विषयावर लेख सुचविण्यासाठी आपली बहुमूल्य प्रतिक्रिया अवश्य द्या.

हे सुद्धा वाचा: Financial Planning In Marathi – योजना आगामी आर्थिक वर्षाच्या

error: Content is protected !!