मला आवडलेले पुस्तक Investment book in marathi, investment planning book in marathi वाचल्याने गुंतवणूक क्षेत्रात शिकतांना मला फायद्याचेच ठरले.
मला आवडलेले पुस्तक Investment book in marathi or investment planning book in marathi ह्या शीर्षकाखाली एका चांगल्या इंग्रजी पुस्तकाची मराठीमध्ये समीक्षा बघूया.
share market आणि investment वर अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत पण Behavioral Finance म्हणजे गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराचे वागणे किंवा विचार करणे ह्या विषयावर फक्त थोडी पुस्तके वाचनात येतात. वरकरणी पाहता असे वागणे किंवा विचार करणे काही जास्त महत्वाचे आहे का? हा प्रश्न वाचकांना पडणे साहजिक आहे; परंतु एखाद्या स्थितीत गुंतवणूकदार कसा विचार करतो ह्यावर बरेच काही अवलंबून असते.
लेखक म्हणतो कि इन्व्हेस्टमेंट करणे म्हणजे पैशाला कामाला लावणे होय. आज पेरलेले लगेच उद्या उगवत नाही हा जगाचा नियम आहे पण लोक तो विसरतात. मग कुणी सांगितल्याप्रमाणे अमूक अमूक शेअर विकत घ्यावा, तमूक तमूक विकावा आणि बऱ्यापैकी नुकसान करून घ्यावे असे चित्र बरेचदा पाहायला मिळते. एखाद्याचे आर्थिक निर्णय (शेअर बाजारातील गुंतवणूक संदर्भात) हे बाजाराच्या चढ उतारांशिवाय त्याच्या भावनिक बुद्धांक्यावरसुद्धा कमी जास्त प्रमाणात अवलंबून असतात. Investment book in marathi or Investment planning book in marathi वाचणे ह्यासाठी उत्तम उपाय आहे.
नवीन लोक शेअर बाजारात प्रवेश करतात. मागचा पुढचा विचार न करता १० -१२ शेअर्स मध्ये बऱ्यापैकी पैसे गुंतवून मोकळे होतात. मग त्यातील अर्ध्यापैकी जास्त शेअर घेतलेल्या किमतीपेक्षा कमी कमी होत जातात आणि गुंतवणूकदाराला असे का झाले कळत नाही. काय चुकले काही कळत नाही. कमी किमतीत विकून नुकसान सहन करण्याची त्यांची तयारी नसते; भलेही तो शेअर परत खाली खाली जात असेल. मग ते अजून विकत घेऊन ऍव्हरेजिंग करतात आणि यथावकाश काही महिन्यांनी शेअर बाजार आपल्यासाठी नाही हे घोषित करतात.
एकंदर ह्या सगळ्यात चुकले कुणाचे ? सगळ्या गोष्टींची चर्चा होते पण investor investment करताना काय विचार करून invest करतो हे काही कुणी लक्षात घेत नाही. लेखक Parag Parikh ह्यांनी investor च्या ह्याच वागणुकीवर मला आवडलेले हे पुस्तक केंद्रित केलेले आहे.
लेखकाने Behavioral Finance चे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथून एका छोट्या अभ्यासक्रमात घेतले आहे आणि त्यासोबत आपल्या शेअर ब्रोकिंगच्या व्यवसायातील विभिन्न अनुभवांची सांगड घालून ह्या पुस्तकाचा खाका तयार केलेला आहे. Investment book in marathi or Investment planning book in marathi मध्ये जरी मला आवडलेले पुस्तक हे पुस्तक English मध्ये असले तरी वाचकांना एक नवीन जग दाखवून आणते.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच एका मजेदार उदाहरणातून गुंतवणूक ही वेगवेगळे लोक कशी समजतात हे स्पष्ट केले आहे.
एका कुटुंबातील तरुण मुलगा वडिलांना म्हणतो कि मला काही पैसे पाहिजे आहेत. माझ्या मित्रांसारखे मी सुद्धा शेअर बाजारात invest करेल आणि पैसे कमावेल. वडील म्हणतात, सध्या तुझे वय शिकायचे आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण कर. अभ्यासात लक्ष घाल मग तुला चांगले मार्क भेटतील आणि मग नोकरी मिळेल हीच तुझी investment आहे.
मुलगी म्हणते कि माझा होणारा नवरा कमोडिटी बाजारात खूप काम करत असतो. त्याने मला सांगितले कि लवकरच सोन्याचे दर वाढणार आहेत त्यामुळे तुम्ही मला काही पैसे द्या; त्यातून मी सोने घेईल. माझ्या लग्नासाठी सुद्धा ती एक investment होईल.
मुलांची आई म्हणते कि तुमच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने कारखाना उभारलेला आहे; ती त्यांची investment आहे. मुले म्हणतात कि जर शेअर बाजारात एवढा सोप्या मार्गाने पैसे येतात तर बाबांना जास्त कष्ट करायची काय गरज आहे?
आई मुलांना म्हणते कि तुम्ही दोघांनी काही कुठे पैसे गुंतवायची गरज नाही. तुमच्या वडिलांनी माझ्या नावावर काही लाभांश देणारे mutual funds घेतलेले आहेत आणि काही Real Estate आहे, तेवढेच पुरे आहे.
