मला आवडलेले पुस्तक

मला आवडलेले पुस्तक “सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माईंड” (हिंदी)

मला आवडलेले पुस्तक ह्या लेखात आज अजून एका छान पुस्तकाची ओळख करून घेऊया. “Secrets of the Millionaire Mind” हे मूळ इंग्रजी पुस्तक भाषांतरित स्वरूपात हिंदी आणि मराठी मध्ये उपलब्ध आहे.

मला आवडलेले पुस्तक

मला आवडलेले पुस्तक- पुस्तकाचे नावात जरी मिलियनेअर शब्द वापरला असला तरी हे पुस्तक वैयक्तिक अर्थकारणात सर्वसाधारण व्यक्तीसाठी तेवढेच महत्वाचे आहे. प्रस्तावनेतच लेखक टी हार्व एकर म्हणतात कि जर तुमच्या सुप्त मनाचा ‘आर्थिक ब्लूप्रिंट’ सफल होण्यासाठी ‘निर्धारित (SET)  नसेल तर तुम्ही कितीही शिका, कितीही माहिती करून घ्या किंवा अजून काही पण करा; कोणत्याही गोष्टीने काही खूप जास्त फरक पडणार नाही. 

मला आवडलेले ह्या पुस्तकात लेखक सांगतो कि काही लोकांचे श्रीमंत बनणे आणि बाकी लोकांचे गरीब बनून राहणे हे का निर्धारित होते? लहानपणी आपल्यावर पडलेले प्रभाव आपला ‘आर्थिक ब्लूप्रिंट’ कसा बनवतात?  ह्यातील भाग १ मध्ये हे सांगितलेले आहे कि आपल्यापैकी प्रत्येक मनुष्याला पैशांच्या बाबतीत विचार करण्याला आणि  काम करायला  कसे तयार केलेले आहे? आर्थिक बाबतीत ‘मानसिक ब्लूप्रिंट’  बदलण्याचे काही उपाय ह्यामध्ये सांगितलेले आहेत.  भाग २ मध्ये आर्थिक बाबतीत श्रीमंत आणि गरीब लोक कसा विचार करतात हे सांगितले आहे आणि इथे असे सिद्धांत आणि उपाय सांगितले आहेत  कि ज्यामुळे वाचकाची आर्थिक स्थिती बदलायला सुरुवात होईल.  

एकंदरीत मला आवडलेले पुस्तक- ह्या पुस्तकात लेखकाने वास्तविक पैसे कसे कमवावे ह्या ऐवजी पैशाबद्दल कसा विचार केला तर पैसा हाती येईल आणि टिकेल ह्यावर विस्ताराने लिहिलेले आहे. लेखक म्हणतो कि ‘हे कुणाला विचित्र वाटू शकते पण  ह्या गोष्टी शिकल्यानंतर माझे जुने व्यवसाय आणि नव्याने सुरु केलेल्या व्यावसायिक हालचाली सगळ्याच यशस्वीपणे वाढायला लागल्या. जर तुम्हाला जीवनात अजून उंच स्तरावर पोहोचायचे असेल तर जुन्या विचारांना सोडून नवीन पद्धतीने विचार करायला सुरुवात  करावी लागेल आणि असे केल्याने येणारे निकाल स्वतःच तुम्हाला चकित करून सोडतील.

मला आवडलेले ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखक म्हणतो कि जसे पैशांचे वरून दिसणारे काही नियम आहेत तसेच न दिसणारे पण आतून प्रभावीपणे काम करणारे सुद्धा काही नियम आहेत. काही लोकांजवळ पैसे तर खूप येतात पण ते लवकरच त्याला गमावून देतात. काही लोक एखाद्या व्यवसायात सुरुवात खूप चांगली करतात पण नंतर सगळे एकदम खाली येते. वरून जरी खराब अर्थव्यवस्था, खराब भागीदार वगैरे कारणे दिसत असतील तरी ह्या सगळ्यांच्या पलीकडे आतून हे वेगळेच कारण असते. लेखक म्हणतो कि ‘तुमच्याकडे खूप पैसे येईलसुद्धा पण जर तुम्ही त्याला सांभाळायला तयार नसाल तर ह्या गोष्टीची खूप शक्यता आहे कि हा पैसा जास्त काळ तुमच्याकडे टिकणार नाही आणि लवकरच तुम्ही त्याला गमावून बसाल.’

