Liquid mutual funds म्हणजे काय?

Liquid mutual funds
Liquid Mutual Funds हे नावाप्रमाणेच गुंतवणूकदारांना Liquidity प्रदान करतात. Liquidity म्हणजे आपल्या गुंतवणुकीला त्वरित रोख पैशामध्ये बदलणे होय. Financial Planning मध्ये liquidity ला महत्व आहे. पैशांची गरज आहे आणि ऐन वेळेवर जर गुंतवलेल्या रक्कमेला रोख स्वरूपात बदलणे शक्य झाले नाही तर केलेले Financial Planning व्यर्थ ठरते.

गुंतवणुकीला त्वरित रोख पैशामध्ये बदलवताना गुंतवणुकीची किंमत कमी होणार नाही हे सुद्धा Liquidity ह्या शब्दात अभिप्रेतआहे. Cash रोख रक्कम जवळ असणे हे इथे Liquidity उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.

परंतु रक्कम कुठेतरी गुंतवली तर त्यावर काही अंशी Return परतावा मिळतो. ह्याउलट खूप जास्त रक्कम नेहमीच रोख स्वरूपात ठेवणे म्हणजे असा परतावा मिळत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे जर ही रक्कम कुठे गुंतवली आणि त्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य थोड्या अवधीत कमी झाले आणि नेमक्या त्याच वेळी आपल्याला ह्या रकमेची आवश्यकता पडली तर काय ?

ह्यासाठी मध्यम मार्ग म्हणजे Return सुद्धा मिळाला पाहिजे आणि Liquidity सुद्धा असली पाहिजे हा होय आणि Liquid Mutual Funds हे नेमक्या ह्याच बाबीची पूर्तता करतात.

Liquid mutual funds

उदाहरणादाखल बोलायचे झाल्यास जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याजवळील सगळे पैसे एखाद्या गुंतवणूक साधनात गुंतवतो (जसे कि जमीन किंवा काही stocks ) आणि लवकरच जर त्याला काही पैशांची गरज भासली तर?

आता हे जरुरी नाही कि त्याने घेतलेली जमीन लगेच विकल्या जाईल आणि त्याला आपल्या गुंतवणुकीवर काही प्रमाणात परतावा सुद्धा मिळेल. हेच विधान एखाद्या stock मधील गुंतवणुकीवर सुद्धा लागू होते जर गुंतवणूकदाराने घेतलेले stocks कमी किमतीवर व्यवहार करत असतील तर त्याला आपली गुंतवणूक तोट्यात विकावी लागेल आणि त्याचा गुंतवणुकीवर काही परतावा मिळवण्याचा मूळ हेतू सफल होणार नाही.

ह्या दोन्ही प्रकारच्या परिस्थितीत गुंवणूकदाराला आपल्या हाती काही Cash रोख रक्कम किंवा काही Liquid Assets ठेवणे गरजेचे होते परंतु तसे न केल्यास त्याला आपली इतर गुंतवणूक कदाचित कमी परतावा घेऊन किंवा मूळ रक्कमेत तोटा घेऊन विकण्याची गरज पडू शकते. अशाच स्थितीला टाळण्यासाठी liquidity खूप गरजेची असते.

ह्याच कारणासाठी आपण liquid फंड ची निवड करू शकतो. ह्यामधील गुंतवणूक कमी न होता आणि तातडीने काढता येणे शक्य होते. Liquid Mutual funds हे एक प्रकारचे debt funds असतात जे कमी अवधीसाठी असलेल्या आणि चांगल्या credit quality च्या गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करतात.

ह्यामध्ये Treasury Bill, Government Securities, Certificates of Deposits, किंवा Commercial papers इत्यादीचा समावेश होतो. Liquid Mutual Funds धोकादायक गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करत नाही. लिक्विड फंड आपली earning त्यांच्या गुंतवणुकीतील व्याजाद्वारे कमावतात. तसेच Liquid Mutual Funds चा परतावा हा इतर Debt Funds च्या तुलनेत सुद्धा अधिक स्थिर असतो.

Benefits of Liquid Funds लिक्विड फंडांचे फायदे

  • Low Risk कमी जोखीम: Liquid mutual fund हा कमी जोखमीचा low risk debt fund आहे जो मुख्य करून स्थिर परतावा देतो.
  • Short holding period कमी गुंतवणूक कालावधी: गुंतवणूकदार फक्त आवश्यक काळासाठी आपली गुंतवणूक liquid mutual funds मध्ये ठेवू शकतो. ज्यांना आगामी ३-४ महिन्यासाठी जास्तीची रक्कम गुंतवायची आहे त्यांचेसाठी हे फंड योग्य असतात. जवळ असलेली जास्त रक्कम Liquid Funds मध्ये गुंतवणे आणि गरज पडल्यास तात्काळ पैसे परत मिळवणे हे ह्यामुळे सोपे होते. आपण Redemption request नोंदवल्यावर खात्यात पैसे मिळवणे हे एका कामकाजी दिवसात शक्य होते. त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रक्कम गुंतवायची असेल तर त्यासाठी योग्य जसे कि Ultra short duration funds मध्ये गुंतवणूक करु शकतात; जेणेकरून थोडा जास्त परतावा मिळू शकतो.
  • Benefit over bank fixed deposits: बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा Liquid mutual Funds मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला एकतर कधीही पैसे काढण्याची सुविधा मिळते. ह्याउलट बँकेत निश्चित कालावधी अगोदर पैसे काढल्यास काही प्रमाणात दंड आकारल्या जातो. बचत खात्यातील पैसे कधीही काढता येतात मात्र त्यावर मिळणारे व्याज हे Liquid Mutual Funds पेक्षा कमी राहते. म्हणजेच एकंदरीत जास्त परतावा मिळवण्यासाठी बचत खात्यापेक्षा liquid fund अधिक योग्य ठरतो. गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याअगोदर दोन्ही बाबतीत त्या त्या वेळेस लागू असलेल्या परताव्याची तुलना करून निर्णय घेऊ शकतात.

ज्या गुंतवणूकदारांना बोनस, मालमत्ता विक्री किंवा अजून काही गोष्टीतून एकदम मोठी रक्कम मिळते ते हा पैसे कोठे गुंतवावा ? हे निश्चित करेपर्यंत Liquid Mutual Funds मध्ये मिळालेली रक्कम ठेवू शकतात. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा Liquid Fund मधून पैसे काढून इतर जागी गुंतवणूक केली जाऊ शकते.

Liquid Fund मध्ये एकदाच जास्तीची रक्कम ठेवून ती नियमित अंतराने Equity Mutual Fund मध्ये STP करणे हा पर्याय सुद्धा कुणी करू शकतो त्यासाठी हे दोन्ही फंड एकाच AMC चे असणे जरुरी आहे.

Liquid Fund मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदार काही गोष्टी विचारात घेऊ शकतो. जरी Liquid Mutual Funds कमीत कमी धोकादायक Debt Funds पैकी एक आहे आणि बँक ठेवीपेक्षा पर्यायी म्हणून वापरता येतो तरीही कमी जोखीम म्हणजे शून्य जोखीम नाही हे समजले पाहिजे. गुंतवणूकदारांनी हे समजून घेतले पाहिजे की Liquid Mutual Funds मध्ये सुद्धा काही जोखीम असतात.

सर्वप्रथम, ह्यातसुद्धा सर्व mutual fund उत्पादनांप्रमाणे Return ची हमी दिली जात नाही. बँक ठेवी मध्ये अगोदरच सांगितलेल्या प्रमाणात व्याज दिले जाते परंतु Liquid Mutual Funds च्या बाबतीत Return बदलतो कारण तो बाजार व्याज दरावर अवलंबून असतो. म्हणूनच गुंतवणूकदारांनी Fund Track Record तपासावा आणि सातत्याने चांगल्या कामगिरीसह असलेल्या fund ची निवड करावी.

दुसरे म्हणजे, लिक्विड फंड Credit Risk पासून मुक्त नाहीत. मध्यंतरी काही बाबतीत काही Funds नी परतावा वाढवण्यासाठी काही कमी दर्जाच्या गुंतवणूक साधनांत गुंतवणूक केल्याचे निदर्शनास आले होते. जेव्हा अशा साधनांनी व्याज देण्यामध्ये Default केले तेव्हा त्यांचे Credit Rating Downgrade केले गेले आणि त्याचा परिणाम Liquid Fund च्या बाजार मूल्यावर झाला होता. चांगल्या दर्जाचे Portfolio असलेल्या Liquid Fund ची निवड करून गुंतवणूकदार Credit Risk कमी करू शकतात.

Best Liquid Fund कोणता हे शोधण्यासाठी Return , Expense Ratio, Fund Size आणि Portfolio Diversification यांचा उपयोग होऊ शकतो. एक महिना किंवा तीन महिन्यांचे परतावे पाहणे सुद्धा उपयोगी ठरते. चांगल्या कामगिरी करणाऱ्या Liquid Fund ने त्याचे Benchmark ला मागे टाकले पाहिजे, परंतु Fund ने केलेल्या सातत्यपूर्ण कामाला देखील महत्व दिले पाहिजे.

ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन एक योग्य Liquid Mutual Fund निवडून ह्यात Emergency Fund जमा करता येईल. Emergency Fund ची काही रक्कम Liquid funds सोबतच Bank fixed deposit मध्ये सुद्धा ठेवणे Portfolio Diversification च्या अनुषंगाने शक्य आहे.

हे सुद्धा वाचा: Mutual Fund विकत घेण्यापूर्वी.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *