होम

गुंतवणुकीचे ७ प्रभावी मंत्र

वाटचाल उज्ज्वल आर्थिक भविष्याकडे

आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासात लाभदायक ठरणारे ई बुक मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.

शिका पैशांच्या गोष्टी “पैसा मंत्र” सोबत

गुंतवणुकीच्या गावातील गप्पा गोष्टी आता मराठी भाषेमध्ये.

लेखकाविषयी

अभिमन्यू (M. Tech) व्यवसायाने अभियंता आहेत. त्यांचे पदव्यूत्तर शिक्षण कृषी प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी विषयात झालेले असून ते सध्या ह्या विषयाचे प्राध्यापक आहेत. निसर्ग, पर्यावरण, शेती, शेतमाल प्रक्रिया आणि त्याचे मूल्यसंवर्धीत पदार्थ, आहार आणि पोषण, ग्रामीण विकास, छोटे व्यवसाय, गुंतवणूक, विविध विषयांवर वाचन आणि विशेषतः आर्थिक साक्षरतेवर वाचन आणि लिखाण हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.

लेखक कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक साधनांच्या विक्रीमध्ये किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही सेवा कंपनीशी संबंधित नाहीत त्यामुळे वाचक इथे लेखकाला आवडलेल्या गुंतवणूक विषयाबद्दल निःपक्षपातीपणे माहिती वाचण्याची अपेक्षा करू शकतात.

गुंतवणुकीसारख्या किचकट विषयाला सोप्या पद्धतीने लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आपल्याला आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य सामाईक करा.

पैसे आणि गुंतवणूक याविषयी अद्ययावत माहिती मिळवा फक्त एका क्लिकवर!

कस्टमझाईड फायनान्सियल प्लॅन बनवून घ्या

कस्टमझाईड फायनान्सियल प्लॅन

  • संपत्ती आणि जबाबदाऱ्या (Asset and Liabilities) ह्यांची समीक्षा व मार्गदर्शन
  • लक्ष्यानुरूप गुंतवणूक आराखडा Goal Based Planning(सेवानिवृत्ती ,मुलांचे शिक्षण ,घर ,गाडी ,आपत्कालीन निधी
    इत्यादी)
  • तुमच्या जोखीमक्षमतेनुसार गुंतवणूक साधनांची निवड (Asset Allocation)
  • कर बचतीच्या सुयोग्य योजना
  • विमा कोणता आणि किती असावा ह्याबद्दल मार्गदर्शन
  • इक्विटी साधनांकडे विशेष लक्ष ठेवून आपल्या आर्थिक ज्ञानात भर टाकण्यासाठी अनुभवी मार्गदर्शन

The Intelligent Investor मराठी आवृत्ती

गुंतवणुकीला सुरवात करण्याआधी प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

“पैसा मंत्र” बचत गुंतवणूक आणि वैयक्तिक अर्थकारणावर एक मराठी अनुदिनी आहे जिथे बचत, गुंतवणूक योजना, शेअर बाजार, म्युच्युअल फंडस् आणि वैयक्तिक अर्थकारणावर तसेच गुंतवणूक विषयावरील पुस्तकांच्या समीक्षा आणि संबंधित लिखाण वाचक वाचू शकतात. गुंतवणूक विषयात नव्याने प्रवेश करणाऱ्या वाचकांना ह्यामुळे नक्कीच लाभ मिळेल अशी आमची खात्री आहे. 

आर्थिक क्षेत्रातील व्यवहारासंबंधी जेवढे पाहिजे तेवढे शिक्षण सामान्य गुंतवणूकदारांमध्ये सहसा आढळत नाही. मराठी भाषेत अशी माहिती ही अजूनही कमी प्रमाणात आहे आणि म्हणून गुंतवणूक क्षेत्रात निःपक्षपातीपणे लिहिलेली अशी माहिती नव्याने गुंतवणूक क्षेत्रात आलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणारी आहे. आर्थिक साक्षरतेवर काम करण्याच्या हेतूने मराठी वाचकांसाठी ह्या अनुदिनीची निर्मिती झाली आहे.

जे वाचक आर्थिक क्षेत्रात अधिक शिकण्याच्या इच्छेचे आहेत आणि ह्या संबंधित माहितगार व्यक्ती, पुस्तके व इतर साहित्याच्या मदतीने नवनवीन गोष्टी शिकण्याच्या तयारीचे आहेत अशा वाचकांसाठी ह्या अनुदिनीवरील लेख उपयोगी सिद्ध होतील अशी आमची खात्री आहे. नुकतेच नोकरीत लागलेले तरुण किंवा नव्याने सुरुवात केलेले तरुण व्यावसायिक हे सुद्धा ह्या अनुदिनीच्या काही लेखांद्वारे काही साध्या परंतू भविष्यात मोठा फरक घडवणाऱ्या चुका टाळून स्वतःसाठी बचत आणि गुंतवणुकीची योजना बनवून भविष्यात लाभ करून घेऊ शकतील.

“पैसा मंत्र” ह्या अनुदिनीवर आम्हाला वाचकांची गोपनीयता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. सदर ब्लॉगवर आम्ही  वाचकांना कुठल्याही प्रकारची वैयक्तिक माहिती विचारत नाही. एखाद्या लेखावर टिप्पण्या करताना वाचक आपले नाव व ई-मेल लिहितात ती माहिती फक्त आम्हाला दिसू शकते. अशी नावे व ई-मेल आम्ही कसल्याही प्रकारे इतर लोकांना व कंपनीला देत नाही. ई-मेल चा वापर “पैसा मंत्र” वरील नवीन उपक्रमांची माहिती वाचकांना ई-मेल द्वारे देण्यासाठी केल्या जाऊ शकतो. ह्यावर अधिक माहितीसाठी आमची Privacy Policy आपण वाचू शकता.

“पैसा मंत्र” ब्लॉग वर आमच्यासाठी वाचकवर्ग सगळ्यात अधिक महत्वाचा आहे. मराठी भाषिक वाचकांना वैयक्तिक अर्थकारणावर  निखळ माहिती पुरवण्यासाठी ह्या ब्लॉग ची निर्मिती झाली आहे. ह्या अनुदिनीमध्ये आम्ही स्वतः वाचलेल्या पुस्तकांच्या समीक्षा केलेल्या आहेत व वाचकांना उपयोगी ठरणाऱ्या अशा पुस्तकांच्या अफिलियट लिंक द्वारे पुस्तके खरेदी झाल्यास वाचकांना कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त किमतीशिवाय आम्हाला अल्प प्रमाणात कमिशन मिळू शकते. ह्या ब्लॉग वर असलेल्या जाहिरातीवर क्लिक केल्यास गुगल ऍडसेन्स द्वारे आम्हाला अल्प प्रमाणात लाभ होऊ शकतो. ह्यामुळे मिळालेल्या अल्प रकमेचा उपयोग आम्हाला ह्या अनुदिनीला संचालित करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी, अजून नवीन पुस्तके, माहिती, प्रशिक्षण इत्यादी घेण्यासाठी होऊ शकतो, ज्यामुळे “पैसा मंत्र” अनुदिनीवर अजून दर्जेदार माहिती देण्यासाठी आम्हाला मदत होऊ शकते. वाचकांच्या सहकार्याने ही अनुदिनी अजून वृद्धिंगत झाल्याने आर्थिक क्षेत्रातील नवनवीन माहिती देण्यासाठी आम्ही अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरित होऊ शकू.

रिच डॅड पुअर डॅड मराठी आवृत्ती  

आपल्या गुंतवणुकीला यशस्वी  बनवण्यासाठी अत्यावश्यक गुण कोणते हे वाचण्यासाठी  अत्यंत उपयोगी पुस्तक

error: Content is protected !!