Index fund in marathi

Index fund मधील गुंतवणूक ही आपण एक हुशार गुंतवणुक म्हणू शकतो. Index fund in marathi ह्या लेखात Index funds काय आहे व कसे काम करतात ह्याची माहिती लिहिलेली आहे. अभ्यासू वाचकांनी index fund बद्दल वाचलेले असेलच, तरीही आजूबाजूला इंडेक्स फंड बद्दल तुलनेने कमी चर्चा केलेली आढळते. त्याउलट Actively managed funds बद्दल माहिती मुबलक प्रमाणात दिसते.

What is index fund in marathi? Index funds म्हणजे काय?

Index fund मधील गुंतवणूक ही आपण एक हुशार गुंतवणुक म्हणू शकतो. Index fund व्यवस्थापनेच्या बाबतीत कमी खर्चिक (Low expense ratio) असतात. Portfolio diversification साठी योग्य असतात आणि long term साठी एक चांगला परतावा देण्यासाठी सक्षम असतात. एका long term time frame मध्ये Index fund इतर अनेक प्रकारच्या फंड्सना मागे टाकण्याची ताकद ठेवतात.

Index fund हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड किंवा Exchange traded funds (ETF) असतात कि जे Passively managed असतात आणि एखाद्या Index ची हुबेहूब नक्कल करत त्या Index प्रमाणेच काही मोजक्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. Passive Management ही Active management च्या विरुद्ध गुंतवणूक शैली असते. Passive management ला “Passive strategy”, ” Passive investment” किंवा “Index investing” असेही म्हटल्या जाते.

How do index funds works? Index funds कसे काम करतात?

भारतीय बाजारात Sensex किंवा Nifty ह्या index ची नक्कल करत त्या धर्तीवर गुंतवणूक करत असलेले बरेच Index funds आपण बघू शकतो. ह्याखेरीज अजूनही अनेक सूचकांकाची -Index- (जसे कि Nifty Next 50, Nifty 100, Nifty Bank वगैरे वगैरे) नक्कल करत त्याप्रमाणे गुंतवणूक करत असलेले Index funds आहेत.

Index fund मध्ये fund manager ला सक्रिय रूपाने शेअर्स निवडण्याची गरज नसते. तो फक्त Index मधील stocks मध्ये त्या त्या प्रमाणात पैसे गुंतवतो आणि म्हणूनच ह्याला Passively managed funds असे म्हटले जाते. त्यामुळेच Index funds चा Expense ratio हा Actively managed funds च्या तुलनेत बराच कमी असतो.

Sensex आधारित एखादा Index Fund हा Sensex मधील एकूण ३० शेअर्समध्ये रक्कम गुंतवतो तसेच Nifty वर आधारित एखादा Index fund हा निफ्टी मधील एकूण ५० कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतो. आता जसा जसा हा इंडेक्स म्हणजेच Sensex किंवा Nifty प्रदर्शन करेल तसा तसा आपण निवडलेला Index fund प्रदर्शन दाखवेल.

index funds in marathi

Why should you invest in index funds?

वेगवेगळ्या strategy आणि Themes वर आधारित अनेक Actively managed funds मध्ये कुशल गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात तसेच प्रत्यक्ष stocks मध्ये सुद्धा गुंतवणूक होत असते. बहुधा कुणी निवडलेले Stocks हे वेगवेगळ्या गटाचे (Large cap, Mid cap, Small cap etc) असतात आणि आपल्या व्यवसायाप्रमाणे परतावा देत असतात. ह्याउलट Index funds हे काही ठराविक Stocks मध्ये गुंतवणूक करतात आणि त्याला चिकटून राहतात. Index मधील सगळे Stocks हे उच्च दर्जाच्या कंपन्यांचे असतात आणि (अपवादात्मक परिस्थिती सोडून) सहसा फार खराब प्रदर्शन करत नाहीत.

मला आवडलेला Index funds चा एक मोठा फायदा म्हणजे अशा गुंतवणुकीला योग्यरीत्या व्यवस्थापित (Manage) करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या स्टॉक्सची निवड व विश्लेषण करण्यासाठी जास्त वेळ देण्याची आवश्यकता नसते तरीही त्यांची गुंतवणूक दर्जेदार stocks मध्ये आपोआप होत राहते व बाजाराच्या प्रदर्शनानुसार आपले प्रदर्शन करते. ह्यात Market return नुसार सरासरी परतावा मिळतो पण कमी Expense Ratio मुळे Long term investing मध्ये हा परतावा आकर्षक सिद्ध होऊ शकतो.

Who should invest in index funds? Index Funds कोणासाठी आहेत ?

जे गुंतवणूकदार स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक तर करू इच्छितात परंतु Market च्या हालचालीवर नियमित लक्ष देण्याच्या तयारीत नाहीत त्यांचेसाठी हे Index funds उपयोगी होऊ शकतात. इथे हे लक्षात घ्यावे लागेल कि Index fund मधील ही गुंतवणूक कमी ते मध्यम जोखमीची असते आणि बाजाराच्या हालचालीनुसार त्यात बदल होत असतो. गुंतवणूकदाराला Stock Market मध्ये जरी लक्ष देण्यासाठी वेळ नसला तरीही तो नेहमीच चांगल्या शेअर्समध्येच गुंतवणूक करत राहतो.

Index Funds मधील गुंतवणुकीतून अधिक फायदा करून घेण्यासाठी कुणी अशा Index मध्ये Systematic Investment Plan द्वारे वेगवेगळ्या किंमतीवर गुंतवणूक करू शकतो किंवा Market trend चा अभ्यास केल्यास index जास्त खाली घसरल्यास अशा वेळेस अतिरिक्त खरेदी करू शकतो.

Index Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे जाणून घ्या.

  • Index Funds हे Stock Market च्या एखाद्या विशिष्ट index च्या परताव्यानुसार परतावा (Return) प्रदान करतात त्यामुळे Index Funds मधून कुणी Stock Market च्या Return पेक्षा Super Return ची अपेक्षा ठेवू नये.
  • काही कमी अधिक काळासाठी इंडेक्स एका छोट्या Range मध्ये फिरत राहतो त्यावेळची सगळी गुंतवणूक त्या Range मध्ये होत राहील. अशा वेळेस त्या गुंतवणुकीवर अगदीच जास्त असा Return कुणाला अपेक्षित नसावा.
  • Index funds हे सबुरी असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी जास्त योग्य आहेत.

हे सुद्धा वाचा: म्युचुअल फंडस् विकत घेण्यापूर्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!