ह्या पुस्तकात “दौलत के सिद्धांत” ह्या शीर्षकाखाली जागोजागी काही परिणामकारक सिद्धांत दिलेले आहेत.  एक सिद्धांत सांगतो कि ‘धन परिणाम आहे, दौलत परिणाम आहे, आरोग्य परिणाम आहे, आजार परिणाम आहे, लठ्ठपणा परिणाम आहे. आपण कारण आणि परिणामाच्या जगात राहतो. आपल्याला जे सुद्धा परिणाम भेटत आहेत; ते फायद्याचे  असो वा नुकसानदायक, चांगले असो किंवा वाईट, सकारात्मक असो किंवा नकारात्मक, हे नेहमीच लक्षात घ्या कि बाहेरचे जग हे आपल्या आतील जगाचा आरसा आहे’.

एखाद्या व्यक्तीची कंडिशनिंग तीन प्रकारे कशी होते हे सांगताना लेखक लिहितो कि पहिला प्रकार म्हणजे शाब्दिक प्रोग्रामिंग म्हणजे  त्याने लहानपणी काय ऐकले होते? दुसरा प्रकार मॉडेलिंग किंवा अनुसरण म्हणजेच  त्याने लहानपणी काय पाहिले होते? आणि तिसरा प्रकार म्हणजे त्याने लहानपणी काय अनुभव केला होता? ह्या तिन्ही प्रकारावर लिहीत असताना लेखकाने स्वतःबद्दल सुद्धा उदाहरणे दिले आहेत आणि स्वतःला रिकंडिशन कसे केले ह्याबाबत जे लिहिले त्याचा वाचकांना फायदाच होतो. ह्या पुस्तकातून एक गोष्ट स्पष्टच सांगितली आहे होते कि जरी कुणाजवळ जगातील सगळे ज्ञान आणि योग्यता असेल पण त्याचा ब्लूप्रिंट जर यशासाठी निर्धारित नसेल तर आर्थिक दृष्ट्या असा व्यक्ती अपयशीच ठरण्याची दाट शक्यता असते.  

मला आवडलेले पुस्तक Secrets of the Millionaire Mind मध्ये लेखक एक अजून सिद्धांत सांगतो कि जर एखाद्याची पैसे कमावण्याची किंवा यश मिळवण्याची प्रेरणा नकारात्मक असेल; जसे कि भीती, राग, किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज तर असा पैसा किंवा यश त्या व्यक्तीला सुखी बनवू शकणार नाही. जे लोक पैसा मिळाला म्हणजे मी सुखी होईल हा विचार करत असतील अशा लोकांच्या विचारांना ह्या सिद्धांतामुळे एक ब्रेक लागणे साहजिक आहे.

अजून एका सिद्धांतात लेखक लिहितो कि पैसा ज्या क्षेत्रात कामाचा आहे त्या क्षेत्रात खूप महत्वपूर्ण आहे आणि ज्या क्षेत्रात तो काम करत नाही त्या क्षेत्रात अगदीच शुल्लक आहे. ह्यावरून काय अर्थ लागतो? कि सगळीकडे पैसा कामाचाच आहे असे मुळीच नाही. अजून एक सिद्धांतात लेखक लिहितो कि काही लोक सवयीने तक्रारकर्ते असतात. ते जिवंतपणी स्वतःला कष्ट आकर्षित  करणारे चुंबक बनतात.

एका ठिकाणी सांगितले आहे कि जे लोक खरंच श्रीमंत बनू इच्छितात ते आपल्या कामाशी समर्पित असतात पण साधारण लोक फक्त श्रीमंत बनू इच्छितात; त्याचेशी निगडित काम करायची त्यांची तयारी नसते. एक अजून सिद्धांत सांगतो कि तुम्ही स्वतःच्या कमाईला कधी कोणत्या मर्यादेत बांधू नका. इथे लेखक वाचकांना स्वतःसाठी काम करण्याचा सल्ला देतात; जेणेकरून त्यांच्या मेहनतीचा फायदा त्यांना स्वतःला होऊ लागेल. एक आणखी सिद्धांत सांगतो कि श्रीमंत स्वतःच्या पैशाकडून खूप काम करवून घेतात आणि गरीब लोक पैशांसाठी खूप काम करतात.  

थोडक्यात मला आवडलेले हे पुस्तक जरी पैशांशी निगडित असले तरी सुद्धा आपल्या विचाराच्या सवयी आपल्याला कसे व कुठे थांबवायचा प्रयत्न करतात ह्यावर वाचकाला विचार करायला भाग पाडते. वेगवेगळ्या सिद्धांतात खूप परिणामकारक नियम सोप्या पद्धतीने आणि उदाहरणासहित स्पष्ट केले आहेत. वैयक्तिक अर्थकारणात अधिक  शिकू इच्छिणाऱ्या वाचकाच्या संग्रही असले पुस्तक हवेच असे वाटते.

हे सुद्धा वाचा:Investment Book in Marathi Stocks to Riches

Similar Posts

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *