How to invest in mutual funds? म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी ?

how to invest in mutual funds

Mutual funds ची ओळख झाली आहे? आता how to invest in mutual funds? हा प्रश्न पडलाय ? तर मग हा लेख तुमच्यासाठीच आहे.

गुंतवणुकीच्या विश्वात पहिले पाउल टाकताना mutual funds मध्ये पैसे गुंतवून equity market चा अनुभव बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांनी घेतला असतोच. मात्र आपण घेतलेला हा पहिला वहिला mutual fund दुसऱ्याच कुणीतरी सुचवलेला असतो ह्याची शक्यता जास्त असते.

कसेही का असेना पण Mutual Funds शी परिचय होणे हे नवीन गुंतवणूकदारांसाठी फायद्याचेच ठरते.मात्र त्यासाठी How to invest in mutual funds हे गुंतवणूकदाराला स्वतःला सुद्धा माहित करून घेणे महत्वाचे ठरते.

Low Risk, Diversification, Expert Fund Manager, Systematic investment इत्यादी मुळे Mutual Funds हे गुंतवणूकदाराला Market volatility पासून एक सुरक्षा कवच प्रदान करतात.आणि SIP मुळे नियमित बचत करण्याची सवय लावण्यात सुद्धा यशस्वी ठरतात.

Mutual Funds हे योग्य तर आहेत पण आपल्यासाठी योग्य Mutual Fund निवडतांना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? -How to select good mutual fund?- हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

कोणताही म्युच्युअल फंड घेताना सर्वप्रथम आपण स्वतःची जोखीम Risk bearing capacity आणि गुंतवणूक कालावधी Investment Horizon ठरवणे गरजेचे असते. ह्यामुळे आपण स्वतःसाठी योग्य श्रेणीतील म्युच्युअल फंड Suitable category of mutual fund निवडू शकू. Mutual funds द्वारे जवळची किंवा दूरच्या कालावधीची आर्थिक उद्दिष्टे (Short term and long term financial goals) पूर्ण करू शकतो . Debt Fund हे नजीकच्या काळासाठी तर Equity Fund हे दूरच्या गरजेसाठी साजेसे असतात.

घर खरेदी करणे किंवा मुलांचे शिक्षण व लग्न, स्वतःची सेवानिवृत्ती इत्यादि लक्ष्यांसाठी वेगवगेळे फंड निवडणे जरुरी आहे.
कर वाचवण्याचे उद्दिष्ट्य असेल तर Equity Linked Saving Scheme (ELSS) श्रेणीतील फंड निवडावा लागेल. ह्यापुढे एक पाऊल टाकताना पुढे ह्या श्रेणीतील एक असा फंड निवडावा कि जो फक्त चांगला परतावाच- Return- देत नाही तर हा परतावा सातत्यपूर्ण रीतीने (Consistent) सुद्धा देतो , चढत्या बाजारातील परतावा -Return- पाहतांना अशा Mutual Fund चे पडत्या बाजारातील प्रदर्शन सुद्धा पाहणे योग्य ठरते.

how to invest in mutual funds

Step by step investing in mutual funds- Mutual Funds मध्ये गुंतवणूक करतांना खालील काही गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो.

  • आपला गुंतवणूक कालावधी आणि लक्ष्य ठरवा.
  • योग्य Category मधील Funds चा अभ्यास करा.
  • सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यातील एक चांगला फंड निवडा.
  • सगळी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून आपले एक खाते उघडा आणि त्याद्वारे Mutual Fund Investment सुरु करा.
  • नियमित अंतराने आपण निवडलेल्या Mutual Funds चे प्रदर्शन तपासा.
  • बाजारातील घडामोडीवर लक्ष्य ठेवून कधी SIP तर कधी Lumpsum गुंतवणूक करा. (सूचना: Market Movement बद्दल अभ्यास नसेल तर फक्त SIP द्वारेच गुंतवणूक सुरु ठेवा.)
  • जास्त माहिती मिळवण्यासाठी स्वतः अभ्यास करा किंवा अधिकृत Investment Advisor शी संपर्क करा.

How to invest in mutual funds?

आजकाल online mode द्वारे आपण कोणताही Mutual Fund घेऊ शकतो. ह्याखेरीज CAMS किंवा Banks द्वारे सुद्धा Mutual Fund घेऊ शकतो. Online Mode द्वारे आपण Direct Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकतो. ह्यामध्ये Expense Ratio कमी असल्यामुळे जास्त Return मिळतो.

KYC म्हणजेच Know Your Customer फॉर्म भरून आणि Pan Card, Bank Passbook, Driving License किंवा Voter Card ह्यासारखे आवश्यक ओळखपत्रे व फोटो देऊन आपण पहिला म्युच्युअल फंड सुरु करू शकतो. योग्य सेवा देणारा म्युच्युअल फंड प्रतिनिधी सुद्धा ही सगळे कामे करून देतो पण त्याद्वारे म्युच्युअल फंड योजना निवडल्यास Direct Plan ऐवजी Regular Plan मध्ये निवेश केल्या जाईल कारण त्या सेवेचे मूल्य म्हणून काही शुल्क त्याला जाईल.

