Systematic transfer Plan

Systematic Transfer Plan in mutual funds

What is Systematic Transfer Plan?

Systematic Transfer Plan

जेव्हा आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्यात साधारणपणे SIP करतो. बाजारातील हालचालींचीबद्दल थोडे अधिक ज्ञान असणारे गुंतवणूकदार मध्ये-मध्ये एकदाच 5-10 हजार किंवा जास्त रक्कम एकरक्कमी गुंतवत असावेत.

जेव्हा म्युच्युअल फंडाची NAV (Net Asset Value) कमी असते तेव्हा गुंतवलेले पैसे चढत्या बाजारात लवकर वाढतात हे सर्वविदित आहेच. पण असा घसरणीचा नेमका अंदाज सगळेच आणि नेहमीच अचूक लावत असतील ह्याची शक्यता कमीच असते.

ह्यावर एक उपाय म्हणजे Systematic Transfer Plan.

जेव्हा आपण Systematic Transfer Plan (STP in mutual funds) ची सुविधा घेतो तेव्हा आपोआपच अधिकची रक्कम हळूहळू आणि काही विशिष्ट वेळेसाठी (जसे की एका आठवड्याला एक हजार असे बारा आठवडे बारा हजार Transfer होणे) घसरणीच्या काळात गुंतवत राहतो.

Systematic Transfer Plan (STP) ला पर्याय म्हणजे बाजारातील हालचालीवर Manually लक्ष ठेवणे व घसरण आली कि त्या दिवशी गुंतवणूक करणे. पण ह्याला मर्यादा येतात. ह्याला Investor behavior अडथळा निर्माण करते व त्यामुळे अशी अधिकची गुंतवणूक नियमितपणे केली जात नाही.

Systematic Transfer Plan मध्ये एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेत रक्कम वळती केली जाते. अट एकच की असे दोन्ही फंड एकाच AMC (Asset Management Company ) चे हवेत.

Benefits of Systematic Transfer Plan

STP चे काही फायदे खालीलप्रमाणे:

  • Systematic Transfer Plan चा मला आवडलेला पहिला फायदा म्हणजे SIP सारखीच STP मध्ये आपली गुंतवणूक हळूहळू आणि आपोआप होत जाते. फक्त STP आपण अशा वेळेस करतो जेव्हा काही कारणास्तव आपल्या आवडीच्या म्युच्युअल फंडाची NAV बरीच कमी झालेली असते आणि नजीकच्या काळात ती अजून कमी होण्याची किंवा ह्याच स्तराच्या आसपास फिरत राहण्याची शक्यता असते (Accumulation at low price).
  • Risk Management (जोखीम व्यवस्थापन): एकच वेळेस अतिरिक्त पैसे गुंतवले तर ते कदाचित उच्च NAV मूल्य असताना गुंतवले जातील. पण STP च्या बाबतीत Market volatility चा फायदा गुंतवणूकदाराला होतो. खरेदी करताना जेवढा जास्त फायदा तेवढी गुंतवणूक अधिक आकर्षक बनते (Margin of safety-लेखकाचा एक आवडता विषय).
  • Equity आणि Debt मध्ये STP केल्यास दोन्ही प्रकारच्या फंडमध्ये व्यवस्थित संतुलन साधले जाते. Equity फंडाची NAV वाढलेली असल्यास त्यातील रक्कम Debt मध्ये वळती करता येते. ह्याउलट घसरत्या बाजारात Debt मधील रक्कम Equity फंडमध्ये वळती केली जाणे शक्य आहे. कुणी जर एकूण गुंतवलेल्या रक्कमेचे दोन्ही Asset Class मध्ये प्रमाण अगोदर ठरवलेले असेल तर जेव्हा जेव्हा हे प्रमाण मिळालेल्या Return नुसार बदलेल तेव्हा तेव्हा त्याला परत पूर्ववत करता येते (Rebalancing).

How to start STP

Systematic Transfer Plan लागू करण्यासाठी खाली दिलेली माहिती उपयोगी होईल.

  • आपल्या पोर्टफोलिओ मधील Mutual Fund Scheme चा प्रकार ओळखा.
  • त्याच AMC मधील अजून एक फंड निवडा जो कि आपल्याला गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो. त्या फंडच्या NAV वर लक्ष ठेवा.
  • जेव्हा त्या फंडची NAV आपल्याला साजेशी वाटेल तेव्हा आपल्या अकाउंट मधून STP चा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यावर कोणत्या फंडमधून STP करण्याची आहे हे विचारल्या जाते. आपल्याकडे अगोदरच असलेल्या फंडची नावे ह्या ठिकाणी दिसतात.
  • ज्या फंडमध्ये ही रक्कम Transfer करायची आहे तो फंड अगोदरचा देखील असू शकतो किंवा आपण नवीन फंड निवडू शकतो. (मी STP हा पर्याय Liquid fund मधून Small cap, Mid cap आणि Balanced Advantage Fund मध्ये Transfer असा उपयोग केलेला आहे. त्यासाठी काही रक्कम अगोदर Liquid fund मध्ये गुंतवता येईल.) Liquid mutual fund बद्दल वाचा: Liquid Mutual Funds म्हणजे काय?
  • STP करतांना किती रक्कम एकदा Transfer करावी व किती काळासाठी? असा पर्याय द्यावा लागतो. STP ची Frequency सहसा Weekly, Monthly, Quarterly असते.
  • आपला Regular plan असेल तर एजेंट ला सांगून हे काम करता येते. जर Direct plan असेल तर आपल्या Online Account मधून STP सुरु करता येते. जर बँक वगैरे कडून म्युच्युअल फंड घेतला असेल (Regular plan) तर AMC च्या वेबसाईट वर जाऊन आपल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ ची माहिती देऊन User ID आणि Password तयार करता येईल. नंतर त्यातून STP हा पर्याय निवडावा. म्युच्युअल फंड प्लॅन्स बद्दल वाचा: Mutual funds in marathi
  • STP चा कालावधी पूर्ण झाल्यावर आपण त्याचे खरेदी विक्री युनिट्स चे पूर्ण Statement बघू शकतो.

Who Should use A Systematic Transfer Plan?

  • जे गुंतवणूकदार Market Trend नुसार आपले पैसे इकडे तिकडे करू इच्छितात त्यांचेसाठी STP हा पर्याय चांगला आहे.
  • आपली एकूण गुंतवलेली रक्कम काही ठराविक वेळेनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या फंडमध्ये Rebalance करण्याची रणनीती असणारे लोक STP करू शकतात.
  • वेतनवृद्धी एरियर्स, बोनस किंवा अजून काही एकरक्कमी पैसे आल्यास ते अगोदर Debt किंवा Liquid fund मध्ये ठेवून हळूहळू Equity मध्ये वळती करण्याची रणनीती असणारे गुंतवणूकदार STP चा पर्याय निवडू शकतात.

हे सुद्धा वाचा: SIP म्हणजे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!