SIP information in marathi म्हणजेच SIP काय आहे व SIP चे गुंतवणूकदारांसाठी फायदे काय आहेत? ह्या विषयावरील हा लेख नव्याने SIP करण्याच्या विचारात असलेल्या गुंतवणूकदारांच्या उपयोगी होईल.
अगोदरच Mutual fund SIP करत असलेल्या गुंतवणूकदारांना सुद्धा ह्या लेखातील काही माहिती उपयोगी होऊ शकते. Mutual funds बद्दल अगदीच प्राथमिक स्वरूपाची माहिती वाचण्यासाठी म्युच्युअल फंडस् विकत घेण्यापूर्वी हा लेख वाचता येईल.
नव्याने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी SIP म्हणजेच Systematic Investment Plan हा एक उत्तम पर्याय आहे. ह्याला पुढील कारणे देता येतील.
Benefits of SIP – SIP चे फायदे
- नवीन SIP Investment करणारे व्यक्ती तुलनेने गुंतवणूक क्षेत्रात कमी प्रशिक्षित असतात. SIP Systematic Investment Plan सिप द्वारे गुंतवणूक केल्यास त्यांना वेगवेगळ्या कमी अधिक किमतीत -Net Asset Value (NAV)- Mutual Fund युनिट्स मिळतात.
- ह्यामुळे एकंदर गुंतवणूक एका मोठ्या Timeframe मध्ये विभागली जाते व त्यामुळे प्रत्येक Investment Installment कमी अधिक NAV वर खरेदी केली जाते व तुलनेने गुंतवणूक अधिक सुरक्षित होते. उदाहरणादाखल चढत्या बाजारात १००० रुपये महिना गुंतवणुकीसाठी 12 रुपये NAV मध्ये 83.33 युनिट्स मिळतील तर मंदीच्या बाजारात त्याच म्युच्युअल फंड मध्ये 1000 रुपयात 100 युनिट्स मिळतील. थोडक्यात सगळे रुपये हळूहळू गुंतवल्यामुळे सरासरी NAV मध्ये गुंतवणूक शक्य होते. शिवाय नवीन गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवणुकीसाठी काही प्रशिक्षण/अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतो.
- Market Volatility मुळे निर्माण होत असलेल्या अनिश्चिततेच्या परिस्थितीत सुद्धा SIP द्वारे गुंतवणूक करणे सुरु राहते म्हणजेच Investor Greed किंवा Fear च्या जाळ्यात येत नाही.
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे SIP investing मुळे नियमित गुंतवणुकीची शिस्त लागते.
SIP CALCULATOR – SIP ची गणना कशी करावी?
एकदा का आपली प्रत्येक गुंतवणूक रक्कमेचा हप्ता – Investment installment- निश्चित झाला कि मग अशा काही SIP Calculator च्या मदतीने Maturity value चा एक अंदाज लावता येतो. जर आपले लक्ष्य -Final Investment value- निश्चित असेल तर अशा Goal based SIP planner च्या साहाय्याने किती वेळेसाठी किती रक्कम SIP द्वारे गुंतवणे जरुरी आहे हे पण ठरवता येईल.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल कि अशा Calculator मध्ये गृहीत परतावा दिल्या जातो. तो प्रत्यक्षात कमी अधिक होण्याची शक्यता नेहमीच असते म्हणून Calculated SIP goal value आणि भविष्यात प्रत्यक्षात मिळणारी रक्कम ह्यात अंतर असण्याची शक्यता असेलच.
How to invest in SIP? एसआयपी मध्ये गुंतवणुक कशी करावी?
आपल्या सोयीनुसार Mutual Fund निश्चित केला कि मग SIP Amount ठरवून एक निर्धारित तारीख नक्की करून SIP ची सुरुवात करता येईल. Online किंवा Mutual fund Agent सोबत संपर्क करून SIP सुरु करता येईल. महिन्याच्या वेगवेगळ्या तारीख मध्ये SIP केल्यास बाजाराच्या चढउतारानुसार Return मध्ये अल्पसा फरक येऊ शकतो. परंतु नियमित गुंतवणूक कायम ठेवल्यास आपल्या Investment goal नुसार योग्य कोष तयार होतो. बाजारातील अस्थिरतने म्युच्युअल फंड NAV मधील चढउतारामुळे विचलित न होता गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी गुंतवणुकीत शिस्त असणे जरुरी असते.
अशा वेळेस STP Systematic Transfer Plan चा उपयोग करून SIP सिप मध्ये अजून रक्कम जमा करता येईल. काही रक्कम Liquid fund मध्ये ठेवली असल्यास अस्थिरतेच्या काळात जेव्हा equity mutual fund NAV मूल्य कमी होते तेव्हा STP चा उपयोग करून आपल्या equity mutual fund मध्ये अतिरिक्त रक्कम गुंतवता येते.
हे सुद्धा वाचा: How to invest in mutual funds?