लेखकाविषयी

जहाज महाल, मांडू (मध्यप्रदेश) येथे घेतलेला क्षण – दोन तलावांच्या मध्ये उभा असलेला हा महाल निसर्गाच्या सान्निध्यात मनाला निवांत करणारा अनुभव देतो. इतिहास, सौंदर्य आणि शांततेचा अद्वितीय संगम इथे अनुभवता येतो. काही वर्षांपूर्वी इथे कदाचित ऐश्वर्य आणि वैभव असं एक समृद्ध जीवन असावं… राजे, दरबार, आणि जलमहालाचं सौंदर्य. पण आज, वेळ आणि बदलांनी दाखवून दिलंय की काहीच कायमचं राहत नाही – बदल हेच शाश्वत सत्य आहे.

अभिमन्यू काळणे (M Tech ) ह्यांचे पदव्यूत्तर शिक्षण खाद्य प्रसंस्करण अभियांत्रिकीत झाले असून ते ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. लेखक आवडीने सखोल वाचक आहे आणि विविध विषयावर वाचन करणे हा त्यांचा जोपासलेला छंद आहे. लेखकाचा गुंतवणूक विषयात विशेष ओढा आहे आणि वाचनाने, प्रशिक्षणाने, चर्चासत्रांनी अनुभवलेले ज्ञान हौशी वाचकांशी सामायिक करण्यासाठी त्यांनी “पैसा मंत्र” ह्या मराठी Money ब्लॉगMarathi Investment Blog– ची निर्मिती केली आहे. लेखकाला ग्रामीण विकास, छोटे व्यवसाय उभारणी, startups आणि मनुष्यबळ विकास HRD, प्रक्रिया व मूल्यसंवर्धीत पदार्थ व त्यांचे विपणन (Marketing) इत्यादी विषयात विशेष आवड आहे. लेखक कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक साधनांच्या विक्रीमध्ये किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही सेवा कंपनीशी संबंधित नाहीत त्यामुळे वाचक इथे लेखकाला आवडलेल्या गुंतवणूक विषयाबद्दल निःपक्षपातीपणे माहिती वाचण्याची अपेक्षा करू शकतात.
“पैसा मंत्र” Marathi Money Blog वरील लेखांवर वाचक आपल्या प्रतिक्रिया किंवा सूचना abhikalne7@rediffmail.com किंवा admin@paisamantra.in ह्या इ-मेल वर पाठवू शकतात. आपल्या प्रतिसादामुळे आम्ही नवीन लेख लिहिण्यासाठी जास्त प्रयत्नशील असू.

लेखकाचे इतर ब्लॉग: Myeblackboard

About Paisa Mantra Marathi Money Blog

“पैसा मंत्र”   ही गुंतवणूक विषयाला उलगडून दाखवणारी एक मराठी अनुदिनी आहे. ह्यामध्ये वैयक्तिक अर्थकारण (Personal Finance) तसेच शेअर बाजार, म्युच्युअल फंडस्, गुंतवणूकदारांचे मानसशास्त्र, बचतीच्या सवयी इत्यादी अनेक विषयाला वेगवेगळ्या लेखातून चर्चेला घेतले आहे. ह्याचा  एकमेव  उद्देश गुंतवणुकीच्या क्षेत्रातील माहिती सोप्या शब्दांत आणि निःपक्षपातीपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. लेखक स्वतः ह्या क्षेत्रात एक सखोल वाचक आणि प्रयत्नशील लेखक आहे आणि आपल्या अनुभवानुसार आर्थिक क्षेत्रातील लेख लिहिण्यासाठी आवडीने कार्यरत आहे.

“पैसा मंत्र”  ह्या अनुदिनीचे लेखक कोणत्याही अन्य कंपनीच्या कसल्याही प्रकारच्या गुंतवणूक साधनामध्ये विक्रीमध्ये सामील नाहीत त्यामुळे वाचक इथे योग्य आणि निखळ ज्ञानवर्धक माहिती मिळण्याची अपेक्षा करू शकतात. 

Frequently Asked Questions:

1) “पैसा मंत्र” काय आहे?

“पैसा मंत्र”  बचत गुंतवणूक आणि वैयक्तिक अर्थकारणावर एक मराठी अनुदिनी आहे जिथे  बचत,  गुंतवणूक योजना, शेअर बाजार, म्युच्युअल फंडस् आणि वैयक्तिक अर्थकारणावर तसेच गुंतवणूक विषयावरील पुस्तकांच्या समीक्षा आणि संबंधित लिखाण वाचक वाचू शकतात.

2) “पैसा मंत्र” अनुदिनीची निर्मिती का झाली?

Investment विषयात माहिती शोधत असतांना मराठीमध्ये अशी माहिती ही अजूनही तुलनेने कमी प्रमाणात आहे असे लेखकाचे मत झाले आणि म्हणून गुंतवणूक क्षेत्रात निःपक्षपातीपणे लिहिण्यासाठी व आपल्या भाषेत वाचनाचा आनंद देण्यासाठी ह्या अनुदिनीची निर्मिती झाली आहे.

3) “पैसा मंत्र” ही अनुदिनी कुणासाठी आहे ?

जे वाचक आर्थिक क्षेत्रात अधिक शिकण्याच्या इच्छेचे आहेत आणि ह्या संबंधित माहितगार व्यक्ती, पुस्तके व इतर साहित्याच्या मदतीने नवनवीन गोष्टी शिकण्याच्या तयारीचे आहेत अशा वाचकांसाठी ह्या अनुदिनीवरील लेख उपयोगी सिद्ध होतील अशी आमची खात्री आहे.

4) माझ्या वैयक्तिक माहितीचे “पैसा मंत्र” अनुदिनी काय करते ?

“पैसा मंत्र” ह्या अनुदिनीवर आम्हाला वाचकांची गोपनीयता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. सदर ब्लॉगवर आम्ही  वाचकांना कुठल्याही प्रकारची वैयक्तिक माहिती विचारत नाही. एखाद्या लेखावर टिप्पण्या करताना वाचक आपले नाव व ई-मेल लिहितात ती माहिती फक्त आम्हाला दिसू शकते. अशी नावे व ई-मेल आम्ही कसल्याही प्रकारे इतर लोकांना व कंपनीला देत नाही. ई-मेल चा वापर “पैसा मंत्र” वरील नवीन उपक्रमांची माहिती वाचकांना ई-मेल द्वारे देण्यासाठी केल्या जाऊ शकतो. ह्यावर अधिक माहितीसाठी आमची Privacy Policy आपण वाचू शकता.

5) पैसा मंत्र अनुदिनीला आर्थिक लाभ कसा होतो ?

“पैसा मंत्र” ब्लॉग वर आमच्यासाठी वाचकवर्ग सगळ्यात अधिक महत्वाचा आहे.   मराठी भाषिक वाचकांना वैयक्तिक अर्थकारणावर  निखळ माहिती पुरवण्यासाठी ह्या ब्लॉगची निर्मिती झाली आहे. ह्या अनुदिनीमध्ये आम्ही स्वतः वाचलेल्या पुस्तकांच्या समीक्षा केलेल्या आहेत व वाचकांना उपयोगी ठरणाऱ्या अशा पुस्तकांच्या अफिलियट लिंक द्वारे पुस्तके खरेदी झाल्यास वाचकांना कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त किमतीशिवाय आम्हाला अल्प प्रमाणात कमिशन  मिळू शकते. ह्या ब्लॉगवर असलेल्या जाहिरातीवर क्लिक केल्यास गुगल ऍडसेन्स द्वारे आम्हाला अल्प प्रमाणात लाभ होऊ शकतो.