Balanced Advantage Fund

BALANCED ADVANTAGE FUND

Balanced Advantage fund म्हणजे काय?

Balanced Advantage Fund बद्दल माहिती करण्यापूर्वी आपल्याला Balanced Funds बद्दल माहिती असणे जरुरी आहे. Mutual funds in marathi ह्या लेखात वेगवेगळ्या Mutual Funds बद्दल लिहिलेले आहेच.

Balanced Fund म्हणजे असा म्युच्युअल फंड कि ज्यात Equity आणि Debt ह्यातील गुणोत्तर अगोदरच ठरवलेले असते. Balanced Funds हे Equity Oriented किंवा Debt Oriented असतात हे सुद्धा वाचकांना ठाऊक असेलच.

एखादा क्रिकेट सामना पाहत असतांना एक फलंदाज आक्रमक खेळी करतो आणि दुसरा बचावात्मक फलंदाजी करतो हे आपण बघितले असेलच. सामना जिंकणे हे इथे लक्ष्य असते. तसेच काहीसे Balanced Funds मध्ये असते. Equity मधील भाग हा जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतो तर Debt मधील भाग गुंतवणुकीला स्थैर्य देण्याचे काम करतो.

हा लेख Balanced Advantage Fund बद्दल आहे. Balanced Advantage Fund मध्ये Market परिस्थितीनुसार Allocation मध्ये बदल केल्या जाऊ शकतो. (Asset Allocation बद्दल Asset Allocation in Marathi इथे लिहिले आहे.)

Balanced Advantage Fund जर आपल्या Mutual Fund Portfolio मध्ये नसेल तर आपल्यासाठी हा लेख महत्वाचा आहे. Balanced Advantage Fund एकीकडे गुंतवणूकदाराला फायद्याच्या दिशेने अधिक वेगाने नेतो तर दुसरीकडे घसरत्या बाजारात अशी गुंतवणूक तुलनेने कमी घसरते. दुसऱ्या अर्थात Balanced Advantage Fund ही एक हुशार गुंतवणूक म्हणता येईल.

माझ्या गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या काळात मी अशा प्रकारच्या फंडच्या शोधात होतो आणि खोलात वाचन करत गेल्यानंतर मला ह्या प्रकारच्या फंड बद्दल कळले. तेव्हापासून आजतागायत एका चांगल्या Balanced Advantage Fund मध्ये (पैसा मंत्र ब्लॉग वर कोणत्याही प्रकारच्या शेअर्स, म्युच्युअल फंड कंपनी किंवा इतर गुंतवणूक सेवा देणाऱ्या कंपनीचे नाव देणे टाळले जाते) मी टिकून आहे आणि अशा प्रकारचा फंड मला विशेष आवडून गेला.

Balanced Advantage Fund हा एक Hybrid Mutual Fund आहे आणि ह्याला Dynamic Asset Allocation Fund असे सुद्धा म्हटले जाते. Balanced Advantage Fund हा Equity आणि Debt दोन्ही प्रकारच्या Asset Class मध्ये गुंतवणूक करतो आणि Fund Manager बाजाराच्या परिस्थितीनुसार ह्यातील गुंतवणूक (म्हणजेच प्रत्येक Asset Class मधील गुंतवलेला भाग) बदलत राहतो.

ह्याला अजून सोपे करून बघूया.

बाजारात स्टॉकच्या किंमती जास्त असल्यास फंड मॅनेजर आपली गुंतवणूक Debt कडे झुकवू शकतो. ह्याउलट सगळीकडे घसरण असतांना जेव्हा स्टॉकच्या किंमती कमी असतात तेव्हा तो जास्त गुंतवणूक इक्विटीकडे वळवू शकतो. अशा फंडचे दोन्ही भागातील (Equity and Debt) गुंतवणूक गुणोत्तर किती असते हे अगोदरच स्पष्ट केलेले असते.

उदाहरणार्थ: एका Balanced Advantage Fund चे हे गुणोत्तर जर 70 आणि 25 (म्हणजेच 70 टक्के भाग Equity मध्ये तर 25 टक्के भाग Debt व 5 टक्के भाग Cash and Cash Equivalents मध्ये) आहे. आता जेव्हा जेव्हा मार्केट परिस्थिती बदलेल तेव्हा तेव्हा हे गुणोत्तर 75:20 इतके किंवा 65:30 इतके होऊ शकते.

दोन Asset Class मधील ही गुंतवणूक ह्यापेक्षाही वेगळ्या टक्केवारीत असू शकते. हे त्या-त्या फंडच्या धोरणांनुसार केले जाते. काही Balanced Advantage Fund मधील Equity Exposure 65 ते 80 टक्के एवढे असते.

Things to consider before investing in Balanced Advantage Funds?

Balanced Advantage Funds मध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदाराने कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

  • जोखीम (Risk): जरी Balanced Advantage Fund मध्ये वेगवेगळ्या Asset Class मध्ये गुंतवणूक केली जाते तरीही ते पूर्णपणे जोखीममुक्त नसतात. याचे कारण Equity तील चंचलता आहे. Stocks च्या किंमती बाजाराच्या अधीन असतात आणि हा हिस्सा Balanced Advantage Fund ना जोखमीसाठी असुरक्षित बनवतात. ह्यामुळेच बाजाराच्या हालचालींनुसार NAV मध्ये चढ-उतार होतात. पण तुलनेने पूर्ण इक्विटी फंडांच्या तुलनेत Balanced Advantage Fund हा कमी जोखमीचा असतो.
  • परतावा (Return): हा सुद्धा पूर्ण Equity फंडांच्या तुलनेत कमी असू शकतो. पण घसरणीच्या काळात पूर्ण Equity फंडांच्या तुलनेत Balanced Advantage Fund कमी घसरण दाखवू शकतो. लांबच्या काळासाठी गुंतवणूक केल्यास एका चांगल्या Return ची अपेक्षा कुणी करू शकतो.
  • Goals: जर कुणाला जास्त जोखीम आवडत नसेल, तर अशा गुंतवणूकदारांसाठी मध्यम ते दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी Balanced Advantage Fund फायद्याचे असू शकतात. वर सांगितल्याप्रमाणे म्हणूनच असा फंड मला माझ्यासाठी योग्य वाटला.
  • Investment Horizon: इतर equity फंड सारखेच पण व्यक्तिपरत्वे बदल असू शकतो.

ह्या लेखाची Investment Portfolio बनवतांना वाचकांना मदत होईल अशी लेखकाची खात्री आहे.

Similar Posts

  • REIT Real Estate Investment Trust

    REIT Real Estate Investment Trust What is Real Estate Investment Trust (REIT)? REIT Real Estate Investment Trust रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी) ह्या अशा प्रकारच्या कंपनी असतात कि ज्यांचेकडे काही Real Estate जसे कि ऑफिस, अपार्टमेंट, गोदामे, व्यावसायिक केंद्र Commercial…

  • म्युचुअल फंडस् विकत घेण्यापूर्वी – Mutual fund in Marathi

    Mutual fund in marathi Mutual fund in marathi Mutual fund in marathi – म्युच्युअल फंड म्हणजे काय? आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? असे प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न नव्याने Investment क्षेत्रात आलेल्या व्यक्तींना पडणे साहजिक आहे. आजच्या त्वरित माहिती युगात म्युच्युअल…

  • SIP Information in Marathi-SIP म्हणजे काय?

    SIP information in marathi म्हणजेच SIP काय आहे व SIP चे गुंतवणूकदारांसाठी फायदे काय आहेत? ह्या विषयावरील हा लेख नव्याने SIP करण्याच्या विचारात असलेल्या गुंतवणूकदारांच्या उपयोगी होईल. अगोदरच Mutual fund SIP करत असलेल्या गुंतवणूकदारांना सुद्धा ह्या लेखातील काही माहिती उपयोगी…

  • |

    Asset allocation in marathi

    Asset allocation in marathi Asset allocation म्हणजे गुंतवणूक करतांना अगोदर ठरवलेली एक अशी योजना की ज्यामुळे गुंतवणुकीची एकूण रक्कम विविध Asset class मध्ये गुंतवली जाते; जेणेकरून गुंतवणुकीतील धोका कमी होईल. हे Asset Class तीन वर्गात मोडतात: Equity, Fixed Income आणि…

  • Index fund in marathi

    Index fund मधील गुंतवणूक ही आपण एक हुशार गुंतवणुक म्हणू शकतो. Index fund in marathi ह्या लेखात Index funds काय आहे व कसे काम करतात ह्याची माहिती लिहिलेली आहे. अभ्यासू वाचकांनी index fund बद्दल वाचलेले असेलच, तरीही आजूबाजूला इंडेक्स फंड…

  • Systematic transfer Plan

    Systematic Transfer Plan in mutual funds What is Systematic Transfer Plan? Systematic Transfer Plan जेव्हा आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्यात साधारणपणे SIP करतो. बाजारातील हालचालींचीबद्दल थोडे अधिक ज्ञान असणारे गुंतवणूकदार मध्ये-मध्ये एकदाच 5-10 हजार किंवा जास्त रक्कम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *