Mini habits book in marathi

Mini habits book in marathi हे जरी रचनात्मक सवयी कशा लावून घ्याव्या? ह्यावर असले तरी Investment habits विषयात सुद्धा ह्याचा नक्कीच फायदा होतो.

Investment habits किंवा गुंतवणूक विषयात मला काही समजत नाही अशा वाक्यांना जर आपल्याला बदलायचे असेल तर ह्या क्षेत्रातील छोट्या छोट्या सवयी small habits हळू हळू आपल्यात बाणवाव्या लागतील. ह्यावर अगदीच सोप्या शब्दात बोलायचे झाले तर Mini habits book in marathi ह्याची चर्चा करणे क्रमप्राप्त ठरते.
हे पुस्तक म्हणजे Mini Habits ह्या पुस्तकाचे मराठीत रूपांतर आहे.
स्टेशनवरील पुस्तकांच्या दुकानावर पुस्तके बघत असताना एक छोटे पुस्तक नजरेस पडले. “Mini Habits: Smaller Habits, Bigger Results” “मिनी हॅबिट्स-लहान सवयींचे महान परिणाम” असे त्याचे शीर्षक होते. MINI HABIT शीर्षक वाचूनच वाटले की हे सोप्या पद्धतींचे वर्णन असलेले Marathi book असेल आणि तसे झाले सुद्धा.
आपल्या विकासात, आर्थिक क्षेत्रात सजग असणे हे देखील तेवढेच महत्वाची भूमिका बजावत असते. लेखक प्रस्तावनेत सांगतो कि Personality development म्हणजेच व्यक्तिमत्व विकासाचे अनेक रस्ते आहेत आणि स्वतः लेखकाने जवळपास दहा वर्षे वेगवेगळ्या पद्धतींवर निरनिराळे प्रयोग केले होते पण त्याचा फारसा प्रभाव लेखकाला आढळून आला नव्हता. एकदा चुकून त्यांच्याकडून एक छोटी गोष्ट झाली आणि तीच त्यांची पहिली Mini habit छोटी सवय ठरली.
Mini habits book in marathi वैशिष्ट्य
ह्या छोट्या सवयीचे एक वैशिष्ट्य होते, त्यामुळे कायमस्वरूपी बदल होत होते. Mini habit छोटी सवय म्हणजे एक असे positive approach सकारात्मक वर्तन किंवा एक सकारात्मक कृती कि जी आपण रोज करण्यासाठी आपल्याला सक्ती करू शकतो.
ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हि एक फार छोटी गोष्ट असल्यामुळे त्यात अपयश येण्याची शक्यता जवळपास नसतेच. आपल्यापैकी बरेच लोक स्वतःला चांगल्या सवयी लागाव्या म्हणून खरंच जागृत असतात. सकारात्मक कृती म्हणजे Personality development च्या क्षेत्रात ही एक महत्वाची सवय म्हणावी लागेल.
असे अनेक लोक असतात कि जे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी करण्याऐवजी येणाऱ्या वर्षात काय नवीन लक्ष्य प्राप्त करायचे ह्यासाठी विचार करतात आणि त्यासाठी संकल्प ही करतात. पण ह्यातील बरेच लोक येणाऱ्या आठवड्यात-पंधरवाड्यात आपल्याच संकल्पाला केराची टोपली दाखवतात.
त्यात त्यांचे सगळेच चुकले असे इथे म्हणायचे नाही. चूक त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीची असते. हे वाचून चांगली सवय लावायची चांगली पद्धत म्हणजे छोट्या सवयीचे Mini habit शास्त्र समजून घेणे असे वाटते.हे पुस्तक वाचल्यानंतर स्वतःला छोट्या छोट्या सवयी लावून घेण्यासाठी उत्तम पुस्तक आहे असे म्हटले तर योग्य होईल असे वाटले.
Mini habits book in marathi कसे काम करते?
लेखक एका ठिकाणी लिहितो कि जर परिणामच येणार नसतील तर मोठे संकल्पही कवडीमोल ठरतात. हे खरेच आहे; काहीच न केल्यापेक्षा थोडे थोडे काम करणे केव्हाही चांगले आहे; सुरुवात करणे Good start जास्त महत्वाचे आहे. होते काय कि कुणी मनुष्य असा संकल्प करतो कि येणाऱ्या महिन्यापासून मी रोज एक तास व्यायाम करेन; पण जर तो झालाच नाही, तर संकल्पाची काही किंमत राहत नाही.
त्यापेक्षा रोज फक्त २ पुशअप काढायचा संकल्प असला तर something is better than nothing ह्या वाक्याला अनुसरून आपला मेंदू अशा छोट्या कामाला विरोध करत नाही आणि हळू हळू आपल्याला व्यायामाची सवय सुद्धा लागते. हीच पद्धत आपण दर महिना ५०० रुपयांची नवीन गुंतवणूक सुरु करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. Mini habits book in marathi हे ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी एक उपयोगी पुस्तक आहे.
