PPF in marathi – Public provident Fund म्हणजे काय?

PPF in marathi ह्या लेखात आपण एकंदर गुंतवणुकीपैकी काही भाग PPF मध्ये कसा ठेवू शकतो व कालांतराने त्यावर कसा फायदा मिळू शकतो ह्यावर माहिती लिहिलेली आहे.

PPF in marathi – पब्लिक प्रॉव्हिडंट फंड माहिती

आपल्या गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी वेगवेगळ्या गटाच्या योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक ठरते. इथे वेगवेगळ्या गटांचा उल्लेख Equity, Debt, Gold आणि अजून इतर गुंतवणूक प्रकार ह्यासंदर्भात केलेला आहे. PPF हे सेवानिवृत्तीसाठी किंवा इतर लक्ष्यांसाठी धनसंचय करण्यासाठी उपयोगी असे Long term saving product आहे.

How to Open PPF Account ? PPF अकाऊंट कसे काढावे ?

PPF उघडण्यासाठी अधिकार दिलेल्या अनेक बँक तसेच पोस्ट ऑफिस मध्ये हे खाते उघडता येते.नेहमीच्या बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या व फोटोच्या आधारे PPF account सुरु करता येते.

Eligibility criteria for PPF-पब्लिक प्रॉव्हिडंट फंड साठी पात्रता

  • फक्त भारतीय नागरिक PPF खाते उघडू शकतो.
  • पालक त्यांच्या अवयस्क मुलांच्या नावाने PPF खाते उघडू शकतात.
  • संयुक्त खाते किंवा एकाच्या नावाने एकापेक्षा जास्त PPF खाते उघडण्यास परवानगी नाही.

What is the interest rate of PPF Account ? पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाऊंटचा व्‍याजदर किती आहे ?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड एक Floating rate investment product आहे. केंद्र सरकारतर्फे PPF वर व्याज दर तिमाही ला घोषित केले जाते.

ppf in marathi

features of PPF-पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ची वैशिष्ट्ये

  • PPF खाते हे १५ वर्षांसाठी LOCK IN PERIOD असलेले Fixed Income, Long term investment product आहे. १५ वर्षाच्या काळानंतर गुंतवणूकदार खाते असलेल्या ठिकाणी आगाऊ माहिती देऊन PPF खात्याचा कालावधी अजून ५-५ वर्षाच्या कालावधीसाठी वाढवू शकतो.ह्यावेळी गुंतवणूकदार Extension of PPF account with contribution किंवा Extension of PPF account without contributionअशी काही निवड करू शकतो.
  • खाते परिपक्व MATURE होण्याआधी सुद्धा PPF खात्यात जमा असलेली रक्कम काही कारणासाठी काढता येते. खाते सुरु झाल्याच्या ५ वर्षानंतर काही मर्यादेपर्यंत ह्यातील जमा पैसे काढता येतात.
  • खातेधारकाला PPF खात्यात वार्षिक कमीत कमी ५०० रुपये तसेच जास्तीत जास्त १,५०,००० जमा करता येतात.
  • PPF खात्यात कमीत कमी एकदा किंवा जास्तीत जास्त बारा वेळा पैसे जमा करता येतात.
  • PPF योजना ही EEE म्हणजेच Exempt-Exempt-Exempt ह्या धर्तीवर काम करते. Exempt म्हणजे सूट किंवा सवलत देणे. EEE हे करांमध्ये तीन प्रकारच्या सूट दर्शविते. पहिली E म्हणजे PPF मध्ये केलेली गुंतवणूक ही त्या वर्षी कर वाचवण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीमध्ये समाविष्ट करता येते. जमा केलेल्या रक्कमेवर 80C कलमाखाली कर सवलत मिळते. दुसरी E म्हणजे ह्या गुंतवणुकीतून झालेल्या उत्पन्नात सुद्धा सूट आहे. तिसरी E म्हणजे गुंतवणुकीतून पैसे काढणे (Maturity Amount) सुद्धा करमुक्त आहे म्हणूनच कराच्या आवाक्यात न येऊ इच्छिणाऱ्यांसाठी PPF मधील गुंतवणुक एक आकर्षक पर्याय नक्कीच वाटू शकतो.
  • PPF खात्यावर गुंतवणूकदार त्याच्या जमा रक्कमेनुसार कर्ज सुद्धा काढू शकतो.

PPF सारांश

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना स्थिर उत्पन्न योजनेमधील एक लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे. PPF मध्ये चक्रवाढीचा फायदा मिळतो आणि गुंतवणूक सुरक्षा सुद्धा मिळते. आपल्या गुंतवणूक portfolio मध्ये एक भाग PPF मधील गुंतवणुकीचा असणे हा नक्कीच एक चांगला निर्णय असू शकतो.

Equity मध्ये आक्रमक स्वरूपाची गुंतवणूक रणनीती असलेले गुंतवणूकदार सुद्धा PPF ह्या योजनेकडे लक्ष ठेवून Asset allocation च्या काही नियमांची पूर्तता करू शकतात.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!