Mahesh chander kaushik books

Mahesh chander kaushik books

Stock market मधील ताज्या घडामोडी सगळ्यांच्या समोर आहेतच. कधी वर तर कधी खाली हा तर शेअर बाजाराचा स्वभाव. परंतु आपल्या जवळ असलेले बहुतांश शेअर जर नेहमीच खालच्या बाजूने जातांना दिसत असतील तर आपली व्यवसायाची निवड कितपत योग्य? हा प्रश्न सुज्ञ गुंतवणूकदार स्वतःला विचारतात.

Stock market मध्ये काम करताना बरेचदा आपण FOMO (Fear of Missing Out) ह्याबद्दल ऐकले असेलच. दुसरे जे करतात त्याला करतांना आपण चुकलो तर काय? असे वाटते आणि एखाद्या Specific Stock मध्ये गुंतवणूक केली जाते. काही वेळ जातो आणि मग तो शेअर खालच्या दिशेने यायला सुरुवात होतो. ठेवताही येत नाही आणि विकताही येत नाही, अशी स्थिती होते.

अशा प्रसंगी पुस्तकांतील वाचनाचा फायदा होतो आणि कुणी एखाद्या मोठ्या नुकसानसापासून वाचू शकतो. मला अशा आणि इतर अनेक प्रसंगी काही पुस्तकांचा विशेष फायदा झाला. लेखक जर अशा गोष्टी सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात सिद्धहस्त असेल तर मग वाचकांना अशी पुस्तके एक पर्वणीच वाटतात.

अशीच काही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत. ह्या सगळ्या पुस्तकांचे लेखक महेश चंद्र कौशिक आहेत. महेश चंद्र कौशिक किचकट विषयाला सुद्धा अगदी सुरुवातीपासून समजावत कठीण गोष्टी साध्या सोप्या भाषेत उलगडत जातात. मी स्वतः ह्यांची सगळी पुस्तके वाचली आहेत आणि लेखकाला ह्याबद्दल प्रशंसेचा इमेल सुद्धा केला आहे.

Mahesh chander kaushik books

Option trading मध्ये माझी विशेष अशी आवड नसल्याने हे पुस्तक वगळता इतर पुस्तकांतील मजकुराचा मला फायदा झाला. हौशी वाचक ह्यातील काही किंवा सगळी पुस्तके वाचू शकतात.

  • Share Bazar Mein Safal Kaise Hon?
  • Share Market Mein Abdul Zero Se Hero Kaise Bana?
  • Share Market Mein Chandu Ne Kaise Kamaya, Chinki Ne Kaise Ganwaya?
  • Aap Bhi Ban Sakte Hain Intelligent Investor 
  • 41 Tips for Success in Share Market by Mahesh Chandra Kaushik
  • SIP Ke Chamatkar Se Financial Freedom Kaise Payen (Financial Freedom Through Systematic Investment Planning)
  • Option Trading Se Paison Ka Ped Kaise Lagayen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!