जेव्हा आपल्याला असे वाटू लागते कि हो मी ठरवलेले काम पूर्ण करतच असतो तेव्हा मग स्वतःमध्ये असा बदल घडण्याची self development सुरुवात होते आणि मग मोठे लक्ष्य goal सुद्धा आपण पार पडायला सज्ज होतो. हीच पायरी महत्वाची असते; एखादे छोटे काम सतत पार पडत गेले कि जणू आपल्याला ती सवयच लागते आणि मग एक पुशअप काढण्यासाठी सुरुवात केली कि १० पुशअप चे मोठे लक्ष्यसुद्धा पूर्ण होऊनच जाते.
Mini habits book in marathi ह्या पुस्तकात Habits and brain सवयी आणि मेंदू ह्यांचे एकमेकांशी असलेले नाते सोप्या आणि रोचक शब्दांत मांडलेले आहे. आपला मेंदू कसा काम करतो, प्रेरणा आणि इच्छाशक्ती ह्यांचा सवयींवर कसा परिणाम होतो हे सुद्धा सोप्या शब्दांत वर्णन केलेले आहे.
छोट्या सवयींचे वेगळेपण आणि छोट्या सवयींचे आठ नियम Eight rules of mini habits वाचताना ह्या सवयींचे वेगळेपण आणि परिणामकारकता जाणवायला लागते. सारांश काय कि छोट्या छोट्या कामांनी तुम्ही मोठे काम ही सहज पूर्ण करू शकता. छोट्या कामांना करायला सुरुवातीला आपण सुद्धा विरोध करत नाही आणि हळू हळू काम करण्याची सवय निर्माण होते आणि मग एकदा का आपल्याला यशाची ही गुरुकिल्ली समजली कि इतर क्षेत्रात तिचा वापर करणे आणि इच्छित लक्ष्य प्राप्त करणे आपल्याला सहजसाध्य होते.
रचनात्मक सवयी कशा लावून घ्याव्यात ह्याबद्दल स्टीफन गूज ह्या लेखकाने लिहिलेले आणि विद्या अंबिके यांनी अनुवादित केलेले मिरर प्रकाशनाचे, हे पुस्तक एखाद्यात अगोदर छोटा आणि नंतर पर्यायाने मोठा बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेन.
Mini habits book in marathi ह्या पुस्तकातील छोट्या सवयीचे शास्त्र नक्कीच आपल्या आर्थिक प्रगतीला पूरक असे सिद्ध होईल अशी खात्री आहे.
Habit ह्या विषयाशी संबंधित आणखी दोन पुस्तके मला फार आवडून गेली. ती म्हणजे Atomic habits by James Clear आणि Power of habit by Charles Duhigg. वाचकांना ह्या पुस्तकांचा देखील बराच फायदा होईल.
https://www.amazon.in/Atomic-Habits-James-Clear/dp/1847941834?crid=FYI4JPWHTQVN&dib=eyJ2IjoiMSJ9.xAoqssi61EZJQQ1VLeENK2OGZPVFZhwBYt4uERHvNuWXvYFRBr5wEZSiJOlPvb8Z076eYXe2wPUbNdgCagGdl4p4RldVN1I8nUciygi_Di8kciukLxRs6uroforRnwC05uoRbyzQkCa0P8tFSYYrYpjOCqWzMPBmAReENj5k8wJ0udL2y8w0rpH3cLmIH92LEVJzQk1asyzLTIrdTCkRW7LEYbYeLHPmFyU6fSenDxg.RchXZpiErmbZSV83kVjkK1rioruPrPxSXciwaHL7XdI&dib_tag=se&keywords=atomic+habit&qid=1732366386&s=books&sprefix=atomic+habit+marathi%2Cstripbooks%2C496&sr=1-3&linkCode=ll1&tag=abhikalne7-21&linkId=0d0ffd70f77a1c225b05fa19fca49e3b&language=en_IN&ref_=as_li_ss_tl https://www.amazon.in/Power-Habit-Why-What-Change/dp/1847946240?crid=3B4JGF2DDXM6&dib=eyJ2IjoiMSJ9.YCetDQJsCPAA28hDgF4ALDz62Eh8yMFw4JPjp8XWdEsZ08TbmFrUG40vsupdWbzAFlrb2Jup5pG_zcUbSL3gb33_KrN9P7U-E6BO5XzIKFdBjGQQNHQtWbo1MVxecxAfiuwJItKuu-OoMFngqzJfZ3aQAzD5FzjuF799dVwqeU_WPdHPmkTpHIvtXDE5yB__AN0OsG9Ww7ijc6kpwYCxMGX2iFjZhQGAL3o3Xas5mT4.sDUJFRb96xFHx3VxEoQceO33rtZQhbhbOJYq22x9fMY&dib_tag=se&keywords=power+of+habit+book&qid=1732365811&s=books&sprefix=power+of+habit+boo%2Cstripbooks%2C254&sr=1-3&linkCode=ll1&tag=abhikalne7-21&linkId=a2e2651d551fc71745bebfd4be283698&language=en_IN&ref_=as_li_ss_tlहे सुद्धा वाचा: List of my favourite investment books in marathi