मी वाचलेले पुस्तक me vachalele pustak in marathi-Retire Young Retire Rich

me vachalele pustak in marathi

me vachalele pustak in marathi मी वाचलेले पुस्तक म्हणजे रॉबर्ट कियोसाकी लिखित Retire Young Retire Rich हे कुणाच्या आर्थिक विचारांबाबत एक डोळे उघडणारे पुस्तक म्हटले तरी चालेल.

me vachalele pustak in marathi म्हणजे Robert Kiyosaki लिखित हे पुस्तक Rich Dad Poor Dad ह्या पुस्तकाचा उन्नत भाग आहे आणि आपल्या विचारांचा संपत्तीशी कसा संबंध असतो हे स्पष्ट करते.

ह्या पुस्तकात संपत्ती तयार करण्यासाठी स्वतःला कसे तयार करावे ह्याबद्दल अनुभवी Robert ने छान मार्गदर्शन केले आहे. Rich Dad Poor Dad आणि Cash Flow Quadrant च्या वाचनानंतर me vachalele pustak in marathi Retire Young Retire Rich ह्या पुस्तकाचे वाचन Personal Finance च्या जगात वाचकाला अजून खोलपर्यंत फिरवून आणते.

me vachalele pustak in marathi म्हणजे Retire Young Retire Rich मध्ये लेखक सांगतो कि Rich Dad ला David and Goliath ची गोष्ट आवडायची.  तुम्ही ही गोष्ट वाचली असेलच ज्यामध्ये Goliath सारख्या विशाल दैत्याला छोटा David एका गुल्लेरच्या आणि नदीतील दगडांच्या साहाय्याने मारतो.  Rich Dad कदाचित स्वतःला David समजत असावे कारण त्यांनीसुद्धा शून्यातून सुरुवात केली होती आणि नंतर व्यावसायिक जगतात मोठ्या मोठ्या व्यावसायिकांशी प्रतिस्पर्धा केली.  Rich Dad म्हणायचे कि David ने Goliath ला हरवले त्यामागे Leverage च्या शक्तीचा हात होता. एक साधारण युवक व गुल्लेर Goliath सारख्या विशाल दैत्यापेक्षा जास्त शक्तिशाली ठरले हीच Leverage ची ताकद होती.

me vachalele pustak in marathi

Rich Dad सांगायचे कि Cash Flow शब्द संपत्तीच्या जगात फार महत्वपूर्ण शब्द आहे.  दुसरा महत्वाचा शब्द आहे Leverage. ते म्हणत Leverage मुळेच काही लोक श्रीमंत बनतात. आता जेव्हा Leverage ताकद आहे तर त्याचा काही लोक सदुपयोग करतात आणि काही लोक दुरुपयोग.

ह्या पुस्तकात लेखक सांगतो कि श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला जे काम करायचे आहेत ते सोपे आणि सरळ आहेत. जवळपास प्रत्येकचजण ते करू शकतो. लेखकाने तीन संपत्ती सांगितल्या आहेत ज्या लोकांना श्रीमंत बनवतात आणि तरुणपणी Retire होण्याची संधी देतात.

  1. Real Estate रियल इस्टेट
  2. Paper Assets पेपर अससेट्स
  3. Business व्यवसाय

लेखकाने सर्वप्रथम मेंदूच्या शक्तीबद्दल सांगितले आहे कि मेंदूची शक्ती सगळ्यात शक्तिशाली Leverage आहे पण ह्या Leverage सोबत समस्या ही आहे कि हे तुमच्या बाजूने काम करू शकते आणि तुमच्या विरुद्ध पण.  तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर आपल्या मेंदूचा आपल्या बाजूकडून उपयोग करून घेतला पाहिजे.  बहुतांश लोक मेंदूच्या शक्तीचा उपयोग स्वतःला गरीब करण्यासाठी करतात.

Rich Dad म्हणायचे तुमचे डोके हे तुमची सगळ्यात मौल्यवान संपत्ती आहे. जर तुम्ही तुमच्या मेंदूत योग्य शब्दाचा उपयोग केला तर तुम्ही खूप श्रीमंत होऊ शकता पण जर गरीब शब्दांचा उपयोग केला तर हाच मेंदू तुम्हाला गरीब बनवण्यासाठी काम करेल.

लेखकाच्या एका मित्राने एका एका नव्या वर्षाच्या सुरवातीला एका वर्षाचा संकल्प न करता लवकर रिटायर होण्याची योजना बनवली आणि लेखकाजवळ मांडली आणि त्यावर आपण मिळून काम करूयात असे सुचवले. परंतु Robert चे डोके माझ्याजवळ जास्त पैसे नाहीत मग रिटायर कसे होणार? असे शब्द सुचवत होते. अचानक त्याला Rich Dad चे शब्द आठवले “तुमचे  सगळ्यात मोठे आव्हान तुमची स्वतःवर शंका आणि आळस आहे. जर तुम्हाला आपले वर्तमान स्वरूप बदलायचे असेल तर आत्म शंका आणि आळस ह्या गोष्टीसोबत लढायला हवे.  बदल न करणे सोपे आहे; जसे आहे तसे राहणे सोपे आहे पण हे तुमच्या उज्वल भविष्यासाठी नुकसानदायक असते”. त्यानंतर दहा वर्षांनी लेखक आर्थिक रूपाने स्वातंत्र्य झाला.

हे कसे झाले ? ह्यापेक्षा हे का झाले? हा प्रश्न महत्वपूर्ण आहे असे लेखक सांगतो.  कोणते काम कसे केल्या जाते ह्यापेक्षा ते का करावे हे महत्वपूर्ण आहे. का? ह्या शब्दामुळेच तुम्हाला प्रेरणा मिळते. Rich Dad म्हणायचे कि बरेच लोक एखाद्या कामाला करू शकतात पण करत नाहीत, कारण त्यांच्याकडे मोठा का? नसतो. जेव्हा तुम्ही का? ह्याचे उत्तर शोधाल तेव्हा  संपत्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग एकदम सोपा होतो.  आपल्याला श्रीमंत का व्हायचे आहे? ह्या कारणाचा  बहुतांश लोक आपल्या हृदयात शोध घेत नाहीत आणि म्हणूनच त्यांना योग्य रस्ता सापडत नसावा. 

ह्या पुस्तकात लेखकाने तीन भागात मेंदूचे leverage, तुमच्या योजनेचे leverage आणि तुमच्या कामाचे leverage ह्याबद्दल विस्ताराने लिहिलेले आहे. पहिल्या भागात मेंदूचे leverage स्पष्ट करतांना सर्रास आढळणाऱ्या चुकीच्या आर्थिक विचारांचे लेखकाने चांगलेच खंडन करीत आर्थिक बाबतीत नव्याने विचार करणे कसे जरुरी आहे ह्यावर भर दिला आहे. मुळात हाच भाग कुणाला कठीण वाटेल पण कमी वयात Retire होऊ इच्छिणाऱ्यांना हा भागच पुरेसे खाद्य पुरवतो. दुसऱ्या भागात योजनेचे कसे आणि किती महत्व आहे हे स्पष्ट केले आहे. तिसऱ्या भागात तुमच्या कामाचे किती leverage आहे हे लिहिताना तुमच्या सवयीचे leverage, पैशाचे leverage, रियल इस्टेट चे leverage, Paper Asset चे leverage आणि Business चे leverage ह्याबद्दल लिहिले गेले आहे.

एकंदरीत हे पुस्तक वाचकाच्या मेंदूच्या खिडक्या उघडण्यात चांगलेच यशस्वी होईल असे वाटते.

हे सुद्धा वाचा: My Favourite Book Essay in Marathi- Cash flow quadrant आर्थिक स्वातंत्रतेची किल्ली

Similar Posts

  • Rich Dad Poor Dad in Marathi – रिच डॅड पुअर डॅड

    Rich dad poor dad in marathi “श्रीमंत वडील आणि गरीब वडील” – दोन वेगवेगळ्या विचारसरणी, दोन वेगळ्या शिकवणी आणि आयुष्य बदलणारी एक कहाणी! आपल्यापैकी बहुतेक जण पैशासाठी काम करतात, पण या पुस्तकात एक धाडसी प्रश्न विचारला जातो – पैसे आपल्या…

  • Behavioral Economics: How Your Brain Cheats Your Bank Account

    Misbehaving: The Making of Behavioral Economics ह्या Richard Thaler (नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ) ह्यांच्या पुस्तकाबद्दलचा लेख Misbehaving: The Making of Behavioral Economics हे पुस्तक पारंपरिक अर्थशास्त्रातील त्रुटी दाखवून देते आणि Behavioral Economics या नव्या शाखेची सुरस कहाणी वाचकांना सांगते. “Behavioral…

  • Mini habits book in marathi

    Mini habits book in marathi हे जरी रचनात्मक सवयी कशा लावून घ्याव्या? ह्यावर असले तरी Investment habits विषयात सुद्धा ह्याचा नक्कीच फायदा होतो. Investment habits किंवा गुंतवणूक विषयात मला काही समजत नाही अशा वाक्यांना जर आपल्याला बदलायचे असेल तर ह्या…

  • Share market book in marathi

    Share market book in marathi शेअर बाजारासाठी उपयोगी पुस्तके. शेअर बाजार म्हणजे गुंतवणूकदारांचा आवडता बाजार. जो तो आपापल्या अभ्यासाने, अपेक्षेने वेगवेगळ्या कंपनीच्या share मध्ये पैसे गुंतवतो आणि त्यावर जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल ह्यासाठी प्रयत्नशील असतो. हे सगळे करतांना share…

  • |

    The Timeless Wisdom of Charlie Munger

    मला भावलेला चार्ली मंगर माझ्याकडे असलेले Poor Charlie’s Almanack हे पुस्तक नुकतेच मी वाचनासाठी हाती घेतले आणि हे पुस्तक बरेच अगोदर वाचायला हवे होते असे मला वाटले. चार्ली मंगर ह्यांचे हे पुस्तक म्हणजे जणू गुंतवणुकीच्या विषयातील एक खजिनाच असे म्हटले…

  • Value investing and Behavioral Finance

    Value investing and behavioral finance: Insights into Indian Stock Market Realities Value investing and behavioral finance Investment wisdom, Value investing, Trading tricks, Lectures, Seminars, Join our channel, Chart sites, Investment gurus ह्यांनी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया ओतप्रोत भरलेला आहे. प्रत्येक…

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *