the almanack of naval ravikant summary

The Almanack of Naval Ravikant Summary

The Almanack of Naval Ravikant Summary

काही दिवसांपूर्वी मी The Almanack of Naval Ravikant: A Guide to Wealth and Happiness हे पुस्तक वाचून संपवले आणि ते मला एवढे आवडले कि त्याची एक प्रत परत बोलावून मी एका स्टार्टअपशी संबंधित अधिकाऱ्याला ते भेट म्हणून दिले.

Eric Jorgenson द्वारा लिखित हे पुस्तक नवल रविकांत ह्या भारतातून अमेरिकेत गेलेल्या उद्योजकावर लिहिलेले आहे. सुरुवातीला Naval शीर्षक पाहून मला वाटले कि हे पुस्तक कुण्या नौदलाच्या अधिकाऱ्यावर आधारित असेल. पण ते नेव्हीशी संबंधित नसून नवल ह्या नावाने होते हे मला वाचनानंतर कळले. ह्या पुस्तकाची Tagline ‘A guide to wealth and happiness’ ही आहे त्यामुळे मला ह्याबद्दल जास्त कुतूहल निर्माण झाले होते. पैसे आणि wealth ह्यात फरक आहे आणि happiness हा अजूनच एक वेगळा विषय आहे की ज्याबद्दल पैशांच्या पुस्तकात फारसे लिहिले नसते ( माझ्या अल्प वाचनातील काही पुस्तके वगळता).

वाचनाअंती ह्या पुस्तकाचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवले. ह्या पुस्तकाचे मला भावलेले एक अजून वेगळेपण म्हणजे हे पूर्ण पुस्तक वाचनासाठी इंटरनेट वर अगदी मोफत उपलब्ध आहे.

The Almanack of Naval Ravikant Summary

आपल्या यशाला कारणीभूत असलेल्या गोष्टी बरेच जण लोकांना सांगत नाहीत. ह्या पुस्तकात मात्र नवल रविकांत स्पष्टच सांगतात की ‘यशस्वी होण्यासाठी मला ज्या गोष्टी कामी आल्या त्या मी नेहमीच लोकांशी सामायिक करत होतो मात्र मी यशस्वी होण्याअगोदर बरेच लोक त्या गोष्टींकडे कानाडोळा करायचे’. ह्या पुस्तकात नवल रविकांतचे अनेक छोटे पण परिणामकारक वाक्य लिहिलेले आहेत. प्रचंड पैसे येऊनही त्याचा अजिबात गर्व नसून लोकांच्या विकासासाठी सहाय्यक गोष्टीबद्दल प्रस्तुत पुस्तकात सविस्तर चर्चा केलेली आहे.

Timeline of Naval Ravikant

Naval Ravikant ह्यांचा जन्म दिल्ली येथे १९७४ मध्ये झाला आणि वयाच्या नवव्या वर्षी १९८५ मध्ये कुटुंबासहित ते दिल्लीहून Quuens, Newyork ला गेले. २५ ते ३४ वर्षाच्या वयात त्यांनी काही startup, company स्थापन केल्या. ३४ व्या वर्षानंतर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये Investment केली आणि २०१८ मध्ये ४३ व्या वर्षी ‘Angel Investor of the Year” हा अवॉर्ड मिळाला.

नवल ह्यांच्या भाषेत Single parent कुटूंबामुळे त्यांच्या आईने त्यांना आणि त्यांच्या भावाला वाढवले. आई शाळेत काम करत असे आणि दोन्ही भाऊ दरवाजा बंद असलेल्या घरात हळहळू मोठे झाले. नवल रविकांत म्हणतात “ते कठीण असे दिवस होते पण प्रत्येकालाच कठीण परिस्थितीतून जावे लागते आणि हीच कठीण परिस्थिती मला अनेक मार्गानी पुढे सहाय्यक ठरली”. ह्यातील कठीण परिस्थितीला सकारात्मक दृष्टीने घेत नवल ह्यांनी तेव्हाच आपल्या यशाचा पाया घातला होता असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

The Almanack of Naval Ravikant Summary

शाळा सुटल्यावर नवल सरळ पुस्तकालयात जात आणि ते बंद होईपर्यंत तिथेच बसून असत. हे त्यांचे दैनंदिन वेळापत्रक असे. ते सांगतात, ‘New York मध्ये नवीन असल्याने माझे कुणी मित्र नव्हते. फक्त पुस्तके माझे खरे मित्र होते. पुस्तके खरंच चांगले मित्र असतात. कारण मागील काही शतकातील सर्वोत्तम असे लोक आपले शहाणपण पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला सांगत असतात.’ हा उतारा वाचल्यावर एवढा यशस्वी व्यावसायिक आणि गुंतवणूकदार पुस्तकांप्रती किती कृतज्ञ आहे हे जाणून लेखकाप्रती माझा आदर अजूनच वाढला. पुस्तकांच्या अशा महत्वाबद्दल पैसा मंत्र – मराठी Money Blog वर लिहायला मला नेहमीच आवडते.

लेखकाचा व्यवसाय (Startups, Business) आणि गुंतवणूक (Investment) विषयातील इतका दांडगा अनुभव असूनदेखील लेखक हे स्पष्ट सांगतो कि ‘मी शिकलेले काही तत्व आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. मी तुम्हाला काही शिकवू शकत नाही. मी फक्त तुम्हाला प्रेरित करू शकतो.’ हे देखील तेवढेच खरे आहे. पाण्यात पडल्याशिवाय पोहोता येत नाही अशी म्हण इथे सार्थ ठरते. Think and Grow Rich ह्या लेखात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपली स्वतःची किती तयारी आहे ह्यावर पुढील यश हे कसे अवलंबून असते ह्याबद्दल लिहिले आहेच. वाचक त्याबद्दल Think and Grow Rich हा लेख वाचू शकतात.

पुस्तक दोन भागात विभागलेले आहे.

Wealth आणि Happiness


Wealth ह्या भागात संपत्ती कशी निर्माण होते ह्याबद्दल लेखक लिहितो की ‘कठीण परिश्रम करणे महत्वाचे असते, पण फक्त कठीण परिश्रमच करणे तुम्हाला श्रीमंत बनवत नाही. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे?, कुण्या व्यक्तींसोबत केले पाहिजे? आणि कधी केले पाहिजे? हे माहित असायला हवे.’
नवल रविकांत पुढे लिहितात की ‘जर तुम्हाला अजूनही हे माहित नसेल कि काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम ते निश्चित करा. जर तुम्ही स्वतः नेमके काय करायला पाहिजे ह्याबद्दल निश्चित नसाल तर कठीण परिश्रम करण्याला काही महत्व उरत नाही.’

The Almanack of Naval Ravikant Summary

सारांश

The Almanack of Naval Ravikant Summary

नवल रवीकांतच्या छोट्या छोट्या वाक्यांनी मला खूपच प्रभावित केले. उदाहरणादाखल मूळ इंग्लिश भाषेतील काही वाक्य पाहूया.

  • Seek wealth, not money or status. Wealth is having assets that earn while you sleep.
  • You are not going to get rich renting out your time. You must own equity-a piece of a business- to gain your financial freedom.
  • You will get rich by giving society what it wants.
  • Pick business partners with high intelligence, energy and above all, integrity.
  • Learn to sell. Learn to build. If you can do both, you will be unstoppable.
  • When specific knowledge is taught, it is through apprenticeships, not schools.
  • There are no get rich quick schemes. Those are just someone else getting rich off you.

ह्यातील दोन वाक्ये तर मला खूपच आवडून गेली ती म्हणजे.

  • Earn with your mind and not your time.
  • If they wrote it to make money, don’t read it.

Happiness ह्या दुसऱ्या भागात सुरुवातीलाच लिहिले आहे The three big ones in life are wealth, health, and happiness. We pursue them in that order, but their importance is reverse. हे वाचून तर वाह! वाह! असे शब्द तोंडातून न निघतील तर नवलच.

ह्या भागातील लिखाण एखाद्याच्या सद्यस्थितीतील विचारांना नक्कीच आव्हान देईल. जसे कि

  • Happiness is being satisfied with what you have.
  • The greatest superpower is the ability to change yourself.
  • Desire is a contract you make with yourself to be unhappy until you get what you want.

Happiness is the absence of desire. Happiness is our choice. आनंदी राहणे ही आपली निवड आहे जो आनंदी राहण्याची निवड करत नाही तो कोठे ना कोठे कमी काढून दुःखी होईलच. ह्या भागात आरोग्याबद्दल सुद्धा लिहिलेले आहे.

नवल रविकांत ह्यांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे If they wrote it to make money, don’t read it ह्या आपल्या शब्दाला जागत The Almanack of Naval Ravikant: A Guide to Wealth and Happiness हे दर्जेदार पुस्तक हौशी वाचकांसाठी इंटरनेटवर अगदी मोफत उपलब्ध करून दिलेले आहे.

हे पुस्तक मराठी भाषेत सुद्धा अनुवादित आहे,

पण मी मूळ भाषेत म्हणजेच English मध्ये वाचलेले आहे. मला छापील पुस्तके वाचण्याची जास्त आवड असल्यामुळे मी हे पुस्तक Print स्वरूपात Amazon वरून खरेदी केलेले आहे.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!