हे सर्व ऐकून थकलेले वडील म्हणतात कि आता मी झोपायला जात आहे, मला वाटते कि Investment मोठाच किचकट विषय आहे. ह्या संभाषणातून समजते कि चौघांपैकी एकालाही Investment समजले नाही.
मुलगा-मुलगी इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलतात पण त्यांना इन्व्हेस्टमेंट काय हेच माहित नाही. वडिलांचा कारखाना आहे आणि ते मुलाला शिक्षणात लक्ष घालायला सांगून तीच त्यांचेसाठी Investment आहे हे सांगतात. आई स्वतः खरी गुंतवणूकदार आहे कारण तिच्या नावाने जमीन आणि काही Mutual Funds आहेत. पण तरीही ती Investment म्हणजे नक्की काय हे सांगू शकत नाही.
एव्हाना तुम्हाला सुद्धा कळले असेल कि प्रत्येकाला Investment in marathi चा वेगवेगळा अर्थ अभिप्रेत आहे. मला आवडलेले पुस्तकात investment म्हणजे काय, त्याचे प्रकार, Investment ची काय योजना असावी आणि Action कृती कशी करावी हे लिहिलेले आहे.
काही प्रकरण खरे मजेदार आणि वाचकांच्या डोक्याला खाद्य पुरवणारे आहेत. Behavioral Finance म्हणजे काय? कुणाचे तरी अनुसरण करून कुणी एखादा चढणारा शेअर कसा विकतो आणि पडणारा शेअर कसा विकत घेतो ह्याची चर्चा ह्या प्रकरणांत आहे. Classical Economic Theory vs Behavioral Economic Theory ह्याचे वर्णन केलेले आहे. Loss Aversion आणि Sunk Cost Fallacy म्हणजे काय हे विस्ताराने लिहिले आहे. ह्या सगळ्या गोष्टींना वाचून झाल्यानंतरच मला हे पुस्तक, मला आवडलेले पुस्तक or Investment book in marathi ह्या बिरुदासाठी अगदी योग्य वाटले.
Loss Aversion म्हणजे गमावण्याची भीती आणि Sunk Cost Fallacy म्हणजे गमावलेले पैसे विसरण्याची आपली अक्षमता. Loss Aversion म्हणजे एखादा चांगला शेअर थोड्या फायद्यात विकून लगेच बाहेर पडणे भलेही तो नंतर अधिक वाढण्याची शक्यता असो. Sunk Cost Fallacy म्हणजे चुकीचा शेअर घेतल्यानंतर तो कमी होत राहला तरीही त्याला न विकणे. Sunk Cost Fallacy म्हणजे चांगला पैसा बिना परिणामाच्या व्यक्तीवर किंवा गुंतवणुकीवर फेकणे. म्हणजे ह्यातून काही फलदायी निष्पन्न होण्याची शक्यता जवळपास नसतेच.
एखादी संस्था सुद्धा अशा लोकांना ठेवून घेते कि ज्यांच्याकडून काही फायद्याचे कामे होण्याची शक्यता नसतेच. अशा कर्मचाऱ्यांवर पैसा गुंतवणे ह्याला अर्थशास्त्राच्या भाषेत Sunk Cost असे म्हणतात. Loss Aversion म्हणजे गमावण्याची भीती. जेव्हा अजून काही चांगले भेटायची शक्यता असते तेव्हाच आपला जिंकणारा घोडा माघारी फिरवणे म्हणजे Loss Aversion.
जेव्हा सगळेच जण मंदीच्या बाजारात चांगले शेअर विकत असतात आणि कुणी घाबरून आपले पैसे फिक्स्ड डिपॉझिट करतो तेव्हा ते सुद्धा Loss Aversion चे उदाहरण असते. कारण तेव्हाच तर चांगले शेअर कमी पैशांत घ्यायचा अवसर असतो. पण पैसे कमी होतील ह्या भीतीने Investor कमी परतावा मिळाला तरी चालेल पण मूळ रक्कम कमी होता कामा नये म्हणून आपला हात मागे घेतो.
असो हे झाले बऱ्याच विस्ताराने. मला आवडलेले हे पुस्तक वाचताना काही काही Paragraph दोन तीनदा वाचावे लागले कारण लगेच काही एका वाचनात समजले नाही. खरे सांगायचे झाले तर मला हे पुस्तक पचायला थोडं जडच गेले; पण हळू हळू वाचल्यानंतर काहीतरी नवीन गवसल्यासारखे वाटते.
विषयाची खोली पाहता लेखकाने जागोजागी सोपी उदाहरणे दिली आहेत ह्याची प्रशंसा करावी लागेल. मला आवडलेले पुस्तक Investment book in marathi or Investment planning book in marathi चे वाचन आणि चिंतन केल्याने वाचक Investment विषयात नक्कीच अधिक हुशार होऊ शकतील. जे वाचक आपली गुंतवणुकीच्या ज्ञानाची पातळी थोडी अधिक वाढवू इच्छितात त्यांनी अवश्य हे पुस्तक वाचावे; जेणेकरून गर्दीच्या विचारांपासून वाचकाचे विचार नक्कीच वेगळ्या पातळीवर राहतील आणि त्याचा त्यांना फायदाच होईल.
हे सुद्धा वाचा:-Useful for investing-Who moved my cheese marathi translation