सुरुवातीला जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा एकाच वेळी जास्त रक्कम गुंतवण्यापेक्षा थोडी थोडी रक्कम नियमित वेळेने गुंतवणे योग्य राहते. ह्यालाच SIP-Systematic Investment Plan- असे म्हणतात. SIP द्वारे केलेल्या गुंतवणुकीमुळे आपण शिस्त शिकतो आणि बाजारातील चढउतार नियंत्रित करतो. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा त्याच रक्कमेत अधिक Units मिळतात.

How to get maximum return in Mutual Funds?-Mutual Funds मधील गुंतवणुकीतून जास्तीत जास्त लाभ कसा मिळू शकतो?

जास्त परतावा मिळवण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घेता येतील.

  • लवकरात लवकर गुंतवणूक सुरु करावी. ह्यामुळे Compounding चा लाभ मिळू शकतो.
  • वेळोवेळी गुंतवणूक रक्कमेत वाढ करता येईल.
  • कमी Expense Ratio असलेले फंड लक्षात घेता येतील.
  • Index Funds चा अभ्यास करून काही गुंतवणूक अशा Funds मध्ये करता येईल.
  • एकंदर अर्थव्यवस्थेचा थोडा चांगला अभ्यास असेल तर Sector Funds निवडता येईल. चुकीच्या वेळेस Sector Fund निवडला तर जास्त वेळ असे फंडस् सामान्य किंवा यापेक्षा सुद्धा कमी परतावा देऊ शकतो.
  • सगळ्या Schemes मध्ये Asset Allocation ठरवणे एक चांगले पाऊल आहे. ह्यामध्ये वेगवेगळ्या Category मधील फंड निवडता येतील.
  • Systematic Transfer Plan चा उपयोग करून Entry किंवा Exit करता येईल.

हे सुद्धा वाचा: Liquid Mutual Fund म्हणजे काय?

Similar Posts

  • REIT Real Estate Investment Trust

    REIT Real Estate Investment Trust What is Real Estate Investment Trust (REIT)? REIT Real Estate Investment Trust रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी) ह्या अशा प्रकारच्या कंपनी असतात कि ज्यांचेकडे काही Real Estate जसे कि ऑफिस, अपार्टमेंट, गोदामे, व्यावसायिक केंद्र Commercial…

  • Liquid mutual funds म्हणजे काय?

    Liquid Mutual Funds हे नावाप्रमाणेच गुंतवणूकदारांना Liquidity प्रदान करतात. Liquidity म्हणजे आपल्या गुंतवणुकीला त्वरित रोख पैशामध्ये बदलणे होय. Financial Planning मध्ये liquidity ला महत्व आहे. पैशांची गरज आहे आणि ऐन वेळेवर जर गुंतवलेल्या रक्कमेला रोख स्वरूपात बदलणे शक्य झाले नाही…

  • SIP Information in Marathi-SIP म्हणजे काय?

    SIP information in marathi म्हणजेच SIP काय आहे व SIP चे गुंतवणूकदारांसाठी फायदे काय आहेत? ह्या विषयावरील हा लेख नव्याने SIP करण्याच्या विचारात असलेल्या गुंतवणूकदारांच्या उपयोगी होईल. अगोदरच Mutual fund SIP करत असलेल्या गुंतवणूकदारांना सुद्धा ह्या लेखातील काही माहिती उपयोगी…

  • |

    Asset allocation in marathi

    Asset allocation in marathi Asset allocation म्हणजे गुंतवणूक करतांना अगोदर ठरवलेली एक अशी योजना की ज्यामुळे गुंतवणुकीची एकूण रक्कम विविध Asset class मध्ये गुंतवली जाते; जेणेकरून गुंतवणुकीतील धोका कमी होईल. हे Asset Class तीन वर्गात मोडतात: Equity, Fixed Income आणि…

  • Index fund in marathi

    Index fund मधील गुंतवणूक ही आपण एक हुशार गुंतवणुक म्हणू शकतो. Index fund in marathi ह्या लेखात Index funds काय आहे व कसे काम करतात ह्याची माहिती लिहिलेली आहे. अभ्यासू वाचकांनी index fund बद्दल वाचलेले असेलच, तरीही आजूबाजूला इंडेक्स फंड…

  • म्युचुअल फंडस् विकत घेण्यापूर्वी – Mutual fund in Marathi

    Mutual fund in marathi Mutual fund in marathi Mutual fund in marathi – म्युच्युअल फंड म्हणजे काय? आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? असे प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न नव्याने Investment क्षेत्रात आलेल्या व्यक्तींना पडणे साहजिक आहे. आजच्या त्वरित माहिती युगात म्युच्युअल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *